Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37
मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले
फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !
महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.
आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कमजोर हृदयाच्या वाचकांनी
कमजोर हृदयाच्या वाचकांनी कृपया वाचू नये ही नम्र विनंती. नंतर काही झाले तर जबाबदार नाही.
फडणवीसांना कोणी घालवले..?*
*रहस्य आणि संशय..*
बहुमताचा आकडा हातात नसताना
अत्यंत नाचक्की होऊन देवेंद्र फडणवीस यांना अखेर अत्यंत खालच्या मानेने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून आज पायउतार व्हावे लागले. देवेंद्र यांच्यासारखा निष्कलंक, चारित्र्यसंपन्न आणि पाच वर्षे मुख्यमंत्री राहूनही कुठलाही भ्रष्टाचाराचा साधा शिंतोडा नसलेला स्वच्छ माणूस ज्या अपमानास्पद पद्धतीने घालवला गेला तो क्षण अत्यंत वेदनादायी आणि यातना देणारा होता. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र यांनी ज्या पारदर्शकपणे राज्यकारभाराचा ५ वर्षे गाडा हाकला त्याला तोडच नव्हती. देवेंद्र यांनी मुख्यमंत्री म्हणून घेतलेले निर्णय आणि त्यांनी राबवलेली धोरणे यात कोणीही एक बारीकसा तरी दोष काढून दाखवावा. त्यांच्या शत्रूलाही अगदी सुक्ष्मदर्शी यंत्र हाती घेऊनही देवेंद्र यांची चूक शोधूनही सापडणार नाही. मग देवेंद्र का गेले? त्यांना कोणी घालवले? असा सचोटीचा आणि प्रामाणिक मुख्यमंत्री कोणाला नको होता? 'निर्मळ' हा हल्ली 'दुर्मिळ' झालेला गूण ज्या नेतृत्वाकडे होता ती इमानदार छबी इतक्या सहजपणे कोणी का फेकून द्यावी? मग चांगली माणसं राजकारणात येत नाहीत म्हणून आपण सगळेच जो गळा काढतो त्याला तरी काय अर्थ? म्हणूनच देवेंद्र का गेले आणि त्यांना कोणी घालवले हा प्रश्न उपस्थित होतो. त्यांचा शत्रू कोणी एकच होता की अनेक शत्रू त्यांनी निर्माण केले होते? हे वैरी स्वपक्षातीलच होते की अन्य पक्षातील? वदंता अनेक आहेत. वर वर पाहता मित्रपक्ष शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या राजकीय पक्षांनी फडणवीसांना घालवले असे कुणालाही वाटू शकते. पण हे अर्धसत्य आहे. नेत्यांचे म्हणाल तर शरद पवार, सोनिया गांधी हे राष्ट्रीय नेतृत्व आणि उद्धव ठाकरे व संजय राऊत हे देखील वर वर पाहता फडणवीसांचे शत्रू वाटू शकतात. पण ते तरी खरे आहे काय, असा प्रश्न भाजपच्याच वर्तुळात आता दबक्या आवाजात विचारला जातोय. तोच सूर 'परिवारा'तही उमटतो आहे. अनेकांशी चर्चा केल्यानंतर दोनच गोष्टी ठळकपणे पुढे येतात. अंतस्थ चर्चा सांगते की, देवेंद्र यांचे दोनच शत्रू होते. कमालीचा प्रामाणिक राज्यकारभार हा फडणवीसांचा पहिला शत्रू ठरला आणि त्यातून निर्माण झालेली "प्रभावशाली प्रतिमा" हा त्यांचा दुसरा शत्रू . यातील दुसऱ्या शत्रूने त्यांचा बळी घेतला असे प्रांजळ मत अनेक जण खाजगीत व्यक्त करतात. भाजपमधील अनेकांशी आणि नागपुरातील जाणत्यांशी केलेल्या चर्चेतून जे सत्य समोर येतेय ते स्वीकारण्यास अवघड असले तरी तेच वास्तव आहे. दिल्लीतील शीर्षस्थ नेतेच फडणवीसांच्या पतनास जबाबदार आहेत! दिवसेंदिवस प्रभावशाली होत चाललेल्या देवेंद्रांमध्ये रा. स्व. संघ भविष्यातील पंतप्रधान शोधत होता. २०२४ मधील हा "अडथळा" म्हणूनच पद्धतशीरपणे संपवण्यात आला. गव्हातून खडा उचलून फेकावा तसे देवेंद्र यांना अलगदपणे उचलून सत्तेबाहेर भिरकवण्यात आले. एक 'पराभूत' असा शिक्का त्यांच्या कपाळावर मारून त्यांना महाराष्ट्रातच
रोखण्याचा हा डाव होता. देवेंद्र यांच्या दिल्लीच्या वाटा कायमच्या बंद करण्याचे मनसुबे त्यामागे होते. भाजपच्या दिल्लीतील नेत्यांचेच हे छुपे षड्यंत्र होते, असे आता बोलले जात आहे. आपल्या मार्गात अडथळे नको म्हणून हे सगळे कारस्थान रचले गेले आणि योजनाबद्ध रीतीने ते दिल्लीश्वरांनी तडीस नेले. या सगळ्या व्यूहरचनेतून भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांनी देवेंद्र फडणवीस सारखा उत्तम मुख्यमंत्री तर गमावलाच पण शिवसेनेसारखा पंचवीस वर्षांपासूनचा सच्चा मित्रही काँग्रेस-राष्ट्रवादीकडे नेऊन सोडला. या सगळ्या एपिसोडमध्ये शिवसेनेचे काय चूकले, असा प्रश्नही आता उपस्थित केला जातोय. अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. फडणवीस यांना ते ठाऊक होते. फक्त निवडणुकीपूर्वी त्याची घोषणा नको अशी विनंती देवेंद्रांनी उद्धव ठाकरे यांच्या समक्ष अमित शहांकडे केली होती. काय शब्द दिलाय हे अमित शहांना पक्के ठाऊक होते. पण दिलेला शब्द नाकारायचा हे 'धोरण' ठरवले गेले. चाणक्यनिती म्हणून! ही निती ठरवली अमितभाईंनीच पण जाहीर करायला लावली देवेंद्रांच्या मुखातून. तिथेच उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्या मधूर संबंधात मिठाचा खडा पडला. आदेश दिल्लीचा पण अकारणच उद्धव ठाकरेंच्या नजरेत फडणवीस व्हीलन ठरले. कय गेम झाला, हे देवेंद्रांना शेवटपर्यंत कळाले नाही. दिल्लीकर काहीतरी मार्ग काढतील, शब्द मान्य करतील, मातोश्रीवर फोन करतील असे देवेंद्रांना शेवटपर्यंत वाटत राहिले, पण यापैकी काहीही घडले नाही. सरकार आणण्यासाठी किंवा देवेंद्रांना वाचवण्यासाठी महिनाभरात अमित शहांनी मातोश्रीवर एकही फोन केला नाही. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द तर दिला होताच मग फोन कुठल्या तोंडाने करायचा हा खरा प्रश्न होता. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांना फोन करण्याचे धाडस अमितभाई सत्ता जाईपर्यँत दाखवू शकले नाहीत. शेवटी सरकार घालवले पण अमित शहा किंवा मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी कोणताही संपर्क केला नाही. खास करून अमित शहा यांनी घेतलेल्या टोकाच्या शिवसेनाविरोधी भूमिकेमुळेच महाराष्ट्रातील भाजपची नौका बुडाली आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा प्रामाणिक व कर्तबगार मुख्यमंत्री महाराष्ट्राने गमावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंतर "प्लॅन-बी" चे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून संघ देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहत होता. तेच खऱ्या अर्थाने फडणवीसांसाठी मारक ठरले. फडणवीसांचा वाढता प्रभाव अमित शहांना खटकत होता का, असा प्रश्न आता विचारला जातोय. असे म्हणतात की, मोदी यांच्यानंतर आपणच पंतप्रधान झालो पाहिजे हे अमित शहा यांचे स्वप्न आहे. या स्वप्नात सगळ्यात मोठा अडथळा होता तो देवेंद्र फडणवीस यांचा. तो अडसर दूर करण्याचे काम अमित शहा यांनी केले. शिवाय अजित पवारांचे 'भ्रष्टास्त्र' स्वच्छ देवेंद्रांच्या दिमतीला देऊन त्यांची यथेच्छ बदनामी करवली. ते अस्त्रही उलटलेच. दुसरे नारायणास्त्र. तेही देवेंद्रांच्या स्वच्छ प्रतिमेवर कलंकच ठरले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार, अजित पवार, शिवसेना, संजय राऊत यांना दोषी धरण्यात किंवा त्यांना शिव्या घालण्यात आता काहीही अर्थ नाही. लोकच नव्हे तर भाजपचे कार्यकर्तेही आता म्हणतायत की २०१४ ते २०१९ आणि २०१९ ते २०२४ या १० वर्षांतील शेवटचे अडीच वर्षांचे मुख्यमंत्री पद शिवसेनेला देण्यास खरे तर काहीच हरकत नव्हती. पण ज्या पक्षाच्या पाठिंब्यावर आपल्या पक्षाला साडेसात वर्षांचे मुख्यमंत्रिपद मिळते आहे त्या शिवसेनेला अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद देण्याचे औदार्य भाजप अध्यक्ष अमित शहा का दाखवू शकले नाहीत..? हा प्रश्न उरतोच. महिनाभरात शहा-मोदींनी ठाकरेंशी एकदाही संपर्क का करू नये हेत देखील एक रहस्यच आहे. राजकारण बाजूला ठेवा, पण अगदी व्यापारी दृष्टीने विचार केला तरी २०१४ ते २४ या १० वर्षांतील साडेसात वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मोबदल्यात अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला सोडणे व्यवहार्यच होते. तो शहाणपणा अमित शहा यांनी का दाखवला नाही? त्यामागचा 'व्यवहार' वर सांगितला आहेच. देशाची आर्थिक राजधानी असलेले महाराष्ट्रासारखे प्रगतिशील राज्य आणि तेथील सत्ता गमावण्यामागील खरा व्हिलन महाराष्ट्रात नाही तर तो दिल्लीतच आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मातोश्रीवर जाऊन चर्चा करणार्या अमित शहा यांनी मागच्या महिनाभरात उद्धव ठाकरे यांच्यासारख्या सौम्य नेतृत्वाशी एकदाही भेट,चर्चा सोडा एकदाही फोन का करू नये? कारण एकच. फडणवीस नको होते. नरेंद्र नंतर देवेंद्र .. हा रस्त्यातील काटा होता. तो हटवला, आणि त्याचे किटाळ शिवसेनेवर झटकले.. संशय घ्यावा अशा अनेक जागा आहेत. सुज्ञास अधिक सांगणे न लगे..!
*--ग. तु. जोशी, पुणे.*
भाजपच्या दिल्लीतील नेत्यांचेच
भाजपच्या दिल्लीतील नेत्यांचेच हे छुपे षड्यंत्र होते,
>>
इतका स्वच्छ, प्रामाणिक आणि निर्मळ मुख्यमंत्री महाराष्ट्राला (पुन्हा, पुन्हा, पुन्हा) लाभू न दिल्या बद्दल भाजपच्या दिल्लीतील नेत्यांचा जाहीर निषेध.
काय हे? कसला पांचट लेख
काय हे? कसला पांचट लेख लिहिलाय.... जोश्यांचं डोकं फिरलय... कन्स्पिरसी थेअरी म्हणायच्या लायकीची पण नाही.
फक्त एकच प्रश्न.. हे सगळं खरं असेल, तर जोशी अमितभाई वरचा राग कसा काढणार म्हणे? पुढच्यावेळेस काँग्रेसला मत देउन की काय?? :ड
https://twitter.com/aajtak
https://twitter.com/aajtak/status/1199358745198776321
फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतला चक्की पिसिंगबद्दलचा प्रश्न.
जबरदस्त !! धन्यवाद पुरोगामी
जबरदस्त !! धन्यवाद पुरोगामी गाढव ( अहो असा का आय डी घेतलाय हो, चांगला तरी घ्यायचा )
जिंकून देखील भारत सारा मोदीजी
जिंकून देखील भारत सारा मोदीजी इथे रडले होते
कारण अडीच वर्षाचे मुख्यमंत्री पद मागून उद्धवजी त्यांना नडले होते
त्या ग त जोशींचाच असाच एक
त्या ग त जोशींचाच असाच एक कोड लँग्वेजमध्ये लिहिलेला लेख मागे व्हॉ अॅ वर आला होता. चिकटवलाय इथे = मायबोलीवर.
वाटले पण होते तसे की काय हरकत
वाटले पण होते तसे की काय हरकत होती शिवसेनेला अडीच वर्षे मु . पद द्यायला. आता तेल गेल नी तुप पण गेले.
आता नाहीच मिळणार गाण्याच्या
आता नाहीच मिळणार गाण्याच्या ऑफर्स, नवरा मुख्यमंत्री होता म्हणूनच मिळत होत्या. शिवाय त्यांना व्यवस्थित किंवा थोडंफार येत असेल गाता, मला काही त्यातलं कळतं नाही. पण आलेल्या ऑफर्स सोडाव्यात का? त्या अजूनही बँकेत आहेतच की नोकरीला.
जोशी यांनी लिहीलेल्यातले काही
जोशी यांनी लिहीलेल्यातले काही मुद्दे, न्युज चॅनेलवरुन असावेत कदाचित कारण फडणवीस जेव्हा दिल्लीत गेलेले शहा यांना भेटायला तेव्हा एका मराठी न्यूज channel चा रिपोर्टर म्हणत होता की फडणवीस यांना एकटे पाडले जातंय. शहा मध्ये पडायला तयार नाहीत, एक फोन उद्धवना करत नाहीयेत, पुढे जाऊन देवेंद्र देशाचे पंतप्रधान होऊ शकतात हि क्षमता त्यांच्यात आहे, म्हणून हे असं सुरु आहे अशी दिल्लीच्या राजकारणात चर्चा आहे.
पर्सनली मला देवेंद्र फडणवीस आवडतात पण त्यांनी विखे, राणे आणि आता पवार यांना जवळ केलं ते मला आवडलं नाही, पटले नाही.
अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्यायला लागलं तरी चालेल पण युतीचं सरकार यावं अशी इच्छा होती माझी.
या ग तु जोशींना हुडकून काढले
या ग तु जोशींना हुडकून काढले पाहीजे. आधीही लेख आलेला हे माहीत नव्हते.
निवडणूकपूर्व ज्या ED च्या
जाऊ दे! कळेलच
हे मी आधी लिहिलं होतं. फडणवीस
हे मी आधी लिहिलं होतं. फडणवीस एकटे पडायला तेच जबाबदार आहेत.
मी पुन्हा येईन ऐवजी आम्ही पुन्हा येऊ असं म्हणू शकले असते.
खडसे, तावडे, बावनकुळे नवा लाथाडून विखे आणि कोण कोण जवळ केले.
यशात भागीदार असतात. अपयशात नाही.
ग तु जोशींचा लेख या पानावर
ग तु जोशींचा लेख या पानावर आहे
https://www.maayboli.com/node/71980
Page 8
मी पुन्हा येईन ऐवजी आम्ही
मी पुन्हा येईन ऐवजी आम्ही पुन्हा येऊ असं म्हणू शकले असते.
खडसे, तावडे, बावनकुळे नवा लाथाडून विखे आणि कोण कोण जवळ केले.
यशात भागीदार असतात. अपयशात नाही. >>> हे पटलं, मी तेच थोड्या वेगळ्या प्रकारे लिहिलं.
हे मी आधी लिहिलं होतं. फडणवीस एकटे पडायला तेच जबाबदार आहेत. >>> ते स्वत: आणि इतर घटकही वाटतात मला.
ती बुलेट ट्रेन फंड
ती बुलेट ट्रेन फंड डायव्ह्रशनची थेअरी खरी आहे का?
ओह. म्हणजे ग तु जोशी
ओह. म्हणजे ग तु जोशी अस्तित्वात देखील आहेत आणि ते रास्वसंघाचेच आहेत. मला आधी शिवसेनेचे वाटले होते.
ग तु जोशींचे टिपण वाचून अतीव
ग तु जोशींचे टिपण वाचून अतीव आनंद जाहला. या संघोट्यांच्या कार्यपद्धतीचा हा उत्कृष्ट नमुना आहे. त्या दिल्लीतल्या चाणक्यांना जर फडणविसांचे इतकेच भय होते तर यावेळी खडसे वगैरे बहुजन समाजातील नेतृत्व पुढे करून इथली राजकीय परिसथिती आटोक्यात ठेवता आली असती. तशी चांगली संधी देखील होती. दिल्लीच्या रिमोटवर हालचाली चालतात हे मान्य मात्र स्थानिक पातळीवर तसा भरोसा, कमिटमेंट दिल्याखेरीज इतकं एककल्ली वागणं कुणी करणार नाही. ह्या पतनात फडणवीसांचा वाटा सिंहाचा आहे.
ज्या जोडीच्या करिष्म्यावर यांचे अच्छे दिवस आले त्याच जोडीला नावे ठेवणे हीच संघोट्यांची खरी संस्कृती.
फडणवीसांना कोणी घालवले..?* >>
फडणवीसांना कोणी घालवले..?* >>>>
कै च्या कै.... फडणवीस, कुठे शहा. तिथे गडकरी जैसे थे परिस्थितीत आहेत, त्यात फडणविस भावी पंप्र... ???
Whatsapp चाणक्य
Whatsapp चाणक्य
Friends , Maharashtra was not a miscalculation or mistake as we think. It was a planned and calculated decision. Why ? Read this.
There are huge funds in Maharashtra government accounts, deposited as part of funds for Bullet train. Centre, Maharashtra and Gujarat control these funds. Sonia wanted to divert these funds for Farmer loan waiver though Japan wouldn't have agreed. But Japan cannot stop Maharashtra CM if he wants to go ahead. That would abort the Bullet train project. It will help Congress to siphon off funds in the name of waivers.
Fadnavis was care taker CM till 22 and he could not have transferred the money to central funds. So he struck a deal with Ajit Pawar (Shah Modi gameplan) and produced letters of support of 159 MLAs through party chiefs. That's why the emergency swearing in. He has transferred almost all the money to central funds, making it impossible for new government to touch the funds.
He will resign now but they have prevented the Congress from poaching into Bullet train project. Sonia's insistence in her CMP was Farmer's loan waivers (the easiest way to scam, like they did in Karnataka and MP) and stop Modi's dream project of Bullet train.
So it was for a cause. Ajit Pawar didn't know all this and thought he can become Deputy CM. In the 3 days, Fadnavis has finished the designated job. Now the Triplets can screw themselves.
Bharat I was talking about
Bharat I was talking about the same. Is this true and possible?
I have no interest in
I have no interest in Politics , but then according to BJP supporters Bullet Train is more important than Farmers ?
मी व्यक्तीशः विरुद्धच्या आहे
मी व्यक्तीशः विरुद्धच आहे या बुलेट ट्रेनच्या. पण मला किंमत देतयं कोण? मुळात काय विचार करुन मोदींनी ही योजना राबवायला घेतलीय देव जाणे. आपल्या देशात अजूनही रेल्वे रुळावरुन क्रॉस करतांना शेकडो लोक मरतात, जनावरे मरतात. कित्येक ठिकाणी ( जिथे सुनसान जागा आहे, शहर/ गावाबाहेर आहे ) रेल्वे क्रॉसिंग च्या जवळ फाटक उघडे असते, अपघात होतात. ते कधी सुधारणार? रेल्वेला ज्या मुख्य सुविधा हव्यात ते कधी होणार? ते होत नाही, मग कशाला हवी असली बुलेट ट्रेन?
उलट ट्रेन ही जपान, जर्मनी सारख्या शिस्तप्रिय देशातच योग्य आहे. आधी शेती व शेतकरी यांना सांभाळा मग ही स्वप्ने सरकारने बघावीत. समजा पुढे काँग्रेस निवडुन आली आणी त्यांनी हा प्रकल्प रद्द केला तर मला खरच आनंद होईल.
बुलेट ट्रेन प्रकल्पात जपानी
बुलेट ट्रेन प्रकल्पात जपानी अर्थसाहाय्याबरोबर गुजरात आणि महारास्ट्रानेही खर्चाचा हिस्सा उचलायचा होता.(एक मतप्रवाह मानतो की महाराष्ट्राला लाभापेक्षा खर्चाचे ओझेच जास्त आहे.) केंद्र सरकार परदेशी कंपनीने दिलेले कर्ज महाराष्ट्राकडे का ठेवील? तर ते बुलेटसाठी बाजूला काढून ठेवलेले महाराष्ट्राचेच योगदान असावे अशी शक्यता असेल काय? पण एव्हढ्यासाठी तीन दिवसांचा तमाशा कोणी खेळेल अशी शक्यता वाटत नाही.
ही बुलेट ट्रेन महाराष्ट्रावर ( कुणाच्या तरी वेड्या स्वप्नापायी ) लादली गेली आहे ही वेगळी गोष्ट.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/15-mi...
दोन उ म? मग बाकी पण २-२ ठेवा की. खरे तर ३ पाहीजे.
खरं काय ते आपल्या सामान्य
खरं काय ते सामान्य लोकांना कधीच समजणार नाही. खरं असेलही किंवा नसेलही. दोन मतप्रवाह, श प यांनी गेम केला नक्की देवेंद्र यांचा की मोदी शहा यांनीच केला अजित पवार यांचा.
काहीही असलं तरी सामान्य जनतेसमोर या दोघांची नामुष्की झालीय, असंच दिसलं ना.
कशाला केंद्रीय नेत्यांना
कशाला केंद्रीय नेत्यांना नावे ठेवताय ? त्यांनी खुप पुर्वी गडकरींचा , सुषमा स्वराज यांचा काटा काधुन नमोसाठी जागा तयार केली असे म्हणा एक वेळ.
फदणविसाम्ची अधोअगती भक्तांमुळे झाली. समोर कुणीच नाही ही हाकाटी भक्तांनी हाकली.दे.फ. गहाळ झाले. मोदींच्या बाबतीत हे वर्क झाले कारण बालाकोट्ची पुण्याई. इथे ३७० चा प्रयोग झाला पण लोकांनी सरळ विचारले ३७० चा महाराष्टाशी संबंध काय? त्यावर मोदी म्हणाले चुल्लुभर पानी मे डुब मरो. समोर शरद पवार काय डझन भर दिग्गज नेते आहेत. मंत्रिमडळात बसवायचे कसे हा प्रश्न आहे उलटा. तरी नशीब काही भाजपा मधे गेले त्यामुळे त्यांची सोय सध्या बघावी नाही लागणार.
व्यक्ती केंद्रीत राजकारण केले की भाजपाला फायदा होतो ह्या ग्रुहितकावर सगळे कॅम्पेन उभे राहिले. पण ह्या विधानसभा निकालानंतर किमान महाराष्टृआत तरी व्यक्ती केंद्रीत राजकारण १००% य्शस्वी होत नाहे असे वाटतय.
खखोदेजा, पण एकनाथ खडसे मु होऊ
खखोदेजा, पण एकनाथ खडसे मु होऊ नयेत ही देवेंद्रांची ईच्छा होती, आणी खडसेंवर पण काही आरोप होते म्हणून पक्षाने देवेंद्रांना मम म्हणले. पण कदाचीत हेच त्यांना भोवले आहे. सगळ्या राजकारण्यांनी एकमेकांच्या पाठीत धप्पे मारलेत. तर नवीन म्हण तयार झाली.
कालचा शत्रु हा आजचा मित्र व उद्याचा व्याही असु शकतो.
राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा
राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, भूमिका बदलते. कार्यकर्ते, समर्थक उगाच एकमेकांशी वाद घालतात.
मला तर वाटतंय काही काळानंतर अजित पवारना मुख्यमंत्री करतील, सध्या नाही. तोपर्यत भाजप पण काहीतरी शिजवेल एकीकडे.
बुलेट ट्रेनचे पैसे वळवायला हे
बुलेट ट्रेनचे पैसे वळवायला हे नाटक केले असेल तर आम्हाला अजित पवारांचा खोटा पाठिंबा देऊन उल्लू बनवल्या जाऊ शकतं ही कल्पना पवार कुटुंबाच्या डोक्यात इन्सेप्ट करावी लागली असेल. हे कसं केलं यावर The Lotus Inception नावाचा चित्रपट जरूर बनवावा.
Pages