सोळा आण्याच्या गोष्टी - स्वर्गीय आवाज - हर्पेन

Submitted by हर्पेन on 10 September, 2019 - 03:23

हॅलो, कशी आहेस?

मी मजेत. तू सांग, अचानक कशी आठवण काढलीस? कसा आहेस?

मी पण मजेत.. म्हणजे ठीकच आहे. सॉरी मला जमलं नाही तुला भेटायला यायला. आजोबांबद्दल ऐकून वाईट वाटलं.

इट्स ओके, तसं वय झालंच होतं त्यांचे. काही आजार न होता गेले हे बरंच झालं म्हणायचं.

हम्म फार जवळ होतात ना तुम्ही, नक्की सावरल्येस ना आता?

हो. जवळपास महिना झाला आता.

नाही म्हणजे status वाचलं तुझं, "I hear dead people they’re still the best", कसले भासबीस होताहेत का तुला?

.…...

हॅलो सांग ना ?

........

अगं उत्तर का देईनास?

म्हटलं तुलाही ऐकवावा ‘स्वर्गीय’ आवाज.... 'ओहोहोहो खोया खोया चांद खुला आसमान'

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages