सोळा आण्याच्या गोष्टी - डोह - महाश्वेता

Submitted by महाश्वेता on 8 September, 2019 - 14:51

हणमंत्या डोहात उतरला.
"नीट रं." पाटील आरडला.
"दहा वर्षापासून हेच काम करतुय. काय नाही होणार."
पाटील वर सिगारेट फुकत होता.
"फौजदार, वढणार का?"
फौजदाराने हातानेच नाही असा इशारा केला.
"सापडलं..."
पाटील सरसावला, त्याने सिगारेट फेकली.
हणमंत्याने जोर लावून प्रेत वर काढलं.
फौजदाराने गाडी आणली. टम्म फुगलेलं प्रेत टाकलं. पंचनामा सुरू झाला.
फौजदाराने दहा रुपये बक्षिस दिलं. हणमंत्याने कपाळाला लावलं.
फौजदार निघाला. शिपाईही निघाले. फौज पार लांब गेली.
खाड!!!!!
हणमंत्याचा गाल काळानिळा झाला.
"पुढल्या येळला जरा इकडतिकडं शोध, येळ लाव, मग प्रेत सापडव. नाहीतर फौजदार दोघांनाबी शक घेऊन आत टाकल."
रागाने लाला झालेल्या पाटलाने राजदूतला किक मारली, आणि तो सुसाट निघाला!!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

गेली दहा वर्ष पाटील कुणाला ना कुणाला मारतोय अन् डोहात हनम्याच्या मदतीनं प्रेताची विल्हेवाट लावतोय??
पण एवढे खुन पाडायला कारण काय?ते कळालं नाही..

कथेची मांडणी आवडली .
पण पाटील सारखे खून का पाडतो ? ते स्पष्ट होत नाहीये .