फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37

मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले Happy

फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !

महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.

आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> शिवसेनेला खरे तर कट्टर सावरकरवादच जवळचा आहे. >>>

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कधीही पोकळ बढाया, फुशारक्या मारल्या नव्हत्या. स्वतःच्या ताकदीविषयी ते कधीही भ्रमात नव्हते. इतरांविषयी बोलताना त्यांनी कधीही खालची पातळी गाठली नव्हती.

गोहत्याबंदी, बीफभक्षणबंदी.. कसे शक्यय. सीकेपी लोक खाण्याच्या बाबती त कशी तडजोड करतील?
साध्वीलातर आज भाजपाने पण झिडकारले.

आता नवीन धागा
उद्धव ठाकरे - मुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री - अजून नांदायला येईना

मी सावरकरवाद म्हणजे सावरकरविचार म्हटलं. सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी तुलना केली नाही.
जेव्हा मास पॉलिटिक्स करायचे असते तेव्हा अतिशयोक्ती, आम्ही यॅंव करू त्यॅंव करू वगैरे वल्गना त्यात येतात. त्याचा अतिरेक झाला की त्याचेही दुष्परिणाम होतातच. असो. सावरकरांच्या काळात हिंदुमहासभेचा प्रसार आणि अनुयायी अत्यल्प होते. तेही सुशिक्षित वर्गातले. तेव्हा तिथे तळागाळातल्या राजकारणाचा प्रश्न नव्हता.
सावरकरांची राष्ट्रनिष्ठा वादातीतच आहे. त्यांची प्रतिभा, तळमळ आणि त्यागही वादातीत.

शपथेला प्रस्तावना जोडलेली चालते का? भुजबळांची प्रस्तावना आतापर्यंत सगळ्यांत मोठी आहे.

जयंत पाटलांनी आईचंही नाव जोडलं. काल रोहित पवार यांनीही जोडलं होतं. भुजबळांनी महात्मा फुले, सावित्रीबाई यांना वंदन करून गांभीर्यपूर्वक शपथ घेतली. बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला वंदन केलं.

हिरा, तुमचा प्रतीसाद छान आहे, पण त्याला बरेच मोठे उत्तर आहे. सावकाश देईन. मला तुमचे प्रतीसाद आवडतात, कारण तुम्ही अभ्यासु आहात.

राजकारण हा खरच सखोल विषय आहे, पण त्याला गाव-शहर-राज्य-देश असा विस्तार लाभल्याने त्याची व्याप्ती पण तेवढीच आहे. शिवसेना हा प्रादेशीक पक्ष होता होता राष्ट्रीय स्तरावर पण गेलाय. पण तो काँग्रेस सारखा मुरायला बराच वेळ लागेल.

भाजपला यापुढे फोडाफोडीचं राजकारण करताना विचार करायला लागेल. गुजराथेत अल्पेश ठाकोर काँग्रेस सोडून भाजपत गेले. पोटनिवडणुकीत हरले. उदयन भोसले यांनाही चुणूक मिळाली आहे. कर्नाटकातले मतदार काय करतात ते महत्त्वाचं आहे. फोडाफोडीच्या राजकारणाला चपराक देण्याची संधी त्यांच्याकडे आहे.

>>> शिवसेनेचे हिंदुत्व आणि भाजपचे हिंदुत्व यात फरक काय असा प्रश्न विचारला जातो. >>>

शिवसेनेचा मराठी बाणा जितका दांभिक आहे, तितकेच त्यांचे हिदुत्वही दांभिक आहे.

हीरा यांचा प्रतिसाद आवडला. रेवा २ यांचे बरोबर आहे. सीकेपी लोकांना बीफबंदी, गोमांस बंदी चालणार नाही. खरे तर शिवसेनेची स्प्लिट पर्सनॅलिटीच झाली असती.

>>उच्चवर्णीय हिंदुत्व आणि बहुजन हिंदुत्व असा फरक केलेला अनेकांना आवडत नाही . पण निदान महाराष्ट्रात तरी तसा तो आहे. जुन्या प्रथा, चालीरीती, उपासतापास इत्यादींना उत्तेजन देणे आणि त्यांचे महोत्सव भरवणे हे शिवसेना करीत नाही. शिवसेनेच्या गणेशोत्सवात टग्या टपोरी लोकांचे संघटन हा मुख्य हेतू असतो. महिलांच्या हळदीकुंकू समारंभात वाणे वाटणे(साड्या वगैरे) आणि खानपान यातून मतदार जोडणे हेच लक्ष्य असते. बाकी धर्मावर लेक्चर, संस्कार, पूजाअर्चा वगैरे काही नसते.
असो. यावर मतमतांतरे वाचायला आवडतील.

शिवसेना व भाजपा यांचे खांदे वापरून तुम्ही 'स्वताच्या' हिंदुत्व मतांचे बाण चालवत आहात. भाजपाचे हिंदुत्व काय हे मुळात तुम्हाला कळलेले नाही हे स्पष्ट आहे. थोडा गृहपाठ करून आलात तर चर्चेला अर्थ राहील नाहीतर ऊगाच आपले फाटे फोडत तोच जुना विषय पुन्हा नव्याने चघळण्यात स्वारस्य नाही. हा बाफ त्यासाठी निश्चीतच नाही.

हिरा,
भाजपा, शिवसेना ह्यांच हिंदुत्व का काय ते कळल तुमच्या कडुन !!

आता काँग्रेसच जनैयु धारी हिंदुत्व वैगेरे पण कव्हर करा !

>>त्यांचा मुस्लिम विरोध होता आणि आहे पण तोही जनमत भडकावून चिथावून मते मिळवण्यासाठी आणि त्यापुरता असावा असे वाटण्यास जागा आहे.<<
मतांसाठी सेनेने मुसलमानांचा द्वेष कधीच केला नाहि. सेनेचे अनेक पदाधिकारी मुसलमान होते. सेनेचा विरोध होता तो देशविरोधी मुसलमानांना आणि त्यांना सपोर्ट करणार्‍या सगळ्यांना, ज्यात हिंदू, मुसलमान, डावे, अतिडावे इ. सगळे आले. पाकिस्तान स्वातंत्र्यदिन साजरे करणे, पाकिस्तान जिंकल्यावर फटाके फोडणे, उठ्सुठ कारणांवरुन इस्लाम खतरेमे है ची बांग देणे या अशा कृत्यांवर सेनेने नेहेमी आवाज उठवला, आणि वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन चोप दिलेला आहे...

>>> सेनेचा विरोध होता तो देशविरोधी मुसलमानांना आणि त्यांना सपोर्ट करणार्‍या सगळ्यांना, ज्यात हिंदू, मुसलमान, डावे, अतिडावे इ. सगळे आले. >>>

ममता बॅनर्जीला मातोश्रीवर बोलावून तिचा आदरसत्कार करणे हे यात बसते का?

ममता बॅनर्जीला मातोश्रीवर बोलावून तिचा आदरसत्कार करणे हे यात बसते का?>>>

ही नवी शिवसेना आहे. ती ९२-९३ मधली जुनी शिवसेना होती.
सावरकरांबद्दल बोलतो म्हणून राहुल गांधीला बेअक्कल्या, जीभ हासडून हातात देईन, नालायक कार्टं असं उद्धवजी ऑक्टोबर २०१९ पर्यंत बोलत असायचे. आता काय बोलतील? 'राहुलजी गांधीजी तुम्ही फक्त आदेश द्या सावरकर स्मारक उखडून टाकू' असं म्हणतील बहुधा.

अजितदादांना तुरूंगात पाठवून चक्की पिसायला लावू असे सांगणारे फडणवीस १८० अंशात वळण घेऊन त्यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रीमंडळात बसू शकतात, तर इतरांनी तसेच केले तर ते चुकीचे कसे ठरेल?

माझी मते ही माझीच असतात आणि तीच मला मांडायची असतात. इतरांचे खांदे, तीर वगैरेची गरज नसते.
(उगीचच आपलं ' कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे!')

अजितदादांना तुरूंगात पाठवून चक्की पिसायला लावू असे सांगणारे फडणवीस १८० अंशात वळण घेऊन त्यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रीमंडळात बसू शकतात, तर इतरांनी तसेच केले तर ते चुकीचे कसे ठरेल?

अजित पवार पॉलिटिकल अपोनन्ट होते. छगन भुजबळ तर बाळासाहेबांना टी.बाळू म्हणणारे, अटक करणारे , पाठीत खंजीर खुपसणारे वगैरे. उध्दवनी आता त्यांना पण पावन करुन घेतलंय. हे फारच डेस्परेशन झालं.

असो. ती इंद्राणी मुखर्जी जी आयएनएक्स मध्ये महत्वाची साक्षीदार आहे चिदंबरमविरुध्द - ती अजून महाराष्ट्रातील जेलातच आहे ना? अशावेळी सेंटर महत्वाचे विटनेस ताब्यात घेऊ शकत नाही का?

अजित पवार पॉलिटिकल अपोनन्ट होते. छगन भुजबळ तर बाळासाहेबांना टी.बाळू म्हणणारे, अटक करणारे , पाठीत खंजीर खुपसणारे वगैरे. उध्दवनी आता त्यांना पण पावन करुन घेतलंय. हे फारच डेस्परेशन झालं.

हे म्हणजे 'तेरा कुत्ता कूत्ता, मेरा कुत्ता टॉमी' छाप विधान झालं. फडणवीस नाही का बैलगाडी भरून पुराव्या नुसार अजित पवार यांना जेल मध्ये चक्की पिसिंग करायला पाठवणार होते पण ऐन वेळी त्यांच्याच मांडी ला मांडी लावून सरकार चालवायला निघाले होते?

मुफतीला जसं आधी सीएम करून नंतर आयुष्यातून उठवलं त्या टाईपचा तो बीजेपी गेम होता. पण अजित पवार हे फडण२० चे राजकीय शत्रू झाले. तिथे गंगाधर राव फडणवीस यांचा संबंध नव्हता.
भुजबळ उद्धवचे पर्सनल शत्रू होते. त्यानी बाळासाहेबाना हर्ट केलं होतं. शिवसेना राजने पण सोडली पण नंतर कधी बाळासाहेबांचा अपमान नाही केला.

ते काय म्हणतात ना चोरोंके भी उसुल होते है. पण सेनेला कसलेच उसुल नाहीत. )

मै आ गया हूं तेजा. मै तुम्हे ये बताने आया हूं के मै तुम्हे ख़तम कर दूंगा. और मेरा ये वादा रहा के मै तुम्हारी जिन्दगी मिटा दूंगा.
~ अमिताभ बच्चन, अजितला उद्देशुन, जंजीर मध्ये.

म्हणजे, जर अजित पवार यांनी श्री गंगाधर फडणवीस यांना अटक केली असती किंवा त्यांना काही फुटकळ टोपणनाव दिले असते तरच ते देवेंद्र फडणवीस ह्यांना चालले नसते. मग एवढे दिवस ते उगाच अजित पवार यांच्यावर आरोप का करत होते? ती पुराव्यांची बैलगाडी कुठाय?

> हे फारच डेस्परेशन झालं.
हम करे तो डेस्परेशन, वो करे तो मास्टर स्ट्रोक ?

हम आहें भी भरते तो बदनाम हो जाते हैं.
वो कत्ल भी करते तो चर्चा नही होता.

> अशावेळी सेंटर महत्वाचे विटनेस ताब्यात घेऊ शकत नाही का?
सरकार कोणाचेही आले तरी ते संविधानाला बांधील असते. त्यामुळे असले काही करावे लागत नाही. अन्यथा केंद्रात व राज्यात परस्पर विरोधी सरकारे आली की तुरुंगातल्या विटनेसेस ची फरफट झाली असती.

इंद्राणी मुखर्जी या एकमेव ( ती ही खुनाच्या खटल्यातील आरोपी) व्यक्तीने दिलेल्या ( तिच्या पतीनेही नाकारलेल्या) स्टेटमेंट वरून पी चिदंबरम सारख्या वयोवृद्ध व्यक्तीला इतके दिवस जामीनाशिवाय आत ठेवणे खरेच चुकिचे आहे त्यांच्यावरील आरोप सिद्ध होउन अगदी त्यांना जन्मठेप झाली तरी हरकत नाही पण आता जामीन मिळणे हा त्यांचा हक्क आहे !

उद्धव ठाकर्‍यांचे अभिनंदन आणि नवीन सरकारला शुभेच्छा! मागच्या शनिवारचे ते नाट्य झाल्यावर शिवसेनेचा मधल्या मधे पोपट झाला म्हणून त्यांच्याबद्दल वाईट वाटले होते. तेथून पुन्हा आता सत्ता मिळण्याची संधी दिसल्यावर उद्धव ठाकर्‍यांचे एकूण वागणे नम्र आणि समंजस दिसले आहे.

उद्धव ठाकर्‍यांचे एकूण वागणे नम्र आणि समंजस दिसले आहे.>> ते कधीही बाळासाहेब किवा राठाइतके अ‍ॅग्रेसिव्ह वाटलेच नाही त्यामूले दोन कॉन्गेस मधे ते किती टिकुन राहतिल ही शन्काच आहे. त्याचा पुतळा करुन टाकतिल ही लोक..साहेबानी रिमोट कन्ट्रोल स्वतःकडे ठेवला आता मुलाचा मात्र दोन दोन कॉन्गीकडे आहे.

<< उद्धव ठाकर्‍यांचे एकूण वागणे नम्र आणि समंजस दिसले आहे.>> ते कधीही बाळासाहेब किवा राठाइतके अ‍ॅग्रेसिव्ह वाटलेच नाही त्यामूले दोन कॉन्गेस मधे ते किती टिकुन राहतिल ही शन्काच आहे. त्याचा पुतळा करुन टाकतिल ही लोक..साहेबानी रिमोट कन्ट्रोल स्वतःकडे ठेवला आता मुलाचा मात्र दोन दोन कॉन्गीकडे आहे. >>

------- अरे एक दिवस तर पूर्ण करु द्या...
भाजपा सोबत राहुन फरफट होण्यापेक्षा काँग्रेस सोबत जाणे कधीही चांगले असा प्रगल्भ विचार त्यांनी केला असेल.

@waglenikhil
Shiv Sena should invoke tradition of Prabodhankar Keshav Sitaram Thackeray, leading reformer and supporter of anti-Brahmin movement.He is father of Bal Thackeray and founder of SS. Uddhav will find more common ground with NCP-Congress in it. #MaharashtraGovtFormation

Pages