टाकाऊतून टिकाऊ - प्रवेशिका क्र. २ - भरत मयेकर

Submitted by संयोजक on 14 September, 2010 - 00:12

टाकाऊतून टिकाऊ :

शुभेच्छापत्रे आणि लग्नाच्या आमंत्रणपत्रिका वापरून केलेला आकाशकंदिल.

साहित्य : शुभेच्छापत्रे, आमंत्रणपत्रिका, आवडत्या रंगाचा जिलेटिनपेपर किंवा पतंगाचा कागद, दोरा.

१) शुभेच्छापत्रे घेऊन त्यावर आतील/कोर्‍या बाजूने ६ सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढावे.

२) आता ६ सेमी त्रिज्येच्या कंपासच्या (वर्तुळक) सहाय्याने वर्तुळाच्या परिघावर सहा खुणा कराव्यात. यातले एकाआड एक बिंदू जोडून एक समभुज त्रिकोण आखून घ्यावा. टोच्याच्या(कंपास/वर्तुळक) सहाय्याने या त्रिकोणाच्या रेषा किंचित दाब देऊन पक्क्या करून घ्याव्यात.
वर्तुळाच्या केंद्रस्थानी एक रुपयाचे नाणे ठेवून त्याभोवती वर्तुळ आखून घ्यावे, (चित्र क्रमांक १)

TT_BharatMayekar_chitra1.jpg

२) वर्तुळ कापून घ्यावे. आतील लहान वर्तुळाचा भागही कापून काढावा. वर्तुळातील त्रिकोणाच्या रेघांवर घडी घालून घ्या. आखलेल्या त्रिकोणाच्या रेषांवर रंगीत/बाहेरील बाजुस कागद दुमडून घ्यावा.व बाजूच्या पाकळ्या त्रिकोणास काटकोनात येतील अशा उघडून घ्याव्यात (चित्र क्र. २अ)

TT_BharatMayekar_chitra2a.jpg

३)प्रत्येक वर्तुळाला आतल्या (कोर्‍या) बाजूने जिलेटीन पेपर किंवा पतंगाच्या कागदाचा लहान चौकोनी/त्रिकोणी तुकडा चिकटवावा.

४)आता या १९ त्रिकोणातील ५ त्रिकोण एकास एक असे , फ़क्त त्रिकोणाच्या बाहेरचा भाग(पाकळी) ,चिकटवून एक टोपी तयार करा.(चित्र क्र.३).

TT_BharatMayekar_chitra3.jpg

अशा आणखी २ टोप्या तयार करा. या टोप्या नीट वाळल्यावर पुढली कृती करावी.

७) उरलेल्या ४ पैकी एक त्रिकोणाकार घ्या. हा आपला पाया असेल. त्याच्या प्रत्येक पाकळीला एकेका टोपीची एकेक पाकळी चिकटवा. या टोप्यांच्या एकमेकांकडल्या बाजूची एकेक पाकळी चिकटवुन घ्या. आता प्रत्येक टोपीच्या २ पाकळ्या दुसर्‍या टोपीला तर एक पाकळी पायाला चिकटलेली असेल. दोन पाकळ्या मोकळ्या असतील. या दोन दोन पाकळ्यांमधे उरलेले ३ त्रिकोण जुळवून चिकटवा. वर एक त्रिकोण मोकळा दिसेल, त्यातून बल्ब सोडता येईल. टांगण्यासाठी या त्रिकोणांच्या पाकळ्यांना छिद्रे पाडून त्यातून धागा गुंफ़ून बांधून घ्यावा.
पूर्ण तयार झालेला कंदिल चित्र क्र. ४.

TT_BharatMayekar_chitra4.jpg

टीपा : वेळ वाचवण्यासाठी ६ सेमी त्रिज्येचे वर्तुळ सीडीच्या सहाय्याने काढता येईल. वर्तुळावरील खुणा करताना कंपास/वर्तुळकाची त्रिज्या ६.१ सेमी घ्यावी लागेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा आम्ही सुद्धा बनवलाय लहानपणी. मी तर छोटे छोटे करून माळेसारखं लावायची. अर्थात बाबांनी शिकवलेले.
हा घ्या विडिओ,
https://youtu.be/P-Oq4Hhx37A

उगाच किचकट पद्धत आहे वरच्या विडिओत पण ठिकाय.
तुनळी जिंदाबाद!

Pages