Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37
मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले
फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !
महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.
आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ते बुलेट ट्रेनचे पैसे,
ते बुलेट ट्रेनचे पैसे, काळजीवाहू सरकार होतं तेव्हा केंद्रात पाठवू शकत नव्हते का, किंवा काळजीवाहू होण्याआधी पाठवू शकत नव्हते का.
ते बुलेट ट्रेनचे पैसे,
ते बुलेट ट्रेनचे पैसे, काळजीवाहू सरकार होतं तेव्हा केंद्रात पाठवू शकत नव्हते का, किंवा काळजीवाहू होण्याआधी पाठवू शकत नव्हते का.
>>
मुम बनाय्चि त्यन्न गुरन्ती होति
भाजपला काय मूर्ख समजला काय?
भाजपला काय मूर्ख समजला काय? हा गेम मोदी-शहांनीच आखला होता आणि तो यशस्वी झालाही...असं दाखवण्यास सोडलेलं पिल्लू आहे ते.
मी चर्या मेसेजला उत्तर दिलं
मी त्या मेसेजला उत्तर दिलं की या मेसेजचं भाषांतर करून शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचे काम सुरू झालंय.
ज्यांना तो मेसेज खरा वाटून आनंद होतो त्यांच्या xx कपाळात जातात माझं उत्तर वाचून
कर्नाटकात एकाच पक्षांचं सरकार
कर्नाटकात एकाच पक्षांचं सरकार आहे. तिथे किती उपमुख्यमंत्री आहेत?
गोवा किती मोठं आहे? तिथे किती आहेत?
ते कर्नाटक गोव्याचे इथे नका
ते कर्नाटक गोव्याचे इथे नका सांगू. अशी व्हॉटअबौटरी करण्याचा मक्ता केवळ आम्हांस आहे
महाराष्ट्रातल्या नव्या विरोधी
महाराष्ट्रातल्या नव्या विरोधी पक्षाच़ं स्वागत आहे. आम्ही तुमची अक्कल काढणार नाही, कसं थोबाड फुटलं असं म्हणणार नाही. तुमच्याशी प्रेमाने वागू.
कर्नाटकात 17 सीट निवडणुका कधी
कर्नाटकात 17 सीट निवडणुका कधी आहेत ? त्याचं पुढे काय होणार ?
5 December and the result is
5 December and the result is on 9th. Bypolls for 15 seats.
भाजपे यात हरले तर तेही
भाजपे यात हरले तर तेही गडगडतील का ?
भाजप ला ८ जागा हव्यात बहुमत
भाजप ला ६ जागा हव्यात बहुमत टिकवायला.
0 मिळू देत
0 मिळू देत
पण 6 विकत घेणे फार अवघड नाही शहाला
कुमारस्वामी अगोदरच पाठिम्बा
कुमारस्वामी अगोदरच पाठिम्बा जाहीर करुन बसलेत भाजपला.
I have no interest in
I have no interest in Politics , but then according to BJP supporters Bullet Train is more important than Farmers ?.. नाही तसे नसते ते. व्हॉटसॅप विद्यापीठतुन जे खाली घरंगळत येते ते खरे आणि जास्त महत्वाचे असते.
मधल्या मध्ये काँग्रेस ला काही
मधल्या मध्ये काँग्रेस ला काही ना करता सत्ता मिळाली. म्हणून काँग्रेस काहीच करत नाही.
या बाफ चं शीर्षक बदलायची वेळ
या बाफ चं शीर्षक बदलायची वेळ आली आहे. किंवा नविन ऊघड्ण्याची.
का मु.मं. चा शपथविधी होईपर्यंत थांबायचे आहे? समजू शकतो.
बाकी, ३ दिवसात पक्ष सोडणे, मग ऊ.मु. पदाची शपथ घेणे, मग राजीनामा देणे.. ईतक्या झटपट पूर्वी गिरणीतले दळण देखिल मिळत नसे. ईथे अख्खी गिरणीच बदलून झाली. थोडक्यात काय राजकीय इच्छाशक्ती असेल तर काहिही अशक्य नाही.
हेच सूत्र व हीच धडाडी राज्यातील अनेक जटील प्रश्ण सोडवताना या आगामी सरकारने वापरले तर किमान जनतेचे तरी कल्याण होईल.
असो आगामी दिवसात काही रंजक दृष्ये बघायला मिळतील अशी आशा आहे:
१. मातोश्री वर आलेल्या सोनिया गांधींना सुवासिनी ओवाळत आहेत.
२. ईद मुबारक चे फलक सेना भवनाबाहेर झळकत आहेत.
३. शरद पवार हे सोनिया गंधींना तीळगूळ व संक्रांतीचे वाण देत आहेत.
४. संजय राऊत हे सामना मध्ये काही लिहीण्यासारखे शिल्लक नसल्याने, काव्यमंच व मुशायरावर जास्त हजेरी लावत आहेत.
५. आणि ईतर बरेच काही...
पण आता शिवसेनेला नविन घोषणावाक्य बनवावे लागेल.. 'गर्व से कहो हम हिंदू है' हे चालणार नाही.
Submitted by पुरोगामी गाढव on
Submitted by पुरोगामी गाढव on 27 November, 2019 - 01:34
>>
हा ग. तु. जोशींचा बराच लेख हा निकालाचा सोयीस्कर अर्थ लावल्यासारखा वाटतोय. आता पडलेत म्हणून बचावकार्य चालू आहे. चुकून फडणवीस पुन्हा बहुमतात आले असते, तर यांनी अग्रलेखाच्या ऐवजी देवेंद्राच्या आरत्या पाडल्या असत्या.
बहुदा फडणवीस इतक्या तडकाफडकी गेल्याची बातमी पचवणं त्यांना जड जात असावं. त्याशिवाय हे असले 'शिवसेनेचा सच्चा मित्र', 'उद्धव-देवेंद्रांचे मधुर संबंध' असल्या विशेषणांची उधळण करून निकालापूर्वी सगळं काही आल-बेल असल्याचं सोंग घ्यायची गरज नव्हती.
जोशी ज्या मैत्रीचे इतके गोडवे गाताहेत, ती मुळात अस्तित्वात तरी होती का ? हे घनिष्ट संबंध २०१४ ला स्वतंत्र निवडणूक लढवताना बरे आठवले नाहीत ते? नंतरही ५ वर्ष सतत हेवेदावे चालले होते, तेव्हा ही मैत्री कुठल्या कोनाड्यात दफन केलेली?
या हिंदुत्वाच्या नात्यातली आतली गोम हीच का शिवसेना कालपर्यंत मोठ्या भावाप्रमाणं होती, जागाही भाजपपेक्षा जास्त असायच्या, मग सत्तेचा मोठा वाटा मिळण्यात काही अडचण नसायची. युतीत थोडी बहुत दादागिरी केल्यावर शिवसेनेचा मराठी बाणा, 'मोडेन पण वाकणार नाही' अशी जी प्रतिमा कार्यकर्त्यात होती तिलाही थोडी उजळणी मिळायची. एकीकडे सत्तेचे मोठाले वाटे आणि परत मोठा भाऊ म्हणून बाळासाहेबांचा युतीत दरारा म्हटल्यावर शिवसैनिकसुद्धा खुश. भाजप छोट्याची भूमिका घेऊन सत्तेत जेवढा वाटा मिळतोय, त्यावर समाधान मानून घ्यायची. कारण युती दोघांची असली तरी तिच्यावर पकड बाळासाहेबांची होती. एकंदरीत शिवसेनेची पाची बोटे तुपात होती.
मग या यारीदोस्तीला नजर कशी लागली? याची सुरवात झाली मोदींच्या उदयाने. २०१४ च्या विजयात बरीच हिंदुत्ववादी मते भाजपनं खेचली, त्यात शिवसेनेची हक्काची हिंदुत्व मराठी मतपेढीही सामील होती. ह्या निकालामुळं शिवसेना खडबडून जागी झाली. आतापर्यंत ज्या मतांच्या जीवावर शिवसेना निवडून यायची, ती भाजपच्या खिशात गेल्यामुळं शिवसेनेच्या जागाही युतीत क्रमांक दोन वर येऊन ठेपल्या. नेमक्या ह्याच वक्ताला बाळासाहेब वयोपरत्वे अस्ताला गेले, अन शिवसेनेच्या युतीतल्या दराऱ्याला ओहोटी लागली. उद्धव ठाकरेंकडे संघटना असली तरी हिंदू मतं बहुसंख्याने खेचण्यासाठी लागणारा बाळासाहेबांसारखा करिष्मा नव्हता.
मग आता करावं काय ? गतवैभव
मग आता करावं काय ? गतवैभव गेलं पण पाठोपाठ सत्तेचा वाटा, हक्काची मतही कमी होऊ लागली तर येत्या काही वर्षात शिवसेनेच्या अस्तित्वालाच धक्का लागतोय का काय, अशी भीती डोकं वर काढायला लागली. आता पुन्हा पाहिल्यासारखं वैभव हवं असेल, तर जुनाच कट्टर बाणा अंगी बनवायला पाहिजे असा निष्कर्ष शिवसेनेनं काढला. मागोमाग शिवसेनेनं सत्तेत राहूनही आपला विरोध आणखी तिखट केला. शिवसेनेचा स्वतःचा असा १६-२० % चा वोट बेस, जो कडव्या शिवसैनिकांचा आहे, तो आणखी मजबूत केला, पाठोपाठ आपल्या मोठ्या भावासारखी दादागिरी चालूच ठेवली. फडणवीस सरकारची पाच वर्ष कोण छोटा कोण मोठा या झगड्यातच गेला. मग दोघा मांजराचं सत्तावाटपावरून वाजलं.
मुळात अजूनही आपलीच चालते हे दाखवणं शिवसेनेला गरजेचं असावं. त्याशिवाय कमी जागा असूनही बरोबर वाटणीची मागणी त्यांनी केली नसती. भाजपनं जागा वाटप असमान केलं, पण सत्ता मात्र समसमान वाटायचं वचन दिलं हे पटत नाही, विशेषतः अशा वेळी जेव्हा २-३ महिन्यापूर्वीच लोकसभेत भाजपनं विक्रमी विजय मिळवला होता. अशा पार्श्व्भूमीवर आपण महाराष्ट्रही काबीज करू असा आभास भाजपला वाटणं सहज शक्य आहे. अशा परिस्थितीत भाजप शिवसेनेपुढं सहजासहजी झुकेल, आणि शिवसेनेच्या सगळ्या मागण्या मान्य होतील याची शक्यता कुठंही दिसत नाही. सामना मध्ये ७ ऑक्टोबर ला उधोजींची मुलाखत आलेली, त्यातही उद्धवनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल हे भाकीत केलेलं. त्यावर भाजपकडून उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आहे, त्याच काय असा सवाल विचारल्यावर त्यांनी 'वचनपूर्तीसाठी कुणाच्याही परवानगीची गरज नाही' असं उत्तर दिले. आमचं युतीत शेअर करायचं ठरलंय असा साधा उच्चारही केला नाही.
या सगळ्या बोलाचालीवरून युतीची वाटचाल तुटण्याकडेच होती, फक्त त्याला निमित्त मुख्यमंत्रीपदाचं झालं एवढंच. ते नसतं तर दुसरं काही खुसपट शिवसेनेनं उकरून काढलं असतंच. आपला जुनाच 'कडवं हिंदुत्व' राग नव्यानं आळवायला कसा सुरु केला याची प्रचिती 'बाळासाहेबांना वचन दिलेल शिवसेनेचा मुख्यमंत्री करू' (जे खरंतर मनोहर जोशींनी हे स्वप्न आधीच पूर्ण केलय) या भावनिक वाक्यातून येतं.
आता शिवसेनेचा प्रयत्न हिंदू मतांबरोबर विखुरलेला भाजपविरोधी मतदार आपल्या छावणीत आणायचा असेल. जुना शिवसैनिक मतदार कालपरत्वे कमी होत असताना नवा हिंदुत्ववादी मतदार शोधणे भाजपच्या सावलीत शिवसेनेला शक्य झालं नसतं. तेव्हा वेगळा घरोबा करण्यावाचून शिवसेनेकडं दुसरे पर्याय फारसे नाहीत.
Darshan Mondkar
Darshan Mondkar on bullet train fund transfer whatsapp message.
I am pretty sure, by now, all of you have received a message on WhatsApp from one Tarun Raju - DFI about the unfolding of events in the last 3 days.
If not I am attaching the pics of that msg which I got on WhatsApp which claims that this is not from WhatsApp Univ but from "some friends in high places".
Do read the message in the pics below....
And now, let me proceed to rip the message to little shreds which can easily fit in your ashtray since a dustbin is too big and too worthy for it to be thrown in.
The message begins by claiming that Sonia Gandhi wanted to shift the funds from the Bullet Train (HSR) project to a Farm Loan Waiver Scheme.
The HSR project is basically the Mumbai-Ahmedabad High Speed Corridor which Modi's Bullet train will use to ply the passengers.
The HSR project is being implemented by National High Speed Rail Corporation (NHSRCL) which was incorporated in 2016 and this Special Purpose Vehicle (SPV) is owned by Indian Railways.
The SPV is headed by Chairman Vinod Kumar Yadav who is also the Chairman of Railway Board, Ministry of Railways.
https://www.nhsrcl.in/about-us/about-nhsrcl
Indian Railways is run by the Ministry of Railways which is a Central Govt agency.
So to begin with that the Central Govt sent Central funds to Maharashtra Govt is balderdash. That the Maharashtra Govt could hold or divert funds from a Central Govt agency is absolute nonsense.
Now to understand the funding of the Bullet train project.....
The Bullet train project was going to cost India, Rs. 98,000 Crores (this value has increased to above 1 lakh crore due to currency fluctuation).
Out of this 98,000 Crore, 81% of the funding was going to come via Japan @ 0.1% interest rate. So close to Rs. 80,000 Crores were coming in from Japan International Co-Operation Agency (JICA).
https://www.indiatimes.com/news/india/railways-to-invest-rs-9-800-crore-...
Both Maharashtra and Gujarat Govts were supposed to invest their State funds equally. So around Rs. 18,000 Crores between the two.
So, Maharashtra had to invest around Rs. 9000 Crores in this project, which it has not done till now. Infact the Govt under Fadanvis was already cribbing against being held as a guarantor for the full amount of the loan taken from JICA.
https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/bullet-train-loan-state-...
Now, at the most the Maharashtra State Govt can delay the funds for the bullet train project by stating shortage of funds, but they can neither divert funds which they never got from the Center (or were supposed to get) nor can they permanently stay away from funding the project, since the project is an agreement between 4 parties (JICA, GOI, MH Govt, Guj Govt) and are bound by a contract which needs to be honored by all parties involved.
The HSR project itself is scheduled to be completed by Dec 2023, but as of now the entire tendering process is not completed, as can be seen from the NHSRCL website.
The rest of the message about Modi getting angrier than he was during Phulwama and throwing a tantrum is so melodramatic that Akshay Kumar can probably make a nationalistic movie about it and rake in a few 100 crores.
The bare fact is that this entire WhatsApp post has been written by someone who has no clue about the HSR project and its funding and is talking through some other place than his mouth.
Disclaimer: The only way the message could have come from "some friends in high places" is if those friends were sitting on the top on Anitilia, smoking pot and fwding gyaan on WhatsApp.
मुळात आशा WA फवड ची दखल
मुळात आशा WA फवड ची दखल घ्यावीच का?
ते रक्तबीज राक्षसासारखे असतात, तुम्ही एक fwd स संदर्भ खोडुन काढता, तर 10 निर्माण होतात,
याला फाईट करायचा मार्ग एकच ,आपणही तितकीच निर्बुद्ध फॉरवर्ड बनवून टाकणे.
सिंबा, मी तेच केलं आणि त्याचा
सिंबा, मी तेच केलं आणि त्याचा अपेक्षेपेक्षा चांगला परिणाम झाला.
पण हे असलं निर्बुद्ध, खरं मानून चालण्याएवढे काही लोकांचे मेंदू पोखरले गेलेत.
विलभ
विलभ
+१
खरे तर सेना भाजपा युती ही निव्वळ हिंदूत्व आणि काँ चा कट्टर विरोध एव्हड्याच कॉमन मिनीमम प्रोग्रॅम वर आधारीत होती. अन्ह्यथा संघाच्या मुशीतून घडलेले भाजपा नेते अन बाळासाहेबांच्या प्रेरणेतून व हिंदुत्वाच्या मातीतून घडलेले रांगडे सेना सरदार यांच्यात कसलाही सांस्क्रुतीक, तात्विक वा धोरणात्मक समान धागा नव्हताच. एरवी पाक च्या सामन्यांमध्ये खेळपट्टी ऊखडणे, मशिदीं वरील भोंग्यांवरून राडा करणे, मुस्लिम समाजावर वचक ठेवणे, ईतकाच काय तो सेनेचा हिंदुत्वाचा आवाका होता. अडवाणींनी तो हायजॅक करून रथयात्रेच्या निमित्ताने भाजपा च्या झेंड्याखाली देशभर पसरवला. त्यामूळे महाराष्ट्रात सेनेच्या (म्हणजेच बाळासाहेबांच्या) संमतीशिवाय काहिही घडू शकत नाही या निव्वळ एका नकारमूल्यापाई आणि बाळासाहेबांच्या राजकीय धुरंधरे पाई भाजपा दुय्यम भूमिका घेऊन युती टिकवून होता. पण बाळासाहेब गेले आणि सेनेचे नकारमूल्य तितकेसे राहिले नाही. तेव्हा अर्थातच बाळासाहेबांनंतरची युती ही निव्वळ राज़कीय सोय होती जी अलिकडील काळात भाजपा साठी गैरससोयच जास्त ठरली. आपण शिवसेनेला या खेपेस हुड केले तर सेना स्वताच्या बळावर सरकार मुळीच स्थापन करू शकत नाही हे भाजप ला पक्के माहित होते. फक्त त्या साठी सेना राष्ट्रवादी आणि खुद्द काँग्रेस (व्हाया शरद पवार) यांच्या समर्थनाने सरकार स्थापन करू शकेल ही शक्यता बहुदा भाजप च्या थिंक टँक ने विचारात घेतली नव्हती. नेमकी ईतेच सर्व गणीत फसले असावे. त्यातही शरद पवार यांच्या पक्षाबरोबर सोनिया देखिल एकत्र येणार नाहीत असेही भाजपाला वाटले असावे. पण अलिकडे भाजपाने ज्या जोमाने सरकारी यंत्रणा कामाला लाऊन एक एक बडी धेंडे तुरुंगात धाडली ते पाहता राष्ट्रवादी व काँ मधिल बर्याच आमदारांना असुरक्षित वाटू लागल्याने, हा असा भाजप वि. कॉमन मिनिमम तह करून पक्षाची बुडती नैया वाचावी अन वैयक्तीक आप्ले ही बूड वाचवावे या हिशेबाने पक्षातील सर्वच आमदारांनी सत्तेत सहभाग घेण्याचा अट्टहास धरल्याने शेवटी पक्षश्रेष्टींना तो मानावाच लागला. दरम्यानच्या काळात ठाकरे, फडणवीस यांच्यात वैयक्तीक आणि भाजपा व सेना यांच्यातील निखार्यावर रोज घडाभर तूप घालण्याचे काम संजय राऊत सारख्यांनी केल्याने both BJP and Sena Leadership found each other at the point of no return! This again provided catalyst to Shard Pawar and Co. आणि अशी राजकीय संधी सोडून भाजपा च्या मांडीवर जाऊन बसण्याचा मूर्खपणा करणारे शरद पवार नाहीत. (असा मूर्खपणा करणार्याचे नाव एव्हाना जगजाहीर आहे!)
अन्यथा आम्हाला विरोधात बसण्याचे मँडेट आहे, हाच राग कायम आळवणार्या शरद पवार यांनी ईतका जिवाचा आटापिटा केला नसता. त्याला फक्त ऊ. ठाकरेंचे मीच्/सेनेचा मुख्यमंत्री होणार हे निमित्त पुरले.
भाजपाचे बर्यापैकी स्ट्रॅटेजिक मिसकॅल्क्युलेशन झाले हे आता एकनाथ खडसे कं च्या विधानंवरून देखिल स्पष्ट होतेच. हा फडणवीसांना शह देण्यासाठी निव्वळ अमीत शाह कं चा गेम आहे असे मानणे हे नवखेपणाचे लक्षण आहे. अशा अनेक पोस्टी शोशल मिडीया वरून फिरत आहेतच.. पण सत्य हे आहे की, सेना भाजप च्या या धुम्सणार्या निखार्यांचा वणवा पेटवण्याची खेळी संजय राऊत करत होते तेव्हाच भाजपातील (गडकरी) व संघातील (भागवत) ज्येष्ट प्रभ्रूतींनी स्वतः लक्ष घालून ते विझवणे अपेक्षित होते. पण जसे सेनेचा डीएनए व अॅप्रोच हा बाळासाहेबांनंतर बदलला आहे तसेच अटलजी, अडवाणी, जोशी (राजकीय संन्यास), आणि अलिकडे जेटली व सुषमा यांच्या जाण्यानंतर भाजपा चा अॅप्रोच हा देखिल बदलला आहे. पूर्वी संघाचे विधान प्रथम येत असे आणि मागाहुन भाजप चे. अलिकडे संघाचे विधान अगदी शेवटी येते.
असो. कसोटी सामना (जरा जास्तच) रंगतदार ठरला. पहिल्या डावात भाजपाकडे आघाडी होती आणि राष्ट्रवादी, काँं व ईतर हे निव्वळ ड्रॉ साठी खेळत होते. खरे तर पंच (राज्यपाल) देखिल भाजपा च्या बाजूचा होता. मात्र दुसर्या डावात भाजप संघातील भरवशाच्या खेळाडूने मी ओपनींग लाच जाणार अन्यथा सोडून जातो अस हट्ट धरल्याने, भाजप संघाने दुसरा डाव जमेल तसा ताणला आणि शेवटी प्रतीस्पर्ध्याचा नाईट वॉचमन (अजित दादा) पळवून घेऊन सामना जिंकायचा प्रयत्न केला. पण ऐनवेळी पुन्हा हा नाईट वॉचमन स्वतः धावचीत झाला. आणि भाजप संघातील भरवशाचा फलंदाज प्रतीस्पर्ध्याकडून खेळला.
थोडक्यातः स्वताचे स्टंप, बॅट, चेंडू, अगदी अंपायर देखिल स्वताचा असला तरिही खेळाडू ऊलटला तर घरच्या मैदानावर देखिल हार पत्करावी लागते हे पुन्हा एकदा सिध्द झाले.
आता नाहीच मिळणार गाण्याच्या
आता नाहीच मिळणार गाण्याच्या ऑफर्स, नवरा मुख्यमंत्री होता म्हणूनच मिळत होत्या. शिवाय त्यांना व्यवस्थित किंवा थोडंफार येत असेल गाता, मला काही त्यातलं कळतं नाही. पण आलेल्या ऑफर्स सोडाव्यात का? त्या अजूनही बँकेत आहेतच की नोकरीला. >>>
त्यांना त्या ऑफर्स देणार्यांनी त्याबदल्यात काय वसूल केलं हा मुद्दा आहे. कारण फुकट कोणी काही देत नाही. मग इतर इतक्या टॅलेंटेड सुंदर गायिका भरपूर असताना या बाईंना संधी मिळाली त्यामागे गिव्ह अँड टेक काय होतं? हा प्रश्न पडतो.
आता नवीन सरकार भरपूर करप्ट असणार आहे, त्यांना ५ वर्षांचा प्लस नोटबंदीचा बॅकलॉग भरुन काढायचाय. पण त्यांना सगळं माफ आहे. रानडे-फडणवीस यांच्याकडून मात्र आमच्या वेगळ्या अपेक्षा होत्या.
आठवण करून देण्यासाठी -
आठवण करून देण्यासाठी - प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांच्या राष्ट्रपती निवडणुकीत सेनेने भाजपच्या विरोधात, कॉंग्रेसच्या बाजूने मतदान केले होते.
>>आता नवीन सरकार भरपूर करप्ट
>>आता नवीन सरकार भरपूर करप्ट असणार आहे, त्यांना ५ वर्षांचा प्लस नोटबंदीचा बॅकलॉग भरुन काढायचाय.
पुन्हा एक्दा बिल्डर लॉबी चा पैसा व्यवहारात येईल, शेतकर्यांच्या मालाला प्रचंड भाव मिळेल, कारखान्दार व सावकार यांची चंदी होणार. थोडक्यात अचानक बंद पडलेली अर्थव्यव्स्था एक्स्प्रेस वेगाने धावायला लागेल. आणि सामान्य माणुस म्हणले अरे वा बरेच झाले. भ्रष्ट मार्गाने पुन्हा अर्थव्यवस्था ठीक ठाक होणार असेल तर सर्वांनाच चालणारी आहे. ही विसंगती आपल्यात जन्मजात आहे. नोटबंदी मूळे किती वाट लागली याची अनेक व्याख्याने व गलके जसे ऐकायला मिळाले तसेच हे आहे. शेवटी गाय भरभरून दूध देत असेल तर तीचे शेण आनंदाने सारवले जाते.
संभाजी ब्रिगेड सारखे गट आणखिन चेव आल्यागत वागतील. आणि एरवी मूग गिळून गप्प बसलेला एक कट्टर धार्मिक समाज पुन्हा डोके वर काढून सत्तेमध्ये आपली खुंटे बळकट करेल यात शंका नाही.
अनेक घोटाळा महासम्राट या तिकडी सरकारच्या निमित्ताने पुन्हा सत्तेत येतील. हे असे होईल असे छगन भुजबळ, अशोक चव्हाण, अजित दादा, अशा महाभागांना कधी स्वप्नातही वाटले नसेल. पण आंधळं दळतं अन xx पीठ खातं या न्यायाने, आता ऊध्द्दव जी ही गिरणी दळतील आणि हे सर्व मस्त फुकट पीठ खातील. भाजपा हा पेंड्युलम चे एक टोक असेल तर ही तिकडी दुसरे टोक आहे. मध्यम वर्गाचे नेहेमीच बारा वाजलेले असतात. त्यामूळे मध्यम वर्गाने फार काही अपेक्षा ठेऊ नयेत.
२०१४ ते २०१९ भाजप म्हणजे
२०१४ ते २०१९ भाजप म्हणजे बाजीराव, शिवसेना म्हणजे काशीबाई आणि एनसीपी म्हणजे मस्तानी अशी परिस्थिती होती. शिवसेना सरकारमधून बाहेर पडली तर एनसीपी पाठिंबा देईल असं सर्वजण धरुन चालले होते. १४ साली बहुमत एनसीपीच्या जिवावरच फडण२० नी प्रूव्ह केलं होतं.
आता मात्र मस्तानी-काशीबाईने हातमिळवणी करुन काशीनेच पेशवा बनावं आणि बाजीरावचाच पत्ता कट करावा असा गेम झालाय. काँग्रेसरुपी निजामही सपोर्टला आलाच आहे!
योगभाऊ, तुमच्या
योगभाऊ, तुमच्या स्वप्नरंजनाच्या पोस्टला एकही हसरी स्मायली नाही याचे वाईट वाटले. मी देऊ का ? आधीच विचारलेलं वरं नाहीतर तुम्हाला चिडवल्यासारखे वाटायचे.
त्या स्वप्नरंजनात आणखीही काही आयटेम ( जमल्यास ) टाकाल का ?
- शपथविधी सोहळा सुरू होण्या आधी नुकत्याच बेकार झालेल्या एक नर्त्नकुशल गायिका यांचा कार्यक्रम
- पद गेल्याने राहीलेला अभ्यास पूर्ण करणारे मामु (माजी मुख्यमंत्री)
- २०२४ साली एक मनुष्य माझे फोटो घ्या ना म्हणून रस्त्यात लोकांना विनवत असेल तर दुसरा मुलाच्या कंपन्यातल्या घोटाळ्यामुळे तडीपार व्हायच्या तयारीत असेल
इत्यादी.,,,
अरेरे. फडणवीसांकडे कॉं आणि
अरेरे. फडणवीसांकडे कॉं आणि राकॉंच्या भ्रष्टाचाराचे ट्रकभर पुरावे होते. त्यांचा अभ्यास करण्यातच पाच वर्षं निघून गेली. त्यात अधूनमधून स्वकीयांना clean chits देण्यात वेळ गेला.
नाहीतर हे सगळे आज चक्की पिसिंग३ असते.
आता फडणवीसांकडे वेळच वेळ असेल . ते रद्दीत विकलेले पुरावे परत आणून नीट अभ्यास करतील.
भाजप == रावण
भाजप == रावण
शिवसेना == बिभीषण
काँ/राकाँ == राम लक्ष्मण
बिभीषण शेवटी सत्याच्या बाजूला आला आणि दुष्ट रावण हरला
२०२४ साली एक मनुष्य माझे फोटो
२०२४ साली एक मनुष्य माझे फोटो घ्या ना म्हणून रस्त्यात लोकांना विनवत असेल तर दुसरा मुलाच्या कंपन्यातल्या घोटाळ्यामुळे तडीपार व्हायच्या तयारीत असेल>> आपके मूह मे घी शक्कर
Pages