"प्रणाम द्रोणाचार्य."
"प्रणाम. काय झाले कृपाचार्य? तुम्ही अस्वस्थ का दिसत आहात अजूनही?"
"तुम्ही पाहिलेत ना काय झाले ते."
"हो. पण तुम्ही का चिंतेत आहात?"
"का नसेन, द्रोणाचार्य?"
"कारण तुम्हाला वाटलेली भिती सत्यात उतरली नाही."
"म्हणजे?"
"दुर्योधन स्पर्धेत विजयी झाला नाही, कुलगुरु. तुम्ही तर आनंदी असायला हवे. चिंतीत नाही." द्रोणाचार्य हसत म्हणाले.
"तुम्ही मला चुकीचे समजत आहात द्रोणाचार्य. दुर्योधनाचा पराजय हस्तिनापुरचा एक आधारस्तंभ इतर आधारस्तंभांपेक्षा कमकुवत असल्याचे द्योतक आहे..... आणि मी कुठे हस्तिनापुरापेक्षा वेगळा आहे, गुरुवर? मी कसा आनंदी होईन दुर्योधनाच्या पराजयाने?"
"म्हणजे ?" द्रोणाचार्य आश्चर्याने म्हणाले, "मला तर वाटलं तुम्ही निश्चित व्हालं, दुर्योधन भीमकडून हरला म्हणल्यावर."
"मी दुर्योधनाविरूध्द नाही, गुरुवर."
"काय? कृपाचार्य? हे तुम्ही बोलता आहात?"
"हो, द्रोणाचार्य. मी हस्तिनापुरचे कुलगुरु पद भूषवतो आणि तुमच्याआधी राजपुत्रांना विद्या देण्याची जवाबदारीही माझ्यावरच होती. अगदी तेव्हा पासून ओळखतो मी या राजपरिवाराला..... अगदी जवळून! इथे सर्व कोणाचे ना कोणाचे पक्षधरं आहेत. मी ही याला अपवाद नाही."
"कोणाच्या पक्षात आहात मग तुम्ही?
"हस्तिनापुराच्या पक्षात आहे मी, द्रोणाचार्य. म्हणून केवळ हस्तिनापुरच्या भविष्याचा विचार करतो. कोण्या एका राजकुमाराच्या जय-पराजयाचा नाही."
"मग दुर्योधन विजयी होऊ नये असे का वाटते तुम्हाला?"
"कारण दुर्योधनाची मुळ शक्ती दैत्य प्रवृत्तीची आहे, गुरुवर."
"म्हणजे?"
"दैत्य प्रवृत्तीकडे ताकद असते, शक्ती असते. परंतु विवेकबुद्धी? ती मात्र नसते. प्रचंड हलक्या कानाचे असतात दैत्य प्रवृत्तीचे. ते अनुसरण करतात केवळ स्वतःच्या स्वार्थी विचारांचे. त्यांना असत्य, अयोग्य मार्गांची मोहिनी पडते, गुरुवर! मग सत्य आणि धर्म जाणून सुद्धा तो आचरत नाहीत ते. त्यात एखाद्या चुकीच्या व्यक्तीची संगत झाली, की मग त्यांच्या सुधारण्याची शक्यता म्हणजे भर अमावास्येला चंद्र दर्शन! शक्तीवर योग्य विचारांचा अंकुश नसेल ना, तर ती शक्ती विनाश करते, गुरुवर.... केवळ विनाश!"
"असे का वाटते तुम्हाला कुलगुरु? आज पाहिलेत ना तुम्ही! एका अनोळखी व्यक्तीचाही अपमान सहन होऊ नये इतका हळवा आहे दुर्योधन. क्षणात अंग प्रदेशाचे अधिपत्य एका अनोळखी व्यक्तीला देण्या इतका इतका उदारही आहे. परक्या व्यक्तीच्या अपमानाच्या जखमेवर मलमपट्टी करू पाहिली त्याने. हे त्याने स्वतः केले. कुणा दुसऱ्याच्या सांगण्याचे अनुसरण नव्हते ते."
"कारण कर्णाने द्वंद्वासाठी आवाहन त्याला केले जो राजगादीचा दावेदार आहे. ती च राजगादी, द्रोणाचार्य, जिच्यावर दुर्योधन स्वतःचा अधिकार समजतो. कर्ण जिंकू शकेल असं समजून त्याने अंग देशाचा राजा बनवून कर्णाला उपकारांच्या ओझ्याखाली दाबलं. अर्थात जर कर्ण जिंकला असता, तर तो त्याच्या विजयाचे फळ सरळ सरळ आणून दुर्योधनाच्या पायी ठेवेल, असा बंदोबस्त केला त्याने."
"कृपाचार्य, मित्र बनवण्यात आणि मैत्री निभावण्यात दुर्योधन कधीच कपट येऊ देत नाही. मी पाहिली आहे अश्वत्थामा आणि दुर्योधनची मैत्री. तो बंधुत्व आणि मैत्री उत्तम निभावतो."
"पांडवां बद्दलचा द्वेष पाहूनही तुम्ही असं म्हणता आहात?"
"दुर्योधनाला नवव्यान्नव अनुज आहेत. ते त्याच्यावर किती प्रेम करतात, त्याचा किती आदर करतात, तेपाहिले आहेत ना तुम्ही? कौशल्य दाखवायलाही त्याच्या पुढे शस्त्र उचलत नाहीत त्याचे अनुज. विचार करा, कृपाचार्य! हे बंधुत्व तर पांडवांमध्येही नाही. पांडवांशी असलेले वैरही एका लहान-सहान कारणामुळे आहे. ते म्हणजे, दुर्योधनाला जेष्ठत्व गाजवलेले चालत नाही, इतकेच."
"इतकेच नाही, द्रोणाचार्य. त्याला हस्तिनापुरवरही कोणी हक्क दाखवलेला चालत नाही. त्याचे अनुज राजगादीचे स्वप्नच पाहत नाहीत, म्हणून हे टिकून आहे हे बंधुत्व. तो राजगादीसाठी कपट, छळ, अधर्म..... काहीही करू शकतो."
"असं तुम्हाला वाटतं असेल तर, दुर्योधनाला तुम्ही नीट ओळखलेलेच नाही."
"दुर्योधनाला स्वतःची ओळख आहेच कुठे, द्रोणाचार्य? गांधार नरेशने त्याला त्याची ओळख मिळवू कुठे दिली आहे? त्याचे निर्णय हे स्वतःचे कधी नसतातच. तो केवळ एक बोलका बाहुला आहे, द्रोणाचार्य. शकुनीला हवे तसा चालणारा, वागणारा आणि जगणारा एक बोलका बाहुला! ज्याचे स्वतःचे काही मत नसते, काही विचार नसतात आणि ज्याच्या दोऱ्या केवळ गांधारनरेशच्या हातात असतात."
"कृपाचार्य, तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे." भीष्माचार्य कक्षातच आलेत हे लक्षात आल्यावर दोघांनी त्यांना हात जोडून नमस्कार केला.
"तुम्हालाही असेच वाटते भीष्माचार्य?"
"हो, द्रोणाचार्य! दुर्दैवाने गांधारनरेशच्या हातातले प्यादे बनला आहे दुर्योधन."
"तेच सांगत होतो मी, महामहीम."
"पण आज कर्णाच्या बाबतीत दुर्योधन जे वागला ते मात्र तो स्वतःच्या मनापासून वागला, कृपाचार्य."
"भीष्माचार्य?" कृपाचार्यांनी आश्चर्याने बघितले.
"दुर्योधन कधी गांधारनरेश सोडून दुसऱ्या कोणाचे ऐकत नाही. पण यावेळी मी त्याला स्वतःच्या मनानुसार वागताना पाहिले. आणि कोणाच्या आदेशाचे अनुसरण अजिबात नव्हते ते!"
"कश्यावरून भीष्माचार्य?"
"आज्ञा पालन करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर कधी ते स्मित नसते कृपाचार्य, जे आज दुर्योधनाच्या मुखावर पसरले होते. दुर्योधनाने आज जे केले ते त्याच्या स्वतःच्या मनाने केले. मग त्याचे कारण कर्णाचे अर्जुनाला ललकारण्याचे धाडसही असू शकेल अथवा कर्णाचे असामान्य तेजही."
"हो.... त्याच्या त्या सुवर्ण वस्त्रामुळे तर सर्वच प्रभावित झाले होते. मला हाच प्रश्न पडला होता की एका सूत पुत्राकडे इतके सुंदर वस्त्र आले कुठून?"
"ते वस्त्र नाही, कवच आहे, कृपाचार्य. जन्मापासूनच आहे त्याच्याकडे. ते कवच त्वचेप्रमाणे त्याच्या शरीरानुसार आकारमान बदलते. ते दिव्य आहे. पण कोणालाच माहितं नाही ते त्याच्याकडे आले कसे! "
"द्रोणाचार्य? काय म्हणता आहात? खरचं? आणि तुम्हाला कसे माहित हे?" कृपाचार्यांनी प्रश्न केला.
द्रोणाचार्य भूतकाळात हरवत म्हणाले, "शब्द दिला नसता तर मला दोन असामान्य विद्यार्थी गमवावे लागले नसते, कृपाचार्य.... ज्यांना मी शिष्यत्व नाकारले त्यांच्यापैकीच एक होता तो..... कर्ण." त्यांच्या चेहऱ्यावर दु:खी छटा होत्या.
"म्हणजे तुम्हाला आधीपासूनच माहित होते की तो सूतपुत्र आहे? मग...." कृपाचार्यांना कळेच ना की मग द्रोणाचार्य स्पर्धेच्या वेळी गप्प का राहिले!
"आधी फक्त तसा संशय होता. अधिरथ आला तेव्हा खात्री पटली."
'तरीच द्रोणाचार्यांच्या चेहऱ्यावर इतके आश्चर्य नव्हते.' कृपाचार्य हसले.
भीष्माचार्यांनी मुद्याला हात घातला. "द्रोणाचार्य, आजचे आयोजन व्यर्थ गेले. आता कसे निवडायचे भावी महाराज?"
"आता ह्या द्रोणाचार्याला गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली आहे, भीष्माचार्य. उद्या जो शिष्य माझी गुरुदक्षिणा मला देईल, तो विजेता!"
"द्रोणाचार्य? गुरुदक्षिणेवरून महाराज कसे ठरवणार आपण?"
"माझ्यावर विश्वास ठेवा, महामहीम. योग्य दावेदारच राजगादीवर बसेल."
कृपाचार्य आता अजून जास्त अस्वस्थ झाले होते. 'गुरुदक्षिणा' शब्द ऐकून त्यांना एकलव्यची आठवण झाली आणि ते धास्तावले.
"काय मागणार आहात तुम्ही गुरु द्रोण?"
"शांतता मागणार आहे कृपाचार्य. मनाची हरवलेली शांतता मागणार आहे."
"म्हणजे?" उद्वीग्न होत कृपाचार्यांनी विचारले.
"एक हिशोब राहिला आहे, कुलगुरू. खूप जूना...... केलेल्या अपमानाचा!"
---------
"थांबाsss" किंचाळत कुंती झोपेतून जागी झाली तसा गांधारीने आन मान धपक्याने तिचा हात पकडत तो थोपटला, "कुंती, काय झालं ? ठीक आहेस ना तू?"
कुंती कुठल्या तरी विचित्र मनोवस्थेत आहे, हे कळण्याकरता गांधारीला कुंतीचा चेहरा बघण्याची गरज नव्हती.
"काही नाही, महाराणी..... काही नाही."
"कुंती, काल बेशुद्ध पडली होतीस तू. मला तर भिती वाटली. जेव्हा वैद्य म्हणाले सर्व ठीक आहे, तेव्हा जीव भांड्यात पडला." कुंतीच्या चेहऱ्यावरून तिने हात फिरवला.
"कालच्या स्पर्धेचे काय झाले?"
"काहीच नाही, कुंती. सुर्यास्त झाला आणि स्पर्धा अपूर्ण राहिली. पूर्ण झाली असती खरं, कर्ण आला नसता तर."
"कर्ण??"
"ज्याने अर्जुनला द्वंद्व युध्दासाठी आवाहन केले ना, तो. अगं विदूर सांगत होते, कि तो काहीतरी सचेतन ताऱ्याच्या तुकड्यासारखा दिसतो म्हणून. आपल्या अधिरथाचाच पुत्र आहे. तो मध्ये आला नसता तर बरे झाले असते. मला दुर्योधन आणि भीम समोरासमोर आले की धडकी भरते गं. कालचं अपूर्ण राहिलं म्हणून आता पुन्हा नवीन स्पर्धा आयोजन होणार. पुन्हा सर्वांची थकावट. पुन्हा ती च भिती. पण यावेळी तू काळजी घे हं तब्येतीची."
गांधारीने दासींकडून फळांनी भरलेली थाळी कुंती समोर ठेवून घेतली आणि पुन्हा एकदा 'तब्येतीची काळजी घे.' असे सांगत तिने कक्ष सोडला.
कुंतीने खिडकीतून नुकत्याच उगवलेल्या सुर्यदेवांच्या तांबड्या रुपाकडे पाहिले.
'कर्ण.....आपला पुत्र, सुर्यदेव! जिवंत आहे. तो.... तो जिवंत आहे..... सुखरूप आहे. मनातलं शल्य गेलं आज.' कुंतीने आनंदाने डोळे पुसले. 'तो इथेच आहे, सुर्यदेव.... हस्तिनापुरात. माझ्या खूप जवळ. तुम्ही दिलेले खरचं कवच शोभून दिसते त्याला.' कालचा प्रसंग आठवला आणि क्षणात तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती उठून अस्वस्थपणे फेऱ्या घालू लागली. 'आज.....त्याने स्वतःच्याच अनूजला द्वंद्व आव्हान दिले. बाकीच्यांनी एकमेकांसोबत द्वंद्व केलं तेव्हा त्यांना माहित होतं की ते एकमेकांचे बंधु आहेत. पण कर्ण? त्याला नातं माहित नाही.... कर्णाकडे तर कवच आहे.... पण अर्जुन? जर काही झालं असतं अर्जुनला तर? नाही.....मला हा विचारही सहन नाही होतं.'
© मधुरा
भाऊरायांना चहा वगैरे विचाराला
भाऊरायांना चहा वगैरे विचाराला की नाही कोणी. किती कळकळीनं लिहीत आहेत ते. मलाच भरून आले त्यांची तगमग बघून. आणि बहिणाबाई 'दमला असशील ना? ' म्हणत साधी विचारपूस ही करत नाही.
मीच पाठवला असता चहा पण चहाची emoji पाठवली तर परत मला निर्लज्ज म्हणतील.
आणि भाऊ IIT वगैरे एकदम impressive (म्हणजे कड्डक) बरं का. अभिमान आणि आदर दोन्ही वाटला तुमच्याबद्दल.
भाऊराया ने माझ्या विपूत येऊन
भाऊराया ने माझ्या विपूत येऊन माझी अक्कल व औकात काढली. मी जाम घाबरलो आहे बुवा.
मधुराताई म्हणत आहेत की त्या
मधुराताई म्हणत आहेत की त्या लिहीत आहे तोच आणि फक्त तोच खरा इतिहास आहे.. बाकी सगळे साहित्य hoax आहे.>>>>>> मी असे कधीही म्हणलेले नाही. काहीही लिहू नका. मी मला पटेल अश्या लॉजिकने लिहिते आहे. माझ्या दृष्टीने लिहिते आहे, असे सतत लिहित आले आहे मी. माझ्या प्रतिसादात सुद्धा हेच लिहिले मी.
हब, तुम्हाला उत्तर द्यायचे नाही असे ठरवले होते. पण आता हद्द झाली. काहीही लिहित आहात. माझ्या प्रतिक्रिया आधी नीट वाचा अथवा निदान युगांतरची प्रस्तावना नीट वाचा. आणि विपर्यास न करता समजून घ्या.
आणि खरचं...... बास करा असे प्रतिसाद लिहिणं. मी तुमच्या धाग्यांवर येत नाही. तुम्ही माझ्या धाग्यांवर येऊ नका.
admin ला सांगून माझ्या सर्व धाग्यांवर तुम्हाला बंदी घालायला लागेल, अशी वेळ आणू नका.
काही काळापूर्वी मर्चंट नेव्ही
काही काळापूर्वी मर्चंट नेव्ही आणि त्या निगडित जीवनाचे अनुभव मांडणाऱ्या ताई होत्या. त्यांनी मायबोलीवरून फार कमी काळात एक्सिट घेतली. आत्ता त्यांचीच आठवण आली . एकदम dejavu feeling...मधुराजी अवांतराबद्दल क्षमस्व
इकडे बनला भाऊ
इकडे बनला भाऊ
आणि विपुत भाई
वाह रे ऊपरवाले
क्या दुनिया दिखाई
शिव, अशोक, सस्मित, सिंबा.....
शिव, अशोक, सस्मित, सिंबा..... सर्वांना विनंती, कोणालाही अपशब्द बोलू नका. इथेही नको आणि त्यांच्या विपुतही नको.
कृपया सर्व शांत व्हा. धागा शांत ठेवा. बाकीच्यांचे वाचनीय धागे खाली जात आहेत. बाकीच्या लेखकांवर हा अन्याय आहे. त्यामुळे, प्रतिक्रिया देणे, विपु करणे टाळा.
धन्यवाद!
@हायझेनबर्ग...
@हायझेनबर्ग...
तुमचा sarcasm level भारीय....
टीप : हा रिप्लाय फक्त संबंधित व्यक्तीसाठीच आहे...बाकी चालू द्या तुमचं..
महाभारत हा सत्य ईतिहास आहे
महाभारत हा सत्य ईतिहास आहे आणि मी त्या सत्याच्या जवळ जाणारे लिहिते हे तुम्ही अनेकदा म्हणालात .. बरोबर?
आणि
>>>>>>
मी असे कधीही म्हणलेले नाही.>>>>> <<<<<< हायझेनबर्ग, भरपूर रेफरेन्सेस आहेत. सगळे देत बसू शकत नाही. जे सोप्प्या पद्धतीने कळतील, आवडतील असे देते आहे. काही ठिकाणी तर BR चे महाभारत पण चुकीचे, वाढीव असते. बाकी सुर्यपुत्र कर्ण, मृत्युंजय, राधेय तर इतिहासाची केलेली तोडमोड आहे निव्वळ. पण त्यातही काही घटना खऱ्या आहेत.तुम्ही मी भरपूर संदर्भ/रेफरेन्सेस वापरते असे म्हणालात 'कुठले?' म्हणून विचारणा केल्यास तुम्हाला एकही सांगता आला नाही. सांगणे न सांगणे तुमचा निर्णय आहे पण सांगता येण्याचे काही कारण आहे का? तुम्ही स्वतः BR चे महाभारत आणि सुर्यपुत्र कर्ण च्या लिंक्स वाचकांना दिल्या. मी 'हे तुमचे रेफरंस का?' विचारल्यावर नाही ते तर चुकीचे आहेत असे म्हणत तुम्ही पुन्हा नाराज झालात. तुम्ही वापरत असलेले रेफरेन्सेस सांगणं तुमच्यासाठी एवढं अवघड असू शकतं हे आधी माझ्या लक्षात आलं नाही. त्याबद्दल क्षमस्व
आणि खरचं...... बास करा असे प्रतिसाद लिहिणं. मी तुमच्या धाग्यांवर येत नाही. तुम्ही माझ्या धाग्यांवर येऊ नका. >> ताई, मी आधी काही कथासाहित्य लिहिलेले असण्याचा काही सबंध आहे का ईथे? एकवेळ समजा माझी लेखनाची पाटी कोरी आहे, मग वाचक म्हणून विचारलेला त्याने 'हे सत्य कसे आणि संदर्भ कोणते' हा प्रश्न बदलतो का?
admin ला सांगून माझ्या सर्व धाग्यांवर तुम्हाला बंदी घालायला लागेल, अशी वेळ आणू नका. >> तुम्हाला योग्य वाटत असल्यास जरूर सांगा. अॅड्मिनना जे योग्य वाटेल ते करतीलच. मी फक्त तुम्हाला 'तुम्ही लिहिलेले सत्य कसे आणि संदर्भ कोणते वापरले' असा साधा प्रश्न विचारला. चर्चा घडून यावी ही ईच्छाही तुम्ही वेळोवेळी बोलून दाखवली आहे, मग अचानक पवित्रा का बदलावा?
असो..'तुम्ही माझ्या धाग्यांवर येऊ नका' ह्या तुमच्या ईच्छेचा मान ठेवला जाईल.
मी पुढे मागे काही लिहिले आणि तुमची प्रतिसाद द्यायची ईच्छा झाल्यास तो द्यायला संकोच करू नका कितीही टीकात्मक प्रतिसाद असला तरी हरकत नाही. तुमचे स्वागतच आहे
हायझेनबर्ग, सत्याच्या जवळ असं
हायझेनबर्ग, सत्याच्या जवळ असं लिहिलं मी. मी लिहिलेलंच फक्त सत्य आहे असं नाही.
तुमच्या प्रतिसादावरून तुम्हाला चर्चा करायची असे वाटलेच नाही. मी एकटी नाही पण बाकीच्या कोणालाही ही चर्चा होती असे वाटले नाही. तो सर्क्याझम होता असेच तुमची तारीफ करणार्यांनाही वाटले. ते टोमणे होते, असं मलाही वाटलं. बाकी, रेफेरंस तुम्हाला लागणार नाहीत जर व्यासांचे महाभारत वाचलेत तर.
माझ्या धाग्यावर तुमचे प्रतिसाद चर्चे करता नसतात हे मलाही माहिती आहे आणि तुम्हालाही. म्हणून सांगितले की धाग्यावर येऊ नका. उगाच तुमच्या-माझ्या बाजूने लिहिणाऱ्यानाही त्रास होतो.
तसही तुम्हाला माझे हे लेख आवडत नाहीयेत हे आपल्याला माहित आहे.
मग कशाला मानसिक त्रास उगाच ?
तुम्हाला न आवडणारे का वाचता आहात, तुम्ही??
बाकीचे कैक लेखक इथे लिहितात. त्यातले जे आवडेल ते वाचा.
आणि हो, मी तुमच्या धाग्यावर येणार नाही. कारण आपली विचारधाराच वेगळी आहे.
उगाच वाद नकोत.
हाब,
हाब,
>>>>>आम्ही (म्हंटलं आपणही स्वतःचा आदरार्थी उल्लेख करून बघावा :फिदी:) म्हणत होतो इतिहास तर एकच असतो ना म्हणजे तुमचा वेगळा आमचा वेगळा असे थोडीच असते. >>>>
इकडे थोडी गोची झाली आहे बघा,
घटना त्याच असतात, पण त्याला इमोशनल संदर्भ आपण जोडत असतो आणि आपल्याला हव्या तश्या गाळलेल्या जागा भरत असतो.
साधं, " हाब ना? प्रचंड हुशार आहे " या वाक्याला वेगळा इमोशनल संदर्भ देऊन मी तुम्हाला टोमणे मारले असेही काही लोक म्हणू शकतात.
तर सांगायचा मुद्दा, जो पर्यंत कथेतील व्यक्तिरेखा त्यांच्या परिघात सुसंगत वागत आहेत, आणि स्थळ काळाचे सुसंबद्ध भान राखत आहेत ( महाश्वेतांच्या भाषेत ऑफिस ला चड्डी घालून जात नाहीत) तो पर्यंत इतिहासाचा अपलाप झाला म्हणून रडायचे कारण नाही.
म्हणजे राम-सीता शिकार करून मास खात होते, हा झाला सो-कॉल्ड तुमचा माझा सारखा असणारा इतिहास.
सीतेने हरिणाचे मास घालून भात बनवला आणि रामाने मिटक्या मारत खाल्ला हे , झाले लेखकाचे कादंबरीतील गाळलेल्या जागा भरून केलेले वर्णन. या लेवल पर्यंत पुरावे द्या पुरावे द्या चा धोशा लावायचे कारण मला वाटत नाही.
रामाला शिकार मिळाली नाही म्हणून त्याने माणूसच मारला आणि सीतेने शिजवला, हे त्यांच्या प्रकृतीचे परीघ सोडून फिरणे आहे, त्यासाठी काय ते साक्षी पुरावे करा.
Saying that* मी 34 पैकी एकही भाग वाचला नाहीये, या भागावरच्या फक्त कमेंट्स वाचल्या आहेत त्यात , कथा कादंबरी सेक्शन मधल्या गोष्टीला पुरावे मागितले जात आहेत हे गमतीशीर वाटले म्हणून मी लिहिले.
मागच्या प्रतिसादात इंग्रजीत लिहिलेले मी स्कीप केले, त्यामुळे त्या बद्दल उत्तर देऊ शकत नाही,
हायझेनबर्ग, तुमच्या नजरेतून
हायझेनबर्ग, तुमच्या नजरेतून एक गोष्ट सुटलीय .
चोप्रा महाभारत आणि सूर्यपुत्र कर्णाच्याच खाली संदर्भ म्हणून विकिपिडियामधला मजकूरही दिला होता.
त्यावर पुढे तुम्हांला "त्यातही विकिपीडिया चा उल्लेख तुम्ही सोयीस्कररित्या गाळलात.
असो, धन्यवाद! Happy" असंही लिहिलं गेलंय.
सिंबा - लेखन कथा कादंबरी या
सिंबा - लेखन कथा कादंबरी या विभागात केलं कसलं तरी विषय इतिहास असा नोंदवलाय.
आधीच्या एका प्रतिसादात" काही ठिकाणी तर BR चे महाभारत पण चुकीचे, वाढीव असते.
बाकी सुर्यपुत्र कर्ण, मृत्युंजय, राधेय तर इतिहासाची केलेली तोडमोड आहे निव्वळ. पण त्यातही काही घटना खऱ्या आहेत."
असं विधान लेखिकेने केलं आहे.
म्हणजे त्यांचा हेतू इतिहास लेखन आहे, असं मानायला वाव आहे.
गंमत म्हणजे संदर्भ म्हणून याच दोन मालिकांची लिंकही त्यांनीच दिलीय.
वर म्हटलेल्या मालिका, काद़ंबऱ्या इतिहासाची मोडतोड, हे त्याच
अधिकारवाणीने म्हणताहेत.
म्हणजे मालिकांतलं काय खरं, काय खोटं हे त्या ठरवताहेत.
इथे तुम्ही या लेखनाला लावत असलेली कलात्मक स्वातंत्र्याची सूट बाद ठरते.
तसंच हे कशाच्या आधारावर म्हटलं आणि आपण करत असलेल्या इतिहासलेखनाला आधार काय हे सांगता येणं अवघड ठरू नये.
झालंय काय:
झालंय काय:
मी सुरूवाती पासुनचे भाग वाचले. प्रतिसाद वाचले. मधुरा नेहमी प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देत असते. कोणी स्तुती केली की मधुराला फार आनंद होतो. दोन दोन आनंदी स्मायल्यासह उत्तर देते. पण कोणी शंका काढली, चूक म्हटलं की एकदम नूर पालटतो. समोरच्या व्यक्तीला काही कळत नाही असे म्हणून खिखि हसणाऱ्या स्मायल्या खिजवायला टाकते. मिसळपाव ला नावं ठेवते व तिथेच लेख टाकते, वर सांगते काही वाचकांना आवडतेय. अशा वाचकांना फेसबुक, माबोवर वाचता येतंय की. वाचकांनी छान छान म्हणावं यासाठी लेखिका आसुसलेली आहे असे मला वाटते.
अरे, बास करा सगळे.
अरे, बास करा सगळे.
बाकीच्यांच्या काही गोष्टी चुकीच्या आहेत असे लिहिले कारण त्यांनी विचारलेला प्रश्न टोमणा मारणारा होता. सुर्यपुत्र कर्ण बघा एकदा. तुम्हीच ठरवालं. सगळ्यांना माहिती आहे त्या मालिकेबद्दल. अर्थात न बघता प्रतिसाद देणारेही आहेत इथे! काय बोलणार ?
कोणी जर म्हणाले की कर्णाने द्रौपदीचे चीररक्षण केले तर ते खरे नाही हे शाळेतलं पोर पण सांगेल.
सुर्यपुत्र कर्ण मध्ये तसं दाखवलंय. आहे का खरे?
BR मध्ये गंगा एक दिवस अलीकडे भीष्माचार्यांची मृत्यू शय्या तयार करते आहे असे दाखवले आहे. वाटते ते खरे?
मी त्यावर जे लिहिले ते प्रेक्षक म्हणून लिहिले, लेखक म्हणून नाही.
काय आणि तुम्ही सगळे!
बास करा, थांबा, असे लिहूनही का देता आहात प्रतिसाद?
माकडांना कितीही सांगितले की
माकडांना कितीही सांगितले की ऊड्या मारु नका. ते एकतात का तसंच आहे हे.
अमर तुला लोकांनी झापले मिपावर
अमर तुला लोकांनी झापले मिपावर. तुला आनंद झाला? नाचलास का ? तिकडे कंपुगिरी चालते असे तू च लिहिले होतेस.
आणि मी लेख मिपावर टाकू नये हे तू आत्ता तुझ्या प्रतिसादातच लिहिलंस त्याबद्दल धन्यवाद!
माबोवर स्वतःपेक्षा दुसऱ्यांचे लेख टाकायचा तुझा प्रपंच चालू राहू देत. अर्थात , admin ने ते काढले तरी तुला राग नाही आला पाहिजे. नै का?
खरं आहे सुपु.
खरं आहे सुपु.
खरं बोलल्यावर सख्ख्या आईला पण
खरं बोलल्यावर सख्ख्या आईला पण राग येतो.
जसा तुम्हाला आला.
जसा तुम्हाला आला.
मिपाची बदनामी करुनही लोक
मिपाची बदनामी करुनही लोक तिकडे लिहितात याला तिकडचे लोक लोचटपणा म्हणत आहेत.
तरी तुम्ही लिहिता आहात?
तरी तुम्ही लिहिता आहात?
कारण बदनामीची सुरवात तर
कारण बदनामीची सुरवात तर तुम्ही केलीत.
आणि तिकडे सोडा इकडे तरी
आणि तिकडे सोडा इकडे तरी तुम्ही स्वतःचे कुठे लिहिता? Copy paste तर असते.
कारण बदनामीची सुरवात तर
कारण बदनामीची सुरवात तर तुम्ही केलीत.
नवीन Submitted by मधुरा कुलकर्णी on 22 August, 2019 - 12:34
>> नीट आठवा बघू. मी मिपावरील लेख कॉपी पेस्ट केला आहे हे सांगितल्यावर तुम्ही मिपावर असे असे चालतं हे लिहिले. तेव्हा मी म्हटलं हो, माझ्या काश्मिर धाग्यावर तिकडं मला खूप झाडले.
अकलेचे तारे तोडण्यापेक्षा
अकलेचे तारे तोडण्यापेक्षा काँपी पेस्ट करणं असतं
नीट आठवते आहे मला. कंपुगिरी
नीट आठवते आहे मला. कंपुगिरी शब्द तुम्ही वापरलात. आणि मिपाचा उल्लेखही.
आणि हो, अपमान करून घेणे
आणि हो, अपमान करून घेणे कोणालाही आवडत नाही. आवडत असेल तुम्हाला, तर तुमच्या धाग्यावर सगळे येऊन तुमची इच्छा पूर्ण करतील.
सुप
सुपु चमचेगिरी आणि कंपुगिरी एकच आहे.
का रे अमर? आम्ही करतो ती
का रे अमर? आम्ही करतो ती चमचेगिरी, कंपुगिरी. आणि तुम्ही करता ते काय? फक्त सहमती दर्शवणे????
ते तुम्हालाच जमत असेल
ते तुम्हालाच जमत असेल चमचेगीरी करणे.
Pages