Submitted by रॉबीनहूड on 20 July, 2015 - 10:44
लता मंगेशकर !
बस नाम ही काफी है.
मला माहीत आहे अलीबाबाला त्या रत्नखचित गुहेतून फक्त दहाच रत्ने उचलायला परवानगी दिली असती तर तो वेडा झाला असता. अनेक लोक लताच्या टॉप टेन च्या याद्या बनवता बनवता वेडे पिसे झालेत. ही यादी अर्थातच वादग्रस्त असते. दुसरे लोक काय पण आपण स्वतःच आपण बनवलेल्या त्या यादीशी सहमत नसतो ::फिदी:
चला तर , बनवा टॉप टेन गाण्यांची यादी. पाहू या किती गाणी कॉमन येतात ती.
लक्षात ठेवा ...
फक्त दहाच !!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नग्माओं शेर की बारात किसे पेश
नग्माओं शेर की बारात किसे पेश करूं' पण आलं नाही अजून.. स्मित
>> ते गाणं रफीच्याच क्रेडिटने ओळखलं जातं.. आणि रफीचं व्हर्शन आहेही उजवं !
कालच कोयल बोली , दुनिया डोली
कालच कोयल बोली , दुनिया डोली युट्यूब वर पाहीलं.
"राजसा जवळि जरा बसा" नाहि
"राजसा जवळि जरा बसा" नाहि आवड्त कोनाला?
दोन्ही गाण्यांची चाल आणि
दोन्ही गाण्यांची चाल आणि शब्दही बरेच वेगळे आहेत हो. दोन्ही चांगली आहेत.
लताची खूप आवडती गाणी
लताची खूप आवडती गाणी शेकड्याने आहेत. पण त्यातली जरा कमी ऐकली जाणारी गाणी घेऊन माझी यादी बनवतोय.
१. दिलने फिर याद किया (खेमचंद प्रकाश, महल, १९४९)
महल म्हटले की 'आयेगा'च आठवते. पण हे गाणे पण तितकेच (कदाचित त्याहून) सुंदर आहे. त्यातला 'हूख' शब्द असा म्हटलाय लताने की अंगावर काटाच येतो.
२. तू कौन है मेरा कह दे बालम (नौशाद, दिदार, १९५१)
नौशादकडे गायलेले लताचे हे सर्वोत्तम गाणे नक्कीच नाहिये. पण त्यात तिच्या आवाजात इतका गोडवा आहे की गाणे ३-४ वेळा ऐकल्याशिवाय मन तृप्त होतच नाही.
३. बलमा जा जा जा, अब कौन तुझे समझाये (अनिल बिस्वास, आराम, १९५१)
४, बलमा बडा नादान (सी.रामचंद्र, अलबेला, १९५१)
लता आणि अण्णा चितळकर या जोडीचे एकच गाणे निवडणे हे सगळ्यात कठीण गेले. शेवटी हे खडीसाखरेसारखेच गोड गाणे निवडले.
५. वो तो चले गये ए दिल (सज्जाद हुसैन, संगदिल, १९५२)
लताच्या जुन्या गाण्यात तिचे उर्दू उच्चार जरा कमकुवत होते. तिचे उच्चार सुधारण्याचे श्रेय प्रामुख्याने सज्जाद साहेबांना जाते. गाणे ऐकल्यावर त्याची प्रचिती येईलच.
६. हमारे बाद अब महफिल मे अफसाने बयां होंगे (मदन मोहन, बागी, १९५३)
लता आणि तिचा मदनभैया या जोडीची गाणी निवडणे तसे कठीणच. पण माझ्याकरता तरी हेच त्यांचे सगळ्यात आवडते गाणे. अक्षरशः झपाटून टाकते मला.
७. ओ सुनता जा, ओ सुनता जा (शंकर जयकिशन, हलाकू, १९५६)
ऑर्केस्ट्रेशन ही एस.जे. ची खासियत होती. या गाण्यात ते अफाट आहे. इतक्या प्रकारची वाद्ये आणि त्या सगळ्यांचा मेळ सांभाळणे खरच कठीण आहे. पण त्या ऑर्केस्ट्रॉच्या वरताण लताचा सुरेल आवाज आहे.
८. ए मेरे दिल-ए-नादान (रवी, टॉवर हाऊस, १९६२)
रवी तसा उपेक्षीतच राहिला. पण त्याचे हे गाणे मात्र खुद्द लताचेही आवडते आहे.
९. जोगी जबसे तू आया मेरे द्वारे (एस.डी, बंदिनी, १९६३)
निव्वळ आनंदाचा झरा.
१०. डर लागे गरजे बदरीया (वसंत देसाई, रामराज्य, १९६७)
भारतीय शास्त्रीय संगितावर आधारीत एक अप्रतिम गाणे. नेटवर मिळाल्यानुसार सूरमल्हार रागातले गाणे आहे हे.
एका संगितकाराचे एकच गाणे घेतले आहे यादीत. आर.डी सारखा दिग्गज संगितकार नाहीच घेता आला. मला जरा अनवटच गाणी घ्यायची होती त्यामुळे आर.डी. नाहीच घेतला.
रॉहू, खेळ खेळताना खरच मजा आली.
ते महल मधलं गाणं छान आहे.
ते महल मधलं गाणं छान आहे. तसंच त्यातलंच 'मुश्किल है बहोत मुश्किल चाहतका भूला देना' ही मला खूप आवडतं..अगदी 'आयेगा'च्या तोडीने
आशा, लता यांचं "मन क्युं
आशा, लता यांचं "मन क्युं बहका" खूप आवडतं.
इजाजत मधली सगळीच.
आंधी मधली पण सगळीच.
किती एक से एक गाणी येतायत
किती एक से एक गाणी येतायत
माधव, खुप छान यादी.
वो तो चले गये ए दिल >> अहाहा
वो तो चले गये ए दिल >> अहाहा मस्त गाणे आठवले माधव. धन्यवाद.
वो तो चले गये ए दिल , याद से उन की प्याsssssर कर... गाण्यातला प्यार हा शब्द आणि कडव्यातला गरज शब्द बाईंनी अप्रतिम गायलाय
जरा उशीराच पाहिले. वरची
जरा उशीराच पाहिले. वरची बहुतेक गाणे खास आहेत आणि आवडतीही. त्याबरोबर माझी ही additional. "देर आये.." पण दुरुस्त की काय ते माहीत नाहे. नंबर देणे शक्य नाही, आठवली तशी लिहीली:
भूल जा ऐ दिल मुहोब्बत का फसाना : खेल (सज्जाद हुसेन)... मित्राने ऐकवले आणि वेडा झालो. लगेच टेप करून घेतले त्यावेळी.
जा ओ रे जोगी तुम जा ओ रे : आम्रपाली (शं ज) ... vcd त बसत नाही म्हणून मुर्खाने सिनेमातुन कापलेले गाणे (अशी अनेक गाणी कापली आहेत)
आ वा रा ऐ मेरे दिल : रात और दिन (शं ज)... मला ही गाणे फार आवडते. खास करून जरा slow आहे ते.
रात क्युं कटी ये तुझे है खबर ( किंवा एक दिल का लगाना): परछाई (सी. रामचंद्र )
ओ बलमा माने ना : Opera House (चित्रगुप्त) ट्रेनमध्ये एका वयस्क भैय्याने म्हटले. जबरी. नमस्कार करावसा वाटला
नदिया के पानी ओ रे: सवेरा (शैलेश)
जागो मोहन प्यारे जागो : जागते रहो (सलील चौधरी) Best song+ best picturization+ Best Situation Everything is perfect
तेरा खत लेके सनम : अर्धांगिनी (वसंत देसाई)
पग ठुमक चलत : सितारों से आगे ( SD)
ये दिल और उनकी निगाहों के : प्रेम परबत (जयदेव)
किशोर टॉप टेन वगैरे
किशोर टॉप टेन वगैरे काढण्यापेक्षा मी समग्र वपु वगैरे वाचत बसाणं पसंत करेन. >> +१
इथे १० गाणी वगैरे लिहिणं मिशन
इथे १० गाणी वगैरे लिहिणं मिशन इंपॉसिबल आहे माझ्यासाठी.
पण हे एक अतिशय अवघड गाणं, लतानी भारी गायलंय.... आरडी, गुलजार आणि लता .. चित्रपट : दूसरी सीता !
https://www.youtube.com/watch?v=JUdK8D8QR6M
व्वा रार, मस्त गाणे.... आता
व्वा रार,
मस्त गाणे....
आता एक गाणे माझे ही अत्यंत आवडते... चित्रपट लेकीन, संगीत पं हृदयनाथ जी, गीत गुलजार साहेब.
मला वाटते राग विहंगिनी आहे बहुदा (मामा, नंदिनी ताई, दिनेशदा, भरतजी प्रकाश टाकावा)
काय गाय्ले आहे हे गाणे...उफ्फ उफ्फ उफ्फ......
www.youtube.com/watch?v=egu-2BJiYfw
अवघड होतं दहाच गाणी निवडणं
अवघड होतं दहाच गाणी निवडणं आणि मी धागा वाचत्येय तेव्हा लक्षात येतंय की बाकीच्यांना आवडलेली कित्येक गाणी मी अजून ऐकली सुद्धा नाहीयेत तेव्हा ही यादी पक्की नाही हे नक्की! पण ही यादी करणं आनंदाचं काम आहे, विशेषतः लता मंगेशकर यांच्या गाण्यांची यादी करणं! इथे प्रतिक्रिया देणाऱ्यांचे आभार कारण ह्या निमित्ताने मला अनेक नवीन गाणी कळली!
तर माझी (सध्याची) आवडती १०!
> रातों के साये घने
> जुर्म - ए- उल्फत पे
> पवन दिवानी
> ये जिंदगी उसीकी है
> तू चंदा मै चांदनी
> चलो सजना जहा तक घटा चले
> ना जिया लागे ना
> आज कल पांव जमी पार
> गगन सदन तेजोमय
> गणपतीची आरती (सुखकर्ता - दु:खहर्ता )
बीती ना बिताई रैना -
बीती ना बिताई रैना - परिचय
रूठे रूठे पिया- कोरा कागज़
फिर छिड़ी रात- बाज़ार
मन क्यूँ बहका रे बहका- उत्सव
यारा सीली सीली- लेकीन
लग जा गले- वो कौन थी
जिया जले जाँ जले- दिल से
दिल हूम हूम करे- रूदाली
बाहोमे चले आओ- अनामिका
तेरे बिना ज़िन्दगीसे कोई- आँधी
अजून शेकडो आहेत, पण ही खूपच आवडती गाणी
अजून एक अशक्य काँबीनेशन...
अजून एक अशक्य काँबीनेशन... राजेंद्र किशनचे चटका लावणारे शब्द, मदन मोहन ची अशक्य चाल , लता चा काळीज चिरणारा आवाज ( 'बात कलकी है के फुलोंको मसल देते थे' या वाक्याला बाई ऐकणार्याला मारुन टाकतात !) आणि पडद्यावर मधुबाला...
गेट वे ऑफ इंडिया मधलं 'ना हसो हमपे जमाने के है ठुकराये हुये'
https://www.youtube.com/watch?v=1OXXQ2wIVP0
इतक्या अवघड प्रश्नाचे उत्तर
इतक्या अवघड प्रश्नाचे उत्तर अजुनही लिहिता येत नाहिये.
लताचा आज वाढदिवस..
लताचा आज वाढदिवस.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ☺️
(१) घन तमी शुक्र बघ .........
(१) घन तमी शुक्र बघ ............................... हेच #१ वरती. अन्य कोणतेही येउ शकत नाही.
(२) या चिमण्यांनो .................................. कासाविस व्हायला होतं
(३) रुणुझुणु रुणुझुणू ....................... फार शांत वाटतं
(४)सोलह बरस की ................................ अवर्णनिय!!
(५)ज्योती कलश छलके ................................. खरोखर मनामध्ये सोनेरी पहाट होत जाते
(६) छुपा लो युं दिल मे ................. शांत वाटतं
(७) दिल से मिला के दिल
(८) तूने ओ रंगीले
(९) हाये रे वोह दिन
(१०)कांटों से खींचके ये आंचल
मी पूर्वी एक "Selected Lata"
मी पूर्वी एक "Selected Lata" असे लेबल असलेली कॅसेट पहिली होती. त्यात एक गाणे सुमन कल्याणपूर यांचे होते ("जुही कि कली मेरी लाडली")
बरीच आहेत. अत्यंत तरल व
बरीच आहेत. अत्यंत तरल व ह्दयस्पर्शी अशी हि काही...
१. कुछ दिल ने कहा
२. जो हमने दास्तान अपनी सुनाई
३. बहारो मेरा जीवन भी संवारो
४. जरासी आहट होती है तो दिल सोचता है
५. लग जा गले के फिर ये हंसी रात ना हो
६. मिलती है जिन्दगी में मुहोब्बत कभी कभी
७. आज फिर जीने कि तमन्ना है
८. नैना बरसे रिमझिम रिमझिम
९. आ जा रे परदेसी
१०. गगन सदन तेजोमय
Haunting songs. They literally drag your mind with them once you start listening
मराठी
मराठी
१. आनंदी आनंद गडे
२. भेटीलागी जीवा
३ रंगा येई वो
४ घेऊ कसा उखाणा
५. प्रेमा, काय देऊ तुला?
६. मला आणा एक हिर्याची मोरणी
७. या चिमण्यांनो, परत फिरा रे
८. मेंदीच्या पानावर
९. माज्या सारंगा राजा सारंगा
१०. तुज स्वप्नी पाहिले रे गोपाळा!
सगळीच गाणी आवडती आहे.
सगळीच गाणी आवडती आहे. सर्वश्रेष्ठ निवडणं अवघड आहे माझ्यासाठी.
<(७) दिल से मिला के दिल> हे
<(७) दिल से मिला के दिल> हे गाणं माहीत नव्हतं किंवा ऐकल्याचं आठवत नव्हतं.
धाग्याच शिर्षक बघून हे एकच
धाग्याच शिर्षक बघून हे एकच पटकन आठवलं
फैली हुई है सपनों की बाहें https://m.youtube.com/watch?v=RT7Cpa5cYxc
बहार आई खिली कलियाँ,
बहार आई खिली कलियाँ,
ए दिलरुबा,
गम की वादींमें खुषीका,
बेकस पे करम कि जिये ,
वो को चले गये ओ दिल,
हम प्यार में जलने वालोंको,
जाना था हमसे दूर,
रस्मे उल्फत को निभायें कैसे,
मुश्किल है बगोत मुश्किल,
दिलसे भुला दो हमें,
....
का, का, दहाच का द्यायची???
मन भरतच नाही इतकीच गाणी लिहून
https://m.facebook.com/story
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2206847056204938&id=15772470...
येथील शांता शेळके यांनी लतादीदींवर लिहिलेला लेख खरंच खूप छान आहे.
हिंदी:
हिंदी:
१. फैली हुई है सपनों की बाहे
२. जा तो से नही बोलू कन्हैया
३. मौसम है आशिकाना
४. ये दिल और उनकी
५. ए जानेवाले मुड़के जरा देख के जाना
६. बलमा माने ना
७. ना, जिया लागे ना
८. रूठे सैंया, हमारे सैंया क्यों रूठे
९. अगर दिलबर की रुसवाई
१०. यूंही कोई मिल गया था
अवल तुमची गाणी मला अनवट वाटली
अवल तुमची गाणी मला अनवट वाटली. मी बरीच ऐकली नव्हती किंवा ती रजिस्टर झालेली नव्हती.
Pages