युगांतर- आरंभ अंताचा! भाग ३४

Submitted by मी मधुरा on 19 August, 2019 - 09:22

"प्रणाम द्रोणाचार्य."
"प्रणाम. काय झाले कृपाचार्य? तुम्ही अस्वस्थ का दिसत आहात अजूनही?"
"तुम्ही पाहिलेत ना काय झाले ते."
"हो. पण तुम्ही का चिंतेत आहात?"
"का नसेन, द्रोणाचार्य?"
"कारण तुम्हाला वाटलेली भिती सत्यात उतरली नाही."
"म्हणजे?"
"दुर्योधन स्पर्धेत विजयी झाला नाही, कुलगुरु. तुम्ही तर आनंदी असायला हवे. चिंतीत नाही." द्रोणाचार्य हसत म्हणाले.
"तुम्ही मला चुकीचे समजत आहात द्रोणाचार्य. दुर्योधनाचा पराजय हस्तिनापुरचा एक आधारस्तंभ इतर आधारस्तंभांपेक्षा कमकुवत असल्याचे द्योतक आहे..... आणि मी कुठे हस्तिनापुरापेक्षा वेगळा आहे, गुरुवर? मी कसा आनंदी होईन दुर्योधनाच्या पराजयाने?"
"म्हणजे ?" द्रोणाचार्य आश्चर्याने म्हणाले, "मला तर वाटलं तुम्ही निश्चित व्हालं, दुर्योधन भीमकडून हरला म्हणल्यावर."
"मी दुर्योधनाविरूध्द नाही, गुरुवर."
"काय? कृपाचार्य? हे तुम्ही बोलता आहात?"
"हो, द्रोणाचार्य. मी हस्तिनापुरचे कुलगुरु पद भूषवतो आणि तुमच्याआधी राजपुत्रांना विद्या देण्याची जवाबदारीही माझ्यावरच होती. अगदी तेव्हा पासून ओळखतो मी या राजपरिवाराला..... अगदी जवळून! इथे सर्व कोणाचे ना कोणाचे पक्षधरं आहेत. मी ही याला अपवाद नाही."
"कोणाच्या पक्षात आहात मग तुम्ही?
"हस्तिनापुराच्या पक्षात आहे मी, द्रोणाचार्य. म्हणून केवळ हस्तिनापुरच्या भविष्याचा विचार करतो. कोण्या एका राजकुमाराच्या जय-पराजयाचा नाही."
"मग दुर्योधन विजयी होऊ नये असे का वाटते तुम्हाला?"
"कारण दुर्योधनाची मुळ शक्ती दैत्य प्रवृत्तीची आहे, गुरुवर."
"म्हणजे?"
"दैत्य प्रवृत्तीकडे ताकद असते, शक्ती असते. परंतु विवेकबुद्धी? ती मात्र नसते. प्रचंड हलक्या कानाचे असतात दैत्य प्रवृत्तीचे. ते अनुसरण करतात केवळ स्वतःच्या स्वार्थी विचारांचे. त्यांना असत्य, अयोग्य मार्गांची मोहिनी पडते, गुरुवर! मग सत्य आणि धर्म जाणून सुद्धा तो आचरत नाहीत ते. त्यात एखाद्या चुकीच्या व्यक्तीची संगत झाली, की मग त्यांच्या सुधारण्याची शक्यता म्हणजे भर अमावास्येला चंद्र दर्शन! शक्तीवर योग्य विचारांचा अंकुश नसेल ना, तर ती शक्ती विनाश करते, गुरुवर.... केवळ विनाश!"
"असे का वाटते तुम्हाला कुलगुरु? आज पाहिलेत ना तुम्ही! एका अनोळखी व्यक्तीचाही अपमान सहन होऊ नये इतका हळवा आहे दुर्योधन. क्षणात अंग प्रदेशाचे अधिपत्य एका अनोळखी व्यक्तीला देण्या इतका इतका उदारही आहे. परक्या व्यक्तीच्या अपमानाच्या जखमेवर मलमपट्टी करू पाहिली त्याने. हे त्याने स्वतः केले. कुणा दुसऱ्याच्या सांगण्याचे अनुसरण नव्हते ते."
"कारण कर्णाने द्वंद्वासाठी आवाहन त्याला केले जो राजगादीचा दावेदार आहे. ती च राजगादी, द्रोणाचार्य, जिच्यावर दुर्योधन स्वतःचा अधिकार समजतो. कर्ण जिंकू शकेल असं समजून त्याने अंग देशाचा राजा बनवून कर्णाला उपकारांच्या ओझ्याखाली दाबलं. अर्थात जर कर्ण जिंकला असता, तर तो त्याच्या विजयाचे फळ सरळ सरळ आणून दुर्योधनाच्या पायी ठेवेल, असा बंदोबस्त केला त्याने."
"कृपाचार्य, मित्र बनवण्यात आणि मैत्री निभावण्यात दुर्योधन कधीच कपट येऊ देत नाही. मी पाहिली आहे अश्वत्थामा आणि दुर्योधनची मैत्री. तो बंधुत्व आणि मैत्री उत्तम निभावतो."
"पांडवां बद्दलचा द्वेष पाहूनही तुम्ही असं म्हणता आहात?"
"दुर्योधनाला नवव्यान्नव अनुज आहेत. ते त्याच्यावर किती प्रेम करतात, त्याचा किती आदर करतात, तेपाहिले आहेत ना तुम्ही? कौशल्य दाखवायलाही त्याच्या पुढे शस्त्र उचलत नाहीत त्याचे अनुज. विचार करा, कृपाचार्य! हे बंधुत्व तर पांडवांमध्येही नाही. पांडवांशी असलेले वैरही एका लहान-सहान कारणामुळे आहे. ते म्हणजे, दुर्योधनाला जेष्ठत्व गाजवलेले चालत नाही, इतकेच."
"इतकेच नाही, द्रोणाचार्य. त्याला हस्तिनापुरवरही कोणी हक्क दाखवलेला चालत नाही. त्याचे अनुज राजगादीचे स्वप्नच पाहत नाहीत, म्हणून हे टिकून आहे हे बंधुत्व. तो राजगादीसाठी कपट, छळ, अधर्म..... काहीही करू शकतो."
"असं तुम्हाला वाटतं असेल तर, दुर्योधनाला तुम्ही नीट ओळखलेलेच नाही."
"दुर्योधनाला स्वतःची ओळख आहेच कुठे, द्रोणाचार्य? गांधार नरेशने त्याला त्याची ओळख मिळवू कुठे दिली आहे? त्याचे निर्णय हे स्वतःचे कधी नसतातच. तो केवळ एक बोलका बाहुला आहे, द्रोणाचार्य. शकुनीला हवे तसा चालणारा, वागणारा आणि जगणारा एक बोलका बाहुला! ज्याचे स्वतःचे काही मत नसते, काही विचार नसतात आणि ज्याच्या दोऱ्या केवळ गांधारनरेशच्या हातात असतात."
"कृपाचार्य, तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे." भीष्माचार्य कक्षातच आलेत हे लक्षात आल्यावर दोघांनी त्यांना हात जोडून नमस्कार केला.
"तुम्हालाही असेच वाटते भीष्माचार्य?"
"हो, द्रोणाचार्य! दुर्दैवाने गांधारनरेशच्या हातातले प्यादे बनला आहे दुर्योधन."
"तेच सांगत होतो मी, महामहीम."
"पण आज कर्णाच्या बाबतीत दुर्योधन जे वागला ते मात्र तो स्वतःच्या मनापासून वागला, कृपाचार्य."
"भीष्माचार्य?" कृपाचार्यांनी आश्चर्याने बघितले.
"दुर्योधन कधी गांधारनरेश सोडून दुसऱ्या कोणाचे ऐकत नाही. पण यावेळी मी त्याला स्वतःच्या मनानुसार वागताना पाहिले. आणि कोणाच्या आदेशाचे अनुसरण अजिबात नव्हते ते!"
"कश्यावरून भीष्माचार्य?"
"आज्ञा पालन करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर कधी ते स्मित नसते कृपाचार्य, जे आज दुर्योधनाच्या मुखावर पसरले होते. दुर्योधनाने आज जे केले ते त्याच्या स्वतःच्या मनाने केले. मग त्याचे कारण कर्णाचे अर्जुनाला ललकारण्याचे धाडसही असू शकेल अथवा कर्णाचे असामान्य तेजही."
"हो.... त्याच्या त्या सुवर्ण वस्त्रामुळे तर सर्वच प्रभावित झाले होते. मला हाच प्रश्न पडला होता की एका सूत पुत्राकडे इतके सुंदर वस्त्र आले कुठून?"
"ते वस्त्र नाही, कवच आहे, कृपाचार्य. जन्मापासूनच आहे त्याच्याकडे. ते कवच त्वचेप्रमाणे त्याच्या शरीरानुसार आकारमान बदलते. ते दिव्य आहे. पण कोणालाच माहितं नाही ते त्याच्याकडे आले कसे! "
"द्रोणाचार्य? काय म्हणता आहात? खरचं? आणि तुम्हाला कसे माहित हे?" कृपाचार्यांनी प्रश्न केला.
द्रोणाचार्य भूतकाळात हरवत म्हणाले, "शब्द दिला नसता तर मला दोन असामान्य विद्यार्थी गमवावे लागले नसते, कृपाचार्य.... ज्यांना मी शिष्यत्व नाकारले त्यांच्यापैकीच एक होता तो..... कर्ण." त्यांच्या चेहऱ्यावर दु:खी छटा होत्या.
"म्हणजे तुम्हाला आधीपासूनच माहित होते की तो सूतपुत्र आहे? मग...." कृपाचार्यांना कळेच ना की मग द्रोणाचार्य स्पर्धेच्या वेळी गप्प का राहिले!
"आधी फक्त तसा संशय होता. अधिरथ आला तेव्हा खात्री पटली."
'तरीच द्रोणाचार्यांच्या चेहऱ्यावर इतके आश्चर्य नव्हते.' कृपाचार्य हसले.
भीष्माचार्यांनी मुद्याला हात घातला. "द्रोणाचार्य, आजचे आयोजन व्यर्थ गेले. आता कसे निवडायचे भावी महाराज?"
"आता ह्या द्रोणाचार्याला गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली आहे, भीष्माचार्य. उद्या जो शिष्य माझी गुरुदक्षिणा मला देईल, तो विजेता!"
"द्रोणाचार्य? गुरुदक्षिणेवरून महाराज कसे ठरवणार आपण?"
"माझ्यावर विश्वास ठेवा, महामहीम. योग्य दावेदारच राजगादीवर बसेल."
कृपाचार्य आता अजून जास्त अस्वस्थ झाले होते. 'गुरुदक्षिणा' शब्द ऐकून त्यांना एकलव्यची आठवण झाली आणि ते धास्तावले.
"काय मागणार आहात तुम्ही गुरु द्रोण?"
"शांतता मागणार आहे कृपाचार्य. मनाची हरवलेली शांतता मागणार आहे."
"म्हणजे?" उद्वीग्न होत कृपाचार्यांनी विचारले.
"एक हिशोब राहिला आहे, कुलगुरू. खूप जूना...... केलेल्या अपमानाचा!"
---------
"थांबाsss" किंचाळत कुंती झोपेतून जागी झाली तसा गांधारीने आन मान धपक्याने तिचा हात पकडत तो थोपटला, "कुंती, काय झालं ? ठीक आहेस ना तू?"
कुंती कुठल्या तरी विचित्र मनोवस्थेत आहे, हे कळण्याकरता गांधारीला कुंतीचा चेहरा बघण्याची गरज नव्हती.
"काही नाही, महाराणी..... काही नाही."
"कुंती, काल बेशुद्ध पडली होतीस तू. मला तर भिती वाटली. जेव्हा वैद्य म्हणाले सर्व ठीक आहे, तेव्हा जीव भांड्यात पडला." कुंतीच्या चेहऱ्यावरून तिने हात फिरवला.
"कालच्या स्पर्धेचे काय झाले?"
"काहीच नाही, कुंती. सुर्यास्त झाला आणि स्पर्धा अपूर्ण राहिली. पूर्ण झाली असती खरं, कर्ण आला नसता तर."
"कर्ण??"
"ज्याने अर्जुनला द्वंद्व युध्दासाठी आवाहन केले ना, तो. अगं विदूर सांगत होते, कि तो काहीतरी सचेतन ताऱ्याच्या तुकड्यासारखा दिसतो म्हणून. आपल्या अधिरथाचाच पुत्र आहे. तो मध्ये आला नसता तर बरे झाले असते. मला दुर्योधन आणि भीम समोरासमोर आले की धडकी भरते गं. कालचं अपूर्ण राहिलं म्हणून आता पुन्हा नवीन स्पर्धा आयोजन होणार. पुन्हा सर्वांची थकावट. पुन्हा ती च भिती. पण यावेळी तू काळजी घे हं तब्येतीची."
गांधारीने दासींकडून फळांनी भरलेली थाळी कुंती समोर ठेवून घेतली आणि पुन्हा एकदा 'तब्येतीची काळजी घे.' असे सांगत तिने कक्ष सोडला.
कुंतीने खिडकीतून नुकत्याच उगवलेल्या सुर्यदेवांच्या तांबड्या रुपाकडे पाहिले.
'कर्ण.....आपला पुत्र, सुर्यदेव! जिवंत आहे. तो.... तो जिवंत आहे..... सुखरूप आहे. मनातलं शल्य गेलं आज.' कुंतीने आनंदाने डोळे पुसले. 'तो इथेच आहे, सुर्यदेव.... हस्तिनापुरात. माझ्या खूप जवळ. तुम्ही दिलेले खरचं कवच शोभून दिसते त्याला.' कालचा प्रसंग आठवला आणि क्षणात तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती उठून अस्वस्थपणे फेऱ्या घालू लागली. 'आज.....त्याने स्वतःच्याच अनूजला द्वंद्व आव्हान दिले. बाकीच्यांनी एकमेकांसोबत द्वंद्व केलं तेव्हा त्यांना माहित होतं की ते एकमेकांचे बंधु आहेत. पण कर्ण? त्याला नातं माहित नाही.... कर्णाकडे तर कवच आहे.... पण अर्जुन? जर काही झालं असतं अर्जुनला तर? नाही.....मला हा विचारही सहन नाही होतं.'

© मधुरा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाबभाऊ जाऊद्या हो इथल्या लोकांना तुमची अननननन्यसाधारण प्रतिभा कुठ कळणार. मी तर म्हणतो तुम्ही ज्या धाग्यात जातात तो धागा धन्य होतो.

प्रिय लेखक वाचक बंधु आणि भगिनींनो 1 भागापासुन जे वाचत आहे त्यांच्या लक्षात आलेच असेल की हायझेनबर्ग आणि त्यांची पिल्लावळ जाणीवपुर्वक लेखिकेंना त्रास देत आहे! त्यामुळे मी आक्रमक प्रतिसाद दिले त्याबद्दल क्षमस्व! मला वाटते की अशा विक्रुतींना उत्तर देणे टाळा! भाषेचे ञान आम्हाला दाखवण्याची गरज नाही(आम्ही काय लेखक नाही!)

पण भाषेचे ज्ञान असल्याशिवाय दुसर्‍या कोणी लिहिलेलं कसं कळणार? आणि प्रतिसाद लिहिण्यापुरतं भाषेचं ज्ञान असायला हवंच ना.
शिवदादा, पुन्हा एकदा " ञान" हा शब्द मला माझ्याकडच्या शब्दकोशात मिळाला नाही. कृपा करून अर्थ समजावून सांगा ना.

आणि तुम्ही इतरांना हायजेनबर्ग यांची पिलावळ म्हणता, मग तुम्ही लेखिकेची पिलावळ नाही कशावरून?

क्षमस्व म्हटल्यावरही तुम्ही पिलावळ, विकृत असे शब्द वापरत आहात. या शब्दां बद्दल पुढल्या प्रतिसादांत क्षमा मागाल का?

<भाषेचे ञान आम्हाला दाखवण्याची गरज नाही(आम्ही काय लेखक नाही!)> यातलं आम्ही हे अनेकवचन की आदरार्थी बहुवचन?

हाब तुमचे खरे नाव सांगाल का? तुमच्यासारख्या (फीवर) वाल्या लोकांसाठी आमच्या एका समिती ने समुपदेशनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे! तुम्हाला आमंत्रनपत्रिका पाठवतो! कार्यक्रमाचा विषय आहे "परस्री माते समान" धन्यवाद जय महाराष्ट्र....!

जिने तुला जन्म दिला! जिने तुला राखी बांधली! ती स्री! आणि दुसर्यांची लाळ पुसु नका! आणि लाळ पुसतांना लाज बाळगा!

परस्री माते समान>>> हे हाब यांना पटवून देण्याची खरंच गरज आहे का?
त्यांनी तसा काही प्रतिसाद दिलाय का?
मी सर्व प्रतिसाद वाचले नाहीयेत, पण जर त्यांनी खरंच एखाद्या स्त्री ची विटंबना होईल अशी काही प्रतिक्रिया दिली असेल; तर खरंच त्यांच्याबद्दलचा आदर कमी होईल...
पण जर तसे नसेल, तर तुम्ही उगाच विषय कुठल्या कुठे घेऊन जाऊ नये ही विनंती...

मग स्त्री म्हणजे?

<लाळ पुसू नका आणि लाळ पुसताना लाज बाळगा > नक्की काय करायचं? लाळ पुसायची की नाही? पुसायची नाही, तर लाज का बाळगायची?

तुम्ही कोणाची लाळ पुसताय का?

कुठला विषय..... कुठे चाल्लाय!

शाब्दिक युध्द थांबवा.
सुरवात झाली की अश्या वादाला अंत नसतो.

सर्वांना विनंती! हा धागा जरा शांत राहू दे.

हायला, गम्मत चालू आहे इकडे,
अडमीन ने प्रतिक्रिया बंद कारण्याअगोदर माझी पण एक पिंक Happy

बोलून चालून एका काव्यावर आधारित लेखमाला आहे, त्यात लेखिकेने स्वातंत्र्य घेतले तर काही बिघडत नाही, रामालाच सब्बाटिकल हवी असते म्हणून तो कैकई करवी वनात जाणे मागून घेतो फॉरमॅट ची कथा येऊन गेलीये माबो वर, तेव्हा एकाच घटनेचे अनेक पैलू असू शकतात आणि लेखक त्यातले कुठले वापरायचे ते ठरवू शकतो, तेव्हडे स्वातंत्र्य त्याला निश्चित आहे.

वेदवती साम्राज्य महाराणी वगैरे,
इकडे द्रौपदी आणि सीतेची कामे करणाऱ्या तारका पब मध्ये दिसतात आणि अर्जुनाचे काम करणारा पार्टी चड्ड्या घालून फोटो शूट करतो तेव्हा कोणाला हे आठवत नाही का?
ती एक व्यक्तीरेखा आहे, व्यक्तिरेखा वठवणार्या माणसाने 24 तास तसेच वागावे असा आग्रह आपण धरत नाही तसेच लेखिका/ डायरेकटर ने 24 तास त्या व्यक्तिरेखांबद्दल गंभीर्यानेच बोलले पाहिजे असा अट्टाहास धरणे चूक आहे.

बाकी माणसाचा रुन्मेष कसा होतो ते प्रत्यक्ष पाहणे सुरू आहे.

.

> Submitted by सिम्बा on 22 August, 2019 - 14:23 > शेवटचे वाक्य सोडून बाकी प्रतिसाद आवडला आणि +१.

रामायण महाभारतला काल्पनिक कथानक समजून त्यातील घटनांचे निराळ्याच दृष्टिकोनातून, जॉन्रमधून चित्रीकरण (जसे की पर्व किंवा ते कुठले ते मराठी नाटक) जरूर करावे. किंवा काही व्यक्तिरेखा उचलून त्यांना वेगळ्याच सिच्युएशनमधे टाकून त्या कशा वागतील याचे चित्रीकरण....

वेदवती साम्राज्य महाराणी वगैरे,
इकडे द्रौपदी आणि सीतेची कामे करणाऱ्या तारका पब मध्ये दिसतात आणि अर्जुनाचे काम करणारा पार्टी चड्ड्या घालून फोटो शूट करतो तेव्हा कोणाला हे आठवत नाही का?
>>>>>
आठवतात ना, आणि तेवढी अक्कल आहे आम्हालाही पण तद्दन गल्लाभरू मालिका आणि लेखिकेने लिहिलेली लेखमाला यात फरक आहेच ना. जर लेखिकेने तशा अनुषंगाने लिहिलं असेल तर माझा पास. आणि २४ तास काही लेखिकेने गुणगान गाऊ नये, पण आपल्या लेखावर, त्याच्या प्रतिक्रियांवर याचं भान ठेवाव एवढंच माझं म्हणणं. तेही लेखिका त्यांच्या लिखाणाविषयी सिरीयस वाटल्या म्हणून...
तसंही मी घरी चड्डीवर वावरतो, म्हणून ऑफिसमध्ये काम करताना तसच वावरेल, असं नाही ना सिंबा. प्रसंगोचित भान ठेवायला हवं!

तेच उदाहरण आहे. त्यालाच उद्देशून म्हटले होते मी. जौदे तूझ्या बुध्दीची बोंबच आहे म्हणा.

पण तद्दन गल्लाभरू मालिका आणि लेखिकेने लिहिलेली लेखमाला यात फरक आहेच ना>>>>>
चला, अटलिस्ट यांचे लिखाण तद्दन गल्लाभरू वगैरे वाटत नाहीये तुम्हाला , धन्यवाद

हैला Proud
काय सॉलिड धुमाकूळ आहे
एकदम लाइव्ह महाभारत Light 1

धागा कटेंट इकडेच ठेवून फक्त त्याचे प्रतिसाद विरंगुळा / विनोदी लेखन मध्ये हलवण्याची सोय असते का मायबोलीवर Wink

धन्यवाद सिम्बा चर्चा मूळ विषयाकडे वळल्याबद्दल.आणि तुमच्या मुद्द्याला पूर्ण अनुमोदन.
फक्त एक गोची आहे. >>>
बोलून चालून एका काव्यावर आधारित लेखमाला आहे >> मधुराताई म्हणत आहेत की त्या लिहीत आहे तोच आणि फक्त तोच खरा इतिहास आहे.. बाकी सगळे साहित्य hoax आहे.
आता काय झाले बघा, तुमचे सगळे argument जे "हे एक काल्पनिक काव्य आहे" ह्या गृहितकावर उभे होते ते फ्लॉप झाले की नाही.
तर आम्ही (म्हंटलं आपणही स्वतःचा आदरार्थी उल्लेख करून बघावा :फिदी:) म्हणत होतो इतिहास तर एकच असतो ना म्हणजे तुमचा वेगळा आमचा वेगळा असे थोडीच असते. तर म्हणुन ताईंना त्यांच्या इतिहासपर लेखासाठी ते कुठले संदर्भ ग्रंथ वापरतात ते विचारले. आता इतिहास आपल्याला आपल्या मनाने थोडीच लिहिता येतो.. खरे की नाही.
पण काय राग आला म्हणुन सांगू काही लोकांना संदर्भ मागितले तर.

तुम्ही आम्ही चोप्रांची महाभारत मालिका पाहिली की नाही, त्यात ते सुरुवातीला त्यांनी वापरलेल्या सगळ्या संदर्भ ग्रंथाची, निर्मितीत मदत केलेल्या महाभारताचा सामुदायिक निरुपण करणार्‍या साधू सद्गुरू लोकांची जंत्री देतात. गल्लाभरू मालिका 'आम्ही सिनेमॅटिक लिबर्टी घेतली आहे' असे लिहितात. पण आम्ही सांगतो, दाखवतो हाच खरा इतिहास आहे असे कोणी ठोकून देत नाही.
So you see it's very easy to take sides and pass judgments before fully exhausting those tiny little grey cells to explore all the sides of any argument. Proud

And sir, with all due respect I'd like to say that, Runmesh is a perfectly fine breed of people just as you me and everyone else on this forum are. There are many new faces around so as a responsible member of this forum we shouldn't put blemish on someone else's name, especially when that someone is not around to defend. Wink
My apologies for writing in English.

Pages