फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37

मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले Happy

फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !

महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.

आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही बसा जानवं आणि शेंडी करत. जातीधर्माचं राजकारण करत.

प्रबोधनकार आणि ब्राम्हणद्वेष हे मुद्दे तुम्ही आणलेत. असं करण्याला जातीचं राजकारण म्हणतात. तुमच्या मुद्द्यांना मी फक्त खोडून काढलं कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दल वाचलेलं आहे.
बाकी भाजपने अनेक स्टेट लेव्हलची सत्ता गमावली हे खरंय. पण फडणवीस चंपा जोडीवर माझा अगदीच राग होता त्यामुळे जे झालं ते ठीकच झालं. एमपी राजस्थान नंतर पुन्हा लोकसभेला भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं त्यामुळे जनमत कसंही फिरतं, कोणीच गृहीत धरू नये. लोकसभेला विरोधकांनी एकत्र येऊन पवारांना पीएम उमेदवार डिक्लेअर केलं असतं आणि भाजपला २७१ सीट भेटले असते तर आज मोदी विरोधी पक्षनेते असते! पण मराठी माणसाला दिल्ली चं तख्त नशिबात नाहीच.

विकास दर ४.५ % ! तोही नव्या मेथड ने !
मला कालच स्वप्न पडले की मिथुन चक्रवर्ती ( गन मास्टर जी ९) मध्यरात्री हेलिकॉप्टर ने तिहार जेल मध्ये उतरले, पी चिदंबरं यांची सुटका केली.
पी सी व मनमोहन यांनी अर्थमंत्रालय ताब्यात घेतले, विकास दर ८ वर नेला व सर्वांनी ऑल इज वेल गाणे गायले.

>>> पी सी व मनमोहन यांनी अर्थमंत्रालय ताब्यात घेतले, >>>

मालकीण बाईंचा आदेश असेल तरच ते अर्थ नंत्रालय ताब्यात घेतील.

नोस्त्रदेमसने भविष्यवाणी केली आहे त्यात त्यांनी हे जे काय सगळं घडतंय ते अचूकपणे लिहिलंय. त्यातले निवडक मुद्दे खालीलप्रमाणे
1. 56 इंच छाती असलेला माणूस वासक्याने शोध लावलेल्या देशाचा सलग तीन वर्षे पंतप्रधान होईल.
2. वाघाचं चिन्ह असलेल्या झेंड्याखाली मालक झोपला असेल तो पाच वर्षानी बोलेल बास कर 56 इंच छातीवाल्या आता माझा झेंडा लाव.
3. एक पांढरा सदरा घातलेला मुलगा त्याला सगळ्यांसमोर डोळा मारेल.
अजून बरेच आहेत ते सविस्तर वेळ मिळेल तसं लिहितो

मालकीण बाईंचा आदेश असेल तरच ते अर्थ नंत्रालय ताब्यात घेतील.

Submitted by पुरोगामी on 29 November, 2019 - 23:09
>> Lol

स्मृती इराणींना अर्थंमंत्री करा. जे एन यू च्या विद्यार्थिनीने वाट लावली आहे.
स्मृती इराणींपेक्षाही कॉमेडिअन कुणी आहे का भाजप मधे ?

>>> सगळे मेट्रोसिटी भाजपामुक्त झाले, अभिनंदन >>>

या मेट्रोसिटी व बराचसा भारत कॉंग्रेसमुक्त सुद्धा आहे.

>>> स्मृती इराणींपेक्षाही कॉमेडिअन कुणी आहे का भाजप मधे ? >>>

स्मृती इराणी कॉमेडीअन नाही, परंतु तिने एका कॉमेडीअनला हरवले आहे. कॉमेडीअनच हवा/हवी असेल तर कॉंग्रेसमध्ये ते पैशाला पासरी सापडतील.

78275918_1395147237307822_1461345038867890176_n.jpg

>>>>>>>मला कालच स्वप्न पडले की मिथुन चक्रवर्ती ( गन मास्टर जी ९) मध्यरात्री हेलिकॉप्टर ने तिहार जेल मध्ये उतरले, <<<<<<<<<
आयला !!! अमेरीकेत रहाणार्याच्या स्वप्नात मनमोहन व चिद्दुच्या रेस्क्यु साठी मिथुन चक्रवर्ती येतो ! बजेट नाही ? नोट बंदी मुळे ?
कदाचीत झुमरीतलैया मधल्या अमेरीकेत रहातात !!
Biggrin

>>>>>>>चिदंबरम सारख्या वयोवृद्ध व्यक्तीला इतके दिवस जामीनाशिवाय आत ठेवणे खरेच चुकिचे आहे त्यांच्यावरील आरोप सिद्ध होउन अगदी त्यांना जन्मठेप झाली तरी हरकत नाही पण आता जामीन मिळणे हा त्यांचा हक्क आहे ! <<<<<<<<<
वकीलपत्र घेतलय जणु !!
Biggrin

नवी दिल्ली: महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. निवडणूकपूर्व वा निवडणुकीनंतर झालेल्या आघाडीत कोर्टाने हस्तक्षेप करण्याचे कारणच काय? राजकीय पक्षांना आघाडी करण्यापासून कोर्ट रोखू शकत नाही. त्यामुळे अशाप्रकारच्या याचिका स्वीकारल्या गेल्या तर या देशात लोकशाहीच राहणार नाही, असं अत्यंत महत्त्वपूर्ण मत सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळताना नोंदवलं.

महाराष्ट्रात निवडणुकीनंतर स्थापन झालेली महाराष्ट्र विकास आघाडी अनैतिक असून या आघाडीचं सरकार घटनेच्या तत्त्वांची पायमल्ली करणारं आहे, असा आक्षेप घेत अखिल भारत हिंदू महासभेचे नेते प्रमोद पंडित जोशी यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान याचिका दाखल केली होती. शिवसेना आणि भाजपने युती करून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लढल्या. या युतीने हिंदुत्वाच्या नावावर मते मिळवली आणि आता भाजपची साथ सोडून शिवसेनेने सत्तेसाठी अन्य पक्षांसोबत आघाडी केली आहे. ही मतदारांची फसवणूक आहे, असे नमूद करत जोशी यांनी महाराष्ट्र विकास आघाडीला याचिकेद्वारे आव्हान दिले होते.

https://m.maharashtratimes.com/india-news/sc-dismisses-plea-challenging-...

सुप्रीम कोर्टाने हिंदुत्ववाद्यांचे थोबाड फोडले

जोशींना थोबाड फुटल्याशिवाय अक्कल येत नसेल तर कोण काय करणार ? सर्वोच्च न्यायालयाच्या द्वारपालाने त्यांना दरवाज्यातूनच हुसकावून द्यायला हवे होते.

78166194_1344021459100945_3628687997169303552_o.jpg

महाराष्ट्रात सरकार बदलल्याने इंद्राणी मुखर्जीची काळजी वाटू लागणे हे जस्टिस लोया प्रकरण ज्या पुस्तकात आहे त्याच पुस्तकातून आले असावे.

>>> सुप्रीम कोर्टाने हिंदुत्ववाद्यांचे थोबाड फोडले >>>

लोया, राफेल, गुजरात दंगली, समझोता एक्सप्रेस अशा अनेक प्रकरणात न्यायालयाने देशद्रोह्यांच्या पेकाटात अनेकदा कचकचून लाथ हाणली आहे.

सुप्रीम कोर्टाने हिंदुत्ववाद्यांचे थोबाड फोडले

चुकीच्या माहीतीवर बेधडक लिहून मोकळे होण्याची आपली हातोटी वाखाणण्यासारखी आहे.

न्या. एन वेंकट रमण यांनी लिहिलेली मूळ निकालपत्रीका वाचली असतात तर बरं झालं असतं.

"Constitutional morality is different from political morality. Courts cannot be asked to go where there is no jurisdiction" observed justice N V RAMANA .

हि बाब न्यायालयाच्या "अधिकारक्षेत्राच्या" बाहेर आहे असा याचा अर्थ होतो.

>>> गुजरात दंगली ? तडीपारीचा निर्णय म्हणजे पेकाटात लाथ का ? >>>

साहराबुद्दीन, इशरत जहा ही प्रकरणे गुजरात दंगलीशी संबंधित नाहीत. बुजगावण्याने मालकीण बाईंच्या आदेशानुसार शहांना खोट्या आरोपांखाली अडकवले होते. नंतर न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका करून देशद्रोह्यांच्या पेकाटात लाथ घातली.

अगदी बरोबर. भाजपच्या विरोधात कुणी गेला असता आणि असा निर्णय आला असता तर मग थोबाड फुटले असे म्हणता आले असते.

राजसी, अहो माहिती घेत चला. तुम्ही समजताय तो तडीपार नाही. त्याचे नाव करण थापरला विचारा.

कोणतीही माहिती न घेता दुगाण्या झाडायच्या आणि पाठीत रट्टा बसला की भेसूर रेकायचं, हे कॉंग्रेसींचं व्यवच्छेदक लक्षण आहे.

Pages