पक्ष्यांच्या वर्गिकरणाविषयी थोडी माहिती
वाढ आणि रचना ह्यांमधील मूलभूत फरकावर आधारित अशा २७ गणांमधे (Order) पक्षीवर्गाचे वर्गीकरण केले जाते. उदा. कुलिंग गणातील पक्षी (Order Passeriformes) म्हणजे झाडावर राहणारे पक्षी, आणि हेच पक्षी आपल्या जास्त परिचयाचे असण्याचा संभव असतो. पाण्याजवळ आपले जीवन व्यतीत करणारे बगळ्यासारखे पक्षी बक गणात (Order Ciconiiformes) अंतर्भूत होतात तर बदके, हंस ह्यांसारख्या पाण्यात राहणाऱ्या पक्ष्यांचा वर्ग म्हणजे हंस गण (Order Anseriformes)
गणांचे आणखी कुलांमध्ये (Families) पृथक्करण करण्यात येते. एका कुलामधील पक्ष्यांचे महत्वाचे गुण सारखेच असतात. कुलिंग गणातील पक्षी म्हणजेच फांदीवर बसणारे पक्षी. ह्या गणात एकूण ४० कुले आहेत. त्यात नाचरे (Muscicapidae), कावळे (Corvidae), फुलचुब (Nectariniidae) ह्यांसारखे पक्षी आहेत. ही कुले म्हणजे खरोखरीचीच कुटुंबे आहेत कारण प्रत्येक कुलात अनेक प्रजाती असतात. प्रजातींमध्ये विकास पावलेले पुष्कळच गुण सारखे असतात आणि त्यामुळे दिसण्यात आणि आचरणात सारखेच दिसतात. ह्या सवयींचे प्रत्यंतर चोच आणि पंजा ह्यांचे आकार, काही वेळा पंख आणि साधारण आकार व हालचाल ह्यांत दिसते. अन्नसाधनांच्या पद्धतीवर चोच आणि पाय ह्यांची रचना अवलंबून असते. पुष्कळ वेळा एखाद्या अनोळखी पक्ष्याची जात जरी सांगता आली नाही तरी त्याचे कुल लगेच सांता येते.
बऱ्याचशा सारख्या गुणांच्या प्रजातीच्या समूहाला गोत्र (Genus) म्हणतात. गोत्र कुलापेक्षा खालच्या वर्गाचे असते किंवा दुसऱ्या शब्दात कुलाचे गोत्रात वर्गीकरण केले जाते. केवळ सोईसाठी सारख्या गुणांच्या प्रजाती एकत्र करुन गोत्राची निर्मिती केली आहे. शास्त्रीय नावांमधील पहिले नाव गोत्राचे असते. एवढ्यापुरताच गोत्राचा संबंध आहे. गोत्रामधील सर्व पक्ष्यांचे पहिले नाव एकच असते. उदा. कावळ्यांच्या अनेक जाती आहेत परंतु त्यांच्यामध्येही काही समान गुण असल्यामुळे त्यांना कॉरव्हस (Corvus) या एकाच गोत्रात गोवले आहे.
गोत्राची विभागणी निरनिराळ्या जातींमध्ये (Species) करणे ही शेवटची पायरी आहे. जात एक नैसर्गिक घटक आहे. आंतर निपज करुन जातींची कसोटी ठरविण्यात येते. एका जातीत सारख्या गुणधर्माचे वेगवेगळे पक्षी असतात. त्यांच्यात पुनरुत्पादन होऊ शकते. सभोवतालच्या प्रदेशाची रचना व हवामान ह्यामुळे काही वेळा एकाच जातीच्या पक्ष्यांमध्ये आकार आणि पिसांचे रंग ह्यात फरक आढळून येतात. उत्तर भागात राहणारे पक्षी दक्षिणेकडे राहणाऱ्या पक्ष्यांपेक्षा साधारण आकाराने मोठे असतात. किंवा दमट हवेत राहणाऱ्या पक्ष्यांचे रंग कोरड्या हवेत राहणाऱ्या पक्ष्यांपेक्षा जरा जास्त गडद असतात. जाती अंतर्गत असे अनेक सूक्ष्म भेद असू शकतात. हे फरक जर अधिक स्पष्ट व कायमचे असतील तर त्या जातीच्या उपजाती आणि वंश ह्यात आणखी भेद करतात. परंतू निरनिराळ्या वंशांमधील पक्ष्यांची आंतरनिपज होऊन सुद्धा जात ती राहिल्यामुळे जात ही वर्गीकरणाचा घटक म्हणून राहतेच.
प्रत्येक पक्ष्याचे गोत्र ठरवून त्याचे कुल आणि जात निश्चित करता येते. सध्या पृथ्वीवर पक्ष्यांच्या ८६५० जाती आहेत. हे पक्षी ज्या २७ गणात विभागलेले आहेत त्या गणांचा अनुक्रम सर्वात कमी प्रगत अशा वंजुल (Grebe) आणि मंजूक (Divers) पक्ष्यांपासून सुरु होऊन अतिशय प्रगत अशा फांदीधारी (Perching) पक्ष्यांपर्यंत शेवट होतो. भारतामधील १२०० पक्ष्यांच्या जाती ७५ कुलांचे प्रतिनिधित्व करतात.
(वरील माहिती सलिम अली यांच्या भारतीय पक्षी या पुस्तकातून जशीच्या तशी घेतली आहे)
-----------हरिहर (शाली)
Creasted Bunting (Male &
युवराज
Creasted Bunting (Male & Female)
Pune outskirts (Ksnd)
24 Nov (7:15 am)
टिबुकली
टिबुकली
Little Grebe
Pune outskirts (Ksnd)
24 Nov (7:45 am)
गांधारी
गांधारी
Bay-backed Shrike
Pune outskirts (Ksnd)
24 Nov (7:00 am)
फारफार सुंदर. काही पक्षांना
फारफार सुंदर. काही पक्षांना आधी पाहिलेच नव्हते. काहींची रंगसंगती मोहुन टाकणारी आहे.
ड्रोन्गोचा चेहरा पण भांडखोरच दिसतोय की.
शाली, तुमच्या कॅमेरा लेन्सची रेन्ज काय आहे?
83X Zoom
83X Zoom
Nikon Coolpix P900. सध्या हा कॅमेरा वापरत आहे.
फार सुंदर फोटो!
फार सुंदर फोटो!
आमच्या सोसायटीच्या बाजूस आंबा, जांभूळ, नारळ,बदाम, रामफळ, कडुनिंब अशी झाडं आहेत.. दिवसभर चिवचिवाट सुरू असतो.. चिमण्या अन मैना तांदूळ पाणी नाशता करायला हॉलच्या खिडकीत येतात .. बाकी बरेच वेगवेगळे पक्षी आहेत पण गर्द झाडीत अजिबात दिसत नाहीत .. फोटो काढेपर्यंत उडून जातात
एकदा पिवळा सनबर्ड आला होता, फोटो काढता पळता भुई थोडी!
चनस तुम्ही सांगितलेली झाडे
चनस तुम्ही सांगितलेली झाडे आहेत म्हणजे भरपुर पक्षी येत असणार तेथे. सुभग, हळद्या, कोकीळ, फुलटोच्या, भारद्वाज, बुलबूल वगैरे हमखास या झाडांच्या आसपास दिसतात. फोटो मिळाले तर उत्तमच नाहीतर पक्ष्यांना फक्त पहायलाही खुप छान वाटते.
मी होला (laughing Dove)
मी होला (laughing Dove) प्रियाराधन करताना पाहिले नव्हते. आज तो एका जाग्यावर उभा राहून मादी होलाचे लक्ष वेधायचा प्रयत्न करताना दिसला. मादीला दिसेल अशा पध्दतीने तो कंठ फुलवत होता. बहुतेक तो कंठावरची फक्त पिसे फुलवत असावा. ते दृष्य सुंदरही दिसत होते व मजेशीरही. विशेष म्हणजे मादी त्याच्याकडे फारसे लक्ष देत नव्हती. पण मी तेथे होतो तोवर त्याने आपले प्रयत्न सोडले नव्हते. सप्टेंबर ते नोव्हेंबर हा त्यांचा नेस्टींग सिझन असल्याने त्यांचे हे प्रियाराधन पुन्हा पहायला मिळेलच. खाली व्हिडीओची लिंक दिली आहे. कंठ फुलवताना तो घुमल्यासारखा आवाज काढतो. पण मी पाहिले तेंव्हा तो आवाज न करताच कंठ फुलवत होता.
येथे होलाचा व्हिडीओ पहाता येईल.
Laughing Dove (Male)
Pune outskirts
24 Nov (5:30 pm)
देवराई
शालीदा, पक्षिनिरीक्षणाची
शालीदा, पक्षिनिरीक्षणाची ऑनलाईन डायरी माबो वर सुरु केल्याबद्दल धन्यवाद. माझ्यासारख्या नवख्या पक्षिनिरीक्षकाला ही माहिती लाखमोलाची. तसेच तुमचे फोटोही अगदी स्पष्ट असल्याने त्याचे फोटोतूनही बारीक निरीक्षण करता येते.
पक्षिनिरीक्षणाचा छंद लागल्यावर सुरुवातीला दुर्बिणीतून पक्षी पाहताना त्याची ओळख पटवताना, माहिती मिळवताना काही पुस्तकांची मदत झाली. त्यात काही फिल्ड गाईड होती परंतु पक्ष्यांची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी काही इतर पुस्तके नक्कीच उपयोगी ठरली त्याविषयी....
१. ओळख पक्षिशास्त्राची - डॉ उमेश करंबेळकर - राजहंस प्रकाशन
..
साताऱ्यासारख्या निसर्गरम्य ठिकाणी राहिल्याने साहजिकच पक्षिनिरीक्षणाचा छंद करंबळेकरांना लागला त्यांनी तो अभ्यास करून, तज्ज्ञांना भेटून वृद्धिंगत केला. या पुस्तकात त्यांनी पक्षीशास्त्रावरील सर्व घटकावर अगदी मुद्देसूद लेखन केले आहे. तसेच युवक व विद्यार्थी यांना डोळ्यासमोर ठेवून लेखन केल्यामुळे ते अति कंटाळवाण्या शास्त्रीय भाषेत नाहीये. अधेमधे अनेक रंजक माहिती दिली आहे. मराठीतील पक्षिनिरीक्षणावरील एक उत्तम पुस्तक म्हणता येईल असे आहे.
ऋतुराज छान माहिती दिली
ऋतुराज छान माहिती दिली पुस्तकाची. मी मागवतो लवकरच.
सध्या मी खालील तिन पुस्तके गाईड म्हणून वापरत आहे. यातील पहिल्या पुस्तकात १३०० पक्षी असुन ४००० पेक्षा जास्त कलर फोटो आहेत. पेपर व प्रिंटींग क्वालीटी छान आहे. यात उडताना, शिकार करताना, प्लमेज इत्यादी फोटो आहेत. तसेच प्रत्येक पक्षी कोठे आढळतो याचा नकाशावर उल्लेख आहे. पुस्तक वजनाला जड असल्याने सोबत बाळगणे जरा अवघड आहे.
Indian subcontinent या पुस्तकाची pdf मला मित्राने पाठवली. योग्यायोग्य याचा विचार न करता मी ती घेतली. खालील तिनही पुस्तके ॲमेझॉनवर उपलब्ध आहेत.
मराठीतील सलिम अलींचे पुस्तकही आहे माझ्याकडे. ते पक्ष्यांच्या बेसीक माहितीसाठी उत्तम आहे. किरण पुरंदरेंचे ४० पक्ष्यांची माहिती देणारे पुस्तकही मला मिळाले पण त्यात अगदीच चिमणी, कावळा, कबूतर असे पक्षी घेऊन ४० हा आकडा पुर्ण केलाय.
१
२
३
100 झाले अभिनंदन
100 झाले अभिनंदन
किल्ली हे प्रतिसाद नाहीत,
किल्ली हे प्रतिसाद नाहीत, नोंदी आहेत. या वाढतच जातील.
हो पण नोंदी 100 झाल्या हे
हो पण नोंदी 100 झाल्या हे छानच नाही का, त्या नियमितपणा दर्शवतात
हे बरीक खंरे हों तुझे!
हे बरीक खंरे हों तुझे!
मी खुप प्रयत्न करुनही मला
मी खुप प्रयत्न करुनही मला शिंजिरचे घरटे काही सापडले नाही. पण आज संध्याकाळी अचानक शिंजिरची तिन चार पिल्ले दिसली. हा शिंजिर जरा वेगळाच दिसतोय म्हणून बराच वेळ त्याला पहात होतो. फुलांमधला मध प्यायच्या ऐवजी त्याने दोन वेळा एक लहान किडा पकडून आणला व फांदीवर आपटून आपटून खाल्ला. त्याची चोचही मुळाशी लालसर होती. वाटले याच्या सवयी देखील वेगळ्या आहेत. गुगल केल्यावर कळले की ते पिल्लू (Juvenile) आहे.
Purple-rumped Sunbird (Juvenile & Female)
Pune outskirts (Dvri)
25 Nov (5:30 pm)
किडा पकडल्यावर.
लक्ष ठेवायला आई सोबतच होती.
Red vented bulbul (Pycnonotus
Red vented bulbul (Pycnonotus cafer)
Pune outskirts (Dvri)
25 Nov (5:45 pm)
हरिहर.. हो बरेचसे पक्षी आहेत.
हरिहर.. हो बरेचसे पक्षी आहेत.. खिडकीतून आवाज आला की आम्ही स्तब्ध शांतता पाळतो.. नैतर दाणा पाणी सोडून लगेच भुर्रर्र!
गावाकडून शेतात पडलेली घरटी आणली होती.. हे दोन शिंजिर रेडिमेड फ्लॅट मिळतोय का बघायला आले होते.. रिसेल पसंत नसावा
तसंही एकमेकांच्या घरात हे राहत नाहीत तरी कसे काय आले काय माहीत
House Sparrow (Passer
House Sparrow (Passer domesticus)
Pune outskirts (Dvri)
26 Nov (7:00 am)
आज कुठेही बाहेर गेलो नाही
आज कुठेही बाहेर गेलो नाही बर्डिंगसाठी. देवराईत नेहमीचे पक्षी दिसले.
वेडा राघू
Green bee eater (Merops orientalis)
Pune outskirts (Dvri)
26 Nov (7:45 am)
देवा! कबुतर,चिमण्या,कावळे
देवा! कबुतर,चिमण्या,कावळे,साळुंक्या हेच प्रामुख्याने प्रामुख्याने पहात आल्याने हे फोटो पाहून भिरभिरल्यासारखे होतेय.
नाही म्हणायला घार,बुलबुल,कोकीळ आणि शिंजिर (अकस्मात दिसलेले) तेवढे एकेकदा पाहिले.
हा करकोचा मी या अगोदर पाहिला
हा करकोचा मी या अगोदर पाहिला नव्हता. हा थव्यात वावरतो असे वाचले होते पण मी जेंव्हा तळ्याजवळ गेलो तेंव्हा एकटाच उडाला. उडणारा करकोचा पाहून लक्षात आले की माझ्या जराशा निष्काळजीपणामुळे एक न पाहिलेला पक्षी गेला. पण अर्ध्या तासात तो पुन्हा त्याच दिशेने आला व तळ्याजवळच्या चिखलामधे बसला. याची चोच अतिशय बेढब व जड दिसत होती. हा पुन्हा फिरुन त्याच जागेवर आलाय याचा अर्थ तो उद्याही याच जागेवर दिसण्याची शक्यता आहे. कदाचित अजुन काही ओपनबिल याच्यासोबत येतील.
Asian Openbill Stork (Anastomus oscitans)
Pune (Krdi)
27 Nov (7:45 am)
मुग्धबलाक
पावशा
पावशा
common hawk-cuckoo ((Hierococcyx varius)
Pune (Krdi)
27 Nov (7:30 am)
ओपनबिलची चोच अजून ओपन झाली
ओपनबिलची चोच अजून ओपन झाली नाही वाटतं पिल्लू आहे का?
पावशा मस्तच.
वावे मी प्रथमच ओपनबिल पाहिलाय
वावे मी प्रथमच ओपनबिल पाहिलाय. याची चोच मलाही जरा वेगळी व आखूड वाटली. आता संध्याकाळी मित्राला त्रास देऊन माहिती मिळवावी लागेल.
राखी वटवट्या
राखी वटवट्या
Ashy Prinia
Pune (8:00 am)
पक्ष्यांच्या पंख साफ करण्याची
पक्ष्यांच्या पंख साफ करण्याची तुलना विमानाच्या मेंटेनन्सबरोबर केली तर पक्षी विमानापेक्षा कितीतरी जास्त काळजी घेतात असंच म्हणावे लागेल. पंख आणि चोच साफ करताना त्यांना भोवतालचे फारसे भान नसते. ही साफसफाई पहाणे खरच मजेदार अनुभव असतो.
सिल्व्हरबिल
.
ॲशी प्रिनिया
मी रंगनथिट्टूला पाहिलाय
मी रंगनथिट्टूला पाहिलाय मुग्धबलाक.
रंगनथिट्टूचे पक्षी
किरण पुरंदऱ्यांनी लिहिलं आहे त्यांच्या पुस्तकात, की पिल्लांच्या चोचीत फटी नसतात म्हणून.
ढोकरी
ढोकरी
Pond Heron (Ardeola)
Pune (Krdi)
27 Nov (7:45 am)
निवडक १०
निवडक १०
अफाट धागा सुंदर सुंदर!
२. पक्षिजगत - सचिन मेन,
२. पक्षिजगत - सचिन मेन, साहित्य प्रसार केंद्र
पालघरमधील सचिन मेन यांनी २०११ ते २०१३ मध्ये तरुण भारत मध्ये लिहिलेल्या पक्षिविश्व या सदरातील लेखांचे हे पुस्तक. सुरवातीला पक्षीविज्ञानचा इतिहास, वर्गीकरण, स्थलांतर, श्रद्धा -अंधश्रद्धा यावर लिहिले असून नंतर महाराष्ट्रातील १००पक्ष्यांची खूप सुंदर माहिती दिली आहे. पक्ष्याचे फोटो तर अप्रतिमच. पक्ष्यांचे साहित्यातील संदर्भ काही रोचक माहिती सुद्धा दिली आहे. संग्रही असावे असे पुस्तक.
...
Pages