दिगंतराचे प्रवासी...

Submitted by .......... on 14 November, 2019 - 01:39

पक्ष्यांच्या वर्गिकरणाविषयी थोडी माहिती

वाढ आणि रचना ह्यांमधील मूलभूत फरकावर आधारित अशा २७ गणांमधे (Order) पक्षीवर्गाचे वर्गीकरण केले जाते. उदा. कुलिंग गणातील पक्षी (Order Passeriformes) म्हणजे झाडावर राहणारे पक्षी, आणि हेच पक्षी आपल्या जास्त परिचयाचे असण्याचा संभव असतो. पाण्याजवळ आपले जीवन व्यतीत करणारे बगळ्यासारखे पक्षी बक गणात (Order Ciconiiformes) अंतर्भूत होतात तर बदके, हंस ह्यांसारख्या पाण्यात राहणाऱ्या पक्ष्यांचा वर्ग म्हणजे हंस गण (Order Anseriformes)

गणांचे आणखी कुलांमध्ये (Families) पृथक्करण करण्यात येते. एका कुलामधील पक्ष्यांचे महत्वाचे गुण सारखेच असतात. कुलिंग गणातील पक्षी म्हणजेच फांदीवर बसणारे पक्षी. ह्या गणात एकूण ४० कुले आहेत. त्यात नाचरे (Muscicapidae), कावळे (Corvidae), फुलचुब (Nectariniidae) ह्यांसारखे पक्षी आहेत. ही कुले म्हणजे खरोखरीचीच कुटुंबे आहेत कारण प्रत्येक कुलात अनेक प्रजाती असतात. प्रजातींमध्ये विकास पावलेले पुष्कळच गुण सारखे असतात आणि त्यामुळे दिसण्यात आणि आचरणात सारखेच दिसतात. ह्या सवयींचे प्रत्यंतर चोच आणि पंजा ह्यांचे आकार, काही वेळा पंख आणि साधारण आकार व हालचाल ह्यांत दिसते. अन्नसाधनांच्या पद्धतीवर चोच आणि पाय ह्यांची रचना अवलंबून असते. पुष्कळ वेळा एखाद्या अनोळखी पक्ष्याची जात जरी सांगता आली नाही तरी त्याचे कुल लगेच सांता येते.

बऱ्याचशा सारख्या गुणांच्या प्रजातीच्या समूहाला गोत्र (Genus) म्हणतात. गोत्र कुलापेक्षा खालच्या वर्गाचे असते किंवा दुसऱ्या शब्दात कुलाचे गोत्रात वर्गीकरण केले जाते. केवळ सोईसाठी सारख्या गुणांच्या प्रजाती एकत्र करुन गोत्राची निर्मिती केली आहे. शास्त्रीय नावांमधील पहिले नाव गोत्राचे असते. एवढ्यापुरताच गोत्राचा संबंध आहे. गोत्रामधील सर्व पक्ष्यांचे पहिले नाव एकच असते. उदा. कावळ्यांच्या अनेक जाती आहेत परंतु त्यांच्यामध्येही काही समान गुण असल्यामुळे त्यांना कॉरव्हस (Corvus) या एकाच गोत्रात गोवले आहे.

गोत्राची विभागणी निरनिराळ्या जातींमध्ये (Species) करणे ही शेवटची पायरी आहे. जात एक नैसर्गिक घटक आहे. आंतर निपज करुन जातींची कसोटी ठरविण्यात येते. एका जातीत सारख्या गुणधर्माचे वेगवेगळे पक्षी असतात. त्यांच्यात पुनरुत्पादन होऊ शकते. सभोवतालच्या प्रदेशाची रचना व हवामान ह्यामुळे काही वेळा एकाच जातीच्या पक्ष्यांमध्ये आकार आणि पिसांचे रंग ह्यात फरक आढळून येतात. उत्तर भागात राहणारे पक्षी दक्षिणेकडे राहणाऱ्या पक्ष्यांपेक्षा साधारण आकाराने मोठे असतात. किंवा दमट हवेत राहणाऱ्या पक्ष्यांचे रंग कोरड्या हवेत राहणाऱ्या पक्ष्यांपेक्षा जरा जास्त गडद असतात. जाती अंतर्गत असे अनेक सूक्ष्म भेद असू शकतात. हे फरक जर अधिक स्पष्ट व कायमचे असतील तर त्या जातीच्या उपजाती आणि वंश ह्यात आणखी भेद करतात. परंतू निरनिराळ्या वंशांमधील पक्ष्यांची आंतरनिपज होऊन सुद्धा जात ती राहिल्यामुळे जात ही वर्गीकरणाचा घटक म्हणून राहतेच.

प्रत्येक पक्ष्याचे गोत्र ठरवून त्याचे कुल आणि जात निश्चित करता येते. सध्या पृथ्वीवर पक्ष्यांच्या ८६५० जाती आहेत. हे पक्षी ज्या २७ गणात विभागलेले आहेत त्या गणांचा अनुक्रम सर्वात कमी प्रगत अशा वंजुल (Grebe) आणि मंजूक (Divers) पक्ष्यांपासून सुरु होऊन अतिशय प्रगत अशा फांदीधारी (Perching) पक्ष्यांपर्यंत शेवट होतो. भारतामधील १२०० पक्ष्यांच्या जाती ७५ कुलांचे प्रतिनिधित्व करतात.

(वरील माहिती सलिम अली यांच्या भारतीय पक्षी या पुस्तकातून जशीच्या तशी घेतली आहे)
1दिगंतराचे प्रवासी.jpg

-----------हरिहर (शाली)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर जो Bunting चा फोटो दिलाय त्याचे नाव आत्ताच समजले. Crested bunting चे पिल्लू (juvenile) आहे ते. मराठी नाव: युवराज

Plain Prinia (वटवट्या)
Pune Outskirts
17 Nov 2019 (7:00 am)

राखी वटवट्या आणि बुशलार्क एकमेकांशेजारी बराच वेळ बसलेले होते. हे पक्षी एकत्र इतक्या शांततेने रहात असतील असे वाटले नव्हते. बुशलार्क मधून मधून खाली उतरुन जमीनीवर बी टिपत होता. त्याच्या सोबत हुपोही शांततेत अन्न शोधत होता. बाजूलाच चार साळूंक्या व रॉबिन होता. म्हणजे हे सर्व पक्षी एकत्र अन्न शोधत होते. प्रिनिया देखील पाच सहा होते. यांना या अगोदर असे थवा करुन वावरताना पाहिले नाही कधी.

Indian Bush Lark & Plain Prinia
(7:00 am)

Creasted Bunting ♀ (युवराज)
Pune outskirts
17 Nov 2019 (7:15 am)

या बंटींगचा नर अतिशय सुंदर दिसतो. युवराज नाव अगदी शोभून दिसते त्याला. काल याचेच Juvenile मी याच ठिकाणि पाहीले होते पण ओळखता आले नव्हते. त्यात ते सुगरणच्या मादीसोबत एकाच फांदीवर शेजारी बसले होते त्यामुळे गोंधळ अजुन वाढला होता.

आज सकाळी 7:00 ते 9:00 या दोन तासामधे एकाच स्पॉटवर खालील पक्षी दिसले.
1. कोतवाल (Black Drongo)
2. तपकिरी पाठीची गांधारी (Bay-backed Shrike)
3. गांधारी (Long-tailed Shrike)
4. चिरक (Indian Robin)
5. वटवट्या (Plain Prinia)
6. हुदहुद (Hoopoe)
7. चंडोल (Bush Lark)
8. कस्तूर (Blue Rock Thrush) क्लिअर फोटो मिळाला नाही.
9. निलपंख (Indian Roller)
10. रान खाटीक (Wood Shrike)
11. होला (Laughing Dove) फोटो काढला नाही.
12. वेडा राघू (Green Bee Eater) फोटो काढला नाही.
13. साळूंकी (Common Myna) फोटो काढला नाही.
14. सातभाई (Large Grey Babbler) फोटो काढला नाही.
15. जांभळा शिंजिर (Purple Sunbird) फोटो काढला नाही

आजची रविवार सकाळ त्यामानाने बरी गेली. युवराजचा (Creasted Bunting) नर दिसेल या अपेक्षेने गेलो होतो पण दिसला नाही. Female आणि Juvenile दिसले. नर काही फिरकला नाही. बहुतेक रविवार सुट्टीचा आनंद घेत घरीच थांबला असावा. Lol
(इतर फोटो सावकाश अपलोड करेन)

Black Drongo (कोतवाल)
Pune
17 Nov (7:00 am)

गाईच्या पाठीवर बसून फिरत असतो हा.

सगळेच फोटो सुंदर ,नेत्रसुखद, माहिती आणि निरीक्षणं देखील खूप महत्त्वाची
माझ्यासारख्या नवख्याला हा धागा खूपच माहितीपूर्ण.

White bellied नाहीए. Black drongo आहे पण juvenile आहे. लवकरच हा पुर्ण काळा व चमकदार होईल व शेपटीही जास्त रुंद होईल. सध्या सगळीकडेच हे juveniles दिसत आहेत.
( Ashy drongo च्या सर्व शरीराचा रंग करडा-काळा असतो तर white-bellied चे पोट पांढरट असते. ठिपकेदार नसते.)

Eurasian collared dove (कंठी होला)
Pune outskirts
18 Nov (7:45 am)

याच्या मानेवर काळी रेघ असते. तिला पांढरी कड असुन ही रेघ मानेच्या वरील बाजूने अर्धीच असते. पोपटासारखी पुर्ण मानेवर नसते. या कंठीमुळे व फिकट रंगामुळे हा चटकन ओळखू येतो. नेहमीच्या होलाच्या मानेवर काळे ठिपके दिसतात. पिसे फुलवल्यामुळे ठिपक्यांचा आभास होतो, प्रत्यक्षात ठिपके नसतात.

.

मानेवर ठिपके असलेला होला. (Laughing Dove)

Jungle Myna (Acridotheres fuscus)
Pune
18 Nov (7:30 am)

हिला साळूंकीची मोठी बहिण म्हणायला हरकत नाही. गायबगळा किंवा कोतवालसारखे याही गाय, म्हैस यांच्या पाठीवर बसुन शिकार करतात.

Glossy ibis (Plegadis falcinellus)
मोर शराटी
Pune
19 Nov (6:45 am)

चार शराटी देवराईत दिसल्या. चाहूल लागल्यावर लगेच उडाल्या व काही वेळात पुन्हा त्याच जागेवर उतरल्या. सुर्योदयाअगोदर दिसल्या या शराटी. सुर्यप्रकाश नसल्याने त्यांचे चमकदार रंग व्यवस्थित दिसले नाहीत.

आज जरा फिरण्याचा मार्ग बदलला. तळयावरचे अनेक मित्र गायब दिसले व तेथे अनेक नविन मित्र आलेले दिसले. विशेष म्हणजे मधल्या टेकडीवर मला चक्क युवराजचा नर दिसला. त्याला मी दोन तिन दिवस शोधत होतो पण मादी आणि पिल्लूच दिसत होते. नवरोबा काही दिसायला तयार नव्हते. पण आज जोडीने दर्शन दिले त्याने. आजूबाजूला दोनचार स्टोनचाटही दिसले. तळ्यावरचे हळदी कुंकूची पिल्ले पुर्ण मोठी झाली आहेत. चांदवाची पिल्ले दिसली नाही. तारवाली भिंगरी दिसली नाही पण शेकाट्यांचा मोठा थवा दिसला. तुतवारही खुप होते. तुतवार, शेकाट्या आणि टिटव्या यांचे सम्मेलनच भरलेले दिसले. टेकडीवर एक डबके आहे. तेथे पिवळ्या टिटव्याही दिसल्या. यांना या अगोदर पाहिले नव्हते. आरुणीही एका फांदीवर गात होता. दोन पक्षी ओळखता आले नाही. ससाणाही दिसला आज पण नक्की कोणता होता हे समण्याइतका स्पष्ट दिसला नाही. बहुतेक देवससाणा असावा.
युवराज (नर)
Creasted Bunting (Melophus lathami)
Pune
20 Nov (7:00 am)

मादी

निलपंख
Indian Roller (Coracias benghalensis)
Pune
20 Nov (5:45 pm)

माळटिटवी
Yellow-wattled lapwing (Vanellus malabaricus)
Pune
20 Nov (5:00pm)

मुरारी
Rufous-tailed Finch-Lark (Ammomanes phoenicura)
Pune
20 Nov (8:00 am)

शेकाट्या
black-winged stilt (Himantopus himantopus)
Pune
20 Nov (8:30 am)

.

.

आरुणी
Indian Bush Lark (Mirafra erythroptera)
Pune
20 Nov (6:45 am)

गप्पीदास, गोजा
Siberian stonechat (Saxicola maurus)

ससाना
common kestrel (Falco tinnunculus)
Pune (Shikrapur)
20 Nov (2:00 pm)

Pages