Submitted by सिद्धेश्वर विला... on 27 August, 2019 - 02:47
कशी वाटली आमची दहा बाय दहा ?
आनंद ओसंडून चाललाय पहा
शेजारी शेजारी मांडलीय चूल छोटी
सासू लाटतेय चपाती
अन भाजतेय सून मोठी
धाकटीने घातलाय कपड्याना पीळ
मधलीने बसवलीय द्वाड पोरांना खीळ
छोटंसं घर त्याचं इनमीन चार वासं
इवल्याश्या घरात राहतात बाराजण कसं ?
महालाला लाजवेल अशी घराची शोभा
महादेव प्रसन्न हस्ते जागोजागी उभा
घराला घरपण माणसांनीच येते
भुई चालेल कमी , पण लागते घट्ट नाते
{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान..!
छान..!
अप्रंतीम
अप्रंतीम
छान
छान
कैच्या काय. शंभर स्क्वेअर
कैच्या काय. शंभर स्क्वेअर फूटात बारा माणसं? खुराड्यात कोंबड्या डालल्यावानी वाटलं.
पोएटिक लिबर्टी घेतलीये
पोएटिक लिबर्टी घेतलीये त्यांनी
मग बारा च्या जागी शंभर चाल्लं
मग बारा च्या जागी शंभर चाल्लं आस्तं.
==)) अहो तो तो काय कुठंनखाना
==)) अहो तो तो काय कुठंनखाना आहे का ? घर आहे हो , घर जिथे फक्त प्रेम नांदते आहे , कुठलेही राजकारण किंवा द्वेष नाही .. या द्वेषापायीच आणि खासकरून पुरुषांच्या किंवा स्त्रियांच्या एकलकोंडेपणानेच तर घात झालाय .. नाहीतर किती छान व्यवस्था होती आपल्या देशात .. असो आता तो इतिहासच म्हणायला हवा ..
सर्वेषां धन्यवादम,, असेच राहू
सर्वेषां धन्यवादम,, असेच राहू देत आपले प्रेम लाभम
छान!
छान!
छान आहे !!! तुमच्या कविता जरा
छान आहे !!! तुमच्या कविता जरा घाबरत घाबरतच वाचतो. दहा बाय दहा ही अतिशयोक्ती झाली पण अजूनही बैठ्या चाळींमध्ये इतके लोक राहताना बघितले आहेत. पण त्यांच्यातील घट्ट नात्याच्या जागी आता द्वेष आणि अनकंफर्टमुळे झालेली चिडचिड दिसून येते.
ह्ही ह्ही ह्ही .. घाबरत घाबरत
ह्ही ह्ही ह्ही .. घाबरत घाबरत का होईना , पण वाचता हे महत्वाचे .. धन्यवाद तुम्हालाही आणि मानव साहेबानाही