Submitted by हर्पेन on 10 September, 2019 - 03:23
हॅलो, कशी आहेस?
मी मजेत. तू सांग, अचानक कशी आठवण काढलीस? कसा आहेस?
मी पण मजेत.. म्हणजे ठीकच आहे. सॉरी मला जमलं नाही तुला भेटायला यायला. आजोबांबद्दल ऐकून वाईट वाटलं.
इट्स ओके, तसं वय झालंच होतं त्यांचे. काही आजार न होता गेले हे बरंच झालं म्हणायचं.
हम्म फार जवळ होतात ना तुम्ही, नक्की सावरल्येस ना आता?
हो. जवळपास महिना झाला आता.
नाही म्हणजे status वाचलं तुझं, "I hear dead people they’re still the best", कसले भासबीस होताहेत का तुला?
.…...
हॅलो सांग ना ?
........
अगं उत्तर का देईनास?
म्हटलं तुलाही ऐकवावा ‘स्वर्गीय’ आवाज.... 'ओहोहोहो खोया खोया चांद खुला आसमान'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त जमलीये
मस्त जमलीये
अगावपणा!
अगावपणा!
अगावपणा! >>> नाही भोचकपणा
अगावपणा! >>> नाही भोचकपणा
मस्त...
मस्त...
मस्त.
मस्त.
ओहो हर्पेनजी भारीच की !
ओहो हर्पेनजी
भारीच की !
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=E0JzJbXd7xY
"I hear dead people they’re still the best"
खोया खोया चान्द स्वर्गिय आवाज
निलुदा, तो 'सैतान' चा आवाज
निलुदा, तो 'सैतान' चा आवाज आहे
नाही कळली. नक्की कोणाचे भूत
नाही कळली. नक्की कोणाचे भूत आहे.
साधी आहे का काही अर्थ
साधी आहे का काही अर्थ काढायचाय?
कारण मला तर कळलीच नाही नेहमीसारखी.
अरे काय हे
अरे काय हे चंपा आणि सस्मित,
अजून कोण्या एकानेही नाही कळली म्हटले तर फारच निराश व्ह्यायला होईल त्यामुळे सांगतो झालं.
"I hear dead people they’re still the best" आणि खोया खोया चांद खुला आसमान हे मूळ गाणे स्व. मो. रफीच्या आवाजात आहे. ह्याचा संबंध जोडावा.
त्यांचा आवाज स्वर्गीय आहे.
निलुदा यांनी दिलेली लिन्क बघीतली तर कळेल की हे गाणे शैतान चित्रपटाकरता रिमिक्स केले गेले होते म्हणून मी त्याला 'सैतान' चा आवाज
असे म्हटले.
आता हे सांगीतल्यावर 'हात्तीच्या' होणार बहुतेक
हात्तीच्या!!! आवडली.
हात्तीच्या!!!
आवडली.
कारण मला तर कळलीच नाही
कारण मला तर कळलीच नाही नेहमीसारखी>>सस्मित तुमची प्रतिक्रिया वाचून खूप बरं वाटलं हो,मला तर वाटायला लागलं होतं की बहुतेक मलाच एकपण कथा नीट कळेना झालीये,
आदू
आदू
पण काही म्हणा ह्या
पण काही म्हणा ह्या स्पर्धेमुळे फार भारी शशक वाचायला मिळाल्या.
माबोच्या चांगल्या लेखकांनी भरपुर लिहिलं.
छान आहे. आवडली. या शशक
छान आहे. आवडली. या शशक स्पर्धेच्या निमित्ताने माबोकर - लेखक, वाचक आणि प्रेक्षक म्हणून किती बहुश्रुत आहेत हे कळलं. मला बराच पल्ला गाठायचाय अजून!
हीच तर खासियत आहे मायबोलीची
हीच तर खासियत आहे मायबोलीची
इथे वेगवेगळ्या विषयात तरबेज असणारी इतकी मंडळी आहेत की आपल्यालाही काहीतरी करायचा हुरुप येतो.
प्रतिसाद देणार्या समस्त मायबोलीकरांनो, धन्यवाद
मला पण नाही कळली अजिबातच !
मला पण नाही कळली अजिबातच !
सस्मित, आपण एकाच बोटीत आहोत!
मला कळली होती पण बरोबर कळली
मला कळली होती पण बरोबर कळली की नाही ते कळलं नव्हतं
मस्तच. रफीच्या आवाजाला स्वर्गीय, दैवी अशी विशेषणं शोभून दिसतात.
मला वाटले होते कि त्यालाच भास
मला वाटले होते कि त्यालाच भास होतोय... आणि ती(भूत) त्याला शेवटी ‘स्वर्गीय’ आवाज ऐकवते. मग प्रतिसाद वाचून उमगले. चांगली कथा.
मला वाटले की तीपण स्वर्गात
मला वाटले की तीपण स्वर्गात गेलीये
हर्पेन यांचा प्रतिसाद वाचून कळाल कि साधी सोपी सरळ कथा आहे.
मला वाटले की तीपण स्वर्गात
मला वाटले की तीपण स्वर्गात गेलीये Lol
हर्पेन यांचा प्रतिसाद वाचून कळाल कि साधी सोपी सरळ कथा आहे. Wink
Submitted by आसा. on 10 September, 2019 - 10:28 >>>>> हो नं!! इतकं काय काय वाचलंय… की हे देखिल काही साधं सरळ नाही असच वाटत राहीलं आणि मग सस्मितसारखं नेमका काय अर्थ काढायचा ह्या गोंधळात होते.
रफीच्या आवाजाला स्वर्गीय,
रफीच्या आवाजाला स्वर्गीय, दैवी अशी विशेषणं शोभून दिसतात. >> सत्यवचन १००१%
सर्व प्रतिसादकांचे आभार
सर्व प्रतिसादकांचे आभार
मला अगदी एमान्युएला असल्या सारखं वाटतंय https://youtu.be/tHE99nOYh70
आवडली. माबोवर शशकांमध्ये
आवडली. माबोवर शशकांमध्ये भयकथा जास्त असल्याने आधी ही पण हॉररच वाटली, पण नंतर हात्तिच्या झाले.
मला अगदी एमान्युएला असल्या
मला अगदी एमान्युएला असल्या सारखं वाटतंय Wink >>>
म्हटलं तुलाही ऐकवावा
म्हटलं तुलाही ऐकवावा ‘स्वर्गीय’ आवाज.... 'ओहोहोहो खोया खोया चांद खुला आसमान'
>> ती - रफिसाहब ?
तो - ह्या ह्या - मोहम्मद अजीज .
भारी
भारी
थोडी थोडी कळल्यासारखी वाटतेय.
थोडी थोडी कळल्यासारखी वाटतेय.
भारी गोष्ट आहे. So many of
भारी गोष्ट आहे. So many of us so eagerly jump to conclusions. मजाच असते.
Pages