"प्रणाम द्रोणाचार्य."
"प्रणाम. काय झाले कृपाचार्य? तुम्ही अस्वस्थ का दिसत आहात अजूनही?"
"तुम्ही पाहिलेत ना काय झाले ते."
"हो. पण तुम्ही का चिंतेत आहात?"
"का नसेन, द्रोणाचार्य?"
"कारण तुम्हाला वाटलेली भिती सत्यात उतरली नाही."
"म्हणजे?"
"दुर्योधन स्पर्धेत विजयी झाला नाही, कुलगुरु. तुम्ही तर आनंदी असायला हवे. चिंतीत नाही." द्रोणाचार्य हसत म्हणाले.
"तुम्ही मला चुकीचे समजत आहात द्रोणाचार्य. दुर्योधनाचा पराजय हस्तिनापुरचा एक आधारस्तंभ इतर आधारस्तंभांपेक्षा कमकुवत असल्याचे द्योतक आहे..... आणि मी कुठे हस्तिनापुरापेक्षा वेगळा आहे, गुरुवर? मी कसा आनंदी होईन दुर्योधनाच्या पराजयाने?"
"म्हणजे ?" द्रोणाचार्य आश्चर्याने म्हणाले, "मला तर वाटलं तुम्ही निश्चित व्हालं, दुर्योधन भीमकडून हरला म्हणल्यावर."
"मी दुर्योधनाविरूध्द नाही, गुरुवर."
"काय? कृपाचार्य? हे तुम्ही बोलता आहात?"
"हो, द्रोणाचार्य. मी हस्तिनापुरचे कुलगुरु पद भूषवतो आणि तुमच्याआधी राजपुत्रांना विद्या देण्याची जवाबदारीही माझ्यावरच होती. अगदी तेव्हा पासून ओळखतो मी या राजपरिवाराला..... अगदी जवळून! इथे सर्व कोणाचे ना कोणाचे पक्षधरं आहेत. मी ही याला अपवाद नाही."
"कोणाच्या पक्षात आहात मग तुम्ही?
"हस्तिनापुराच्या पक्षात आहे मी, द्रोणाचार्य. म्हणून केवळ हस्तिनापुरच्या भविष्याचा विचार करतो. कोण्या एका राजकुमाराच्या जय-पराजयाचा नाही."
"मग दुर्योधन विजयी होऊ नये असे का वाटते तुम्हाला?"
"कारण दुर्योधनाची मुळ शक्ती दैत्य प्रवृत्तीची आहे, गुरुवर."
"म्हणजे?"
"दैत्य प्रवृत्तीकडे ताकद असते, शक्ती असते. परंतु विवेकबुद्धी? ती मात्र नसते. प्रचंड हलक्या कानाचे असतात दैत्य प्रवृत्तीचे. ते अनुसरण करतात केवळ स्वतःच्या स्वार्थी विचारांचे. त्यांना असत्य, अयोग्य मार्गांची मोहिनी पडते, गुरुवर! मग सत्य आणि धर्म जाणून सुद्धा तो आचरत नाहीत ते. त्यात एखाद्या चुकीच्या व्यक्तीची संगत झाली, की मग त्यांच्या सुधारण्याची शक्यता म्हणजे भर अमावास्येला चंद्र दर्शन! शक्तीवर योग्य विचारांचा अंकुश नसेल ना, तर ती शक्ती विनाश करते, गुरुवर.... केवळ विनाश!"
"असे का वाटते तुम्हाला कुलगुरु? आज पाहिलेत ना तुम्ही! एका अनोळखी व्यक्तीचाही अपमान सहन होऊ नये इतका हळवा आहे दुर्योधन. क्षणात अंग प्रदेशाचे अधिपत्य एका अनोळखी व्यक्तीला देण्या इतका इतका उदारही आहे. परक्या व्यक्तीच्या अपमानाच्या जखमेवर मलमपट्टी करू पाहिली त्याने. हे त्याने स्वतः केले. कुणा दुसऱ्याच्या सांगण्याचे अनुसरण नव्हते ते."
"कारण कर्णाने द्वंद्वासाठी आवाहन त्याला केले जो राजगादीचा दावेदार आहे. ती च राजगादी, द्रोणाचार्य, जिच्यावर दुर्योधन स्वतःचा अधिकार समजतो. कर्ण जिंकू शकेल असं समजून त्याने अंग देशाचा राजा बनवून कर्णाला उपकारांच्या ओझ्याखाली दाबलं. अर्थात जर कर्ण जिंकला असता, तर तो त्याच्या विजयाचे फळ सरळ सरळ आणून दुर्योधनाच्या पायी ठेवेल, असा बंदोबस्त केला त्याने."
"कृपाचार्य, मित्र बनवण्यात आणि मैत्री निभावण्यात दुर्योधन कधीच कपट येऊ देत नाही. मी पाहिली आहे अश्वत्थामा आणि दुर्योधनची मैत्री. तो बंधुत्व आणि मैत्री उत्तम निभावतो."
"पांडवां बद्दलचा द्वेष पाहूनही तुम्ही असं म्हणता आहात?"
"दुर्योधनाला नवव्यान्नव अनुज आहेत. ते त्याच्यावर किती प्रेम करतात, त्याचा किती आदर करतात, तेपाहिले आहेत ना तुम्ही? कौशल्य दाखवायलाही त्याच्या पुढे शस्त्र उचलत नाहीत त्याचे अनुज. विचार करा, कृपाचार्य! हे बंधुत्व तर पांडवांमध्येही नाही. पांडवांशी असलेले वैरही एका लहान-सहान कारणामुळे आहे. ते म्हणजे, दुर्योधनाला जेष्ठत्व गाजवलेले चालत नाही, इतकेच."
"इतकेच नाही, द्रोणाचार्य. त्याला हस्तिनापुरवरही कोणी हक्क दाखवलेला चालत नाही. त्याचे अनुज राजगादीचे स्वप्नच पाहत नाहीत, म्हणून हे टिकून आहे हे बंधुत्व. तो राजगादीसाठी कपट, छळ, अधर्म..... काहीही करू शकतो."
"असं तुम्हाला वाटतं असेल तर, दुर्योधनाला तुम्ही नीट ओळखलेलेच नाही."
"दुर्योधनाला स्वतःची ओळख आहेच कुठे, द्रोणाचार्य? गांधार नरेशने त्याला त्याची ओळख मिळवू कुठे दिली आहे? त्याचे निर्णय हे स्वतःचे कधी नसतातच. तो केवळ एक बोलका बाहुला आहे, द्रोणाचार्य. शकुनीला हवे तसा चालणारा, वागणारा आणि जगणारा एक बोलका बाहुला! ज्याचे स्वतःचे काही मत नसते, काही विचार नसतात आणि ज्याच्या दोऱ्या केवळ गांधारनरेशच्या हातात असतात."
"कृपाचार्य, तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे." भीष्माचार्य कक्षातच आलेत हे लक्षात आल्यावर दोघांनी त्यांना हात जोडून नमस्कार केला.
"तुम्हालाही असेच वाटते भीष्माचार्य?"
"हो, द्रोणाचार्य! दुर्दैवाने गांधारनरेशच्या हातातले प्यादे बनला आहे दुर्योधन."
"तेच सांगत होतो मी, महामहीम."
"पण आज कर्णाच्या बाबतीत दुर्योधन जे वागला ते मात्र तो स्वतःच्या मनापासून वागला, कृपाचार्य."
"भीष्माचार्य?" कृपाचार्यांनी आश्चर्याने बघितले.
"दुर्योधन कधी गांधारनरेश सोडून दुसऱ्या कोणाचे ऐकत नाही. पण यावेळी मी त्याला स्वतःच्या मनानुसार वागताना पाहिले. आणि कोणाच्या आदेशाचे अनुसरण अजिबात नव्हते ते!"
"कश्यावरून भीष्माचार्य?"
"आज्ञा पालन करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर कधी ते स्मित नसते कृपाचार्य, जे आज दुर्योधनाच्या मुखावर पसरले होते. दुर्योधनाने आज जे केले ते त्याच्या स्वतःच्या मनाने केले. मग त्याचे कारण कर्णाचे अर्जुनाला ललकारण्याचे धाडसही असू शकेल अथवा कर्णाचे असामान्य तेजही."
"हो.... त्याच्या त्या सुवर्ण वस्त्रामुळे तर सर्वच प्रभावित झाले होते. मला हाच प्रश्न पडला होता की एका सूत पुत्राकडे इतके सुंदर वस्त्र आले कुठून?"
"ते वस्त्र नाही, कवच आहे, कृपाचार्य. जन्मापासूनच आहे त्याच्याकडे. ते कवच त्वचेप्रमाणे त्याच्या शरीरानुसार आकारमान बदलते. ते दिव्य आहे. पण कोणालाच माहितं नाही ते त्याच्याकडे आले कसे! "
"द्रोणाचार्य? काय म्हणता आहात? खरचं? आणि तुम्हाला कसे माहित हे?" कृपाचार्यांनी प्रश्न केला.
द्रोणाचार्य भूतकाळात हरवत म्हणाले, "शब्द दिला नसता तर मला दोन असामान्य विद्यार्थी गमवावे लागले नसते, कृपाचार्य.... ज्यांना मी शिष्यत्व नाकारले त्यांच्यापैकीच एक होता तो..... कर्ण." त्यांच्या चेहऱ्यावर दु:खी छटा होत्या.
"म्हणजे तुम्हाला आधीपासूनच माहित होते की तो सूतपुत्र आहे? मग...." कृपाचार्यांना कळेच ना की मग द्रोणाचार्य स्पर्धेच्या वेळी गप्प का राहिले!
"आधी फक्त तसा संशय होता. अधिरथ आला तेव्हा खात्री पटली."
'तरीच द्रोणाचार्यांच्या चेहऱ्यावर इतके आश्चर्य नव्हते.' कृपाचार्य हसले.
भीष्माचार्यांनी मुद्याला हात घातला. "द्रोणाचार्य, आजचे आयोजन व्यर्थ गेले. आता कसे निवडायचे भावी महाराज?"
"आता ह्या द्रोणाचार्याला गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली आहे, भीष्माचार्य. उद्या जो शिष्य माझी गुरुदक्षिणा मला देईल, तो विजेता!"
"द्रोणाचार्य? गुरुदक्षिणेवरून महाराज कसे ठरवणार आपण?"
"माझ्यावर विश्वास ठेवा, महामहीम. योग्य दावेदारच राजगादीवर बसेल."
कृपाचार्य आता अजून जास्त अस्वस्थ झाले होते. 'गुरुदक्षिणा' शब्द ऐकून त्यांना एकलव्यची आठवण झाली आणि ते धास्तावले.
"काय मागणार आहात तुम्ही गुरु द्रोण?"
"शांतता मागणार आहे कृपाचार्य. मनाची हरवलेली शांतता मागणार आहे."
"म्हणजे?" उद्वीग्न होत कृपाचार्यांनी विचारले.
"एक हिशोब राहिला आहे, कुलगुरू. खूप जूना...... केलेल्या अपमानाचा!"
---------
"थांबाsss" किंचाळत कुंती झोपेतून जागी झाली तसा गांधारीने आन मान धपक्याने तिचा हात पकडत तो थोपटला, "कुंती, काय झालं ? ठीक आहेस ना तू?"
कुंती कुठल्या तरी विचित्र मनोवस्थेत आहे, हे कळण्याकरता गांधारीला कुंतीचा चेहरा बघण्याची गरज नव्हती.
"काही नाही, महाराणी..... काही नाही."
"कुंती, काल बेशुद्ध पडली होतीस तू. मला तर भिती वाटली. जेव्हा वैद्य म्हणाले सर्व ठीक आहे, तेव्हा जीव भांड्यात पडला." कुंतीच्या चेहऱ्यावरून तिने हात फिरवला.
"कालच्या स्पर्धेचे काय झाले?"
"काहीच नाही, कुंती. सुर्यास्त झाला आणि स्पर्धा अपूर्ण राहिली. पूर्ण झाली असती खरं, कर्ण आला नसता तर."
"कर्ण??"
"ज्याने अर्जुनला द्वंद्व युध्दासाठी आवाहन केले ना, तो. अगं विदूर सांगत होते, कि तो काहीतरी सचेतन ताऱ्याच्या तुकड्यासारखा दिसतो म्हणून. आपल्या अधिरथाचाच पुत्र आहे. तो मध्ये आला नसता तर बरे झाले असते. मला दुर्योधन आणि भीम समोरासमोर आले की धडकी भरते गं. कालचं अपूर्ण राहिलं म्हणून आता पुन्हा नवीन स्पर्धा आयोजन होणार. पुन्हा सर्वांची थकावट. पुन्हा ती च भिती. पण यावेळी तू काळजी घे हं तब्येतीची."
गांधारीने दासींकडून फळांनी भरलेली थाळी कुंती समोर ठेवून घेतली आणि पुन्हा एकदा 'तब्येतीची काळजी घे.' असे सांगत तिने कक्ष सोडला.
कुंतीने खिडकीतून नुकत्याच उगवलेल्या सुर्यदेवांच्या तांबड्या रुपाकडे पाहिले.
'कर्ण.....आपला पुत्र, सुर्यदेव! जिवंत आहे. तो.... तो जिवंत आहे..... सुखरूप आहे. मनातलं शल्य गेलं आज.' कुंतीने आनंदाने डोळे पुसले. 'तो इथेच आहे, सुर्यदेव.... हस्तिनापुरात. माझ्या खूप जवळ. तुम्ही दिलेले खरचं कवच शोभून दिसते त्याला.' कालचा प्रसंग आठवला आणि क्षणात तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती उठून अस्वस्थपणे फेऱ्या घालू लागली. 'आज.....त्याने स्वतःच्याच अनूजला द्वंद्व आव्हान दिले. बाकीच्यांनी एकमेकांसोबत द्वंद्व केलं तेव्हा त्यांना माहित होतं की ते एकमेकांचे बंधु आहेत. पण कर्ण? त्याला नातं माहित नाही.... कर्णाकडे तर कवच आहे.... पण अर्जुन? जर काही झालं असतं अर्जुनला तर? नाही.....मला हा विचारही सहन नाही होतं.'
© मधुरा
बापरे! इतके सारे प्रतिसाद
बापरे! इतके सारे प्रतिसाद बघून आले, म्हटले आधी प्रतिसाद वाचू अन मग लेख, पण इकडे तर मज्जाच चालुये☺️
<<<सर्व लेखकांनी खास करून धर्म, ईतिहास, वैदिक काळ ह्यांच्या संदर्भाने लिहिणार्या लेखकांनी ऊथळपणा टाळून, मूळ (जुन्यात जुन्या) स्त्रोताला प्रमाण मानून लिहिणे किती महत्वाचे आहे. एक प्रकारची सामाजिक जबाबदारीच आहे ही. "मृत्युंजय, राधेय तर इतिहासाची केलेली तोडमोड आहे निव्वळ." अशी विधाने करतांना आपले लेखन प्रमाण कसे? हे सांगण्याची जबाबदारी तुमच्यावर आपसूक पडते. तुम्हाला "मधुराचे महाभारत" लिहायचे आहे ... जरूर लिहा पण मी लिहिते तोच खरा ईतिहास आहे बाकी हे/ते खोटे आहे अशी बेजबाबदार विधाने करून नव-वाचकांची दिशाभूल करतांना संयंम बाळगणे जरूरी आहे.
Submitted by हायझेनबर्ग on 20 August, 2019 - 21:45>>>+१११११ मी क्रमशः कथा शक्यतो वाचत नाही, म्हणून ही देखील वाचली नाही तरी, लेखिका असे काही विधान करत असेल तर ते नक्कीच चुकीचे आहे
अन हो, तुम्हाला जे लिहायचे ते लिहा पण ऐतिहासिक पात्र अन कादंबरी चा अपमान नका करू
महाश्वेता, प्रतिसाद विनोदी
महाश्वेता, प्रतिसाद विनोदी होता. कदाचित समोरच्याने मजेत विचारले नसते तर मी ही मजेत उत्तर दिले नसते. पण प्रतिसाद आवडला नाही म्हणून लेखन थांबवण्याची विनंती? हे जरा अतिच होतयं.
VB, केवळ प्रतिसाद वाचणाऱ्यांनी चूका सांगायला सुरुवात केली तर चूका तर प्रत्येक गोष्टीत मिळतात. त्याला अंत नाही.
पुन्हा सांगते, जे मृत्युंजय आणि राधेयला ऐतिहासिक प्रमाण मानतात, त्यांनी राधेय ची प्रस्तावना वाचण्याचे कष्ट घ्यावेत.
रणजित देसाई स्वतःच सांगतात की त्यांच्या कथेतील कर्ण वास्तविक महाभारता पेक्षा वेगळा आहे.
मृत्यंजय बद्दल इथे वाचा.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=641070029339216&id=440861902...
मृत्युंजय/राधेय निर्विवादपणे एक रसाळ कादंबरी/पुस्तक आहे. ऐतिहासिक पात्रावर लिहिलेली पण पूर्ण सत्य नाही. कर्णाचे मुंडके छाटले होते अर्जुनाच्या बाणांनी खऱ्या महाभारतात! आणि मृत्युंजयमधे बाण लागून घायाळ झालेला कर्ण सोन्याचा दात दान करत होता. VB, इथे का विचार होत नाही ऐतिहासिक पात्रांच्या अपमानाचा?
आणि हो, मी लिहित असलेलं महाभारत हे माझ्या दृष्टीने लिहिलेले आहे, असं मी पहिल्या भागातच सांगितलं होतं. जे अर्धवट वाचून टिका करत आहेत, त्यांनी आधी ते वाचावं. तंतोतंत खरे महाभारत केवळ व्यास ऋषींनी लिहिले होते. आणि प्रश्न राहिला ज्यांना महाभारतच काल्पनिक आहे असे वाटते त्यांचा......त्यांनी खरंतर हे वाचण्याची तसदीच घेऊ नये.
VB, केवळ प्रतिसाद
VB, केवळ प्रतिसाद वाचणाऱ्यांनी चूका सांगायला सुरुवात केली तर चूका तर प्रत्येक गोष्टीत मिळतात. त्याला अंत नाही >>> मी जसे आधी लिहीले कि मी क्रमश: कथा वाचत नाही कारण त्यात खुप वेळ जातो पण एखाद्या कथेला जर भरपुर प्रतिसाद असले अन ते वाचुन ठरविते बरेचदा की मी सगळे भाग वाचण्यात माझा वेळ घालवावा की नाही. निगेटीव्ह प्रतिसादांनेदेखिल तितकासा फरक पडत नाहीप, पण मला ईथले तुमचेच काही प्रतिसाद पटले नाहीत.
VB, इथे का विचार होत नाही ऐतिहासिक पात्रांच्या अपमानाचा? >>> अहो, तुम्ही घ्या न तुमची लिबर्टी जशी त्यांनी घेतली त्यात काय एवढे, पण असे करताना किमान मला तरी तुमची भाषा खटकली. असो, तुम्हाला नाही आवडत न नकारात्मक प्रतिसाद तर दुर्लक्ष करा मला जे वाटले ते मी लिहिले.
अन हो, अजुन एक ईतरांसारखे
अन हो, अजुन एक ईतरांसारखे किमान मी तरी तुम्हाला लिहु नका असे बोलली नाही, कारण तो सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे, जसे वाचने न वाचने माझा. माझ्याकडुन तरी याविषयावरील तुमच्या लिखाणाला माझा पास, त्यामुळे नो कमेंट्स
VB, निगेटिव्ह प्रतिसादांचे
VB, निगेटिव्ह प्रतिसादांचे स्वागतच आहे. पण मग मी सुद्धा एखाद्या कादंबरी वर, पुस्तकावर, मालिकेवर प्रतिक्रिया देऊ शकते ना? त्यावर तुमचा आक्षेप का?
आणि संदर्भहीन टिका नाही केली मी.
असो. यापुढच्या भागांपासून मी या लेखमालेच्या धाग्यांवर प्रतिक्रिया देणार नसल्याचे ठरवले आहे. या धाग्यावरच्या प्रतिक्रिया वाचल्या बद्दल आभारी.
म्हटले न तुम्हाला नकारात्मक
म्हटले न तुम्हाला नकारात्मक प्रतिसाद रुचत नाहीत, असो,
<<मग मी सुद्धा एखाद्या कादंबरी वर, पुस्तकावर, मालिकेवर प्रतिक्रिया देऊ शकते ना? त्यावर तुमचा आक्षेप का?>>> मी तुमच्या प्रतिकीयेवर आ़क्षेप घेतला नाहीये, तुम्ही लिहा. पण तुमच्या प्रतिसादातील एक वाक्य <<सुर्यपुत्र कर्ण, मृत्युंजय, राधेय तर इतिहासाची केलेली तोडमोड आहे निव्वळ >>> हेच मुळात पटले नाही, अहो तोडमोड आहे निव्वळ म्हणजे काय? सगळे थापा आहे काय? कि फक्त एखादा प्रसंग खरा बाकी थापा?
असे नसते.
असो, मला खरेच आता यावर माझा वेळ वाया घालवायचा नाहीये, कारण माझ्यामते तुम्ही सर्व प्रकारच्या प्रतिसादासाठी स्वत:ला खुले केलेच नाही मग तुम्हाला दुसर्याचे म्हणने पटने अशक्य आहे
@मधुरा जर समोरच्याला
@मधुरा जर समोरच्याला तुमच्याशी काही प्राँब्लेम असेल तर तो त्यांचा प्राँब्लेम असतो तुमचा नाही.
मला एक कळत नाही तुम्ही सर्व
मला एक कळत नाही तुम्ही सर्व लेखक स्वःताला फार महान लेखक का समजता? जसे काही तुमचे 50-60 ग्रंथ लिहून झाले!
@मधुरा जर समोरच्याला
@मधुरा जर समोरच्याला तुमच्याशी काही प्राँब्लेम असेल तर तो त्यांचा प्राँब्लेम असतो तुझा नाही.<<<<हा प्रतिसाद एकदम योग्य आहे आणि .मी या प्रतीसादशी सहमत आहे .
Expect that you do not get upset by the negative response
नाही अशोक सर..... जे लोक
नाही अशोक सर..... मी नाही मनावर घेत अश्या प्रतिक्रिया. जे लोक 'क्रमशः' आहे म्हणून वाचण्याची तसदी घेत नाहीत पण केवळ लिहायचे म्हणून बहुचर्चित धाग्यावर आवर्जून प्रतिसाद खरडतात, ते लिंक मिळाल्यावर वाचून मगच पुढचे लिहितील अशी अपेक्षा ठेवणेच चुकीचे होते.
अक्कु, अशोक, काळजी करू नका. असे प्रतिसाद पाहून वाईट वाटणे साहजिकच आहे पण मी यामुळे लेखमाला बंद करणार नाहीये. कोणाला काय प्रयत्न करायचेत ते करू देत.
कोणाला काय प्रयत्न करायचेत ते
कोणाला काय प्रयत्न करायचेत ते करू देत.
नवीन Submitted by मधुरा कुलकर्णी on 21 August, 2019 - 12:02 >
अगदीच रहावले नाही म्हणुन...
खरेच धन्य आहे लेखिका अन कंपु, आता मात्र इकडचे प्रतिसाद देखिल नको वाचायला, चालु द्या तुमचे
VB चोराच्या मनात चांदणे असे
VB चोराच्या मनात चांदणे असे ऐकले आहेत का हो?
I mean.... that comment was not specifically witten for you. But you intervened again.
खरेच धन्य आहे लेखिका अन कंपु,
खरेच धन्य आहे लेखिका अन कंपु, आता मात्र इकडचे प्रतिसाद देखिल नको वाचायला, चालु द्या तुमचे
नवीन Submitted by VB on 21 August, 2019 - 02:47
>> सहमत.
हो अमर? मग नका वेळ वाया घालवू
हो अमर? मग नका वेळ वाया घालवू या धाग्यावर. तसेही कंपुगिरी आम्ही करतो आहोत ना तुमच्या मते..... हायझेनबर्ग आणि तुम्ही अजिबात नाही.
तुमच्या वतीने अशोक, शिव आणि
तुमच्या वतीने अशोक, शिव आणि इतर उत्तरं देत आहेत. ही कंपूगिरी नाहीय.
मधुरा, प्रतिसाद देणार नाही
मधुरा, प्रतिसाद देणार नाही लिहुन प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देणं हास्यास्पद आहे. मी तुम्हाला मागच्या काही भागातच सुचना केली होती.
प्रतिसाद लिहिण्यापेक्षा लेखनाकडे लक्ष द्या म्हणुन.
माबोवर जे दीड लोक आहेत ते स्वतःला अतिविद्वान समजतात.
जगातली काय ती अक्कल मलाच असं त्यांना वाटतं.
जे लेखन आपल्याला आवडत नाहीये त्यावर आवडलं नाही, किंवा का आवडलं नाही असे प्रतिसाद देणं किंवा पुढे जाउन हे लेखन आपल्यासाठी नाही (बुद्धी अतिच जास्त असल्याने) , ते न वाचणं आपल्या स्वतःच्या हातात आहे ही कळण्याचीही अक्कल त्यांच्याकडे नाहीये.
खरंतर तुमच्या अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष्य करण्याने भुंकणार्या कुत्र्याच्या तोंडात बाण मारुन त्याला गप्प करणार्या एकलव्यासारखं काम केलं असतं.
बघा पटलं तर.
अमर, ते उगाच काहीही लिहित
अमर, ते उगाच काहीही लिहित नाहीयेत.
कंपुगिरी कोणाला चुकीचे ठरवण्याकरता केली जाते. जे तुम्ही लोक करता आहात. जे मिपावर घडते.
आधीच्या धाग्यावर हायझेनबर्ग काहीच्या काही लिहित होते तेव्हा कोणीही मध्ये पडले नाहीत. कारण तेव्हा प्रतिक्रिया केवळ वाचकाचे मत आहे असे वाटले होते.
पण आता त्यांना माझी लेखमाला आवडत नसूनही ते धाग्यावर येतात. वर प्रतिक्रिया म्हणून सतत टोमणे मारत लिहितात. हे मान्य असेल तर त्यांच्या प्रतिक्रियेवर कोणी प्रतिक्रिया दिली तर काय बिघडले?
तुमच्या लेखनाविरूध्द उगाच टिका होत असेल आणि एखाद्या वाचकाने तुमच्या बाजूने त्या टिकेला उत्तर दिले, तर ती कंपुगिरी कशी?
उद्या तुमच्या लेखमालेच्या बाबतीत हेच घडलं, आणि मी तुमच्या बाजूने टिकेला उत्तर दिलं तर ती आपली कंपुगिरी असेल का?
पटलं सस्मित!
पटलं सस्मित!
मधुरा जी तुम्हाला आठवत असेल
मधुरा जी तुम्हाला आठवत असेल तर मी हाब यांना दोन तीन वेळा विनंती केली होती.
@मधुरा, मडक्या वरुन कितीही
@मधुरा, मडक्या वरुन कितीही पाणि टाकलं तरी वाहुनच जातं तशीच गत आहे यांची.
पटलं सस्मित!>>
पटलं सस्मित!>>
आता उद्या बघ कसे जाळ प्रतिसाद येतील
मी बरेच दिवस वाचुन कंट्रोल केलं. कशाला चिखल उडवुन घ्या स्वतःवर.
पण चिखल लैच दलदल व्हायला लागला आणि मला स्वस्थ बसवेना.
आणि तुझा माझा कंपु बिंपु नाहीए हा.
मी एक एकटीच आहे
आता इथे मी टोटल दुर्लक्ष करणार आहे.
बाय बाय.
पोट दुखीच प्रमाण वाढलेलं
पोट दुखीच प्रमाण वाढलेलं दिसतयं. madhura keep writing
सस्मित>>>>सहमत आहे!
सस्मित>>>>सहमत आहे! ज्या दीडशहाण्यांना आवडत नसेल त्यांनी वाचू नका!
हायझेनबर्ग आणि त्यांचे पिल्लु
हायझेनबर्ग आणि त्यांचे पिल्लु>>>नसलेली अक्कल दाखवणे बंद करा!
लगे रहो.
लगे रहो.
अरेरे दैत्य प्रवृत्तीच्या
अरेरे दैत्य प्रवृत्तीच्या शंभर कौरवांनी मूठभर पांडवांचा न्यायाचा आवाज अन्यायाने, बळाने दाबू पहिला तसेच चित्र दिसत आहे इथे. कलियुग कलियुग म्हणतात ते हेच.
मधुरा,
भुरट्या कौरव वाचकांपासून सावधान. त्यांच्या कौतुकाला फशी पडू नका.
मी खूप दिवसांपासून रोमात आहे,
मी खूप दिवसांपासून रोमात आहे, इथे बरेच जण चांगले लिहितात. सिद्धी, तुम्ही, अज्ञातवासी, महाश्वेता. पण तुमच्या कथेवरचे प्रतिसाद वाचून प्रतिसाद द्यावासा वाटतोय.
कायम माझी ट्रोलिंग झाली, माझ्याविषयी या त्या धाग्यावर बोललं गेलं, म्हणून मी लेखनसन्यास घेतोय, आणि स्वतःच्या कथा अर्धवट सोडून तुम्हाला लेखन सोडायला डिवचण्यासाठी पान पान भर प्रतिसाद देणारे महाभाग हायझेनबर्ग यांच्याकडे बघून अक्षरशः चीड येते, आणि कीवही... लॉजिकल युक्तिवादाचा आव आणणारे हायझेनबर्ग अज्ञातवासीने डॉ. स्ट्रेंजच्या चमत्कारामागील लॉजिक विचारल्यावर भाच्यांना विचारून सांगतो एवढंच म्हणून त्यावर एकलव्याने बाण मारलेल्या कुत्र्याप्रमाणे गप झाले. (ही उपमा त्यांचीच...)
अशांसाठी लेखन सोडू नका.
दुसरी गोष्ट, महाश्वेता यांनी लिहिलेला मुद्दा मात्र मला पटला. खरंच ही कथा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, त्यातील प्रत्येक पात्र हे स्वतंत्र इतिहास होईल इतकं भव्यदिव्य आहे, त्याविषयी लिहिताना कमीत कमी प्रसंगोचित भान ठेवावं. ही कथा तुमची आहे, तर असले प्रतिसाद दिल्यावर त्यांना नीट शब्दात समजावणं ही तुमची जबाबदारी आहे.आणि तुमच्या काय, प्रत्येक लेखावर अक्कू या आयडीचे असेच फालतू प्रतिसाद असतात. यात काय कुलपणा दाखवायचा असतो, नाही कळत.अशा प्रतिसादांनी खरंच चिडायला होते.
सत्यवती काही कुणा चित्रपटाची हिरोईन नव्हती, एका गौरवशाली साम्राज्याची अधिपती होती, वेदांची माता होती.
या भागातला सर्वोत्तम प्रतिसाद.
सस्मित तुमचाही प्रतिसाद आवडला.
आणि हो, कुणीही थोडाजरी निगेटिव प्रतिसाद दिला, तर लगेच काही आयड्यानी धावून जाण्याची गरज नाही. तसेच आम्हीच लेखिकेचे तारणहार असा आव आणण्याचीही गरज नाही. त्यांना उत्तर देण्यास लेखिका समर्थ आहेत...
नोटः मी कुणाचिही डु आयडी नाही.
शेवटच वाक्य खटकल. डुआयडी नाही
शेवटच वाक्य खटकल. डुआयडी नाही हे सांगायची मुळात गरजच का भासावी.
अहो त्या बाय बाय करून गेल्या
अहो त्या बाय बाय करून गेल्या ना त्याच पुन्हा परत आल्या
म्हणुन मी डुप्लिकेट आयडी नाही सांगावे लागते.
चालू दे त्याचं नेहेमीचच आहे.
लोल
लोल
Pages