रोहा तालुक्यात बाजारपेठेपासून सुमारे १५-१६ किलोमीटर वर असलेलं हे खेड. एक बाजूने खाडी तर तीनही बाजूने जंगल आणि थोडस उंचावर वसलेलं गाव"हाल".
आज ही त्या गावात पूर्ण दिवसात १ ते २ वेळाच बस जाते. शक्यतो 3 किलोमीटर प्रवास हा पायीच करावा लागतो. बायका अजूनही डोक्यावर पाणी आणतात आणि ते ही १५-२० मिनिटं डाग( डोंगर) चढुन.
या गावात आता सध्या आगरी आणि मराठी लोक एकत्र राहतात पण फाळणी च्या आधी मुस्लिम जमात इथे राहायची फाळणी च्या वेळी ते पाकिस्तान ला निघून गेले अस बोललं जातं.
या गावात भुताच्या खूप गोष्टी अनुभवल्या जातात - सांगितल्या जातात तसाच एक किस्सा माझ्या आत्ये बहिणी ने अनुभवलेला.
८-१० वर्षे झाली असतील या घटनेला. गणपतीसाठी माझी आत्ये बहीण ज्योती गावाला आली होती. गौरी पूजनाच सामान आणायला आधल्या दिवशी म्हणजे गौरी बसतात त्याच दिवशी ती रोह्याला गेली.बाजारपेठ फक्त रोह्यलाच होती सामान आणायला तिकडेच जावं लागायचं. सकाळी 8 वाजता गावात बस येते त्याच बसने ती रोह्याला गेली पटकन सामान घेऊन तिला परत यायचं होत. रोह्याला तिची आत्या राहायची ती आधी तिच्या आत्या कडे जाऊन आली लवकर परतायचं होतं म्हणून जास्त थांबली नाही. सामान घेऊन ती हाल ला जायला निघाली. हालच्या २ गाव आधी तिचं गाव होत तिकडे ही सामान द्यायचं होत आत्याने तिच्याकडे दिल होत घरी द्यायला. तिकडे ही ती जास्त थांबली नाही सामान दिल आणि लगेच निघाली . ती सामान देऊन येईल तेवढ्या गाडी निघून गेली होती दुसरी गाडी येई पर्यंत ती थांबली थोड्याच वेळात गाडी आली ती पुढच्या गावात उतरली. हाल ला तेव्हा फक्त सकाळी ८ वाजताच बस जायची इतर वेळेत चालत जावं लागायचं.
तिने मामा ला बाजूच्या गावात यायला सांगितल होत पण मामा आला न्हवता तिने वाट न बघता एकट जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा संध्याकाळ चा काळोख पडायला सुरुवात झाली होती अंदाजे ६ - ७ ची वेळ होती. तिला वाटलं होतं रस्त्यात कोणतरी ओळखीच भेटल निदान गवारी आपल्या गाई ना घेऊन परतत असतील ते तरी भेटतील.
ती स्वतःशीच गाणं गुणगुणत जात होती बाजूच्या गावातील घरे आता दिसेनासे झाले तिला अर्धा तास चालत जायचं होतं. ती पायाखालची वाट असली तरी काळोख पडला की जंगलातुन जायला भीतीच वाटते, आणि ते ही अश्यावेळी जेव्हा त्याच रस्त्याचे भयंकर किस्से माहीत असतात.
अजून काही अंतर चालल्यानंतर तिला एक अनोळखी माणूस भेटतो तो तिला आंबा खायला देत असतो ती खरं वतार मनातुन खुप घाबरलेली असते कारण पावसाळ्यात तेही गणपतीत आंबे नसतात आणि हा माणूस तिला आंबा देत असतो. ती तो आंबा घेत नाही त्या माणसाला नाही म्हणून सांगते आणि पुन्हा चालू लागते. ती मागे वळून बघत सुद्धा नाही. ती चालतच असते खूप वेळ पण तिचा रस्ता काही संपत नसतो साधं तिला गाव दिसत ही नसत जवळपास तासभर चालूनही ती गावात पोहोचत नाही.
एक गाव असही
Submitted by प्रिया खोत on 23 October, 2019 - 15:42
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्रमश: आहे का?
क्रमश: आहे का?
Pradnya हो हा पहिला भाग आहे
Pradnya हो हा पहिला भाग आहे
आत्ये बहीण ज्योतीला कोणी
ज्योतीला कोणी जुड़वा बहिण आहे का ओ ?
तिकडे रोहयाजवळच्या अजुन एका गावात अशीच एक चालत राहिलीय. पण अजुन घरी पोहोचली नाही.
अस्लम बेग ज्योती ला बहिण नाही
अस्लम बेग ज्योती ला बहिण नाही हीच ती ज्योती आणि हेच ते गाव
Okay धन्यवाद
Okay धन्यवाद
पुढील भागाच्या प्रतीक्षेत
शीर्षकात भाग१ असे टाकणे आणि
शीर्षकात भाग१ असे टाकणे आणि अखेरीस क्रमश: असे सांगणे उत्तम.
छान आहे सुरुवात....
छान आहे सुरुवात....
कथा , वर्तमान्काळात सुरु होते
कथा , वर्तमान्काळात सुरु होते. मग ती भुतकाळाबद्धल सान्गते इथपर्यन्त ठीक आहे, पण शेवटी शेवटी चालु वर्तमान्काळात कथन आहे .. त्यामुळे अचानक लिन्क तुटल्यासारखी वाटते.