Submitted by वेडोबा on 15 November, 2019 - 08:52
वाचकहो, आपण आपल्या बरोबर घडलेल्या चांगल्या गोष्टी इथे शेअर करू आणि आपला आनंद वाढवू..रोज काही ना काही चांगलं घडत असतं , आपण ते शोधु आणि इथे लिहूया... चला करू सुरवात..
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज मला ऑफिसमधे एकही अडचण न
आज मला ऑफिसमधे एकही अडचण न येता काम पूर्ण झालं... ही माझी आजची चांगली गोष्ट..
खूप छान धागा. वाईट काय झाल
खूप छान धागा. वाईट काय झाल हे विचारल, तर आपल्याकडे ढीग भर मुद्दे असतात. आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींकडे पाहिल्याने एक प्रकारची चांगली ऊर्जा आपल्याला मिळते. आपण हा धागा सुरु केला आणि तो वाचनात आला हे चांगला झालं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सकाळी घरातून निघाले , लगेच
सकाळी घरातून निघाले , लगेच शेअर रिक्शा मिळाली , जी हवी ती ट्रेन मिळाली आणि विन्डो सीट पण मिळाली
)
( केवळ लोकल ट्रेन ने प्रवास करणारा सच्चा मुंबईकर जाणे यात कित्ती कित्ती आनंद आहे तो
आज एक हा चांगला धागा निघाला,
आज एक हा चांगला धागा निघाला, आशा आहे तो वृध्दिंगत होईल
आज बॉस नसल्याने ऑफिसमधून लवकर
आज बॉस नसल्याने ऑफिसमधून लवकर (वेळेवर) घरी यायला मिळालं . त्यामुळे लेकीला घेऊन पार्कमध्ये खेळायला नेता आलं. मग घरी येताना भेळ पाणीपुरी हादडता आली. एकंदरीत छान गेली संध्याकाळ
खरंच आनंद छोट्या गोष्टींमध्ये
खरंच आनंद छोट्या गोष्टींमध्ये असतो ..तो शोधायचा असतो..आणि चांगल्या गोष्टी आठवल्यावर मनाला उभारी येते ना रोजची कामं करायला....
मस्त आहे धागा.
मस्त आहे धागा.
मी हल्लीच नवीन शिवण मशीन घेतलंय. आज सूनबाईंचा टॉप त्यावर alter करून दिला आणि तिला तो पसंत ही पडला.
म्हटलं तर ही काही फार आनंद व्हायची गोष्ट नाहीये पण मला झालाय खरा.
मनिमोहोर तुम्हाला सून आलीये?
मनिमोहोर तुम्हाला सून आलीये? तुमच्या सुंदर लिखाणावरून वयाचा अंदाज नाही आला
सगळ्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी आवडल्या.....बाकीच्यांनी पण लिहा....आजची छोटी का असेना पण आवडलेली गोष्ट....
आज केदार जाधव यांचा जर्मन
आज केदार जाधव यांचा जर्मन भाषेवरचा धागा वाचला. खूप छान वाटलं कारण मीही जर्मन शिकले आहे, जरी आता सराव नसला तरी.
आत्ताच मी कुठेतरी वाचलं की रोज तीन तरी सकारात्मक गोष्टी लिहाव्या आणि ते अंमलात आणण्याचा निर्णय घेतलाय.
सुट्टीच्या दिवशी मिळालेली
सुट्टीच्या दिवशी मिळालेली मनासारखी झोप![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आज केदार जाधव यांचा जर्मन
आज केदार जाधव यांचा जर्मन भाषेवरचा धागा वाचला. खूप छान वाटलं.........
मलाही काल तसेच वाटले.
आज उठायला उशीर झाला आणि माझी
आज उठायला उशीर झाला आणि माझी कॅब मिस झाली.. असाच रिक्षासाठी खूप वेळ उभा होतो ..तर एकाने स्वतःहून विचारून मला ऑफिसपर्यन्त सोडलं ते हि अपेक्षित नसताना...तो हि त्याच बाजूला जात होता म्हणा पण तरीही आज माझं गुडलकच म्हणावं लागेल.
आज भरपुर पक्षी दिसले. त्यातही
आज भरपुर पक्षी दिसले. त्यातही हुदहुद (Hoopoe) आणि निलपंख (Indian Roller) हे या आधी न पाहिलेले पक्षी प्रथमच पहायला मिळाले. भारी.
)
(कुणाचे काय तर कुणाचे काय.
आज झी मराठी वर आरण्यक नाटक
आज झी मराठी वर आरण्यक नाटक पाहिले छान आहे
आज संध्याकाळी 7 वाजता पुनःप्रसारण आहे
मनिमोहोर तुम्हाला सून आलीये?
मनिमोहोर तुम्हाला सून आलीये? तुमच्या सुंदर लिखाणावरून वयाचा अंदाज नाही आला Happy, >>☺ होय ग.
राजेंद्र देवी, धन्यवाद.
राजेंद्र देवी, धन्यवाद. मलाही पहायचे होते पण विसरून गेले. आता jio अँप वर सकाळचे बघतेय, म्हणजे जाहिराती पुढे ढकलत पाहता येईल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आज सेक्शन ३७५ हा हिंदी ( +
आज सेक्शन ३७५ हा हिंदी ( + इंग्लिश + मराठी) चित्रपट पाहिला .
छान वाटले.
आरण्यक बघतो आता, धन्यवाद
आरण्यक बघतो आता, धन्यवाद राजेंद्र
आज ट्रॅफिकमधे न अडकता घरी
आज ट्रॅफिकमधे न अडकता घरी येता आलं.
छान....
छान....
आज मला बाल्कनीत तो छोटा पक्षी नीट बघता आला...निळ्या पाठीचा आहे....सकाळी खूप सारे पोपट पण बघायला मिळाले.
बायको माहेरी गेली.
बायको माहेरी गेली.
खरंच आनंद छोट्या गोष्टींमध्ये असतो ..तो शोधायचा असतो. >>> +१
(No subject)
बायको माहेरहून आली
बायको माहेरहून आली
खरंच आनंद छोट्या गोष्टींमध्ये असतो ..तो शोधायचा असतो.
राजेंद्र
राजेंद्र
खुप दिवसांनी ह्या धाग्यासारखा चांगला धागा वाचायला मिळाला..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भाजीच्या पिशव्या रिकाम्या
भाजीच्या पिशव्या रिकाम्या करताना एक राजम्याची शेंग दोऱ्यात अडकून राहून गेली, पुढच्या आठवड्यात परत भाजी आणायला पिशवी काढली तेव्हा वळून गेलेली शेंग आणि त्यातच अर्धवट वाळलेले राजम्याचे 3 दाणे मिळाले. ते झाडांना पाणी घालताना निरुद्देश एका कुंडीत खोचून दिले. आज एक महिन्याने घरी आल्यावर, बागेला पाणी घालायच काम परत माझ्याकडे आलं तर काय त्या तीन दाण्यांना रोपं येऊन फुल येऊन त्यातून शेंगा सुद्धा आल्या आहेत. 12-15 शेंगा आहेत. मला खूप आनंद झाला आहे.
मैत्रिणीतल्या, एक्मेकांच्या
मैत्रिणीतल्या, एक्मेकांच्या व्यर्थ अहंपणा आणि गैरसमजामुळे आलेला ६-७ महिन्यांचा तणावपूर्ण अबोला आज दूर झाला.
काल एका वर्गमैत्रिणीचा फोन
काल एका वर्गमैत्रिणीचा फोन आला माझी तब्येतीची विचारपूस करायला. तर त्याचं घडलं असं की, मला न्यूमोनिया झाला होता आणि त्याबद्दल मी फेसबूकवर स्टोरी पोस्ट केली होती आणि ती वाचून तिने मला फेबू मैसेंजर वरून कॉल लावला होता. बऱ्याच गप्पा-गोष्टी झाल्या जुन्या शाळेच्या आठवणीवर वगैरे.
आज मायबोलीवर लोकांना
आज मायबोलीवर लोकांना सन्माननीय सदस्य श्री. पुरोगामी गाढव यांचा भिंगनिरपेक्षता, उरोगामित्व आणि फेक्युलॅरिझम हा धागा वाचायला मिळाला ही घटना सुवर्णाक्षरात नोंदवून ठेवावी लागेल.
सध्या एव्ह्रीथिंग बेगल मिक्स
सध्या एव्ह्रीथिंग बेगल मिक्स आणले आहे/ अचानक सापडले आहे. पोळीच्या लाटीला पीठाऐवजी त्या मिक्स्मध्ये घोळवुन लाटुन पोळी भाजली की खमंग कुलच्यासारखी होते.
आय अॅम सुपरएक्सायटेड.
Phillipines मधून कॅप्टनला
Phillipines मधून कॅप्टनला मागणी आली
![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
Pages