रात्रीचे २:०५ वाजलेत. चंद्र ढगांच्या चादरीखाली झाकला गेलाय. १४७०साली पिशाच झाल्यापासुन तिने खुप जणांचे रक्त प्राशन केलेय. आतापर्यंत लाखो व्यक्ती तिच्या सौदर्यांला भुलून तिच्या या तहानेला बळी पडलेत. पण तिची तहान कधीच भागत नाही.
काळोख्या रात्री ती एक भक्ष्य हेरून त्याच्या बेडरूम मधे प्रवेश करते. तो एक २४ वर्षाचा तरूण आहे. त्याच्या मानेतील शिरेमधुन वाहणार, सळसळणारं गरम रक्त तिला खुणावतय. तिला पाहताक्षणीच तिच्या डोळ्यांमधे तो हरवत चाललाय. तिला बाहुपाशांमधे घेण्यासाठी तो आतुर झालाय. कोळ्याच्या जाळीप्रमाणे भासणारे तिच्या हातांची बोटे त्याच्या गालावरून फिरतात. तिची तिक्ष्ण नख त्याच्या मानेपर्यंत येवून थांबतात. रक्त पिण्यासाठी आतुर झालेले तिचे चमकणारे दात बघितल्यावर त्याच्या चेहय्रावर भितीची छाया पसरते. त्याचे हात तिला दुर करण्यासाठी धडपडतात पण, तिच्या सामर्थ्यापुढे त्याचा संघर्ष कमी पडतो.
"Relax! शांत हो, फ्क्त थोडसच रक्त, मी तुला मारणार नाही", तिच्या आवाजातल्या नशेने तो शांत होतो.
त्याच्या शर्टाची काही बटने ती सैल करते. तो काहीच हलचाल करत नाही. तिचे तिक्ष्ण सुळ्यांचा मानेवर स्पर्श होताच त्या वेदनांनी फक्त 'अहं' ईतकाच आवाज त्याच्या मुखातून निघतो. त्याचं रक्त ती प्राशन करायला लागते. अचानकच, ती त्याला स्वतःपासुन दुर ढकलून त्रासलेल्या स्वरात म्हणते, "यक! AB निगेटिव्ह."
-समाप्त-
आपल्याला तर काहीच कळलं नाही
आपल्याला तर काहीच कळलं नाही ब्वॉ !
अफलातून.... भन्नाटच रे भावा,
अफलातून.... भन्नाटच रे भावा, तोडलंस, तोडुन, चुरगाळुन टाकुन दिलंस
भारी आहे, आवडली!
भारी आहे, आवडली!
त्याच्या शर्टाची काही बटने ती
त्याच्या शर्टाची काही बटने ती सैल करते. तो काहीच हलचाल करत नाही. तिचे तिक्ष्ण सुळ्यांचा मानेवर स्पर्श होताच त्या वेदनांनी फक्त 'अहं' ईतकाच आवाज त्याच्या मुखातून निघतो. त्याचं रक्त ती प्राशन करायला लागते. >>>> माझ्यातर्फ़े थोडी एडिशन......
ती मनसोक्त त्याचं रक्त पिते. नंतर तृप्त होवुन बाजुला पहुडते. तो जोराने हसतो आणि म्हणतो....
Welcome to AIDS Group !
विशाल
विशाल
या कथेसाठी नवीन विभाग उघडा'
या कथेसाठी नवीन विभाग उघडा' कै च्च्या कै कथा'
आवडली
आवडली
प्रसिक .. लै भारी.. विशल्या
प्रसिक .. लै भारी.. विशल्या ते वेलकम २ ग्रुप .. गोव्याचा किस्सा आहे ना रे ?
सुक्या गोव्याचा नै पुण्यात
सुक्या गोव्याचा नै पुण्यात घडलाय डेक्कनला
Welcome to AIDS Group !
Welcome to AIDS Group !
महान कथा !!! अवांतर :असो
महान कथा !!!
अवांतर :असो बरेच दिवस माझ्या मनात एक वॅम्पायर कथा लिहायचे चालु आहे ..." इन्टर्व्युव्ह विथ वॅम्पायर " या चित्रपट कथेचा स्वैर अनुवाद !!! असो ...तुम्ही वॅम्पायर्स्ना मस्त हाताळत आहात ...तुम्ही लिवा अजुन जरा ...मग आम्ही सुरवात करतो
रच्याकने, कोणी ख्रिस्तोफर
रच्याकने, कोणी ख्रिस्तोफर पाईकची सिरीज 'द लास्ट वैम्पायर' वाचलेय का? त्या कथेमधे वैम्पायर-गर्ल चा एक AIDS पिडीत मित्र असतो. ती वैम्पायर त्याच्या शरिरात काही स्वतःच्या रक्ताचे थेंब सोडते आणि काय आश्चर्य, त्याचा AIDS नाहीसा होतो.
प्रसिक, विशल्या
प्रसिक, विशल्या
अबे एडसग्रस्त व्हँपायर! कसली
अबे एडसग्रस्त व्हँपायर! कसली भारी कवि कल्पना आहे. हे घ्या प्रेमात पडला व्हँपायर ....
(No subject)
बिभत्स रसाचे बरेच प्रेमी
बिभत्स रसाचे बरेच प्रेमी दिसतात मायबोलीवर. भयकथा, सुडकथा हा ट्रेंड जाउन बिभत्स कथा हा ट्रेंड येण्याची नांदी दिसते आहे.
प्रसिक व्हॅम्पायर डायरीचा
प्रसिक
व्हॅम्पायर डायरीचा सिझन टू पाहतोयस वाटतं....
(No subject)
१दम मस्त !!! :ड कल्पना खूप
१दम मस्त !!! :ड
कल्पना खूप आवडली.
व्हॅम्पायर वर १ मस्त कथा आवडेल वाचायला.
सगळ्यानां प्रतिसाद बद्दल
सगळ्यानां प्रतिसाद बद्दल धन्स, ईस्पेशली विशालने दिलेल्या फोडणीसाठी
व्हॅम्पायर डायरीचा सिझन टू पाहतोयस वाटतं........@सानी VD माझी सर्वात फेवरेट सिरीअल आहे, पण एका एपिसोडसाठी आठवड्याची वाट बघायला लागते
@सानी VD माझी सर्वात फेवरेट
@सानी VD माझी सर्वात फेवरेट सिरीअल आहे, पण एका एपिसोडसाठी आठवड्याची वाट बघायला लागते >>> माझीपण प्रसिक.... म्हणून मी सावकाश पहाते... २-३ आठवड्याचा गॅप करुन... आधी ट्वायलाईट वाचली होती... मग तिच्या ४ही सिरिज झपाटल्यासारख्या वाचून काढल्या...पण मुव्ही एकदम बेक्कार निघाली... पण VD... अहाहाहा... जे ट्वायलाईट मधून अपेक्षित होतं, ते सगळं VD मधे मिळालं... कॅरोलाईन व्ह्यॅम्प झाल्यानंतरची तिची घालमेल... तो एपिसोड मी कालच पाहिला... सही थ्रिलिन्ग आहे...डेमॉनच्या प्युपिल्स मधले चेंजेस पहाणं... एक भारी एक्सपिरियन्स असतो....
सॉल्लिड
सॉल्लिड
बिच्चारी ती..
बिच्चारी ती..