दिल पुकारे आरे आरे विरुद्ध मुंबईचा मेट्रो विकास? हे प्रकरण नक्की आहे तरी काय?

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 September, 2019 - 15:57

दिल पुकारे आरे आरे विरुद्ध मुंबईचा मेट्रो विकास?

हे प्रकरण नक्की आहे तरी काय?

विकासाच्या नावाखाली आरे येथे मोठी वृक्षतोड होणार. मुंबईची फुंफ्फुसे निकामी करणार. त्याविरोधात चला पेटीशन साईन करूया म्हणून उत्साहात मी सुद्धा माझे वृक्षप्रेम आणि त्याहून कांकणभर जास्त असे मुंबईप्रेम दाखवत त्याला समर्थन दिले. माझ्यासोबत चार लोकांना जबरदस्ती द्यायला लावले.

पण आता आरेला कारे करत बातमीची दुसरी बाजू काही अभ्यासू लोकं समोर घेऊन येत आहेत. आरे वाचवा म्हणणारयांवर बेगडी पर्यावरणप्रेमीचा शिक्का मारला जात आहे. तसेच मुंबईच्या विकासासाठी वृक्षतोड किती गरजेची आहे हे सांगत आहेत.
त्यात आज सकाळीच एक बातमी कानावर आली की या विकांताला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबईतील उच्चशिक्षित विकासप्रिय नागरिक मेट्रो समर्थनासाठी जमणार आहेत.
बर्रं बातमीसोबत सोबत एक भावनिक आवाहन होते,
तुमचा एक तास वसई-कल्याण च्या लोकलमधून पडणाऱ्याचा जीव वाचवू शकतो.

एकंदरीत दोन्ही बाजूंनी मला भावनिक करून टाकले आहे.

यात माझे एक सूक्ष्म निरीक्षण असेही आहे की मित्रयादीतले भाजप समर्थक मेट्रो झिंदाबाद टीमकडून उतरले आहेत तर सरकार विरोधक आरे बचाव गटात सामील आहेत.
आणि जेव्हा असे एखाद्या विषयात राजकारण येते तेव्हा काय खरे आणि काय खोटे हे जाणून घेणे माझ्यासाठी अवघड होते.

मायबोलीचर्चेत नेहमीच चांगली आणि योग्य माहीती मिळते हा आजवरचा अनुभव म्हणून मुद्दाम ईथे हे विचारतोय.

माझे वैयक्तिक मत म्हणाल तर आपण विकासाच्या रस्त्याने विनाशाकडे जात आहोत. पण याचा अर्थ असा नाही की मी मेट्रोला वा विकासाला विरोध करतोय. विनाश असा ना तसा आज ना उद्या होणारच आहे. तर त्याआधी विकास उपभोगून घेतलेला काय वाईट Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्लॅक कॅट
स्थानिक लोकांची लोकसंख्या वाढते ती नैसर्गिक वाढ झाली .
बाहेरून जे परप्रांतीय लोकांची आवक होते ती लोकसंख्येची अनिसर्गिक वाढ आहे कारण एकच ठिकाणी हे लोंढे येतात आणि स्थायिक होतात त्या मुळे तेथील जमीन,पाणी,ह्यांच्या वर बोजा पडतो .
आणि हो तुमच्या दर दहा पोस्ट मागे लाल किल्ला आणि ताजं महाल चा उल्लेख असतोच .
खूप च वाटत आहे तर एक पोस्ट टाका लाल किल्याच्या माहिती वर .
लोकांना जो माहीत नाही असा अधभूत इतिहास सुद्धा माहिती होईल तुमच्या मुळे .
तेवढं कराच

विधानसभेच्या निवडणुका संपेस्तोवर वातावरण थोडं तापेल. बट राइट आफ्टर, एव्हरिथिंग विल फॉल इन लाइन...म्हणजे न्यायालयातील केस फक्त निवडणुक डोळ्यासमोर ठेवुन केली आहे असे? की आम्ही एकदा बहुमताने निवडुन आलो की आंदोलन चिरडुन काढु असे?

<< स्थानिक लोकांची लोकसंख्या वाढते ती नैसर्गिक वाढ झाली .
बाहेरून जे परप्रांतीय लोकांची आवक होते ती लोकसंख्येची अनिसर्गिक वाढ आहे कारण एकच ठिकाणी हे लोंढे येतात आणि स्थायिक होतात त्या मुळे तेथील जमीन,पाणी,ह्यांच्या वर बोजा पडतो .>>

--------- स्थानिक लोकांची लोकसंख्या वाढते हे नैसर्गिक असेल तर बाहेरुन रोजी-रोटी साठी केलेले स्थालांतरही नैसर्गिकच आहे.

मनुष्य हा अन्न आणि पाण्याच्या शोधात स्थालांतर करतो आणि असे स्थलांतर हे नैसर्गिक आहे. अशा स्थलांतराला देशाच्या सिमा पण मान्य नाही. प्रसांगी लोक जिवावर उदार होतात आणि स्थालांतर करतात.
(अ) बोट फक्त २०० लोकां साठी आहे.... पण त्यात ६०० -८०० लोक कोंबतात... लोकांनाही ते किती मोठा धोका घेत आहे हे माहित असते, प्रसंगी आस्त जास्त भारामुळे बोट बुड ण्याची शक्यताही असतेच. (दलालाला प्रत्येक माणसाचे पैसे मिळतात... ). असे स्थलांतर सिरीयामधून - युरोप कडे किंवा इराक मधून - इंडोनेशिया /ऑस्ट्रेलिया कडे सातत्याने होते. अनेक लोक बुडतात आणि प्राणास मुकतात.
(ब) मागच्याच वर्षी अमेरिकेमधून दोन लोक पायी चालत कॅनडामधे आले... -२५ से. पेक्षा कमी तापमानात... पायी. फ्रॉस बाईट मुळे हाताची बोटे कायमची गमावली. बोटावर निभावले. असे उदाहरणे मधून मधून वाचायला मिळतातच.
(क) बांग्लादेशामधून ---- भारतात येणे किंवा पेरू, ब्राझील, इक्वाडोर, कोलंबिया, अर्जेंटिना, मेक्सिको, ग्वाटमाला / मधून म स्म अमेरिके कडे येणारा जथ्था... हे जिवावर उदार झालेले असतात.
मागे राहिलो तर उपासमारीने मरणार हे नक्की.... पायी चालतांना सुरक्षित स्थळी पोहोचण्याची आणि म्हणून जगण्याची शक्यता तर आहे.

निवडणुका कोणीही जिंकल्या तरी आंदोलन चिरडले जाणे खूप सोपे आहे कारण पर्यावरणाबाबत जाणीव आणि त्याचे गांभीर्य कोणत्याच राजकारणी मंडळींना नाही.

प्रश्न हा आहे की
भविष्याचा वेध घेऊन इतिहासातल्या चुकांमधून आपण काही शिकणार आहोत का?

काँग्रेसने पर्यावरणाची वाट लावली म्हणून भाजपलाही तो हक्क मिळतो, असे आहे का?\\\

असं नक्कीच नाही. जे काही उरलं सुरलं पर्यावरण वाचवता येईल ते भाजपने वाचवावं. पण ज्या काँग्रेसने पर्यावरण ऱ्हास प्लस परप्रांतीय लांगूलचालन प्लस लँड माफिया प्लस झोपडपट्ट्या हे सर्व निर्माण करून महाराष्ट्राची वाट लावली त्या पक्षाला हे सर्व आणखी जास्त करायला नव्याने संधी देण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांना या विषयावर बोलायचा नैतिक अधिकार नाही. म्हणूनच म्हटलं सौ चुहे खाके...
एकीकडे स्थळांतरितांच्या बाजूने बोलायचं, दुसरीकडे पर्यावरणाची काळजी करायची, तिसरीकडे राज ठाकरेंवर जीव ओवाळायचा- हे सगळं परस्पर विरोधी होतंय हो.
सर्व समस्यांवर तुमचं उत्तर काँग्रेस, रागा, पवार हेच आहे ना. ते जनतेला माहीत आहे आणि त्यांचं आधीचं काम दिसत आहे लवासा वगैरेंच्या रूपाने.
दुसरं काही सोल्यूशन असेल तर बोलू!

मनुष्य हा अन्न आणि पाण्याच्या शोधात स्थालांतर करतो आणि असे स्थलांतर हे नैसर्गिक आहे. अशा स्थलांतराला देशाच्या सिमा पण मान्य नाही. प्रसांगी लोक जिवावर उदार होतात आणि स्थालांतर करतात.
उदय तुमच्या ह्या मताशी सहमत होणे अवघड जातय.
देश एवढ्या क्षेत्राचा आपण विचार केला तर पासपोर्ट आणि विसा चा
वापर करून स्थलांतरित लोकांची संख्या नियंत्रित केलेली असते .
कोणत्या ही प्रगत देशांनी मोठ्या मेहनतीने त्यांचा देश राहण्यास उत्तम बनवला ला असतो .त्या पाठी त्यांचा त्याग सुधा असतो.
त्या मुळे अनियंत्रित स्थलांतर लोकांची आवक कोणताच देश मान्य करणार नाही .
जसे आपण आपले घर मोठ्या कष्टांनी सजवतो सर्व सुविधा निर्माण करतो त्या आपल्या स्वतःच्या घरात आपण झोपटी मधील माणूस भिजतो आहे म्हणून प्रवेश देणार नाही आणि सहन सुद्धा करणार नाही .
तसे राज्य किंवा देश सुधा तेथील लोकांचे घरचं असते .
ते सुंदर,सर्व सुविधायुक्त आहे त्या मध्ये तेथील जनतेचा त्याग कारणीभूत असतो

राजेश - migrant caravan गुगला.
https://www.bbc.com/news/world-latin-america-45951782

काही ठिकाणी बोटी वापरतात... पण जिवावर उदार होत स्थलांतर करतातच. कशासाठी? माझा मुद्दा एव्हढाच आहे हे असे स्थलांतर नैसर्गिक आहे. देशाच्या, राज्याच्या सिमा आपण बनवलेल्या आहेत.

हर्पेन, ही एक छोटी डॉक्युमेंटरी दिसली. यावरून हा प्रश्न फक्त काही झाडे पाडण्याचा नाही हे लक्षात येईल.

https://scroll.in/video/903954/eco-india-in-a-rapidly-urbanising-mumbai-...

केवळ कार शेड नव्हे तर कमर्शिअल कॉम्प्लेक्स ३२ मजली ऑफिस इत्यादी प्रोजेक्ट्स आहेत हे हीरा यांच्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे. म्हणजे फक्त अत्यावश्यक गरजे खातर काही झाडे तोडली असं दिसतं नाहीय. आणि तीही कुठल्या खजिन्यातील झाडे तोडण्यात येतील हे बघायला हवे. हा खजिना वाचण्याच्या प्रयत्न करणाऱ्यांना मेट्रोचे / विकासाचे विरोधक म्हणणे चुकीचे आहे.

स्थानिक लोकांची लोकसंख्या वाढते ती नैसर्गिक वाढ झाली .
बाहेरून जे परप्रांतीय लोकांची आवक होते ती लोकसंख्येची अनिसर्गिक वाढ आहे कारण एकच ठिकाणी हे लोंढे येतात आणि स्थायिक होतात त्या मुळे तेथील जमीन,पाणी,ह्यांच्या वर बोजा पडतो .

कायच्या काय लॉजिक !!

जर मनुष्य व्यवस्थित काम करतो , पैसे मिळवतो तर सरकारी नियमात राहून त्याने कुठेही घर बांधावे,

टाटा, अंबानी , मोदी वाराणसी, राहुल गांधी वायनाड , रायगड ते कोल्हापूर ही सगळी स्थळांतरच आहेत

आणि लाल किल्ल्याचा उल्लेख ह्या धाग्याच्या मालकालाही आवडेलच

कारण 15 ऑगस्ट 1947 साली लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणारे शहानवाज खान हे शाहरुख खांनचे आजोबा होते.

Proud

https://www.ichowk.in/society/general-shahnawaz-khan-of-azad-hind-fauz-h...

शाहरुखच्या आजोबांचा इतिहास , खास धागा मालकासाठी

मानव धन्यवाद, सवडीने बघतो डॉक्युमेंटरी

BLACKCAT जमलं तर वरचा 19 September, 2019 - 12:59 चा प्रतिसाद उडवून टाकाल का? ऋ स्वतःचा धागाही भरकटवू शकतो. त्याचे सामर्थ्य अफाट आहे.

मेट्रो योजना म्हणजे पश्चिम उप नगर आणि सेंट्रल लाईन वरील उपनगरांना जोडण्याची योजना .
ह्याची गरज का पडली?
मुंबई मध्ये सर्वात जास्त रोजगार मुंबई मध्ये उपलब्ध आहेत आणि उपनगर फक्त लोक वस्तीनी व्यापली आहेत .
.
उपनगर म्हणजे कसलेच प्लॅन न करता असतव्यास्त पने झालेले शहरी करण.

पहिल्या पासून मुंबई आणि वाढणाऱ्या उप नगरांचे पद्धतशीर योजना आखून विकास केला असता तर आता जी मुंबई ची दुर्दशा झाली आहे ती झालीच नसती .
कोणी सरकारी जागा हडपली आहे तर काही लोकांनी खाड्या,फूट पथ,गटार ह्यांचा वर सुद्धा बांधकाम केले आहे .
हे सर्व बघून असे वाटत मुंबई मध्ये सरकारी यंत्रणा आहे का .
मी तर म्हणतो आता पर्यंतचे शासक,प्रशासकीय यंत्रणा,राजकीय पक्ष सर्व जबाबदार आहेत मुंबई ची वाट लावण्या मध्ये .
कोणाला अतिक्रमण करणाऱ्या परप्रांतीय लोकांनाच पुळका येतो तर काही लोकांना खाड्या बुजवणाऱ्या लोकांवर प्रेम येत.

प्रशासनाने भांडुप येथील खाजगी जागा मालकांना जो काही मोबदला द्यायचा असेल तो त्यांनी आर्थिक ,एफ एस आय किंवा टी डी आर च्या स्वरूपात द्यावा व तेथेच कारशेड बांधावी. आरे कॉलनी हा पर्याय होऊच शकत नाही. नसेल ऐपत तर कॅन्सल करा मेट्रो प्रोजेक्ट.
आरे कॉलनी काय आहे हे समजण्यासाठी एकदा तरी मुलुंड ते गोरेगाव ह्या परिसरातून बस प्रवास करून बघा. खरं वाटत नाही आपण मुंबई सारख्या शहरात आहोत. ह्या जंगलातील एक इंचही जागा आपल्या मालकीची नाही, मुंबईला शहराला निसर्गाने फुकट दिलेले अमृत आहे ते. त्यामुळे प्रगतीचा मार्ग आरेतून नक्कीच जाऊ शकत नाही.

मुंबई व आसपासविषयी माझे ज्ञान अत्यल्प आहे. कारण अगदी क्वचीतच प्रसंगानुरुप दिलेल्या भेटी. त्यामुळे आरे हे गोरेगाव जवळ आहे एवढेच माहीत. पण मला आता असा प्रश्न पडलाय की ही जंगलतोड झाल्यानंतर तिथे जे मूळ अधीवासी / रहीवासी आहेत, म्हणजे माणसे, जनावरे यांचे काय? ते बिबटोबा आणी त्यांचे इतर नातेवाईक मित्र मैत्रिणी आरेतच रहातात ना? मग तिथे उजाड झाल्यावर ते मुंबई व आसपासच्या परीसरात घुसले तर?

का मुंबईतच ओपन झू क्रिएट होणार आहे?

मानवी अतिक्रमणाने बिबळे ठाणे, भांडुप परिसरात फिरू लागले. आता कार शेड आली की अजून त्यांच्या अधिवासाचा संकोच होणार. ह्या जंगलात आदिवासी आहेत म्हणून जंगल टिकले आहे. ते गरजेपेक्षा जास्त निसर्गाकडून घेत नाहीत.

कोणीतरी मध्यंतरी मोकळ्या फिरणार्‍या सिंह व सिंहिणींचा व्हिडीओ ( जो गुजराथ मधील आहे ) घोडबंदर रोड ठाणे अशा नावाने वॉट्स अ‍ॅप वर टाकला होता. तो पाहुन मला चक्कर यायची बाकी होती. बिबटे ठीक आहेत, कारण ते जवळच आहेत. पण जंगलका राजा और उसका परीवार कही मुंबई घुमने तो नही आया ना? असे वाटुन घाम फुटला. मग लगेच दुसर्‍या आलेल्या पोस्टवरुन सर्व उलगडा झाला.

जंगलतोड झाली तर फिरतील पण बिबटोबा मोकाट.

सनवतै, काँग्रेसने जेव्हा पर्यावरणाची वाट लावली/ लवासा झालं तेव्हा तुम्ही स्वतः काय केलं हे पण सांगाल काय ?

काँग्रेसपेक्षा मी राष्ट्रवादी कॉ चे नाव घेणे पसंत करेन. कारण काँग्रेस सत्तेत असतांना श्री जयराम रमेश हे पर्यावरण मंत्री होते. एर्‍हवी भाजपाच्या बाजूने असणारे माझे वडील व इतर नातेवाईक जयराम रमेश यांचे कौतुक करतांना कधी थकले नाहीत. कारण जयराम रमेश यांनी कायम पर्यावरणाचे हित जोपासले. त्यांच्यावर काय प्रेशर आले नसेल का? पण ते त्यांच्या कामाशी कायम प्रामाणीक राहीले.

चिवट, लवासाला त्या काळात काँग्रेसने हात लावला नसेलही कारण प्रत्येकाचे हित संंबंध गुंतलेले असतात.( त्यात भाजप व शिवसेनेचे लोक पण असतीलच की ) पण काँग्रेस पेक्षा सगळ्यात जास्त नुकसान राष्ट्रवादीने केले आहे आणी अजूनही चाललेच आहे. काँग्रेस मध्ये निदान सुशिक्षीत लोक आहेत, पण राष्ट्रवादी म्हणजे.....

>>म्हणजे न्यायालयातील केस फक्त निवडणुक डोळ्यासमोर ठेवुन केली आहे असे? की आम्ही एकदा बहुमताने निवडुन आलो की आंदोलन चिरडुन काढु असे?<<
दॅट इज योर वे/लाइन ऑफ थिंकिंग. सेनेचा विरोध का आहे, हे शेंबडं पोर देखील सांगु शकेल. २-३००० हजार झाडांच्या तोडण्याने पर्यावरणाला धोका पोचतो असा कंठ्शोष करणार्‍यांनी, आणि सेनेने सुद्धा फिल्मसिटी, आरे कॉलनीतली हाटेलं का होउ दिली याचं आत्मपरिक्षण करावं. आरे कॉलनी ते संगांपार्क हा संपुर्ण पट्टाच ग्रीन झोन म्हणुन आरक्षित का केला नाहि? ते पाम हाटेल तर सेनेच्याच कारकिर्दित झालेलं आहे. आता बोला... Proud

ती honkong ची जनता केवढी सजक आहे स्वतःच्या अधिकार विषयी .
किती दिवस निदर्शनं करत होते .
अशी sajak जनता असेल तर सरकारची हिम्मत नाही होणार कोणता ही उलट सुलट निर्णय घेण्याची .
आपल्या कडे आता कुठे शहरात जनतेला स्वतःच्या अधिकार विषयी जाणीव होवू लागली आहे .

कार शेड कांजुरमार्गला घालवा, कचरा टाकायला मानखुर्द , कट्टलखान्याला गोवंडी, पाण्याच्या टाक्या भांडुपला बांधायच्या, हाय वे अन रस्ता चेंबूरवरून काढायचा.

आणि गुणगान गायचे , आमचे आरे हिरवेगार आहे आणि दादरला किती सुंदर बाग आहे.
गम्मतच करतात लोक.

जिथे आज हे सर्व बांधले , तिथेही जंगलेच होती ना ?

Pages