सोळा आण्याच्या गोष्टी - स्वर्गीय आवाज - हर्पेन

Submitted by हर्पेन on 10 September, 2019 - 03:23

हॅलो, कशी आहेस?

मी मजेत. तू सांग, अचानक कशी आठवण काढलीस? कसा आहेस?

मी पण मजेत.. म्हणजे ठीकच आहे. सॉरी मला जमलं नाही तुला भेटायला यायला. आजोबांबद्दल ऐकून वाईट वाटलं.

इट्स ओके, तसं वय झालंच होतं त्यांचे. काही आजार न होता गेले हे बरंच झालं म्हणायचं.

हम्म फार जवळ होतात ना तुम्ही, नक्की सावरल्येस ना आता?

हो. जवळपास महिना झाला आता.

नाही म्हणजे status वाचलं तुझं, "I hear dead people they’re still the best", कसले भासबीस होताहेत का तुला?

.…...

हॅलो सांग ना ?

........

अगं उत्तर का देईनास?

म्हटलं तुलाही ऐकवावा ‘स्वर्गीय’ आवाज.... 'ओहोहोहो खोया खोया चांद खुला आसमान'

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे काय हे चंपा आणि सस्मित,
अजून कोण्या एकानेही नाही कळली म्हटले तर फारच निराश व्ह्यायला होईल त्यामुळे सांगतो झालं.

"I hear dead people they’re still the best" आणि खोया खोया चांद खुला आसमान हे मूळ गाणे स्व. मो. रफीच्या आवाजात आहे. ह्याचा संबंध जोडावा.

त्यांचा आवाज स्वर्गीय आहे.

निलुदा यांनी दिलेली लिन्क बघीतली तर कळेल की हे गाणे शैतान चित्रपटाकरता रिमिक्स केले गेले होते म्हणून मी त्याला 'सैतान' चा आवाज
असे म्हटले.

आता हे सांगीतल्यावर 'हात्तीच्या' होणार बहुतेक Wink

कारण मला तर कळलीच नाही नेहमीसारखी>>सस्मित तुमची प्रतिक्रिया वाचून खूप बरं वाटलं हो,मला तर वाटायला लागलं होतं की बहुतेक मलाच एकपण कथा नीट कळेना झालीये, Rofl

आदू Lol

पण काही म्हणा ह्या स्पर्धेमुळे फार भारी शशक वाचायला मिळाल्या.
माबोच्या चांगल्या लेखकांनी भरपुर लिहिलं.

छान आहे. आवडली. या शशक स्पर्धेच्या निमित्ताने माबोकर - लेखक, वाचक आणि प्रेक्षक म्हणून किती बहुश्रुत आहेत हे कळलं. मला बराच पल्ला गाठायचाय अजून!

हीच तर खासियत आहे मायबोलीची
इथे वेगवेगळ्या विषयात तरबेज असणारी इतकी मंडळी आहेत की आपल्यालाही काहीतरी करायचा हुरुप येतो.

प्रतिसाद देणार्‍या समस्त मायबोलीकरांनो, धन्यवाद

मला कळली होती पण बरोबर कळली की नाही ते कळलं नव्हतं Wink
मस्तच. रफीच्या आवाजाला स्वर्गीय, दैवी अशी विशेषणं शोभून दिसतात.

मला वाटले होते कि त्यालाच भास होतोय... आणि ती(भूत) त्याला शेवटी ‘स्वर्गीय’ आवाज ऐकवते. मग प्रतिसाद वाचून उमगले. चांगली कथा.

मला वाटले की तीपण स्वर्गात गेलीये Lol
हर्पेन यांचा प्रतिसाद वाचून कळाल कि साधी सोपी सरळ कथा आहे. Wink
Submitted by आसा. on 10 September, 2019 - 10:28 >>>>> हो नं!! इतकं काय काय वाचलंय… की हे देखिल काही साधं सरळ नाही असच वाटत राहीलं आणि मग सस्मितसारखं नेमका काय अर्थ काढायचा ह्या गोंधळात होते.

आवडली. माबोवर शशकांमध्ये भयकथा जास्त असल्याने आधी ही पण हॉररच वाटली, पण नंतर हात्तिच्या झाले. Proud

म्हटलं तुलाही ऐकवावा ‘स्वर्गीय’ आवाज.... 'ओहोहोहो खोया खोया चांद खुला आसमान'

>> ती - रफिसाहब ?
तो - ह्या ह्या - मोहम्मद अजीज .

Pages