फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37

मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले Happy

फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !

महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.

आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एबीपी माझा तर सांगतंय की सात डिसेंबरपर्यंत मुदत मिळेल भाजपला. सुप्रीम कोर्टच्या आधी अशी विधाने कशी करतात. खरं असेल तर ह्याना कसं माहिती. पण अशा news देऊ नयेत ना.

>>> भाजपाशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यातून क्लीन चीट देण्यात आल्याचं वृत्त सीएनएन न्यूज १८ ने दिली आहे. >>>

हे खरे असेल तर फडणवीसांनी आज अजून खालची पातळी गाठली असं दिसतंय.

पण शपथ घेतली ना?
मला खरंतर काही कळत नाही.
की
शप्पथ शप्पथ सुटली
देवाला साखर वाटली
होणार

न खाउंगा न खाने दुंगा (इलेक्शन बाँडबद्दल बोलू नका, ऐकू नका, वाचू नका)

शिवसेना युतीतून बाहेर पडताच मुंबई मनपाच्या कंत्राटदारांवर आयकर खात्याच्या धाडी पडतात.
(जोवर तुम्ही आमच्या सोबत आहात तोवर खाता येईल.)

अजित पवारांवर सिंचन घोटा़ळ्याचे आरोप केले. चक्की पिसिंगसाठी पाठवू म्हटले. ज्यांच्याशी कधीही हातमिळवणी करणार नाही, असं म्हटलं ते भाजपशी येऊन मिळताच त्यां ना क्लीनचिट मिळायला सुरुवात झाली.
( आमच्या मते जर तुम्ही आधी कुठे खाल्ल असेल तर आमच्याकडे या. आम्ही तुम्हांला आमच्या मते जे खाल्लय ते पचवू देऊ, आणखी खायची संधी देऊ.)

ना खाउंगा ना खाने दूंगा बरं का.

+ अजित पवारांना भाजपच्या मागणीवरून चौकशी चालू असल्याच्या कारणावरून आघाडी सरकारच्या काळात उप मुख्यमंत्रीपदावरून पा य उतार व्हावं लागलं, त्याच अजित पवारांना अजूनही चौकशी चालू आहे ( भाजपच्या सांगण्याप्रमाणे) उपमुख्यमंत्रीपदी बसवलं.

मौजा ही मौजा.

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार अजुनही का स्विकारला नाही..? क्लीन चीट मिळायची वाट बघत होते का..? की आमदारांच्या सह्यांचा कागद घेऊन राज्यपालांकडे पळाले तसं क्लीन चीट घेऊन पळुन येणार आहेत..?? Proud

एक भाबडा प्रश्न -
सरकार स्थापनेला उशीर होत होता,महारा ष्ट्रासमोरचे प्रश्न खोळंबले होते म्हणून ( भाजपच्या मते) ज्यांना १५ वर्षांत ते प्रश्न सोडवता आले नाहीत, किंवा ज ज्यांनी ते निर्माण केले अशा अजित पवारांसह फडणवीसांनी घाईघाईने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता पटापट विश्वासमत मिळवून मंत्री मंडळ स्थापन करून प्रश्न सोडवायला जायला कशाची वाट बघताहेत गडे?

किती लोकांनी "सिन्चन क्लीन्चीट" नावाच्या कोरड्या स्विमिंग पूल् मध्ये उड्या मारल्या ?

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/maharash...

याशिवाय परमबीर सिन्ग यान्ची ट्विट्स वाचा.

https://twitter.com/ANI/status/1198918600637108224

इथल्या सर्वांनी आता शहाणे होऊन ओझ्याची गाढवं बनणे बंद करा.
जे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते होते, घरचं खाऊन लष्करच्या भाक-या भाजत भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अजितदादांना जेल झाली पाहीजे म्हणून दिवसरात्र राबत होते त्यांच्या थोबाडीत बसली आहे या निर्णयाने.

आणि काँग्रेसवाल्यांना काय बोलायचं, आता निर्लज्जपणे विचारताहेत आमच्या माणसाला का सोडता म्हणून !
हाणा साल्यांना

आयला, विधानसभेत डेंग्यु पटकीची साथ यावी आणि २८८ संख्याबळ ताब्यात घ्यावं !
राज्य रोगराईमुक्त होईल.

शुगोल, कालचाच प्रतिसाद आज पुन्हा का?
बरं त्याला काल रात्री मी उत्तर दिलंय. ते वाचून घ्या.
मला वाटतं हा व्हिडियो तुम्हांला खूप आवडेल.
https://www.facebook.com/pulkitchaturvedi007/posts/1169970236725956

दिसला खड्डा की उड्या मारायची सवय आहे त्यांना.... नका अडवू प्लीज
उड्या मारुन मग थोबाड फोडुन घेतात !
Biggrin

शुगोल, कालचाच प्रतिसाद आज पुन्हा का?>>> भरत, काल बटन हिट केलं तेव्हाच नेमकं नेट गंडलं होतं. आज आत्ता मायबोली ऑन केली तर प्रतिसाद आपोआप गेला. देव जाणे कसा काय! असो. संपादित केला आहे. धन्यवाद!

ब्रेकिंग न्यूज - ललित मोदी, विजय मल्ल्या, नीरव मोदी , मेहुल चोक्सी यांनी भाजप सदस्यत्वासाठी अर्ज भरता येतील का याची चाचपणी सुरू केली.

मुंबईतील ग्रॅड हयात हॉटेल मधे,
राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना या पक्षाच्या आमदारांचा, आता थोड्यावेळानंतर पक्षश्रेष्ठींसमोर मुजरा करायचा कार्यक्रम आयोजीत केला आहे व तो कार्यक्रम टिव्हीवर लाईव्ह दाखवणार आहेत सर्वांनी ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्या.
--
च्यायला आमदार आहेत का मेंढर !

तीन पक्षांच्या याचिकेबद्दल सर्वोच्च न्यायालयाला उत्तर द्यायला केंद्र सरकारने दोन तीन दिवसांची मुदत मागितली.
अरे जो निर्णय घेऊन् त्याची अंमलबजावणी करा यला तुम्हांला दोन तीन तास पुरले, त्याचं स्पष्टीकरण द्यायला फक्त दोन तीन दिवस?
दोन तीन आठवडे, दोन तीन महिने, दोन तीन वर्षं मागायची होती.

तीन पक्षांच्या याचिकेबद्दल सर्वोच्च न्यायालयाला उत्तर द्यायला केंद्र सरकारने दोन तीन दिवसांची मुदत मागितली.
--

मग न्यायालयाने दिली का ती मुदत ?

>>> याशिवाय परमबीर सिन्ग यान्ची ट्विट्स वाचा. >>>

ज्यांच्या आदेशानुसार सिंचन घोटाळ्याची चौकशी लांबवून शेवटी अजितदादांचा पाठिंबा मिळवून क्लीन चिट दिली, त्यांच्याच आदेशानुसार हे परमवीर सिंग ट्विट करून समर्थन करणार नाही का?

आज ग्रॅंड हयात हॉटेलमधे महाविकास आघाडीच्या आमदारांचा, जो रॅंपवॉक चालू आहे तो पाहून,
उद्या येणार्‍या न्यायालयाच्या निर्णयावर काही परिणाम होईल का ?

ज्यांच्या आदेशानुसार अजितदादांना क्लीन चिट दिली, त्यांच्याच आदेशानुसार हे परमवीर सिंग ट्विट करून समर्थन करणार नाही का?

नवीन Submitted by पुरोगामी on 25 November, 2019 - 19:42 >>>

कॉन्स्पिरसि थिअरि मांडण्यापेक्षा, तुमच्याकडे काही ठोस माहीती असेल तर मांडा.

Pages