फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37

मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले Happy

फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !

महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.

आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कर्नाटकात माजी मुख्यमंत्यांना रडवलं गेल्या आठवड्यात एक प्रचारसभेत! Happy कर्नाटकात काही प्रॉब्लेम नाही. शिवाय सूनबाईचा आणि युवराजांचा book-keeper आहेच मदतीला, भाजपाच्या.

हे सरकार पाच वर्ष काय पाच दिवस जरी टिकले तरी शेठ चा व्हायचा तो पोपट झाला आहे. एक काळ anti-काँग्रेसी विचारसरणीने गाजवला, हे सरकार अँटी- बीजेपी समीकरणांची सुरुवात आहे.

काही दिवसांपूर्वी इथे सुबोध खरे साहेबांनी पवार आणि ठाकरे कुटुंबिय एकमेकांचे नातलग असल्याचा गौप्यस्फोट (त्यांच्यामते) केला होता.>>> Rofl Rofl

विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन.
जयंत पाटलांनी त्यांच्यासाठी केलेल़ं भाषण गोड आणि खुसखुशीत होतं.

पटोले म्हणाले, “विधानसभेतील विरोधी पक्ष नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मान्यता देण्यात यावी अशी विनंती भाजपाने आपल्याकडे केली आहे. त्यामुळे अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मी भाजपाला मान्यता देत आहे. तसेच भाजपाने गटनेते देवेंद्र फडणवीस हे १ डिसेंबर २०१९ पासून विरोधी पक्ष नेते असतील असे मी जाहीर करतो.”

दरम्यान, फडणवीस यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, या दिवसाची मला अपेक्ष नव्हती, मी इथं येईन अस कधीही म्हटलं नव्हत पण आलो, अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला. आज मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, २५ ते ३० वर्षे जे आमच्या विरोधात होते ते मित्र झालेत तर जे मित्र होते ते आज विरोधात बसलेत. फडणवीसांशी असलेली मैत्री आपण कधीही लपवलेली नाही त्यांच्याकडून मी ५ वर्षांत बरचं काही शिकलो. कुठलीही गोष्ट मी काळोखात केली नाही. पदावर बसून न्याय देऊ शकलो नाही तर मी अपराधी, असेन असेही यावेळी ठाकरे म्हणाले.

फडणवीसांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड योग्य. ते एक अभ्यासून नेते आहेत. गेली ५ वर्षे त्यांनी चांगलं काम केलं. एखादा विषय समजून घेऊन प्रश्न सोडवले. सैन्याला आत्मविश्वास वाटावा यासाठी मी पुन्हा येईन असं त्यांनी सांगितलं. पण मी कुठे बसेन हे त्यांनी सांगितलं नव्हतं अशा शब्दांत जयंत पाटील यांनी फडणवीसांचे अभिनंदन करताना कोटी केली.

जयंत पाटलांनी फडणवीसांकडे सदसद्विवेकबुद्धी आहे. ते पाच वर्षं कोणाच्याही जागा बदलायचा प्रयत्न करणार नाहीत किंवा त्याला उत्तेजन देणारी नाहीत, असं म्हटलं.

जयंत पाटील म्हणाले, सभागृहात शांतता राहिली पाहिजे. वेलच्या जवळ जाणे योग्य नाही सभात्याग करायचाच असेल तर शिस्त पाळत कालच्याप्रमाणे बाहेर निघून गेलात तरी चालेल. वॉक आऊट करायच्या प्रथा ज्या आहेत त्या देखील आपण गटनेत्यांसोबत बसून ठरवल्या पाहिजेत, अशी अपेक्षा करताना त्यांनी पंतप्रधान मोदींच्या विधानाचा दाखला दिला. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मोदींनाही हेच अपेक्षित असल्याचे सांगत त्यांनी भाजपाला टोला लगावला.

आता पुढील चर्चा विरोधकांनी काढलेल्या "ठाकरे सरकारवर जागता पहारा" किंवा समर्थकांनी काढलेल्या "विरोधीपक्षावर जागता पहारा" धाग्यावर व्हायला हवी ना. Wink

https://www.loksatta.com/mumbai-news/bjp-leader-devendra-fadnavis-has-be...

समोर कुणी पैलवान नाही, विरोधक नाही अशा वल्गना करणाऱ्यावर विरोधी पक्षात बसायची वेळ यावी याला निव्वळ नियतीचा खेळ म्हणता येत नाही. गर्वाचे घर खाली या उक्तीचे हे उत्तम उदाहरण आहे.

अमित शहाजी,
उद्योगपति सरकार विरुद्ध बोलायला घाबरतात, हे असे यूपीए सरकारच्या वेळी होत नव्हते..
माझे नाव राहुल आहे, कदाचित तुम्हाला ते आवडणार नाही, पण ते जवाहरलाल नेहरू यांनी ठेवले आहे.
राहुल बजाज..

भरत धन्यवाद.

मी युतीच्याच बाजूने होते. तिथे उद्धव यांना मुख्यमंत्री झालेलं बघायला आवडलं असतं, देवेंद्र यांनाही, ते मला आवडतात. उद्धव , देवेंद्र एकत्र असते तर नक्कीच आवडलं असतं. त्यांची मैत्री टीकावी. उद्धव यांचा मृदु स्वभाव, प्रसंगी थोडं कठोर होणं पण क्वचित अगदी, हेही आवडतं मला.

बाकी कुठलंही सरकार लवकर नीटपणे यावं आणि प्रश्न मार्गी लागावे असं वाटत होतं पण सर्वच गोंधळ सुरु होता अगदी, तो मात्र बघवत नव्हता.

आता खरंच जनतेचे प्रश्न सोडवावेत, नवीन सरकारला शुभेच्छा.

विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन >>> माझ्याकडूनही.

जागता पहारा वगैरे जेव्हा भाजपा massive mandate मिळवून सत्ताधारी होते तेव्हा sore losers करतात. दहीहंडीच्या गोविंदाला कोणी पहारा ठेवत नाही ते स्वतःच आपापले पडतात Happy शिवाय ते काही cheating करत नाहीयेत बघायला सगळं जग असतं Happy

अमित शहाजी,
उद्योगपति सरकार विरुद्ध बोलायला घाबरतात, हे असे यूपीए सरकारच्या वेळी होत नव्हते..
माझे नाव राहुल आहे, कदाचित तुम्हाला ते आवडणार नाही, पण ते जवाहरलाल नेहरू यांनी ठेवले आहे.
राहुल बजाज..

नवीन Submitted by BLACKCAT on 1 December, 2019 - 14:32 >>>

अगदी अगदी, यु पी ए च्या काळात तर एक फोन रोबोटला केला की कर्जवसुली पुढे ढकलली जात होती... आता ते होत नाही.

रोबोट म्हणतो की उद्योगपती लोकांकडे ते "चोर" असल्याच्या दृष्टिकोनातून बघू नका. तिथे त्याचा मालक सुटबुट वाली सरकार म्हणून विरोधी प्रचार करत असतो. याना गंभीरपणे घ्यायला यांचे आधी पक्षांतर्गत विचार जुळले पाहिजेत ना !

>>> अगदी अगदी, यु पी ए च्या काळात तर एक फोन रोबोटला केला की कर्जवसुली पुढे ढकलली जात होती... आता ते होत नाही. >>>

मल्याला विनातारण कर्ज रोबोटच्या (म्हणजेच मालकीण बाईंच्या) आदेशानुसारच दिलं गेलं होतं.

ज्यांना विजय पचवता येत नाही त्यांच्याकडून पराभव पचवण्याची अपेक्षा नाही.
Submitted by भरत. on 1 December, 2019 - 15:01
<<
41.gif

And about that claim of relationships LOL.
कित्ती निर्लज्जपणे खोटे बोलतात हे संघोटे!

एक मोत्या गळाला, 105 गारगोट्या हरवल्या आणि फेसबुकवर लाख बांगडी फुटली, चिल्लर खुर्दा किती गेला याची तर गणनाच नाही.
खार्का बदामा अक्षरशा: आकाशी उडाल्या ....

Proud
धरणात पाणीपत झाले...
त्यांनी पाणी दाखवलं
यांची पत गेली

बिळात गरम पाणी किंवा धूर सोडल्यानंतर आतली उंदरं बाहेर येऊन सैरावैरा धावत सुटतात, तसे लपलेले कॉंग्रेसी बाहेर आलेत.

ज्यांना विजय पचवता येत नाही त्यांच्याकडून पराभव पचवण्याची अपेक्षा नाही.
Submitted by भरत. on 1 December, 2019 - 15:01>>

च्यामारी, तरीच एव्हढी दुतोंडी खदखद मोदींविरुद्ध निघत होती, असो विजय पचवायची ताकत तुम्हाला ईश्वर देवो...

कित्ती निर्लज्जपणे खोटे बोलतात हे संघोटे!

Submitted by आ.रा.रा. on 1 December, 2019 - 19:17 >>>
संघ वाल्यांना ती अफवा पसरवून काय मिळणार?
राकाँग्रेस - शिसे बॉण्ड किती मजबूत होणार हे दाखवायला कुठल्यातरी मोदींविरोधक लंगोट्याने च ती अफवा पसरवली असावी.

संघ वाल्यांना ती अफवा पसरवून काय मिळणार?
<<
मग असले भिकारडे खोटे मेसेज तुम्ही सो कॉल्ड सुशिक्षित का फॉर्वर्ड करता?

अ‍ॅबसोल्यूट विकृत आहात लेको.

तुमचा लाडका संघोट्या सुबोध खरे ती बातमी लिहिता झाला इथे मायबोलीवर.

सगळं ठाऊक असूनही परत निर्लज्जपणे उलट आरोप? अरेरे.

आमचे काँग्रेस राष्ट्रवादीवाले लग्ने लपवून ठेवत नाहीत, मिरवून , सर्वाना जेवायला घालून फोटू काढून ठेवतात,

लग्ने लपवून नन्तर पत्रकारांनी बाईला आणून समोर बायको म्हणून उभे करायला ते काय नरोबा लोखंडे आहेत ??!!

Proud

Pages