युगांतर- आरंभ अंताचा! भाग ३४

Submitted by मी मधुरा on 19 August, 2019 - 09:22

"प्रणाम द्रोणाचार्य."
"प्रणाम. काय झाले कृपाचार्य? तुम्ही अस्वस्थ का दिसत आहात अजूनही?"
"तुम्ही पाहिलेत ना काय झाले ते."
"हो. पण तुम्ही का चिंतेत आहात?"
"का नसेन, द्रोणाचार्य?"
"कारण तुम्हाला वाटलेली भिती सत्यात उतरली नाही."
"म्हणजे?"
"दुर्योधन स्पर्धेत विजयी झाला नाही, कुलगुरु. तुम्ही तर आनंदी असायला हवे. चिंतीत नाही." द्रोणाचार्य हसत म्हणाले.
"तुम्ही मला चुकीचे समजत आहात द्रोणाचार्य. दुर्योधनाचा पराजय हस्तिनापुरचा एक आधारस्तंभ इतर आधारस्तंभांपेक्षा कमकुवत असल्याचे द्योतक आहे..... आणि मी कुठे हस्तिनापुरापेक्षा वेगळा आहे, गुरुवर? मी कसा आनंदी होईन दुर्योधनाच्या पराजयाने?"
"म्हणजे ?" द्रोणाचार्य आश्चर्याने म्हणाले, "मला तर वाटलं तुम्ही निश्चित व्हालं, दुर्योधन भीमकडून हरला म्हणल्यावर."
"मी दुर्योधनाविरूध्द नाही, गुरुवर."
"काय? कृपाचार्य? हे तुम्ही बोलता आहात?"
"हो, द्रोणाचार्य. मी हस्तिनापुरचे कुलगुरु पद भूषवतो आणि तुमच्याआधी राजपुत्रांना विद्या देण्याची जवाबदारीही माझ्यावरच होती. अगदी तेव्हा पासून ओळखतो मी या राजपरिवाराला..... अगदी जवळून! इथे सर्व कोणाचे ना कोणाचे पक्षधरं आहेत. मी ही याला अपवाद नाही."
"कोणाच्या पक्षात आहात मग तुम्ही?
"हस्तिनापुराच्या पक्षात आहे मी, द्रोणाचार्य. म्हणून केवळ हस्तिनापुरच्या भविष्याचा विचार करतो. कोण्या एका राजकुमाराच्या जय-पराजयाचा नाही."
"मग दुर्योधन विजयी होऊ नये असे का वाटते तुम्हाला?"
"कारण दुर्योधनाची मुळ शक्ती दैत्य प्रवृत्तीची आहे, गुरुवर."
"म्हणजे?"
"दैत्य प्रवृत्तीकडे ताकद असते, शक्ती असते. परंतु विवेकबुद्धी? ती मात्र नसते. प्रचंड हलक्या कानाचे असतात दैत्य प्रवृत्तीचे. ते अनुसरण करतात केवळ स्वतःच्या स्वार्थी विचारांचे. त्यांना असत्य, अयोग्य मार्गांची मोहिनी पडते, गुरुवर! मग सत्य आणि धर्म जाणून सुद्धा तो आचरत नाहीत ते. त्यात एखाद्या चुकीच्या व्यक्तीची संगत झाली, की मग त्यांच्या सुधारण्याची शक्यता म्हणजे भर अमावास्येला चंद्र दर्शन! शक्तीवर योग्य विचारांचा अंकुश नसेल ना, तर ती शक्ती विनाश करते, गुरुवर.... केवळ विनाश!"
"असे का वाटते तुम्हाला कुलगुरु? आज पाहिलेत ना तुम्ही! एका अनोळखी व्यक्तीचाही अपमान सहन होऊ नये इतका हळवा आहे दुर्योधन. क्षणात अंग प्रदेशाचे अधिपत्य एका अनोळखी व्यक्तीला देण्या इतका इतका उदारही आहे. परक्या व्यक्तीच्या अपमानाच्या जखमेवर मलमपट्टी करू पाहिली त्याने. हे त्याने स्वतः केले. कुणा दुसऱ्याच्या सांगण्याचे अनुसरण नव्हते ते."
"कारण कर्णाने द्वंद्वासाठी आवाहन त्याला केले जो राजगादीचा दावेदार आहे. ती च राजगादी, द्रोणाचार्य, जिच्यावर दुर्योधन स्वतःचा अधिकार समजतो. कर्ण जिंकू शकेल असं समजून त्याने अंग देशाचा राजा बनवून कर्णाला उपकारांच्या ओझ्याखाली दाबलं. अर्थात जर कर्ण जिंकला असता, तर तो त्याच्या विजयाचे फळ सरळ सरळ आणून दुर्योधनाच्या पायी ठेवेल, असा बंदोबस्त केला त्याने."
"कृपाचार्य, मित्र बनवण्यात आणि मैत्री निभावण्यात दुर्योधन कधीच कपट येऊ देत नाही. मी पाहिली आहे अश्वत्थामा आणि दुर्योधनची मैत्री. तो बंधुत्व आणि मैत्री उत्तम निभावतो."
"पांडवां बद्दलचा द्वेष पाहूनही तुम्ही असं म्हणता आहात?"
"दुर्योधनाला नवव्यान्नव अनुज आहेत. ते त्याच्यावर किती प्रेम करतात, त्याचा किती आदर करतात, तेपाहिले आहेत ना तुम्ही? कौशल्य दाखवायलाही त्याच्या पुढे शस्त्र उचलत नाहीत त्याचे अनुज. विचार करा, कृपाचार्य! हे बंधुत्व तर पांडवांमध्येही नाही. पांडवांशी असलेले वैरही एका लहान-सहान कारणामुळे आहे. ते म्हणजे, दुर्योधनाला जेष्ठत्व गाजवलेले चालत नाही, इतकेच."
"इतकेच नाही, द्रोणाचार्य. त्याला हस्तिनापुरवरही कोणी हक्क दाखवलेला चालत नाही. त्याचे अनुज राजगादीचे स्वप्नच पाहत नाहीत, म्हणून हे टिकून आहे हे बंधुत्व. तो राजगादीसाठी कपट, छळ, अधर्म..... काहीही करू शकतो."
"असं तुम्हाला वाटतं असेल तर, दुर्योधनाला तुम्ही नीट ओळखलेलेच नाही."
"दुर्योधनाला स्वतःची ओळख आहेच कुठे, द्रोणाचार्य? गांधार नरेशने त्याला त्याची ओळख मिळवू कुठे दिली आहे? त्याचे निर्णय हे स्वतःचे कधी नसतातच. तो केवळ एक बोलका बाहुला आहे, द्रोणाचार्य. शकुनीला हवे तसा चालणारा, वागणारा आणि जगणारा एक बोलका बाहुला! ज्याचे स्वतःचे काही मत नसते, काही विचार नसतात आणि ज्याच्या दोऱ्या केवळ गांधारनरेशच्या हातात असतात."
"कृपाचार्य, तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे." भीष्माचार्य कक्षातच आलेत हे लक्षात आल्यावर दोघांनी त्यांना हात जोडून नमस्कार केला.
"तुम्हालाही असेच वाटते भीष्माचार्य?"
"हो, द्रोणाचार्य! दुर्दैवाने गांधारनरेशच्या हातातले प्यादे बनला आहे दुर्योधन."
"तेच सांगत होतो मी, महामहीम."
"पण आज कर्णाच्या बाबतीत दुर्योधन जे वागला ते मात्र तो स्वतःच्या मनापासून वागला, कृपाचार्य."
"भीष्माचार्य?" कृपाचार्यांनी आश्चर्याने बघितले.
"दुर्योधन कधी गांधारनरेश सोडून दुसऱ्या कोणाचे ऐकत नाही. पण यावेळी मी त्याला स्वतःच्या मनानुसार वागताना पाहिले. आणि कोणाच्या आदेशाचे अनुसरण अजिबात नव्हते ते!"
"कश्यावरून भीष्माचार्य?"
"आज्ञा पालन करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर कधी ते स्मित नसते कृपाचार्य, जे आज दुर्योधनाच्या मुखावर पसरले होते. दुर्योधनाने आज जे केले ते त्याच्या स्वतःच्या मनाने केले. मग त्याचे कारण कर्णाचे अर्जुनाला ललकारण्याचे धाडसही असू शकेल अथवा कर्णाचे असामान्य तेजही."
"हो.... त्याच्या त्या सुवर्ण वस्त्रामुळे तर सर्वच प्रभावित झाले होते. मला हाच प्रश्न पडला होता की एका सूत पुत्राकडे इतके सुंदर वस्त्र आले कुठून?"
"ते वस्त्र नाही, कवच आहे, कृपाचार्य. जन्मापासूनच आहे त्याच्याकडे. ते कवच त्वचेप्रमाणे त्याच्या शरीरानुसार आकारमान बदलते. ते दिव्य आहे. पण कोणालाच माहितं नाही ते त्याच्याकडे आले कसे! "
"द्रोणाचार्य? काय म्हणता आहात? खरचं? आणि तुम्हाला कसे माहित हे?" कृपाचार्यांनी प्रश्न केला.
द्रोणाचार्य भूतकाळात हरवत म्हणाले, "शब्द दिला नसता तर मला दोन असामान्य विद्यार्थी गमवावे लागले नसते, कृपाचार्य.... ज्यांना मी शिष्यत्व नाकारले त्यांच्यापैकीच एक होता तो..... कर्ण." त्यांच्या चेहऱ्यावर दु:खी छटा होत्या.
"म्हणजे तुम्हाला आधीपासूनच माहित होते की तो सूतपुत्र आहे? मग...." कृपाचार्यांना कळेच ना की मग द्रोणाचार्य स्पर्धेच्या वेळी गप्प का राहिले!
"आधी फक्त तसा संशय होता. अधिरथ आला तेव्हा खात्री पटली."
'तरीच द्रोणाचार्यांच्या चेहऱ्यावर इतके आश्चर्य नव्हते.' कृपाचार्य हसले.
भीष्माचार्यांनी मुद्याला हात घातला. "द्रोणाचार्य, आजचे आयोजन व्यर्थ गेले. आता कसे निवडायचे भावी महाराज?"
"आता ह्या द्रोणाचार्याला गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली आहे, भीष्माचार्य. उद्या जो शिष्य माझी गुरुदक्षिणा मला देईल, तो विजेता!"
"द्रोणाचार्य? गुरुदक्षिणेवरून महाराज कसे ठरवणार आपण?"
"माझ्यावर विश्वास ठेवा, महामहीम. योग्य दावेदारच राजगादीवर बसेल."
कृपाचार्य आता अजून जास्त अस्वस्थ झाले होते. 'गुरुदक्षिणा' शब्द ऐकून त्यांना एकलव्यची आठवण झाली आणि ते धास्तावले.
"काय मागणार आहात तुम्ही गुरु द्रोण?"
"शांतता मागणार आहे कृपाचार्य. मनाची हरवलेली शांतता मागणार आहे."
"म्हणजे?" उद्वीग्न होत कृपाचार्यांनी विचारले.
"एक हिशोब राहिला आहे, कुलगुरू. खूप जूना...... केलेल्या अपमानाचा!"
---------
"थांबाsss" किंचाळत कुंती झोपेतून जागी झाली तसा गांधारीने आन मान धपक्याने तिचा हात पकडत तो थोपटला, "कुंती, काय झालं ? ठीक आहेस ना तू?"
कुंती कुठल्या तरी विचित्र मनोवस्थेत आहे, हे कळण्याकरता गांधारीला कुंतीचा चेहरा बघण्याची गरज नव्हती.
"काही नाही, महाराणी..... काही नाही."
"कुंती, काल बेशुद्ध पडली होतीस तू. मला तर भिती वाटली. जेव्हा वैद्य म्हणाले सर्व ठीक आहे, तेव्हा जीव भांड्यात पडला." कुंतीच्या चेहऱ्यावरून तिने हात फिरवला.
"कालच्या स्पर्धेचे काय झाले?"
"काहीच नाही, कुंती. सुर्यास्त झाला आणि स्पर्धा अपूर्ण राहिली. पूर्ण झाली असती खरं, कर्ण आला नसता तर."
"कर्ण??"
"ज्याने अर्जुनला द्वंद्व युध्दासाठी आवाहन केले ना, तो. अगं विदूर सांगत होते, कि तो काहीतरी सचेतन ताऱ्याच्या तुकड्यासारखा दिसतो म्हणून. आपल्या अधिरथाचाच पुत्र आहे. तो मध्ये आला नसता तर बरे झाले असते. मला दुर्योधन आणि भीम समोरासमोर आले की धडकी भरते गं. कालचं अपूर्ण राहिलं म्हणून आता पुन्हा नवीन स्पर्धा आयोजन होणार. पुन्हा सर्वांची थकावट. पुन्हा ती च भिती. पण यावेळी तू काळजी घे हं तब्येतीची."
गांधारीने दासींकडून फळांनी भरलेली थाळी कुंती समोर ठेवून घेतली आणि पुन्हा एकदा 'तब्येतीची काळजी घे.' असे सांगत तिने कक्ष सोडला.
कुंतीने खिडकीतून नुकत्याच उगवलेल्या सुर्यदेवांच्या तांबड्या रुपाकडे पाहिले.
'कर्ण.....आपला पुत्र, सुर्यदेव! जिवंत आहे. तो.... तो जिवंत आहे..... सुखरूप आहे. मनातलं शल्य गेलं आज.' कुंतीने आनंदाने डोळे पुसले. 'तो इथेच आहे, सुर्यदेव.... हस्तिनापुरात. माझ्या खूप जवळ. तुम्ही दिलेले खरचं कवच शोभून दिसते त्याला.' कालचा प्रसंग आठवला आणि क्षणात तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती उठून अस्वस्थपणे फेऱ्या घालू लागली. 'आज.....त्याने स्वतःच्याच अनूजला द्वंद्व आव्हान दिले. बाकीच्यांनी एकमेकांसोबत द्वंद्व केलं तेव्हा त्यांना माहित होतं की ते एकमेकांचे बंधु आहेत. पण कर्ण? त्याला नातं माहित नाही.... कर्णाकडे तर कवच आहे.... पण अर्जुन? जर काही झालं असतं अर्जुनला तर? नाही.....मला हा विचारही सहन नाही होतं.'

© मधुरा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्यांना फक्त चुकाच दिसतात त्यांना न सांगीतलेलच बरं. मधुरा तु लिहीत रहा.

स्वप्नाली ही प्रतिक्रिया एकदम बरोबर आहे तूझी

उगीच गैरसमज नको कोणाचा .

काही ठिकाणी तर BR चे महाभारत पण चुकीचे, वाढीव असते.
बाकी सुर्यपुत्र कर्ण, मृत्युंजय, राधेय तर इतिहासाची केलेली तोडमोड आहे निव्वळ. पण त्यातही काही घटना खऱ्या आहेत.
तुम्हाला हे समजवावं लागेल, असं वाटलं नव्हतं.
असो, धन्यवाद!

मधुरा हा प्रतिसाद मला मनापासून खुप आवडला.

धन्यवाद शिव. Happy
धन्यवाद सुपु. Happy
धन्यवाद अशोक. Happy Happy

काही ठिकाणी तर BR चे महाभारत पण चुकीचे, वाढीव असते.
बाकी सुर्यपुत्र कर्ण, मृत्युंजय, राधेय तर इतिहासाची केलेली तोडमोड आहे निव्वळ>> अगदी अगदी. ते लोक काय काम धाम नसलेले लेखक, दिग्दर्शक होते. त्यांच्याकडे कुठला आलाय उत्साह आणि अभ्यासू वृत्ती. तुम्ही नोकरी धंदा सांभाळून वेळ मिळताच आठ दहा संदर्भ ग्रंथ समोर ठेऊन "धर्मसंस्थापनार्थ लिखितामि अहोरात्रं" करीत आहात ह्याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही संदेह नाही. Happy

भरपूर रेफरेन्सेस आहेत. सगळे देत बसू शकत नाही. >> असे का? काही अभ्यास पूर्ण लिहिले की रेफरन्सेस द्यावे लागतात. तुम्ही हे भाकडकथा, परिकथा म्हणुन लिहित असाल तर मग काही गरजेच नाही. Happy

जे सोप्प्या पद्धतीने कळतील, आवडतील असे देते आहे. >>सोप्पे? Uhoh फारच बुवा तुम्ही वाचकांना माठ समजता. त्यांना काय आवडते (चमत्कार का? ) तेही परस्पर ठरवून टाकले. Sad

"Uncertainty principle" हे जरा जास्तच व्यक्तीगत होतयं!

अगदी अगदी. ते लोक काय काम धाम नसलेले लेखक, दिग्दर्शक होते. त्यांच्याकडे कुठला आलाय उत्साह आणि अभ्यासू वृत्ती.
>> पॉईंट आहे यात.

मधुरा

पृथ्वीवर काही माणसाचा जन्म जगाला त्रास देण्यासाठी झालेला असतो.

असेच मायबोलीवरच काही आयडी आहेत .जे चांगल्या लेखका वर टीका करून स्वतः च्या अक्कले चे तारे तोडत आहे
अणि स्वतःलाच विद्वान समजत आहे .
माझी तुला विनंती आहे की तु अश्या माणसांना कडे तु दुर्लक्ष कर

अणि तुझा लेखना चा प्रपंच चालु ठेव .त्यामध्ये खंड पडून देऊ नको

सत्यमेव जयते .
अणि

best of luck

मधुराताई, मला अशोक यांचा मुद्दा अतिशय योग्य वाटला. keep writing! All the best! हायझेनबर्ग(uncertainty principleवाले) तुम्ही एक उच्चप्रतीचे लेखक असून हे महाभारत वैगरे तुमचे पाठच असणार यात काही शंका नाही! तुम्ही छान एखादी भयकथा लिहा. उगीच timepass होईल महाभारत वाचनात!

मधुरा तु एक प्रामाणिक लेखिका आहेस .
आम्हा सर्व वाचकांना खात्री आहे की तू कुठल्याही टीकेने खचून न जाणारी लेखिका आहेस.
आम्ही सर्व वाचक तुझ्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत आहोत.

अशोक, शिव,
तुमच्या सारखे वाचक मिळाले, या बद्दल मानेन तितके आभार कमी आहेत. Happy
तुमचा सल्ला पटला आणि आवडलाही. Happy
मनापासून धन्यवाद दोघांचे. Happy

प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद मधुरा .
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.अणि
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

मेहनतीने केलेल्या रिसर्च मधून निघालेल्या क्वालिटी प्रॉडक्ट ऐवजी लोकांना सहजी हातात मिळालेले मेड अप, चीप, नॉक-ऑफ, पायरेटेड प्रॉडक्ट्स पटकन पचनी पडतात.. हा मानसिकतेचा भाग झाला. ह्याच मानसिकतेचा वापर करून काहीही ऑथेंटिसिटी नसलेल्या कंपन्या अशा प्रॉडक्ट्सचा पुरवठा करतात. कंपन्या आणि ग्राहकांना प्रॉडक्ट्च्या क्वालिटीशी काहीच घेणे देणे नसते किंवा कालांतराने ते ऊरत नाही. आणि अर्थात जस-जसा प्रत्येक मेड-अप मालाला ऊठाव मिळत राहतो तस-तसे ओरिजिनल क्वालिटी प्रॉड्क्ट दुर्मिळ होत राहते.

ह्या निमित्ताने ईरावती कर्व्यांच्या युगांतची प्रस्तावना चटकन आठवली. सर्व लेखकांनी खास करून धर्म, ईतिहास, वैदिक काळ ह्यांच्या संदर्भाने लिहिणार्‍या लेखकांनी ऊथळपणा टाळून, मूळ (जुन्यात जुन्या) स्त्रोताला प्रमाण मानून लिहिणे किती महत्वाचे आहे. एक प्रकारची सामाजिक जबाबदारीच आहे ही. "मृत्युंजय, राधेय तर इतिहासाची केलेली तोडमोड आहे निव्वळ." अशी विधाने करतांना आपले लेखन प्रमाण कसे? हे सांगण्याची जबाबदारी तुमच्यावर आपसूक पडते. तुम्हाला "मधुराचे महाभारत" लिहायचे आहे ... जरूर लिहा पण मी लिहिते तोच खरा ईतिहास आहे बाकी हे/ते खोटे आहे अशी बेजबाबदार विधाने करून नव-वाचकांची दिशाभूल करतांना संयंम बाळगणे जरूरी आहे.

रच्याकने, सत्यवती कुठे गायबली पर डे जास्त मागत होती म्हणुन कथेतुन बाहेर काढलं की काय.

Submitted by Akku320 on 19 August, 2019 -
>> असे प्रतिसाद पाहून कपाळावर हात मारला.

हायझेनबर्ग, या महाराष्ट्रात प्रत्येक बालकाला रामायण,महाभारत, श्रीशिवछत्रपती महाराज यांचे बाळकडू पाजले जाते. त्यामुळे हा इतिहास आम्हाला वेगळा शिकवण्याची गरज नाहीये! पण तुमचे याआधीचे प्रतिसाद वाचताना कळून येईल की तुम्ही खोडसाळपणे सदर लेखिकेस न लिहिण्यास भाग पाडत आहे.

यामागच्या पाच-सहाव्या भागात तुम्ही महाभारतविषयावर लिहू नये असे indirectly प्रतिसादात लिहिले होते. आणि 34 व्या भागात तुम्हीच प्रतिसाद देता (याअर्थी तुम्हीही वाचत आहात) ही विसंगती अढळून येते!

यामागच्या पाच-सहाव्या भागात तुम्ही महाभारतविषयावर लिहू नये असे indirectly प्रतिसादात लिहिले होते. आणि 34 व्या भागात तुम्हीच प्रतिसाद देता (याअर्थी तुम्हीही वाचत आहात) ही विसंगती आढळून येते!<<<<<

शिव
तुमच्या प्रतिसादाशी मी सहमत आहे .

खुप उत्तम प्रतिसाद .

रुमाल टाकुन गेलो होतो गं. हा भाग पण छान झालाय. रच्याकने, सत्यवती कुठे गायबली पर डे जास्त मागत होती म्हणुन कथेतुन बाहेर काढलं की काय.>>>
आणि त्यावर हा प्रतिसाद!
धन्यवाद अक्कु, प्रॉडक्षन हाऊस ला परवडत नाही रे ती ! भीष्माचार्यांकडून राज्यच घेतले तेव्हापासून धास्तावले होते सारे आणि त्यात तिने गांधारी कांडही केलं. म्हणून आउट !
>>>>>>>
गांधारी कांड हे कधी झालं आणि मला कसं माहिती नाही.
>>>>>>>>
मग आता त्या सत्यवती कुठे असतात.

नवीन Submitted by Akku320 on 19 August, 2019 - 12:44
अक्कु, I was joking. तिचा उल्लेख येणार आहे. पण आत्ता लाईम लाईट वेगळ्या व्यक्तीरेखेवर आहे. Happy

नवीन Submitted by मधुरा कुलकर्णी on 19 August, 2019 - 13:14

लेखिकेना एक स्पष्ट विनंती करावीशी वाटतेय, महाभारतासारख्या विषयावर लेखन करताना अशा फालतू कमेंट्स टाकून त्या गौरवशाली महाकाव्याचा विपर्यास करण्यापेक्षा लिहिणं बंद केलं तरी चालेल.
सत्यवती काही कुणा चित्रपटाची हिरोईन नव्हती, एका गौरवशाली साम्राज्याची अधिपती होती, वेदांची माता होती.
पर डे, प्रॉडक्शन हाऊसची एवढीच हौस असेल, तर सिरीयलसाठीच लिखाण करावं.

(आणि हो, पर डेचा जमाना संपलाय आता, काँट्रॅक्टस असतात. कुणाला वाटत असेल, की पर डे वर कलाकार काम करत असतील, तर त्यांनी त्या पेजरच्या जमान्यातून बाहेर यावं)

shiv pawar
20 August, 2019 - 10:35
हायझेनबर्ग, स्वःताला फार मोठे विचारवंत लेखक समजू नका! तुम्ही काय chetan bhagat नाही! आणि तुम्हाला फारच reference ची खाज असेल तर wikipedia वर "महाभारत" search करा! तुमच्यामुळे त्या लेखिकेने आजचा भाग टाकला नाही.

रामायण, महाभारताचे बाळकडू लहानपणीच मिळालेल्यांची संस्कारी भाषा बघा. Sad
ह्यांच्यासाठी मोठ्या लेखकाचे ऊदाहरण म्हणजे चेतन भगत ऐकून हृदय पिळवटून निघाले. Sad

तुमच्या पिळवटलेल्या ह्रदया साठी- ''एका छोट्या website वर 60-70 चाहते आहे, तेही "heisenberg" या थोर शास्रञाच्या चोरलेल्या नावाने कुठे 60-70 कुठे 6.3 million? कोण आहात तुम्ही? C.bhagat यांची पाया खालची धुळही नाही आहात तुम्ही. एकतरी कादंबरी लिहा स्वःताची 1000 मिळाले तरी खूप झाले!"

आणि राहिला विषय लेखक निवडीचा आणि आदर्शांचा मी लिहायला "paulo coelho" यांचे नावही लिहिले असते पण तुमच्या सारख्या "खोडसाळ" माणसाची तुलना त्यांचाशी होणे शक्य नाहीँ.

पॉलो कोएलो.. Lol
आता पुढे काय डॅन ब्राऊन नि सिडने शेल्डन काय Rofl

Pages