कपड्यांच्या फॅशन

Submitted by webmaster on 31 January, 2014 - 23:35

कपड्यांच्या फॅशन
वेगवेगळे कपडे, पॅटर्न
(साड्या आणि साड्यांशी निगडीत कपड्यांव्यतिरिक्त)
Fashion, dresses, patterns

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्याकडे भागलपुरीच्या नावावर जे काही खपवतात ना, ते शुद्ध (???) आर्टिफिशियल सिल्क असतं.
माझ्याकडे एकदा सोनल हॉलच्या प्रदर्शनातून घेतलेली एक भागलपुरी साडी आहे, त्याचं टेक्स्चर इतकं वेगळं आहे ना, आणि किंचित गरमही आहे ते मटेरियल.

Simple answer: if its below rs. 1500-2000 ( m being optimistic here) then its definitely not pure silk. Bhagalpuri or any other. Wink however, you "may" get original pure silk sarees in that range from wholesalers or directly from weavers if u have great bargaining skills. But its very much unlikely.
Do u want detailed answer? I am not an expert btw.

from wholesalers or directly from weavers if u have great bargaining skills.>>> विणकरांकडेही इतक्या कमी किंमतींमधे आजकाल रेशीम मिळत नाही. भारत सरकारच्या नव्या धोरणांनुसार चीन मधून कच्च्य रेशीमाची आयात करणं कमी कमी करत २०१७ पर्यंत (बहुतेक) पूर्णपणे थांबवायची आहे. भारतीय रेशीम उद्योगासाठी ही चांगली गोष्ट आहे, पण पुरवठा कमी होत आहे त्यामुळे कच्च्या रेशमाच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे 'सिल्क'च्या 'फिनिश्ड प्रॉडक्ट'ची किंमतही वाढत आहे. मागच्या २-३ वर्षांत सिल्कच्या साड्यांच्या किंमतीत लक्षणीय वाढ होण्याचं हे एक कारण आहे.

किंमती वाढत असल्या तरी या धोरणाचं एक व्यावसायिक म्हणून मी स्वागतच करेन. चीनमधून आलेले रेशीम आणि भारतात विणकरांनी तयार केलेले रेशीम यात फरक जाणवतो. चीनमधल्या सिल्कला चमक असली तरी, टिकण्याच्या दृष्टीनं तसंच रेशमाच्या नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टीनं मी कायम भारतात तयार झालेल्या रेशमाला प्राधान्य दिले आहे. हा कच्चा माल वापरून विणकरांनी तयार केलेल्या प्रॉडक्ट घेणे याकडे जाणिवपूर्वक लक्ष देणे मला महत्वाचे वाटते.

अंजली, बरोबर. म्हणूनच एवढे डिस्क्लेमर्स दिले. कोणी असं म्हणायला नको की आम्हाला २००० मध्ये प्युअर सिल्क मिळालीच आहे. मिळाली असेल तर फारच उत्तम! अ‍ॅमेझॉन, फ्लिपकर्ट वगैरे वर ३९९ रु च्या साड्या बनारसी, कांजीवरम वगैरे म्हणून विकतात Proud

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकर्ट वगैरे वर ३९९ रु च्या साड्या बनारसी, कांजीवरम वगैरे म्हणून विकतात >>> इकडे 'प्युअर पश्मिना' किंवा 'प्युअर कॅशमिअर' स्टोल $१० ला मिळते Wink
पश्मिना शाल नुसत्या विणण्याचे १५०० रूपये द्यावे लागतात. कच्च्या मालाचे वेगळे, बाकीचे ओव्हरहेडस वगैरे धरून काही हजारात किंमत जाते. अस्सल माल कधीही स्वस्त मिळणार नाही, मिळत नाही हे कायम लक्षात ठेवावं लागतं. अर्थात अस्सल माल ओळखता यायला पाहीजे.

online shopping बद्दल काय अनुभव आहे? साड्या आणि ईतर कपड्यांसाठी ? आजकाल खुप web sites दिसुन येतात.

हा प्रश्न कुठे विचारू समजत नाही म्हणून इथे -
चांगल्या रेशमी साड्या, म्हणजे पैठणी, लग्नातल्या प्युअर सिल्क साड्या ज्या खूप वापरल्यायत त्या मेंटेन कशा करायच्या?

मी ७-८ वर्षांत एकदाही ड्राय क्लीन नाही केल्यायत त्या. वापरून झाल्यावर घरातच दांडीवर पसरून हळकल्या की घडी बदलून हँगरला लावणे हेच केलंय. क्वचित एखाद वेळा रोल प्रेस केली असेन एखादी साडी, बाकी घरीच इस्त्री. ड्राय क्लीन करून ग्लेझ जाते अशी ऐकीव माहिती होती म्हणून नाही केल्या. सुदैवाने खूप वापरूनही नीट आहेत.

प्र९, मी साड्या घडी करण्यापूर्वी उलगडून त्यात भरपूर लवंगा घालून मग फोल्ड करुन ठेवते. सो फार अनुभव चांगला आहे.

सायो, ड्राय क्लीन अजिबात नाही का करावं लागत? आणि लवंगा भरपूर म्हणजे किती? जरा (घडी) विस्कटून सांग बरं Happy
आणि मग लवंगांचे चिटुकले आकार नाही का येत? (नसणार. नाहीतर तू कशाला सुचवशील! Uhoh पण मनातला शंकासूर विचारतोय)

ड्राय क्लीन ने नेमका फायदा होतो की नाही आणि त्यामुळे ते करावं का नाही इथपासून शंका आहेत. करावं तर किती वेळा केलं तर चांगलं वगैरे हेही...

मी भारतात रहात नाही तेव्हा सतत साड्या नेसायची वेळ येत नाही. तिकडे जाताना साड्या घेऊन गेले तरच ड्रायक्लिन होतं नाहीतर नाही. लवंगा किती म्हणजे साधारण पाव वाटी लवंगा एका साडीत. प्रत्येक घडीत थोड्या थोड्या करत पसरवून ठेवते. आकार वगैरे कधी नोटीस केला नाही, येतही नसावा.

प्र९! ड्रायक्लिन करणारा खात्रिचा हवा , माझ्या एका साडिची शाइन कमी झाली आहे, स्लिकचा सॉफ्टनेस पण, नतर मी पण ड्रायक्लिन केली नाहिये तशाही प्युअर स्लिक कमी आहे माझ्याकडे आणि सायो म्हणते तस नेसण पण फार होत नाही.
थॅन्क्स सायो ! लवन्गा घालुन ठेवते ( वास येत का लवन्गाचा साडिला? )

माझ्या मैत्रिणीला तिच्या मुलींकरता ऑनलाईन शॉपिंग करायचे आहे, बाहेर जायला वेळ नाहीये. मुली १० -१२ वर्षाच्या आहेत. तर अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मायंत्रा, जबाँग या व्यतीरीक्त अजून कुठली भरवशाची साईट आहे की जिच्यावरुन चांगले ड्रेसेस मागवतात येतील. तिला चुडीदार किंवा लाचा/ शरारा टाईप ड्रेस हवे आहेत.

अमेझॉन सारखी सोपी return policy -(initiate refund from app, pickup फ्रॉम home, नो questions asked, same day refund,)आणि zero डिलिव्हरी चार्जेस असे कोणतं app / site आहे का?
मला ह्या सोयींसाठी पैसे भरून membership घ्यायला काही problem नाही (prime सारखी).

मुंबईत सिल्कच्या साड्यांपासून ड्रेस शिवणारा कोणी चांगला टेलर माहीत आहे का ? शक्यतो पश्चिम उपनगरात असेल तर बरं पडेल ?

मागच्या वर्षी महाराष्ट्र व्यापारी पेठेत होता एक स्टॉल. दादर मध्ये होतं त्यांचं दुकान. आता नाव आठवत नाही आणि पत्रकही सापडणार नाही. तेव्हा सिरिअसली घेतलं नाही पण आता मलाही हवाय असा एक शिंपी. दुदैवाने महाराष्ट्र व्यापारी पेठ यावर्षी दादरमध्ये नाही.

कपड्यांच्या फॅशन
वेगवेगळे कपडे, पॅटर्न
(साड्या आणि साड्यांशी निगडीत कपड्यांव्यतिरिक्त) >>> असं लिहिलं आहे, पण तरीही जास्तीत जास्त पोस्ट्स साडी संदर्भातच दिसल्या ( अर्थात मी random पोस्ट्स वाचून हे म्हणते आहे). साडी व्यतिरिक्त कपड्यांबद्दल चर्चा कमीच आहे.

अचानक टिपिकल सलवार कुर्ते जाऊन लॉंग कुर्ते (अँकल लेंग्थ), लेगिंगज जाऊन पलाझो, लॉंग कुर्ताखाली स्कर्टसारखा काही बॉटम किंवा पेन्सिल pants, असं बरंच काही फॅशन मार्केट बदललं आहे. Cold shoulders ची वेव्ह अजून आहेच. या सगळ्या बद्दल मला ज्ञान नाही, मी फक्त वेस्टर्न कपडे आत्मविश्वासाने घालू शकते, त्यामुळे या सगळ्या नवीन ट्रेंड्स बद्दल वाचायला आवडलं असतं.

(माझा आवडता विषय काढल्याने पाल्हाळ लावतेच)
सध्या सलवार कुर्ता मध्ये बरंच काही चालू आहे.
कुर्ता आणि सिगरेट पँट,कुर्ता आणि पूर्वीच्या काळी लोक लेंगा घालायचे तसा थोडा तोकडा स्ट्रेट लूज लेंगा(पलाझो नव्हे),कुर्ता आणि स्कर्ट,कुर्ता आणि पलाझो.थोडक्यात कश्यावरही योग्य रंगातलं काहीही घाला.माझ्या लहानपणीचे 'नुसता ड्रेस? ओढणी कुठाय?अशी जाणार तू बाहेर?' वाले दिवस आठवले की आता किती मजा आहे हे जाणवतं.
जीन्स मध्ये स्किन फिट थोडे मागे पडून बूट लेग आणि हिपस्टर्स ची फॅशन परत येते आहे.अगदी बेल बॉटम ची आठवण देणारे डेनिम पलाझो वगैरे पण.डेनिम जॉगर्स पण बऱ्याच दिसतात.पण यावर अगदी कॅज्युअल टोपच घालावे लागतात.
फॉर्मल टॉप मध्ये प्लेन रंगात जॉर्जेट/रेयॉन चे टॉप दिसतात छान आणि टिकतातही.पण उन्हाळ्यात फार गरम होतं.
कॉटन+लायक्रा लेगिंग हा अति सोयीचा प्रकार गेली अनेक वर्षं टीकून आहे.नाडी आत गेली वगैरे प्रकार नाहीत, वेगवेगळ्या शेड मध्ये, मिक्स मॅच कोणत्याही कुर्ता बरोबर.उन्हाळ्यात मात्र नकोनको होतं ते चिकटणारं लेगिंग घालायला.लेगिंग आणि कमी कट वाला लॉंग कुर्ता मस्तच.
थोडक्यात सोयीच्या फॅशन टिकल्या आणि बाकीच्या गेल्या(विदूषक पँट/जुन्या इस्लामिक पिक्चर मध्ये घालतात तश्या वर नॉर्मल खाली झालर वाल्या पँट. आणि वर साधी सैल आणि खाली पट्टी लावून घट्ट केलेली बलून सलवार.)
सध्या फ्रिल साडी ची फॅशन आहे ती जायची मी आतुरतेने वाट बघत आहे.

Pages