Submitted by रॉबीनहूड on 20 July, 2015 - 10:44
लता मंगेशकर !
बस नाम ही काफी है.
मला माहीत आहे अलीबाबाला त्या रत्नखचित गुहेतून फक्त दहाच रत्ने उचलायला परवानगी दिली असती तर तो वेडा झाला असता. अनेक लोक लताच्या टॉप टेन च्या याद्या बनवता बनवता वेडे पिसे झालेत. ही यादी अर्थातच वादग्रस्त असते. दुसरे लोक काय पण आपण स्वतःच आपण बनवलेल्या त्या यादीशी सहमत नसतो ::फिदी:
चला तर , बनवा टॉप टेन गाण्यांची यादी. पाहू या किती गाणी कॉमन येतात ती.
लक्षात ठेवा ...
फक्त दहाच !!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
E chand jahaa wo jaaye>> Ruke
E chand jahaa wo jaaye>>
Ruke ruke se kadam ruk ke baar baar chale>> मस्त.
'आँखोंसे फिर ये प्यारकी बरसात हो ना हो' ओळीत त्या 'फिर'वर घेतलेली हरकत अमेझिंग >>अहा!!
झिलमिल, हिरा, चिकु विशालदेव मस्तच.
मैं तो तुमसंग नैन मिलाके - मनमॉजी>>
१०. क्या जानू सजन - बहारों के सपने>> वॉव!!
आ जा रे मै तो कब से खडी इस पार
(एक फ्लो आहे गाण्यात. गाणे संपू नये असे सतत वाटत राहते.)>> मस्तय हे गाणे.
ओ सजना बरखा बहार लायी>> हे पण.
रॉबीनहुडा खूप छळ आहे रे १० च गाणी म्हणजे.
होय अगदीच भूले बिसरे गीत
होय अगदीच भूले बिसरे गीत नाहीयेत ही गाणी, पण शक्यतो ती लोकप्रियतेच्या लिस्ट मध्ये येत नाहीत. उठाये जा उनके सितम चा अपवाद. टॉप टेन मध्ये ही क्वचितच येतील पण मनामध्ये रेंगाळणारी आहेत, निदान माझ्यातरी, म्हणून लोकप्रियतेच्या बाबतीत भूले बिसरे गीत.
१. धीरे धीरे मचल ए दिले
१. धीरे धीरे मचल ए दिले बेकरार कोई आता है
२. वो जो मिलते थे कभी हमसे दीवानों की तरह, आज यूँ मिलते हैं जैसे कभी पहचान न थी
३. किसीने अपना बनाके मुझको मुस्कुराना सिखा दिया
४. पिया बिना पिया बिना बासिया बाजे ना
५. जिया लागेना , तेरे बिना मेरा कही जिया लागेना
६. अजि रुठ कर अब कहा जाईयेगा
७. पिया तोसे नैना लागे रे, जाने क्या हो अब आगे रे
८. मनमोहना बडे झूठे
९. तू जहा जहा चलेगा, मेरा साया साथ होगा
१०. ये समा, समा है ये प्यार का
११. बैया ना धरो ओ बलमा
माझ्या दृष्टीने दर दोन-तीन
माझ्या दृष्टीने दर दोन-तीन वर्षांनी बहुधा ही लिस्ट बदलेल. अनेक वर्षे आजूबाजूला ऐकू येत असलेली गाणी कधीतरी एकदम डोक्यातील कोणतातरी स्विच ऑन करून टाकतात आणि मग त्यातील माधुर्य, चाल, संगीत व आवाजातील ताकद लक्षात येते जी आधी कधीच आलेली नसते. नुकतेच तिच्या मदन मोहन कडच्या काही गाण्यांबाबत असे झाले, त्यामुळे सध्या माझ्या लिस्ट मधे मदन मोहन वाली टॉप मधे :). पूर्वी कधी शंकर जयकिशन वाली होती तर कधी एस्डी वाली.
१. नैनों मे बदरा छाये - यातील 'शरमा के देंगी तोहे मदिरा के प्याले' वाक्यात काय मॅजिक आहे माहीत नाही. एकदा गाणे म्हणून क्लिक झाल्यावर हजार वेळा ऐकून झाले आहे पण गोडवा कमी होत नाही
२. नैना बरसे रिमझिम रिमझिम - हे ही तसेच. पहिले कडवेच 'आँखो मे हे बरसों की प्यास' या वाक्यावर लता असे काही संपवते, की टोटल खलास. बाकी कडवी शब्दरचनेच्या दृष्टीने फारशी भारी नाहीत पण आवाज, चाल आणि संगीत त्याला पुरून उरते
३. तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा - हे अनेक वर्षांपूर्वी साक्षरतेच्या की कसल्यातरी जाहिरातीत दूरदर्शनवर लागू लागले आणि तेव्हापासूनच आवडू लागले.
४. मिलों न तुम तो हम घबराये - आवाज, चाल, संगीत, शब्द सगळेच भारी. एकदा ऐकले, की दिवसभर ते तुकडे कानात गुणगुणत राहतात. मात्र हे गाणे फक्त ऐकावे :).
५. रहे ना रहे हम - हे ऑलटाईम फेवरिट राहिले आहे. एक कडवे ('जब हम ना होंगे, जब हमारी खाक पे तुम रुकोगे चलते चलते') वगळता मला शब्द नीट कधीच समजले नाहीत मजरूह चे, पण तरीही. रोशन च्या चालीतील अंगभूत गोडवा आहेच.
६. अजीब दास्तां है ये - शैलेन्द्रची सोपी सुटसुटीत आणि तरीही अर्थपूर्ण रचना, शंकर जयकिशन ला ऑर्केस्ट्रा ने टेकओव्हर करण्या आधीचा त्यांच्या चालींमधला प्रचंड गोडवा आणि केवळ त्यांच्याच कडे ऐकू येणारा लताचा कमालीचा रोमँटिक आवाज!
७. ओ सजना बरखा बहार आयी - शब्दरचना सहज मला तरी रिलेट न करता येण्यासारखी पण पावसाळी वातावरण, साधना, सलील चौधरींची सुंदर चाल आणि लता! कितीही वेळा ऐकले तरी कंटाळा नाही!
८. आजा रे परदेसी - हे लिहावे की 'घडी घडी मोरा दिल धडके' त्यातील प्रसन्नतेमुळे ते लिहावे यावर विचार करून शेवटी दोन्ही गाणी पुन्हा ऐकली आणि शेवटी याला तोड नाहीच, जरी मला घडी घडी ही तितकेच आवडत असले तरी. त्यातील 'आज मिलन की बेला मे' ही ओळ वरच्या इतर ओळींसारखीच - टोटल मॅजिक.
९. धीरे धीरे मचल ऐ दिल-ए-बेकरार - रचने च्या दृष्टीने हे बहुधा 'क्लासिक' ची व्याख्या प्रत्यक्षात उतरवणारे असावे - हळुहळू वेग घेणारे संगीत, गाण्याचा जो अर्थ आहे - तो जो कोणी घरी येत आहे त्याबद्दल स्टेप बाय स्टेप वर्णन, पियानोचे अफलातून पीसेस सगळेच जबरी आहे.
१०. अल्ला तेरो नाम - इथे मात्र निव्वळ लता ने उचलले आहे. शब्द, चाल ठीकठाक आहे, सगळी जादू आवाजात! 'निर्बल को बल देनेवालें, बलवानोंको दे दे ग्यान' ऐकताना गळ्यात काहीतरी होण्याची गॅरंटी!
हे झाले १० हिन्दी, तेही फक्त ६० च्या दशकापर्यंतच. तरीही आपला फेवरिट एस्डी राहिलाच. I am sure उद्या 'अरे हे कसे नाही टाकले' असे वाटण्याजोगी त्याच दशकातील अजून दहा आठवणार आहेत. जाउदे!
फारेंडा मस्तच. जियो लताजी!!
फारेंडा मस्तच.
जियो लताजी!!
फारएण्ड, तुझ्या लिस्टमधल्या
फारएण्ड, तुझ्या लिस्टमधल्या प्रत्येक गाण्यासोबतच्या तुझ्या टिपण्णीमुळे तुझी लिस्ट वेगळीच भासली
"अजीब दास्ताँ है ये" मध्ये लताचा आवाज रोमँटिक नाही वाटत. उलट खालच्या ओळींमध्ये कासाविशी जाणवते...
मुबारके तुम्हे के तुम किसी के नूर हो गए
किसी के इतने पास हो के सब से दूर हो गए
किसी का प्यार लेके तुम नया जहां बसाओगे
ये शाम जब भी आयेगी, तुम हमको याद आओगे
पहिल्याच दिवशी लिस्ट काढायला
पहिल्याच दिवशी लिस्ट काढायला घेतली होती. पण आय गेव्ह अप. कारण १० म्हणजे ५० तरी होत आहेत. १० ची गंमत वगैरे कळूनही.
मयेकरांनी इथे तू चंदा लिहिण्याआधी मी विचार करत होतो की ते अजून इथे का आले नाही. तसेच अजून इथे राजसा जवळी जरा बसा हे ही आले नाही. त्या राजसावरच माणूस मरू शकतो.
मराठीचीच २५ तरी भरतील.
फारेण्ड ,सहमत. वर्षानी कशाला
फारेण्ड ,सहमत. वर्षानी कशाला मूडप्रमाणेही बदलतील. आज एस डी चं कब तो है तुमसे हर खुषी अपनी येईल,जयदेवचंएक ठंडीसी अगन ,एक मिठीसी चुभन येईल. शंकर जयकिशनचं सुनते थे नाम हम जिनका बहार से
कोणालाच 'ये कहाँ आ गये हम,
कोणालाच 'ये कहाँ आ गये हम, यूँही साथ साथ चलते' आवडत नाही का?
मला आवडतं ते गाणं. त्याच
मला आवडतं ते गाणं. त्याच बरोबर अमिताभच्या ओळीही आवडतात. दोन्ही एकमेकांना पूरक आहेत.
वर्षानी कशाला मूडप्रमाणेही
वर्षानी कशाला मूडप्रमाणेही बदलतील. >> +१
मी कालपासुन वो है जरा खफा खफा तो नैन यु चुराये है , हे शागिर्द (१९६७) मधील लक्ष्मिकांत प्यारेलाल यांनी संगितबद्ध केलेल गाण ऐकतेय... लता दि आणि रफी साहेबांनी कम्माल केलीय यात पन..
प्रतिसादात सगळ्यांनी लिहिलेली
प्रतिसादात सगळ्यांनी लिहिलेली आणि अजुन राहीलेली म्हणतात लोक ती गाणी आवडतातच. पण ती केवळ लताची गाणी नाही म्हणु शकत मी.
या विषयाशी संबंधित आहे म्हणून
या विषयाशी संबंधित आहे म्हणून लिहित आहे.
~ मागे एकदा स्टार प्लसवर प्रीतिश नंदी यानी लता मंगेशकर यांची तब्बल एक तासाची मुलाखत घेतली होतो. मुलाखतीची मांडणी गप्पागोष्टी, जुन्या आठवणी अशाच असल्याने दोघेही अगदी हसतखेळत बोलत असल्याचे दिसत होते. साहजिकच नंदी यानी त्या ओघात दिदींना विचारले, "लता जी....तुमच्या हजारोच्या संख्येत असलेल्या गाण्यांपैकी तुम्हाला वैयक्तिक आवडीची अशी शेकडो गाणी आठवत असतील...चर्चाही होत राहतात. पण आता मी तुम्हाला जर विचारले की तुमच्या सर्व गाण्यांतून तुम्ही फक्त एकच आवडते गाणे असे निवडा, तर तुम्ही कुठले निवडाल ?" खरं तर या प्रश्नाचे उत्तर दिदींसाठी अवघड होते, पण त्यानी डोळ्याची पापणी लवते न लवते तितक्या वेळेत उत्तर दिले "आयेगा आनेवाला...." ~ त्याबद्दल त्या काहीही बोलल्या नाही. प्रीतिश नंदी यानीदेखील त्याना "का ?" हा प्रश्न विचारला नव्हता.
आपण चर्चा करत राहूच पण दिदींची स्वतःची अशी आवड समजावी आपल्याला यासाठी हा प्रतिसाद.
मामा छान आठवण सांगितलीत
मामा छान आठवण सांगितलीत तुम्ही....
ह्या मुलाखती ची लिंक मिळाली कुठे तर अजुन बहार येइल.
मला वाटते, की आयेगा आनेवाला लतादिदिंचे फेव्हरेट असेल कारण ते पहिले अत्यंत गाजलेले गाणे आहे बहुदा त्यांचे, मागे एका रेडीओ च्या मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की त्या गाण्याच्या आधी पार्श्वगायकाचा उल्लेख रेकॉर्ड वर होतच नसे, महल च्या रेकॉर्ड वर पण म्हणे ह्या गाण्यासमोर कामिनी असे नाव आहे, जे चित्रपटात मधुबाला चे नाव होते.
आयेगा आनेवाला ची अजुन एक गंमत म्हणजे ह्या दोनच शब्दांचा मुखडा आहे गाण्याला आयेगाss आयेगाsss आनेवाला आयेगा....That's all
माझी लिस्ट: पिया तोसे नैना
माझी लिस्ट:
पिया तोसे नैना लागे रे
अजीब दास्ता है ये
ओ सजना बरखा बहार आयी
तुम्हे याद करते करते
धीरे धीरे मचल ए दिले बेकरार
जुलमी सन्ग आन्ख लडी
रात का समा, झुमे चन्द्रमा..
बाहो मे चले आओ
घडी घडी मेरा दिल धडके
पानी पानी रे, पानी पानी रे- माचीस
प्रसन्न... ~ स्टार प्लसवरील
प्रसन्न...
~ स्टार प्लसवरील त्या मुलाखतीचा व्हिडिओ असायला हवा...कदाचित असेलही. विशेष सांगायचे म्हणजे पूर्ण मुलाखतीत प्रीतिश नंदी इंग्रजीत प्रश्न विचारत होते आणि दिदी हिंदीत उत्तर देत होत्या....इतके मला स्मरते.
बाकी "महल" चे गाणे म्हणजे हिंदी चित्रपट इतिहासाचे एक लखलखते पानच बनले आहे यात संदेह नाही. लता मंगेशकर असे गायिकेचे नाव नव्हते रेकॉर्डवर तर नायिका "कामिनी" असे होते. शिवाय त्या काळात भारतीय आकाशवाणी केन्द्रावरून चित्रपट संगीताच्या प्रसारणाला बंदी असल्याने लोकांनी हे गाणे 'रेडिओ गोवा' या केन्द्रावरून ऐकले.... नंतर अनेक लोकांच्या पत्रांद्वारे केलेल्या मागणीला उत्तर म्हणून त्याच केन्द्रावरून गायिकेचे खरे नाव "लता मंगेशकर" असे जाहीर करण्यात आले.
hya dhagyala latachi jast
hya dhagyala latachi jast prasidhi na milaleli pan titkich god ase nav have hote.karan var dileli sarva gani apan anekda eikaleli ahet.Me ashi gaani dete ji atishay god ahet,
1) Raato ke saaye ghane. film-Annadata, music -Salil chowdhari.
2)Nis din nis din mera julmi sajan. film-Annadata.
3)Meghava gagan beech zake.. film-Harishchandra Taramati. music-Laxmikant Pyarelal.he atishay god gane ahe.
4)Balma mora aanchara. film-Sangat, music-Salil choudhari.(1976)
5)More naina bahaye neer. film-Bawarchi.
6)Jindagi ka ajab fasana hai. film-Choti Choti baateen. music-Anil Bishwas.
7)Sapano mein agar mere tum aao . film-Dulhan ek raat ki. music-Madan Mohan.
8) Hai wo Paradesi. film-Barsaat ki ek raat. music-R.D.burman.
9)Kya janu sajan, film-Baharon ke sapne. music-R.D.Burman.
10) Phaili hui hain sapano ki baate. film-House no.44. music-S.D.Burman.
-
केदारशी आणि दक्षिणाशी सहमत.
केदारशी आणि दक्षिणाशी सहमत. अशक्य आहे.
तरीही असावा आपला म्हणुन हा सराव (व्यर्थच) करून बघितला. पण डोक्याला स्क्रू लागलाय तो लागलायच!
रॉबिन, ये आपने अच्छा नही किया..
१. मिला है किसीका झुमका - गोडवा, दाय नेम इज लता.. ताल आणि चाल सगळं सलिल चौधरी शाळेशी सुसंगत. त्यात ती साधना.. बासच! पण 'ओ बरखा'मुळं या गाण्याकडे लक्षच जात नाही सहसा.
२. ये तनहाई हाए रे हाए जाने फिर आए ना आए
३. न जाने क्युं होता है युं जिंदगी के साथ - अनुभूती देणारं गाणं. इतर कुणी गायलं असतं तर तितकं प्रभावी झालं असतं का, हा ऐकताना प्रत्येक वेळेला पडणारा प्रश्न आहे. मला तरी उत्तर नाही असंच येतं.
४. न जाने क्या हुआ, जो तूने छू लिया - सिंपली सेन्सेशनल! हे गाणं ऐकताना लता प्रेमात पडली नव्हती यावर विश्वास बसत नाही आणि ते प्रत्यक्षात तसं नसावंही.
५. माझी न मी राहिले, तुजला नाथा सर्व वाहिले - ऐकायलाही अवघड आहे हे गाणं. लताच्या मराठी जेम्सपैकी एक.
६. पसायदान - दंडवत, यापेक्षा निराळं काही बोलू शकत नाही.
७. दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी
८. धीरे से आजा री अखियन में - याला तोडच नाहीये!
९. जाहल्या काही चुका - खळेकाका आणि लताची सगळीच आवडतात, पण हे सर्वात जास्त.
१०. आज की रात न जा, न जा, न जा रे
चिक्कार, चिक्कार राहिलीयेत अजुन. आली हासत पहिली रात आणि माझिया नयनांच्या कोंदणी पण याच यादीत हवं होतं मला, पण काढू कुणाला? मागे शैलजासाठी एक यादी तयार केली होती, त्यातलीही यात कित्येक नाहीयेत..
वरती किती सुंदर गाणी आलियेत लतामंथन सुरू आहे. प्रत्येकाला चांगलाच घाम गाळायला लावताय (विधायक कामासाठी)
माझी आवडती काही गाणी: १. मोहे
माझी आवडती काही गाणी:
१. मोहे भूल गये सावरिया
२. आँख से आँख मिलाता है कोई (गझल)
३. मेरा गोरा अंग लईले
४. खेलोना मेरे दिल से ओ मेरे साजना
५. क्या जानू सजन
६. ना जिया लागे ना ( ह्याचे बंगाली व्हर्जन पण मस्त आहे..ना मोनो लागे ना)
७. उठाए जा उनके सितम
८.चाला वाही देस (भजन)
९.साजन की गलिया छोड चले दिल रोया
१०. रिमझिम गिरे सावन
अरे हे वाचले सगळे पण
अरे हे वाचले सगळे पण कुणाच्याही यादीत राम तेरी गन्गा चे एक राधा, एक मीरा दोनोने श्याम को चाहा हे नाहीये याचे जरा सखेद आश्चर्य जाहले. किरवाणी रागातले अप्रतीम गाणे आहे हे.
पण फक्त दहा? बहुत नाईन्साफी है ये. आता आशाकरता पण नवीन बाफ काढा किन्वा याच्यातच तिचा समावेश करा. तिला पण हजार हिरे मिळालेत.
. उठाए जा उनके सितम>> सई तू
. उठाए जा उनके सितम>>
सई तू एकत्र टाकलीस गाणी. हिंदी १० मराठी १० व गैरफिल्मी १० असा ३० चा स्कोप आहे. असो. आवडली लिस्ट.
न जाने क्युं होता है युं जिंदगी के साथ - >>४. न जाने क्या हुआ, जो तूने छू लिया >>५. माझी न मी राहिले, तुजला नाथा सर्व वाहिले>> आली हासत पहिली रात >> खासच.
आशा टॉप टेन रफी टॉप टेन किशोर
आशा टॉप टेन
रफी टॉप टेन
किशोर टॉप टेन वगैरे काढण्यापेक्षा मी समग्र वपु वगैरे वाचत बसाणं पसंत करेन. मेंदूला इतक्या सीलेक्शन प्रोसेस झेपण्यासारख्याच नाहीत. लता टॉप टेनने अजून डॉक्याच्या भुगा लावलेलाच आहे.
हिंदी १० मराठी १० व गैरफिल्मी
हिंदी १० मराठी १० व गैरफिल्मी १० असा ३० चा स्कोप आहे>> केपी, असं तर काही लिहिलेलं नाही वरती हेडरमधे
पण तरी हाल व्हायचे ते झालेच असते
रश्मी , मला 'राम तेरी' ची
रश्मी , मला 'राम तेरी' ची सगळीच गाणी आवडतात. सून साहीबा सून, यारा हो यारा आणि टायटल सॉन्ग ही. १० च गाणी लिहायची होती त्यामुळे वगळली गेली
अजून काही.. १. रसिक बलमा, २.
अजून काही..
१. रसिक बलमा,
२. झूम झूम ढलती रात लेके चली मुझे अपने साथ,
३. माईरी मै नीर भरन नही जाऊ,
४. मोहे छेडोना नंद के लाला,
५.ए दिल-ए-नादा,
६.दिलबर दिलसे प्यारे,
७. कही दिप जले कही दिल,
८. निला आसमा सो गया,
९. एक प्यार का नगमा है,
१०. जाने क्या बात है
जाने क्या बात है ... (सनी)
जाने क्या बात है ... (सनी)
मेरा साया मधे सगळ्यांच्या
मेरा साया मधे सगळ्यांच्या आवडीची 'नैनोमे बदरा छाये' आणि 'मेरा साया साथ होगा' आहेत. पण मला 'नैनोवालीने हाय मेरा दिल लूटा' हे खेळकर, प्रसन्न गाणं जास्त आवडतं, कडव्यांच्या आधी शेर आहेत त्यामुळे अजून मजा येते.
तसंच वो कौन थी मधली 'लग जा गलेसे' आणि 'नैना बरसे' जास्त प्रसिद्ध आहेत पण 'जो हमने दास्तान अपनी सुनायी' ही मला अतिशय आवडतं.
काही काही वेळा सिनेमातली एकदोनच गाणी प्रचंड गाजतात आणि त्यामुळे बाकिच्यांकडे काहिसं दुर्लक्ष होतं. वरील गाणी त्याचीच उदाहरणं आहेत. अशीच अजून काही गाणी.
परख मधलं 'मिला है किसीका झुमका'. यातलं सगळ्यात गाजलेलं गाणं 'ओ सजना बरखा बहार आयी'.
आह मधलं 'सुनते थे नाम हम'. यातलं सगळ्यात गाजलेलं गाणं 'राजा की आयेगी बारात'.
कोहरा मधलं 'ओ बेकरार दिल'. यातलं सगळ्यात गाजलेलं गाणं ' झूम झूम ढलती रात'
बीस साल बाद मधलं 'सपने सुहाने लडकपनके'. यातलं सगळ्यात गाजलेलं गाणं ' कही दीप जले कही दिल'.
मुघले आझम मधलं 'ए इश्क ये सब दुनियावाले'. यातली गाजलेली गाणी 'प्यार किया तो डरना क्या' आणि 'मोहे पनघटपे नंदलाल'.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=aOXEIJhE9qo&list=PLa-ms30vrtELAJSAsrrbSg...
आज हे रत्नं मिळाली.याअतलं भूल जा ए दिल मधल्या दिल जलाना है ओळीला लता काय करते ते मर्त्य मानवाच्या शब्दांत वर्णन करणं अशक्य आहे.
दिल तो है दिल (मुकद्दरका
दिल तो है दिल (मुकद्दरका सिकंदर) हे गाणं कुणाच्या आवडीत नाही का आजून?
-गा.पै.
'नग्माओं शेर की बारात किसे
'नग्माओं शेर की बारात किसे पेश करूं' पण आलं नाही अजून..
Pages