Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37
मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले
फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !
महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.
आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लै भारी झालं
लै भारी झालं
हुश्श्.
हुश्श्.
झालं एकदाचं ध्रुविकरण.
हा कहानी मे नयाच ट्विस्ट
हा कहानी मे नयाच ट्विस्ट दिसतोय. मग आता १. भाजप-सेना वाटाघाटी (९ दिवस), २. आघाडी वाटाघाटी (११ दिवस) ३. फडणवीस-पवार नुसताच शपथविधी (३ दिवस). ४. पुन्हा आघाडी तर्फे सरकारस्थापनेच्या हालचाली - चौथा अंक
खरंतर आता कंटाळा आलाय, उरका
खरंतर आता कंटाळा आलाय, उरका काय ते लवकर.
आघाडीचे नेते राज्यपालांना
आघाडीचे नेते राज्यपालांना एकत्र भेटायला गेलेत.
बेस्ट झालं.
बेस्ट झालं.
थोबाड फुटलेलं बघायला मजा आली. गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही!
एक रात्र मधे आहे. पहाटे छगन
एक रात्र मधे आहे. पहाटे छगन भुजबळ काही आमदारांसहीत शपथ घेऊ शकतात.
अभी तो असली गेम शुरु हुवा है
अभी तो असली गेम शुरु हुवा है!
फडणविस ८०% आरक्षणाचं जोरजोरात
फडणविस ८०% आरक्षणाचं जोरजोरात समर्थन करत होते. इतकं करुन मराठा मतं मिळाली तर नाहीतच.
पण त्यांच्या १०५ सीट येऊन पण सीएमचा जॉब भेटला आही आणि तिकडे ५६-५४ सीटवाल्यांना तो जॉब मिळतोय तेव्हा कुठेतरी नियतीनेच न्याय केलेला आहे असं वाटतं.
मेधा कुलकर्णीचे तळतळाट भोवले.
मेधा कुलकर्णीचे तळतळाट भोवले.
कुलकर्णी चौकातली चंपा
NDTV and mirror now म्हणताहेत
NDTV and mirror now म्हणताहेत २८ ला उद्धव शपथ घेतील.
एबीपी माझा अजूनही १ डिसेंबरच म्हणतंय.
>>> फडणविस ८०% आरक्षणाचं
>>> फडणविस ८०% आरक्षणाचं जोरजोरात समर्थन करत होते. इतकं करुन मराठा मतं मिळाली तर नाहीतच. >>>
व्हि पी सिंगांपासून वसुंधरा राजे, गेहलोट, पृथ्वीराज चव्हाण, मनमोहन सिंग आणि आता फडणवीस या सर्व सरकारांचा इतिहास पाहिला तर असं दिसतंय की एखाद्या जातीला राखीव जागा देणारे सरकार पुढील निवडणुकीत निवडून येत नाही.
याचे कारण म्हणजे ज्यांच्या जागा हिसकावून दुसऱ्यांना दिल्या जातात ते चिडून विरोधात मत देतात व ज्यांना जागा मिळतात ते त्याचे श्रेय जागा देणाऱ्या सरकारला न देता जागांसाठी आंदोलन करणाऱ्या संघटनेला देतात.
किमान समान कार्यक्रमाचे काही
किमान समान कार्यक्रमाचे काही डीटेल्स आले का? ट्रायडण्ट मधल्या बैठकीनंतर येणार होते. लोकसत्ता मधे अजून काही दिसत नाही.
कलराज मिश्र महाराष्ट्राचे
कलराज मिश्र महाराष्ट्राचे भावी राज्यपाल
छानच व्यवस्थित जिरली.
छानच व्यवस्थित जिरली.
आता तोंड फुटलेले भाजपेयी rss
आता तोंड फुटलेले भाजपेयी rss मधून आणि भाजप आयटी सेलमधून सुटणारे मेसेज इथं फॉरवर्ड करतील. सगळ्या जनतेला माहीत असलेलं पवार आणि ठाकरे नातं आपणच भाट असल्यागत सांगतील. एवढंच होतं तर 5 वर्षं का गुन्हा सिद्ध झाला नाही अजित पवारवर? आत्ता पण इतर राज्यातील गुन्हेगारांना वळवलं तसंच आमिष अजित पवारला दाखऊन तडकाफडकी शपथविधी करून टाकला, पण हे विसरले की अजून शरद पवार हरलेले नाहीत. महाराष्ट्रात माज खपवून घेतला जात नाही हेच खरं!
निर्लज्ज भाजप, आणि कोडगे अंधभक्त!
पुन्हा येईन ही फडनविसने
पुन्हा येईन ही फडनविसने केलेली कविता आहे म्हणे.
पूर्ण कविता कुठे आहे?
२३ नोव्हेंबर २०१९ , सकाळी ८
२३ नोव्हेंबर २०१९ , सकाळी ८ वाजता...
*मी परत आलोsssssss........*
२६ नोव्हेंबर २०१९ , दुपारी २:३० वाजता .
*तू आया नही , लाया गया है*
<<याचे कारण म्हणजे ज्यांच्या
<<याचे कारण म्हणजे ज्यांच्या जागा हिसकावून दुसऱ्यांना दिल्या जातात ते चिडून विरोधात मत देतात व ज्यांना जागा मिळतात ते त्याचे श्रेय जागा देणाऱ्या सरकारला न देता जागांसाठी आंदोलन करणाऱ्या संघटनेला देतात. >>
आता नवीन सरकारने उरलेले २०% ही आरक्षित करुन १०० % कोटा देऊन टाकावा.
माझी फक्त एकच आशा आहे की महा-विकास-आघाडीत एकही ब्राम्हण मंत्री नसावा. तसंही त्यांच्याकडे एकही ब्राम्हण आमदार नसेलच. सो आता
पूर्णपणे ब्राह्मण-विरहित सरकार असावं. यातच ब्राम्हण समाजाचं भलं आहे. फडण२० चं हे पद म्हणजे उगाच एक डोकेदुखी/ डिस्ट्रॅक्शन झालेलं.
ब्राम्हणांचं भलं, मराठ्यांचं
ब्राम्हणांचं भलं, मराठ्यांचं भलं, त्या जातीचं भलं म्हणजे आपण अजून जातीच्या चष्म्यातूनच बघत रहायचं का?
अमुक जातीला सत्तेत शून्य
अमुक जातीला सत्तेत शून्य प्रतिनिधित्व असणं अपेक्षित आहे असं लिहिलं तर त्याबद्दल कोणाला प्रॉब्लेम असू नये. फडण२० च्या पदामुळे उगाचच ५ वर्ष फार कटकट झाली. आता या ड्रामामधून एका तरी कम्युनिटीने लॉग आऊट करावं.
गड आला पण सिंह गेला!
गड आला पण सिंह गेला!
भाजपा चा पुन्हा एक प्रयत्न फसला.. गडकरी म्हणले तसे राजकारणात व क्रिकेट मध्ये काहिही होऊ शकते.
चला अब की बार, ठाकरे सरकार!
मा. ऊध्दव जी ठाकरे यांचे अभिनंदन. ज्या गोष्टिसाठी ते ईरेला पेटले होते ते मुख्यमंत्रीपद त्यांना मिळाले. हा गड सर करताना बर्याच पडझडी व चढाया झाल्या. बरेच सैन्य दोन्ही बाजूकडील घायळ झाले. पण ज्या साठी हा सर्व अट्टहास केला होता ते मिळवण्यासाठी मात्र तीन दशके ज्यांच्या पक्षाची व कुटूंबाची शकले करण्यात सेनेची हयात गेली, ज्या हिंदूत्वाच्या ध्वजाची मान राखण्यात प्रखर हिंदुत्ववाद व प्रसंगी आंदोलने केली आणि ज्या पक्षाला अस्पृश्य म्हणून वागवले आता त्यांच्या मॅडम समोर झुकावे लागणे, पवारांच्या ऊपकाराखाली तहहयात आबदीन राहणे आणि हिंदुत्व या शब्दाला मुरड घालणे ईतका मोठा तह करावा लागला. या तीन पायाच्या सरकारचा गाडा हाकताना अर्थातच प्रत्येक पक्षातील प्रत्येक बड्या सरदाराची लाज, बूज व मान राखल्याशिवाय या नविन राजाला एक पाऊल पुढे टाकणे देखिल अवघड आहे. पुढील काही दिवस हार तुरे फुले पेढे यात जातील. आणि नंतर तेच जुने प्रश्ण आ वासून ऊभे असतील वाट बघत. त्यातही केंद्रात एक हाती सत्ता असलेल्या पक्षाचा विरोधक म्हणून पदोपदी सामना करायला लागणे, या सर्वात नेतृत्व, कणखरपणा, मुत्सद्दीपणा test of character या सर्वाची कसोटी लागेल हे नक्की. एकतर यातून ऊध्द्व ठाकरे तावून सुलाखून बाहेर पडतील (अशीच आशा आहे) किंवा पोळून निघतील. या पोळ्यात हुकूम चालवणारी राणी आहेच पण मध खायला मिळण्यासाठी आलेल्या माशा मात्र असंख्य आहेत. यातून जो काय ऊरला सुरला मधु गळेल तो सामान्यांच्या वाट्याला येईल.
असो. कुठलाही बदल हा संघर्षातून जन्माला येतो आणि संकर्षणातून व्रुध्दिंगत होतो. हा बदल महाराष्ट्रासाठी मात्र चांगला पर्याय ठरो अशी आशा करुयात. शेवटी आपण 'आम' जनता असतो. पडद्यावरचा खेळ संपला की रोजच्या रुटीन ला लागतो. पण या सर्वाचं श्रेय शरद पवार यांना कसं जातं हे आत पुढील काही दिवस खमंग रकान्यांतून वाचायला मिळेल. प्रत्यक्षात मात्र बाकी बरेच खेळाडू धावचीत व हिट विकेट होत असताना आणि आतातायी फटके मारून सामना गमावत असताना, पवार 'द वॉल' सारखे खेळ्पट्टीवर ठामपणे ऊभे राहिले हे मान्य करावे लागेल. साहेबां नंतर मात्र मोठी पोकळीच आहे हे मात्र त्या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले. दुसरीकडे मात्र भाजपा चे राजकारण मॉडेल आता संघाच्या चौकटीतून बाहेर पडून पैलवानांच्या आखाड्याकडे जास्त झुकताना दिसतय. अलिकडे सगळीकडच्या चिखलात कमळ फुलवण्याच्या अट्टहासात कमळावर मात्र जास्त चिखल जमा होतोय. हा बदल भाजपा च्या नव्या फळीला कितपत मानवेल हे येणारा काळच ठरवेल. ज्या गोष्टी कॉंं पक्षाने त्यांच्या चार दशकाच्या सत्तेच्या काळात करून सवरून झाल्या त्याच गोष्टि करताना भाजप दिसतोय.. I think the circle will complete in future. आणि कदाचित तेव्हाच एका नव्या पर्वाची सुरुवात होईल. द्विपक्षीय लोकशाही. पण तोपर्यंत अशी अनेक संघर्ष व संकर्षणे पहाणे आपल्या पिढीच्या नशीबात आहे हे नक्की.
गेल्या काही दिवसांतील या राजकीय नाट्याने मात्र एरवी पडद्यामागे चालणारी नाट्ये, नायक, खलनायक, ई. सर्व थेट सर्वांना 24x7 बघता आले. प्रत्येक छोटी गोष्ट देखिल 'ब्रेकींग न्युज' म्हणून राबवत राहणार्या मिडीया मधिल सर्वांना काहितरी ठोस काम मिळाले. त्या निमित्ताने पुन्हा एकदा ईथे देखिल मायबोलीकरांनी हिरीरीने भाग घेतला आणि माबोटीचा टीआरपी वाढवला. आणि हो राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या ईतकाच पक्ष गटनेता देखिक महत्वाचा असतो हे नव्यानेच कळले. शालेय जीवनात नागरीकशास्त्र विषय हलका घेतल्याने आज हा सर्व भार जड जातोय हेच खरे.
so all is well that ends well.
सेनेच्या समर्थकांचे अभिनंदन! भाजप च्या समर्थकांसाठी सहानुभूती! राष्ट्रवादीच्या समर्थकांसाठी मात्र काळजी वाटते. कॉंग्रेस बद्दल काय बोलायचे. ईतक्या ऊभ्या थरार नाट्यात राहुल गांधींचे कुठेच नामो निशाण नव्हते. तेव्हा त्या पक्षाला राहुल गांधीं च्या पलिकडे जाऊन विचार करणे क्रमप्राप्त आहे. स्वतंत्र भारताच्या राजकीय पटलावर महाराष्ट्राची भूमिका नेहेमीच महत्वाची व ऐतिहासीक ठरलेली आहे आणि याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
ताकः महाराष्ट्रातील राजकीय दिवाळी संपल्यात जमा आहे तरीही अजून पूर्वीचे मुख्यमंत्री व भावी मुख्यमंत्री यांच्यात फुटणारे फटाके मात्र मिडीया मध्ये अजूनही वाजत आहेतच. दोघांनी आता आपल्या पद व प्रतिष्ठेला साजेसे वर्तन करावे एव्हडीच अपेक्षा आहे. शेवटी मोठ्यांनी मोठ्यांसारखे वागावे हेच बरे, अन्यथा अनेक छोटे अचानक मोठे वाटू लागतात.
बरोबर बोललात सनव.उठता बसता
बरोबर बोललात सनव.उठता बसता पेशव्यांना आणि ब्राह्मणांना शिव्या देण्यापेक्षा महाराष्ट्रा बाहेर काढावे म्हणजे भ्रष्ट्राचार पण शून्य होईल आणि समस्त लोक गुण्यागोविंदाने राहतील
बरोबर बोललात सनव.उठता बसता
बरोबर बोललात सनव.उठता बसता पेशव्यांना आणि ब्राह्मणांना शिव्या देण्यापेक्षा महाराष्ट्रा बाहेर काढावे म्हणजे भ्रष्ट्राचार पण शून्य होईल आणि समस्त लोक गुण्यागोविंदाने राहतील
भ्रष्टाचार शून्य झालाच आता
भ्रष्टाचार शून्य झालाच आता आघाडी सरकार आलं म्हणजे!
महाराष्ट्राबाहेर कोणाला आणि कसं काढायचं ते जरा डिटेलमध्ये लिवा बरं
योग पोस्ट आवडली, पवारानी भाजप
योग पोस्ट आवडली, पवारानी भाजप-शिवसेनेतली दरी फार आधी ओळखली आणि ती दुरावत जाइळ याची होता होइतो खबरदारी घेतली त्यामुळे द्विपक्षिय सरकाराची सन्धी असुनही शिवसेनेला आपल्या पन्खाखाली घेवुन अजुन दुबळ करणे आणि भाजपला सत्तेपासुन दुर ठेवणे ज्यायोगे भाजपाला केन्द्रातही शह देता येइल अशी तिहेरी खेळी पवारानी खेळलीये.
जी चुक शिवसेनेने रा.कॉ. कडुन कुठलीही शिफारस नसतानाकेली तिच चुक फडणविसानी अजित दादावर विष्वास ठेवुन करावी हे म्हणजे पुढच्यास ठेच लागुन मागच्याने त्याच दगडाला लाथ मारण्यासारखे झाले.
एकतर १०५ असा सगळ्यात जास्त नबर असताना जे साटलोट करायला नतर तयार झाले ते आधिच करायचे होते किवा मानभावीपणे सत्तेपासुन लान्ब राहुन ही ३ पायान्ची शर्यत पाहात राहावी.
उठानी इरेला पेटुन जळत्या निखार्यावर पाय देत हे काटेरी सिहासन स्विकारलय त्याना ते किती टोचत आणी किती भाजत लवकरच कळेल.
उठा बाळासाहेबांपेक्षा समंजस
उठा बाळासाहेबांपेक्षा समंजस वाटतात. अर्थात उठाकडे बाळासाहेबांसारखा करिष्मा नाही, पण आता गेली दहा एक वर्षे सेनेच्या नेतृत्त्वाचा अनुभव आहे. फुका रिमोट कंट्रोलगिरी न करता सत्तेच्या रिंगणात आले ते ही उत्तम केलं. आता रिमोटचे दिवस गेले हे ही समजलंय त्यांना.
उठा टिकतील तितके दिवस टिकतील, पण देशभर प्रादेशिक पक्ष + काँग्रेस एकत्र येऊन भाजपाला थोपवू शकतात हा फार मोठा धडा मोदी-शहांना मिळणारे. आणि पैसे, ब्लॅकमेलिंगला लोक एकदोनदा बळी पडतील, पण भक्त परिवार सोडला तर इतर मतदार डोळस आहे, आणि त्यांची मत मिळवायची तर स्पाईनलेस असून चालणार नाही हे आमदारांना समजेल असं धरुन चालू.
भक्त परिवार स्पाईनलेस आहे, आणि भाजपाने काहीही केले तरी कणाहीन कोलांट्याउड्या मारत रहातील ते लोक. त्यांना मागे सोडून पुढे गेलेलं बरं.
आणि पानिपतच्या आधीच
आणि पानिपतच्या आधीच महाराष्ट्रात पानिपत-२ रिलिज झाला...
प्रमुख भूमिकेत -
फडणवीस - सदाशिवरावभाऊ
अजितदादा - विश्वासराव
पवार - धूर्त अब्दाली
उठा काही स्वेच्छेने मुमं
उठा काही स्वेच्छेने मुमं झालेले नाहीत. त्यांना मुलाला किंवा दुसर्या कुणाला मुमं करायचे होते म्हणजे ते रिमोट हाती ठेवू शकले असते. (तसंच सिल्व्हर ओक आणि १० जनपथच्या वार्या त्यांना कराव्या लागल्या नसत्या. ) पण एवढं सगळं घडवून आणल्यानंतर थोरले पवार हातचा रिमोट कसा बरं जाऊ देतील? त्यामुळे उद्धवनीच मुमं झालं पाहिजे ही थोरल्या पवारांची अट आहे. तेव्हा उद्धव नामधारी मुमं होणार आणि बाकी श प बोले तैसे राज्य चाले हेच होणार.
असो. तसे तर तसे. तीन पायांची शर्यत एकाच दिशेनी धावु दे म्हणजे झालं.
भाजपाच्या वळचणीस राहून पक्ष
भाजपाच्या वळचणीस राहून पक्ष संपण्याच्या मार्गावर होता हे शेंबडे पोर देखील सांगेल त्यामुळे उध्दव ठाकरेंचे काही चुकत आहे असे वाटत नाही. आहे त्या परिस्थितीत जो काही सर्वोत्तम पर्याय निवडता येईल तो बरोबर निवडला आहे. बाकी या महानाट्याचे मुख्य सूत्रधार पवारांकडून शिकण्यासारखं बरेच आहे. ही निवणूक सर्वार्थाने पवार पॉवर मुळे लक्षात राहणार यात दुमत नाही.
Pages