लाल करा ओ माझी लाल करा

Submitted by सिद्धेश्वर विला... on 23 August, 2019 - 08:53

लाल करा ओ , माझी लाल करा

येता जाता लाल करा

पुसा मला तुम्ही येता जाता

पुसूनि पुरते हाल करा ,

लाल करा ओ लाल करा

येता जाता लाल करा

भजा मज तुम्ही भाई दादा

तुमचाच राहीन , पक्का वादा

गॉड बोलुनी बेहाल करा

लाल करा ओ माझी लाल करा

येता जाता लाल करा

समजू नका मज ऐरागैरा

नीट बघून घ्या माझा चेहरा

या गोंडस, लोभस मित्रासाठी

प्रेमाची पखाल करा

लाल करा ओ माझी लाल करा

येता जाता लाल करा

नका कटू कधी बोलत जाऊ

बनेन मग मी शंभू न शाहू

च्छाताड पुढे , फुगतील बाहू

कशाला स्वतःला हलाल करा

लाल करा थोडी लाल करा ओ

येता जाता लाल करा

क्रोध द्वेष जरा लांब राहू दे

प्रतिसादाने न्हाऊन जाऊ दे

पाठीवरती कशाला उगाचच

या छातीवरती वार करा

लाल करा ओ माझी लाल करा

येता जाता लाल करा

कल्पनेत मी रमतो गातो

एकलाच मी प्रेम वाटतो

बिनडोक्याच्या या वाघासाठी

मायेची तुम्ही शाल धरा

चुटकीसरशी काम करा

लाल करा माझी लाल करा

येता जाता लाल करा

{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ओके
परस्परांची लाल करु अवघे उधळु गुलाल Lol

@ अमर ९९ अहो मी करतो साहेब कधी कधी नक्कीच करतो लाल .. असे नाही कि मी बिलकुल करत नाही .. मागे केलेली पण आहे बर्याचदा ...

@ सर्वेषां धन्यवादम पुन्हा एकदा ...