Submitted by मॅगी on 6 September, 2019 - 11:29
"आत्ता तुला जगातली कुठलीही गोष्ट मिळणार असेल तर काय मागशील?" खट्याळ हसत तिने विचारलं.
टेरेसवर आडवं होऊन वरचं टिपूर चांदणं न्याहाळतानाच मी उत्तर दिलं, "तू!"
"प्चss काय हे? दुसरं काहीतरी सांग"
"मग जास्तच तू!"
"कसला बोअर आहेस! मी आहेच तुझी.."
"मला अख्ख्या जगात फक्त तू हवी आहेस."
"मॅड!! आय लव्ह यू..."
"आय लव्ह यू टू!"
ती किंचाळून उठायला लागली, पण मी चपळ आहे. पुढच्या मिनिटात ती बिल्डिंगखाली रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
ती झोपलेल्या ऊबदार फरशीवर आता फक्त तिचा मोबाईल होता. मी तो उचलून कानाला लावला.
"अदिती? अदितीsss काय झालं? काय झालं??
मी गालावरचा ओघळ पुसून स्क्रीनवर बोट ठेवलं.
कॉल एंडेड.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाऊन्सर गेली
बाऊन्सर गेली
समजली
समजली
बापरे...
बापरे...
का कोण जाणे, सुरवात वाचून एकदम शाहरुख- शिल्पा शेट्टी व गच्ची आठवली. दुर्दैवाने शेवट तोच झाला.
आधी दोघे फोनवर आहेत की काय
आधी दोघे फोनवर आहेत की काय असं क्षणभर वाटलं. पण..
ट्राईंग टू रिलेट "मी चपळ आहे" .... चपळतेने त्याने तिला ढकललं. आणि तो वरती टेरेसवरच आहे. असा अर्थ लागला. मग फरशीवर म्हणजे टेरेसच्या फरशीवर. तिचा फोन कानाला लावुन अदिती काय झालं विचारतोय... आणि कॉल एंडेड आलं म्हणजे कॉल चालू होता.
म्हणजे अदिती फोन वर बोलत होती.... पण कोणाशी बोलत होती? जर दोघे एकाचवेळी एकाच गच्चीवर असतील तर फोन चालू असणार नाही.
सो दोघे एकाच वेळी एकाच गच्चीवर न्हवते ???
अगेन कनफ्यूज्ड!
'अदिती काय झालं?' हे फोनवर
'अदिती काय झालं?' हे फोनवर दुसऱ्या बाजूला असणारी व्यक्ती विचारतेय. अदिती सुरुवातिपासून फोनवर पल्याड असणाऱ्या व्यक्तीशी (तिचा बॉफ्रे?) बोलतेय. ढकलणारा त्याचवेळी होता गच्चीवर आणि तो ढकलायला आला (आय लव्ह यू टू त्याने म्हटलंय!) तेव्हा तिला जाणवलं आणि ती किंचाळली.
भारी कथा मॅगी.
फोनवर प्रियकर आहे. अदितीचा
फोनवर प्रियकर आहे. अदितीचा टेरेसवर येऊन प्रियकराशी बोलण्याची सवय्/शेड्यूल असावे.
टेरेसवर एक स्टॉकरही आहे जो अदितीला फॉलो करतोय आणि अदितीने प्रियकराला 'आय लव यू' म्हंटल्यावर त्याने 'आय लव यू टू' म्हणत अॅक्शन घेतली.
असे वाटले.. पण अजून विचार चालू आहे.
ऑन अ सेकंड थॉट... स्टॉकर ईज अदिती'ज रिअल हजबंड.
नाही समजली
नाही समजली
पण ती फोनवर बोलत असतानाच तिला
पण ती फोनवर बोलत असतानाच तिला ढकललं असेल तर फोन तिच्याबरोबर खाली जाईल ना? आणि जरी गच्चीवरच पडला तरी कॉल चालू राहील का?
किंवा तीही आडवी होऊन फोनवर
किंवा तीही आडवी होऊन फोनवर बोलत असेल.
बेस्ट!!!! जाम आवडली!
बेस्ट!!!! जाम आवडली!
श्रद्धा धन्यवाद एक्सप्लनेशनला. दोनपेक्षा जास्त लोक असू शकतात आणि ते 'मी' म्हणू शकतात हे का डोस्क्यात आलं नाही????
आवडलीच!
श्रद्धा आणि हाब, परफेक्ट!
श्रद्धा आणि हाब, परफेक्ट!
अदिती टेरेसवर झोपून फोनवर तिच्या बॉफ्रेशी बोलत होती, त्याचवेळी स्टॉकर तिच्यापासून लांब आडवा होऊन तिच्या प्रश्नांना मनात उत्तरं देत होता. ती आय लव्ह यू म्हणते तेव्हा तो उठून तिच्याजवळ जाऊन मोठ्याने 'आय लव्ह यू टू' म्हणतो. ती किंचाळते, फोन हातातून खाली पडतो. स्टॉकर तिला उचलून खाली फेकतो. कॉल सुरूच असतो. स्टॉकर फोन फक्त कानाला लावतो, बॉफ्रेचं ओरडणं ऐकून कॉल कट करतो.
तो स्टॉकर जर अदितीचा खरा नवरा
तो स्टॉकर जर अदितीचा खरा नवरा असेल तर त्याची रेज नक्कीच समजण्यासारखी आहे आणि त्याचे मनात ऊत्तरं देणे, 'आय लव यू टू' म्हणणे जास्त रिअल आणि विथ ईंटेंसिटी वाटते.
अरे मस्त आहे ही कथा!
अरे मस्त आहे ही कथा!
असंय का??
असंय का??
हो हाब, स्टॉकर तिचा नवरा
हो हाब, स्टॉकर तिचा नवरा किंवा ex असू शकतो. मुद्दाम थोडी संदिग्धता ठेवली आहे.
मॅगीची गोष्ट म्हणजे
मॅगीची गोष्ट म्हणजे धक्कातंत्र होनाइच मंगता.
लोकांनी सांगितल्यावर मला पण समजली कथा!
लोकांनी सांगितल्यावर मला पण
लोकांनी सांगितल्यावर मला पण समजली कथा!>>+१
कसली जबरदस्त कथा आहे. सॉल्लिड
कसली जबरदस्त कथा आहे. सॉल्लिड ट्विस्ट.
मॅगी,भारी जमलीय! ट्विस्ट जबरी
मॅगी,भारी जमलीय! ट्विस्ट जबरी आहे
वा मस्त आहे!
वा मस्त आहे!
झकास!!
झकास!!
झकास!!+११
झकास!!+११
झकास! जमलीय.
झकास! जमलीय.
मारणारा नवरा असावा असं वाटलं.
जबरदस्त मांडणी
जबरदस्त मांडणी
भारीच गं!!
भारीच गं!!
पण लोकांनी सांगितल्यावर मला पण समजली कथा!>>+१
"आत्ता तुला जगातली कुठलीही
"आत्ता तुला जगातली कुठलीही गोष्ट मिळणार असेल तर काय मागशील?" खट्याळ हसत तिने विचारलं.
टेरेसवर आडवं होऊन वरचं टिपूर चांदणं न्याहाळतानाच मी उत्तर दिलं, "तू!" >>>>> दोघे आपापल्या टेरेसवर आहेत काय ?
मस्त !!
मस्त !!
मस्त कथा. सगळे धागे जुळवून
मस्त कथा. सगळे धागे जुळवून आणण्यासाठी काही क्षण डोके वापरावे लागले. डोक्याचा गंज किंचित हटल्यामुळे अधिक आवडली.
हे असं होत तर.
हे असं होत तर.
मस्त जमली आहे मॅगी.
मस्त जमली आहे मॅगी.
Pages