पक्ष्यांच्या वर्गिकरणाविषयी थोडी माहिती
वाढ आणि रचना ह्यांमधील मूलभूत फरकावर आधारित अशा २७ गणांमधे (Order) पक्षीवर्गाचे वर्गीकरण केले जाते. उदा. कुलिंग गणातील पक्षी (Order Passeriformes) म्हणजे झाडावर राहणारे पक्षी, आणि हेच पक्षी आपल्या जास्त परिचयाचे असण्याचा संभव असतो. पाण्याजवळ आपले जीवन व्यतीत करणारे बगळ्यासारखे पक्षी बक गणात (Order Ciconiiformes) अंतर्भूत होतात तर बदके, हंस ह्यांसारख्या पाण्यात राहणाऱ्या पक्ष्यांचा वर्ग म्हणजे हंस गण (Order Anseriformes)
गणांचे आणखी कुलांमध्ये (Families) पृथक्करण करण्यात येते. एका कुलामधील पक्ष्यांचे महत्वाचे गुण सारखेच असतात. कुलिंग गणातील पक्षी म्हणजेच फांदीवर बसणारे पक्षी. ह्या गणात एकूण ४० कुले आहेत. त्यात नाचरे (Muscicapidae), कावळे (Corvidae), फुलचुब (Nectariniidae) ह्यांसारखे पक्षी आहेत. ही कुले म्हणजे खरोखरीचीच कुटुंबे आहेत कारण प्रत्येक कुलात अनेक प्रजाती असतात. प्रजातींमध्ये विकास पावलेले पुष्कळच गुण सारखे असतात आणि त्यामुळे दिसण्यात आणि आचरणात सारखेच दिसतात. ह्या सवयींचे प्रत्यंतर चोच आणि पंजा ह्यांचे आकार, काही वेळा पंख आणि साधारण आकार व हालचाल ह्यांत दिसते. अन्नसाधनांच्या पद्धतीवर चोच आणि पाय ह्यांची रचना अवलंबून असते. पुष्कळ वेळा एखाद्या अनोळखी पक्ष्याची जात जरी सांगता आली नाही तरी त्याचे कुल लगेच सांता येते.
बऱ्याचशा सारख्या गुणांच्या प्रजातीच्या समूहाला गोत्र (Genus) म्हणतात. गोत्र कुलापेक्षा खालच्या वर्गाचे असते किंवा दुसऱ्या शब्दात कुलाचे गोत्रात वर्गीकरण केले जाते. केवळ सोईसाठी सारख्या गुणांच्या प्रजाती एकत्र करुन गोत्राची निर्मिती केली आहे. शास्त्रीय नावांमधील पहिले नाव गोत्राचे असते. एवढ्यापुरताच गोत्राचा संबंध आहे. गोत्रामधील सर्व पक्ष्यांचे पहिले नाव एकच असते. उदा. कावळ्यांच्या अनेक जाती आहेत परंतु त्यांच्यामध्येही काही समान गुण असल्यामुळे त्यांना कॉरव्हस (Corvus) या एकाच गोत्रात गोवले आहे.
गोत्राची विभागणी निरनिराळ्या जातींमध्ये (Species) करणे ही शेवटची पायरी आहे. जात एक नैसर्गिक घटक आहे. आंतर निपज करुन जातींची कसोटी ठरविण्यात येते. एका जातीत सारख्या गुणधर्माचे वेगवेगळे पक्षी असतात. त्यांच्यात पुनरुत्पादन होऊ शकते. सभोवतालच्या प्रदेशाची रचना व हवामान ह्यामुळे काही वेळा एकाच जातीच्या पक्ष्यांमध्ये आकार आणि पिसांचे रंग ह्यात फरक आढळून येतात. उत्तर भागात राहणारे पक्षी दक्षिणेकडे राहणाऱ्या पक्ष्यांपेक्षा साधारण आकाराने मोठे असतात. किंवा दमट हवेत राहणाऱ्या पक्ष्यांचे रंग कोरड्या हवेत राहणाऱ्या पक्ष्यांपेक्षा जरा जास्त गडद असतात. जाती अंतर्गत असे अनेक सूक्ष्म भेद असू शकतात. हे फरक जर अधिक स्पष्ट व कायमचे असतील तर त्या जातीच्या उपजाती आणि वंश ह्यात आणखी भेद करतात. परंतू निरनिराळ्या वंशांमधील पक्ष्यांची आंतरनिपज होऊन सुद्धा जात ती राहिल्यामुळे जात ही वर्गीकरणाचा घटक म्हणून राहतेच.
प्रत्येक पक्ष्याचे गोत्र ठरवून त्याचे कुल आणि जात निश्चित करता येते. सध्या पृथ्वीवर पक्ष्यांच्या ८६५० जाती आहेत. हे पक्षी ज्या २७ गणात विभागलेले आहेत त्या गणांचा अनुक्रम सर्वात कमी प्रगत अशा वंजुल (Grebe) आणि मंजूक (Divers) पक्ष्यांपासून सुरु होऊन अतिशय प्रगत अशा फांदीधारी (Perching) पक्ष्यांपर्यंत शेवट होतो. भारतामधील १२०० पक्ष्यांच्या जाती ७५ कुलांचे प्रतिनिधित्व करतात.
(वरील माहिती सलिम अली यांच्या भारतीय पक्षी या पुस्तकातून जशीच्या तशी घेतली आहे)
-----------हरिहर (शाली)
हा आमचा सोसायटी मेंबर
हा आमचा सोसायटी मेंबर असल्यासारखा येथेच वावरतो. आज काही पक्षी पहायला गेलो नाही. नेहमीच्या जागेवर हा आणि ब्ल्यू थ्रश फिमेल दिसले. हा गजावर व ती भिंतीवर बसलेलेच असतात रोज संध्याकाळी.
White Throated Kingfisher

Pune
3 Dec (5:45 pm)
निळा कस्तूर (मादी)
निळा कस्तूर (मादी)

Blue Rock Thrush (Female)
Pune
3 Dec (5:45 pm)
खंड्या भारीच
खंड्या भारीच
आमच्याकडे सकाळचा गजर असतो ह्याचा
येस्स!
येस्स!
सकाळी याची मस्त किलकारी ऐकू येते मग हा येतो.
मला खात्री नाही हा इंडीगो आहे
मला खात्री नाही हा इंडीगो आहे का पण ९५% हा इंडीगो बंटींगची फिमेल आहे. पुन्हा क्लिअर फोटो मिळेल तेंव्हा समजेल. या बंटींगचा मेल निळा असुन फार सुंदर असतो.
Indigo Bunting (Female)

Pune (wgli)
4 Dec (7:00 am)
निलपंख
निलपंख

Indian Roller (Coracias benghalensis)
Pune (Shikrapur)
5 Dec (5:15 pm)
अतिसुंदर....
अतिसुंदर....
राखी मानेचा भारीट
राखी मानेचा भारीट

Grey-necked Bunting
Pune (Shikrapur)
5 Dec (5:30 pm)
भारीट भारी आहे
भारीट भारी आहे

निलपंख जरा चिडलाय बरं का. "फोटो कसले काढता " असा लुक देतोय.
निळा कस्तुरीही चिडु चिडू लुक
मोर
मोर

Peafowl (Pavo cristatus)
Pune (wadi)
5 Dec (5:30 pm)
सामो, निलपंख नेहमीच त्रासलेला
सामो, निलपंख नेहमीच त्रासलेला दिसतो.
फार सावध पक्षी आहे. ब्लू थ्रशही फार लाजाळू आहे.
>>>>>>>सामो, निलपंख नेहमीच
>>>>>>>सामो, निलपंख नेहमीच त्रासलेला दिसतो. Wink>>>> हाहाहा
Red vented Bulbul
Red vented Bulbul

Pune (Wadi)
5 Dec (5:00 pm)
Indigo Bunting (Female)
Indigo Bunting (Female)
Pune (wgli)
4 Dec (7:00 am)>>>>>> मी तर हिला चिमणी समजले असते.
रच्याकने काल आईशी या धाग्यावरून बोलताना आई, तिच्या गावच्या आठवणी सांगत होती.धोबी पक्षाला, तिच्या गावी गावकरी सुकना म्हणतात.तर बाबा असं का म्हणतात तर "शेपूट लवकर वाळूक होयी, म्हणून तो शेपूट खालीवर आपटत सुक ना,सुक ना म्हणता." आता मजेचा भाग किती हे ते गावकरी जाणोत.
आठ दिवसांच्या सुट्टीवर आजोळी
आठ दिवसांच्या सुट्टीवर आजोळी आलो आहे. येथेही तेच तेच पक्षी दिसत आहेत. पण येथे शांतता असल्याने निरिक्षण व्यवस्थित करता येते आहे. १५-२० दिवसांपुर्वी मी पुण्यामधे निलपंख पाहीला पण वेळेअभावी त्याचे निरिक्षण करता आले नाही. येथे खुप निलपंख असल्याने त्यांचा मागोवा घेता येतो आहे. हा अन्न कसे मिळवतो हा मला प्रश्न होता. आज सकाळी मी याला विजेच्या तारेवर बसलेला पाहीले. जरा वेळाने त्याने खाली असलेल्या शेतात सुर मारला व तो पुन्हा तारेवर येवून बसला तेंव्हा त्याच्या चोचीत मातीत घर करणारा मोठा किडा होता. दहा मिनिटात मी त्याला सहा वेळा सुर मारताना पाहीले. त्यात चार वेळा त्याची शिकार सुटली असावी. कारण मग तो जमीनीवरच बसून राहीला व किडा मिळाल्यावरच तारेवर येवून बसला. खंड्या आणि याच्या शिकार करण्यात बरेच साम्य दिसले. फरक एवढाच की खंड्या वेगात पाण्यात सुर मारतो व निलपंख जलद गतीने जमीनीवर उतरुन बसतो.

निलपंख, तास, चाष, टटास
Indian Roller
Pune (Wadi)
6 Dec (9:30 am)
देवकी, सुकना नावाची कथा
देवकी, सुकना नावाची कथा मजेदार आहे. आता मला तो जेंव्हा जेंव्हा दिसेल मला तो शेपटीला विनवनी करतोय असेच वाटेल. प्लिज सुक ना.
वॅगटेल ऐवजी हेच नाव आता लक्षात राहणार.
आज सकाळी तारवाली भिंगरी दिसली
आज सकाळी तारवाली भिंगरी दिसली पण गम्मत म्हणजे तिला तारच नव्हती. तार हीच तिची ओळख असल्याने मला ती एकदम वेगळीच वाटली. मला वाटते कदाचित ती पिल्लू भिंगरी असावी. दिसायला पुर्ण वाढ झाल्यासारखी दिसत होती. पिल्लांना तार कधी येते याची चौकशी करावी लागेल. किंवा काही कारणाने त्यांची तार गळून वगैरे पडते का हे ही शोधले पाहिजे.
तारवाली भिंगरी

Wire-tailed Swallow
Pune (Wadi)
6 Dec (7:30 am)
काल एकच भारीट दिसली होती.
काल एकच भारीट दिसली होती. फोटोही व्यवस्थित मिळाला नव्हता. आज भारीटचा लहानसा थवा शेतात साठलेल्या पाण्याजवळ दिसला. शेजारी कोकारी, स्ट्रॉबेरी फिंच, चिमणी, स्टोनचाट असे वेगवेगळे पक्षी होते. सगळ्या भारीटांनी अंघोळ केली असावी. किंवा फक्त पंख साफ करण्याचे काम सुरु असावे. दिवसाची सुरवात साफसफाईने करताना भारीट दिसली. व्यवस्थित पाहिले नाही तर ही चिमणी असल्यासारखे वाटू शकते. थोडे व्यवस्थित पाहीले की तिचे करड्या रंगांचे डोके व डोळ्यांवरचा पांढरा चष्मा लगेच उठून दिसतो. ही तिला ओळखायची महत्वाची खुण आहे.
राखी मानेचा भारीट

Grey-necked Bunting
Pune (Wadi)
6 Dec (7:45 am)
सगळे फोटो भारीच
सगळे फोटो भारीच
निरीक्षण पण मस्त, निलपंख मी ही नेहमी वायरवर बसतानाच पाहिलाय
देवराईत एकच फॅन टेलची जोडी
देवराईत एकच फॅन टेलची जोडी आहे. तिचा मुड असेल तेंव्हाच दिसणार. पण येथे मात्र जवळ जवळ प्रत्येक झाडांवर एक दोन जोड्या आहेतच नाचराच्या. आणि प्रत्येक झाडाला राखन असावा तसा एक तांबट (बार्बेट) दिसतोच.
नाचरा, नाचन

Fan Tailed
Pune (Wadi)
काळी शराटी नेहमी पाणथळ जागी
धन्यवाद ऋतुराज!
काळी शराटी नेहमी पाणथळ जागी पहायची सवय आहे मला. पण येथे एकूलता एक मोबाईल टॉवर आहे. त्यावर या शराटींची अगदी गर्दी होते. ते कशासाठी बसत असावेत तेथे? आजूबाजूला उंच झाडे आहेत पण तरीही या शराटी येथेच बसताना दिसल्या. हे आजच झाले की त्यांची ही नेहमीची जागा आहे विश्रांतीची हे लवकरच समजेल. मानवाचा हस्तक्षेप या पक्षांची वाट लावणार हे नक्की.
काळी शराटी

Red-napped ibis
Pune (Wadi)
6 Dec (8:15 am)
मला कुणीतरी सांगितले की
मला कुणीतरी सांगितले की चक्रवाक दिसणे बऱ्यापैकी दुर्मिळ आहे. पण मागच्या आठवड्यात मला कवडीपाटला (हडपसर) दोन जोड्या दिसल्या होत्या. येथे माझ्या आजोळी येताना मला मोराच्या चिंचोलीजवळ आज दोन चक्रवाक दिसले. एक पानकावळा व एक टिबूकलीही होती.
Ruddy Shelduck

Pune (Morachi chincholi)
6 Dec (11:00 am)
पक्षी पहायला घराबाहेर पडले की
पक्षी पहायला घराबाहेर पडले की स्टोनचाट, बुशचाट, रॉबीन, बॅबलर, बुलबुल आणि श्राईक हे अगदी दिसतात म्हणजे दिसतातच. एक वेळ चिमण्या व कावळे दिसणार नाहीत पण वरील पक्षी दिसतातच. वरील पैकी एक नाही तर सगळेच्या सगळे हजेरी लावतात. कदाचित हे महिने त्यांच्या विणिची किंवा मुबलक खाद्याचे असतील. वर्षभर दिसतात का याकडे लक्ष ठेवले पाहीजे.
गप्पीदास

Stonechat
Pune (Wadi)
6 Dec (11:30 am)
पाणकावळा
पाणकावळा

Little Cormorant (Microcarbo niger)
Pune (Wadi)
6 Dec (8:00 am)
पाणकावळा जुव्हेनाईल दिसतोय.
पाणकावळा जुव्हेनाईल दिसतोय. ते यडचॅप एक्स्प्रेशन तरी तसच सुचवतय.
Juvenile नाहीए. पाण्यातून
Juvenile नाहीए. पाण्यातून नुकताच बाहेर आला आहे. आणि या पाणकावळ्यांचे चेहरे वेंधळ्यासारखेच दिसतात मला तरी. जशी स्ट्रॉबेरी फिंच वैतागलेली दिसते, घुबड उत्सूक दिसते, पोपट चावट दिसतो तसे.

हा Juvenile आहे.
>>>आणि या पाणकावळ्यांचे चेहरे
>>>आणि या पाणकावळ्यांचे चेहरे वेंधळ्यासारखेच दिसतात मला तरी. जशी स्ट्रॉबेरी फिंच वैतागलेली दिसते, घुबड उत्सूक दिसते, पोपट चावट दिसतो तसे. Lol>>>>> हाहाहा मस्त!!!
जुव्हेनाईल बिचारं अजुनच वेंधळं आहे
पोपट, कीर
पोपट, कीर

आज हा एकटा फिरताना दिसला. सर्व पोपट शक्यतो थव्याने फिरतात. हा भांडण करुन किंवा रस्ता भटकून एकटा पडला असावा.
rose-ringed parakeet (Psittacula krameri)
Pune (Wadi)
6 Dec (8:30 am)
>>>>>>हा भांडण करुन>>>>
>>>>>>हा भांडण करुन>>>> हाहाहा तीच शक्यता जास्त आहे.
.
मी ऐकलेले आहे की पोपट फार आक्रमक असतात. यु के मध्ये इतर पक्ष्यांकरता, पोपट हे कर्दनकाळ होउन बसलेत. फार त्राही माम करुन सोडलय इतर पक्ष्यांना. कितपत खरे आहे माहीत नाही पण बातमीचा सोर्स - ऑथेन्टिक आहे . नवरा
गुलाबी चटक किंवा गोरली.
गुलाबी चटक किंवा गोरली.

ही या अगोदरही मला दिसली होती पण त्यावेळीही तिचे डोके पुर्ण गुलाबी नव्हते. बहुतेक Juvenile असावे. याची मला काहीच माहीत नाही. मक्याच्या तुऱ्यावर बसली होती. शेजारीच सिल्व्हर बिल व स्ट्रॉबेरी फिंचचा थवा होता. पिवळा परिटही जवळच वावरत होता.
Pages