शब्दथवे

Submitted by पुरंदरे शशांक on 18 November, 2019 - 22:30

शब्दथवे

उडत रहातात शब्दथवे
मनात इकडे तिकडे कधी
रेखाटतात उडता उडता
तरंगणारी नक्षी नभी

इतस्ततः पसरतात
रंगबिरंगी पिसे तलम
ओंजळीत येता येता
जातात विरुन धुक्यासम

कसले कसले आकार घेत
ढग जातात विरुन जसे
शब्द असेच येतात विरतात
कधी उरतात पाउल ठसे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!!