Submitted by महाश्वेता on 8 September, 2019 - 14:51
हणमंत्या डोहात उतरला.
"नीट रं." पाटील आरडला.
"दहा वर्षापासून हेच काम करतुय. काय नाही होणार."
पाटील वर सिगारेट फुकत होता.
"फौजदार, वढणार का?"
फौजदाराने हातानेच नाही असा इशारा केला.
"सापडलं..."
पाटील सरसावला, त्याने सिगारेट फेकली.
हणमंत्याने जोर लावून प्रेत वर काढलं.
फौजदाराने गाडी आणली. टम्म फुगलेलं प्रेत टाकलं. पंचनामा सुरू झाला.
फौजदाराने दहा रुपये बक्षिस दिलं. हणमंत्याने कपाळाला लावलं.
फौजदार निघाला. शिपाईही निघाले. फौज पार लांब गेली.
खाड!!!!!
हणमंत्याचा गाल काळानिळा झाला.
"पुढल्या येळला जरा इकडतिकडं शोध, येळ लाव, मग प्रेत सापडव. नाहीतर फौजदार दोघांनाबी शक घेऊन आत टाकल."
रागाने लाला झालेल्या पाटलाने राजदूतला किक मारली, आणि तो सुसाट निघाला!!!!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाटील वर सिगारेट फुकट होता. >
पाटील वर सिगारेट फुकट होता. > पाटिल विकत घेतला तर सिगारेट फ्री मिळणार? आहे काय हे पाटील? लायटर?
गाळ >> गळा का?
गाळ >> गळा का?
ठिकठिक आहे
ठिकठिक आहे
कोणी कोणाला का मारलं. पाटलाने
कोणी कोणाला का मारलं. पाटलाने मारलं पण कोणाला आणि का.
टायपो संपादित केले आहेत!
टायपो संपादित केले आहेत!
छान
छान
कोणाला आणि का मारले कळत नसले
कोणाला आणि का मारले कळत नसले तरी छान.
गेली दहा वर्ष पाटील कुणाला ना
गेली दहा वर्ष पाटील कुणाला ना कुणाला मारतोय अन् डोहात हनम्याच्या मदतीनं प्रेताची विल्हेवाट लावतोय??
पण एवढे खुन पाडायला कारण काय?ते कळालं नाही..
छान.
छान.
छान!
छान!
मस्त आहे गोष्ट. आवडली.
मस्त आहे गोष्ट. आवडली.
जमलीये.
जमलीये.
आवडली
आवडली
पण एवढे खुन पाडायला कारण काय
पण एवढे खुन पाडायला कारण काय?ते कळालं नाही..
>>> 10 rupaye
कथेची मांडणी आवडली .
कथेची मांडणी आवडली .
पण पाटील सारखे खून का पाडतो ? ते स्पष्ट होत नाहीये .
भाषाशैली जबरदस्त! आवडली.
भाषाशैली जबरदस्त! आवडली.
इथेही साधनावर जास्त फोकस आहे, साध्यावर नाही...
आवडली
आवडली
ही सुद्धा आवडली.
ही सुद्धा आवडली.