Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
थ्री डी पाव> >>>
थ्री डी पाव> >>>
ह्यापेक्षा सुरीने कापणं सहज सोपं नाही का?>>होना
हे अवघड वाटते आहे तरीही विचारते.....
पाव हातात धरुन कात्रीची दोन पाती पावाच्या कडेने आतल्या बाजूकडे कापायची का?
कि कात्रीचे एक पात पावात खूपसून मग पाव कापायचा?
माझ्या वहिनीकडे पाहिलं मी की
माझ्या वहिनीकडे पाहिलं मी की कात्री मोठी होती बर्यापैकी आणि पाव छोटे त्यामुळे ती इझीली पावाच्या मधोमध कापत होती.
:-)...थ्री डी पाव म्हणायचा
:-)...थ्री डी पाव म्हणायचा अर्थ ... ब्रेड चे स्लाइस टू डी असतात असा....
अंजलीच्या वर्णनाने थोडं लक्षात येतंय...
खरं तर पाव सर्व करताना इतकी घाई होते की बरेचदा ते हातानेच फाडले जातात!
ब्रेडचे स्लाईसही थ्री डी च
ब्रेडचे स्लाईसही थ्री डी च असतात हो. सोपं करुन सांगायचं तर तुम्हाला बहुतेक थर्ड डायमेंशन पक्षि झी अॅक्सिस म्हणजे राईट हँड थंब रूल नुसार तर्जनी आणि मधलं बोट मॅगनेटिक फील्ड आणि करंट दाखवत असतील तर मोशन ही अंगुलीच्या दिशेने होते. त्या अंगुलीच्या अक्षात बरोबर मध्य भागी कात्री भोसकायची असं म्हणायचं असेल तर कात्रीला दोन पाती असतात. ती दोन्ही पाती एकदम भोसकायची का कसं ते विस्कटून सांगा. तसंच किचन मधली कात्री बरीच जाड (परत झी दिशेला) असते. सुरी त्यामानाने टू डायमेंशनल असते म्हणायला हरकत नाही. (तरी ब्रेड टू डायमेंशन म्हणायला माझी हरकत आहेच) ती (म्हणजे सुरी) भोसकायला सोपी कारण न्यूटनचा पहिला आणि दुसरा नियम.
आता सांगा कशी भोसकायची ते.
अमित सरळ विंग्रजीत लिह की तो
अमित सरळ विंग्रजीत लिह की तो भुमितीचा भाग.
फार भूक लागली असेल तर पब्लिक सरळ हातानेच फाडत नसतील का पाव? इतकं का कठिण आहे की हे पार्टी प्लानिंगसाठी?
आता (तरी) लोकं पुरती कन्फूज
आता (तरी) लोकं पुरती कन्फूज झाली का?
(No subject)
(No subject)
(No subject)
हे सगळं मिती वगैरे कठीण होतंय
हे सगळं मिती वगैरे कठीण होतंय समजायला.
एक मोठी कात्री (दुधाची पिशवी फोडायची लहानगी नाही) तिचा जबडा वासून एका (आ ड वी) हातात धरणे. दुस-य् हातात पाव धरणे. पाव दोन पात्यांच्या मधे सरळ आहे . आता कात्रीच्या पातं बंद करणे. म्हणजे ब्रेड मधोमध कापला जाईल. ते माळी लोक कंपाऊंडची झाडं एका रेषेत कात्रीनं कट करतात तशी कात्रीची अॅक्शन होईल.
ती माळ्याची कात्री वापरली तर
ती माळ्याची कात्री वापरली तर होतील एकवेळी ४-५ कापून. नॉर्मल नाईफ ब्लॉक मध्ये असते तशी कात्री वापरली तर एका वेळी एक.. फारतर दोनच होतील ना पण?
सुरी त्या मानाने चिक्कार लांब असते.
बाप रे! काय क्लिष्ट आहे पाव
बाप रे! काय क्लिष्ट आहे पाव कापणं!
एका वेळी एकच पण स्पिड चांगला
एका वेळी एकच होतो पण तरीही पटापट होतं. सुरीनं केल्यास खडबडीत होणं /पातं लपकणं/ वाकडं तिकडं वगैरेसाठी स्कोप असतो. वेळही तुलतेत जास्त असतो.
पाव कसा कापायचा ते लिहीणं कठीण आहे. कापणं सोप्पंय.
मी काय म्हणतेय,
मी काय म्हणतेय,
कोयता घेतला तर लगेच एक घाव.. दोन तुकडे होतील... पावाचे ‘च’..
नाहितर, सुताराच्या करवतीने पण काम होइल पटकन.
घ्या, आणखी उपाय..
मी एकदम ऍग्री आहे पाव कात्री
मी एकदम ऍग्री आहे पाव कात्री ने कापण्याबद्दल.शिवणाचा कपडा कापायची मोठी जुनी कात्री.धार कमी झालेली.
3डी पावाला फरक पडत नाही.माळी लोक वर्षानुवर्षे 3डी गवत, झुडपं अश्या कात्रीने कापत आले आहेत.☺️☺️
काय एकेक उपाय आहेत. प्रचंड
काय एकेक उपाय आहेत. प्रचंड हसले.
मी पण पाव मोठ्या पातीच्या
मी पण पाव मोठ्या पातीच्या कात्रीने कापते... एकावेळी एकच कापून होतो... पण पटापट कापून होतात.... सुरीने कापण्यापेक्षा सोपं आहे... करुन पहा एकदा..
मैत्रियी
मैत्रियी
मै :हाहा:..
मै
(No subject)
अमितव, मै,
अमितव, मै,
विळीवर पण पटापट चिरल्या जातील
विळीवर पण पटापट चिरल्या जातील. फुप्रो वापरता येईल का पाव कापायला.
बापरे!!!
बापरे!!!
खरंतर मी सुरीने पण कापत नाही. सरळ हाताने फाडते.
एका वेळी एकच होतो पण तरीही
एका वेळी एकच होतो पण तरीही पटापट होतं. सुरीनं केल्यास खडबडीत होणं /पातं लपकणं/ वाकडं तिकडं वगैरेसाठी स्कोप असतो. वेळही तुलतेत जास्त असतो.
पाव कसा कापायचा ते लिहीणं कठीण आहे. कापणं सोप्पंय. > १११११ हेच म्हणायचंय मला!! Thank you मेधावि !
अरे पावाची एक अंगभूत
अरे पावाची एक अंगभूत इलास्टिसिटी असते त्यामुळे तो हातात धरून झटक्यात कापला तरी तो लगेच ओरिजिनल साइज ला येणार. पण तुम्ही पार घट्ट पकडून कापा कापी केलीत तर त्याचा अंगभूत शेप बदलून जाउन गट्ठा होईल. हलक्या हाताने कापले तर ओरिजिनल शेप लगेच धारण करेल.
कापून झाले असतील तर भाजून
कापून झाले असतील तर भाजून द्या आता... पावभाजी नुसतीच खायची वेळ आणलीत...
(No subject)
(No subject)
कुणीतरी व्हिडीओ टाका आता
कुणीतरी व्हिडीओ टाका आता
अरे कोणी तरी त्या रामसे ला
अरे कोणी तरी त्या रामसे ला बोलवा - पाव कसा कापायचा ते सांगायला
Pages