युगांतर- आरंभ अंताचा! भाग ३४

Submitted by मी मधुरा on 19 August, 2019 - 09:22

"प्रणाम द्रोणाचार्य."
"प्रणाम. काय झाले कृपाचार्य? तुम्ही अस्वस्थ का दिसत आहात अजूनही?"
"तुम्ही पाहिलेत ना काय झाले ते."
"हो. पण तुम्ही का चिंतेत आहात?"
"का नसेन, द्रोणाचार्य?"
"कारण तुम्हाला वाटलेली भिती सत्यात उतरली नाही."
"म्हणजे?"
"दुर्योधन स्पर्धेत विजयी झाला नाही, कुलगुरु. तुम्ही तर आनंदी असायला हवे. चिंतीत नाही." द्रोणाचार्य हसत म्हणाले.
"तुम्ही मला चुकीचे समजत आहात द्रोणाचार्य. दुर्योधनाचा पराजय हस्तिनापुरचा एक आधारस्तंभ इतर आधारस्तंभांपेक्षा कमकुवत असल्याचे द्योतक आहे..... आणि मी कुठे हस्तिनापुरापेक्षा वेगळा आहे, गुरुवर? मी कसा आनंदी होईन दुर्योधनाच्या पराजयाने?"
"म्हणजे ?" द्रोणाचार्य आश्चर्याने म्हणाले, "मला तर वाटलं तुम्ही निश्चित व्हालं, दुर्योधन भीमकडून हरला म्हणल्यावर."
"मी दुर्योधनाविरूध्द नाही, गुरुवर."
"काय? कृपाचार्य? हे तुम्ही बोलता आहात?"
"हो, द्रोणाचार्य. मी हस्तिनापुरचे कुलगुरु पद भूषवतो आणि तुमच्याआधी राजपुत्रांना विद्या देण्याची जवाबदारीही माझ्यावरच होती. अगदी तेव्हा पासून ओळखतो मी या राजपरिवाराला..... अगदी जवळून! इथे सर्व कोणाचे ना कोणाचे पक्षधरं आहेत. मी ही याला अपवाद नाही."
"कोणाच्या पक्षात आहात मग तुम्ही?
"हस्तिनापुराच्या पक्षात आहे मी, द्रोणाचार्य. म्हणून केवळ हस्तिनापुरच्या भविष्याचा विचार करतो. कोण्या एका राजकुमाराच्या जय-पराजयाचा नाही."
"मग दुर्योधन विजयी होऊ नये असे का वाटते तुम्हाला?"
"कारण दुर्योधनाची मुळ शक्ती दैत्य प्रवृत्तीची आहे, गुरुवर."
"म्हणजे?"
"दैत्य प्रवृत्तीकडे ताकद असते, शक्ती असते. परंतु विवेकबुद्धी? ती मात्र नसते. प्रचंड हलक्या कानाचे असतात दैत्य प्रवृत्तीचे. ते अनुसरण करतात केवळ स्वतःच्या स्वार्थी विचारांचे. त्यांना असत्य, अयोग्य मार्गांची मोहिनी पडते, गुरुवर! मग सत्य आणि धर्म जाणून सुद्धा तो आचरत नाहीत ते. त्यात एखाद्या चुकीच्या व्यक्तीची संगत झाली, की मग त्यांच्या सुधारण्याची शक्यता म्हणजे भर अमावास्येला चंद्र दर्शन! शक्तीवर योग्य विचारांचा अंकुश नसेल ना, तर ती शक्ती विनाश करते, गुरुवर.... केवळ विनाश!"
"असे का वाटते तुम्हाला कुलगुरु? आज पाहिलेत ना तुम्ही! एका अनोळखी व्यक्तीचाही अपमान सहन होऊ नये इतका हळवा आहे दुर्योधन. क्षणात अंग प्रदेशाचे अधिपत्य एका अनोळखी व्यक्तीला देण्या इतका इतका उदारही आहे. परक्या व्यक्तीच्या अपमानाच्या जखमेवर मलमपट्टी करू पाहिली त्याने. हे त्याने स्वतः केले. कुणा दुसऱ्याच्या सांगण्याचे अनुसरण नव्हते ते."
"कारण कर्णाने द्वंद्वासाठी आवाहन त्याला केले जो राजगादीचा दावेदार आहे. ती च राजगादी, द्रोणाचार्य, जिच्यावर दुर्योधन स्वतःचा अधिकार समजतो. कर्ण जिंकू शकेल असं समजून त्याने अंग देशाचा राजा बनवून कर्णाला उपकारांच्या ओझ्याखाली दाबलं. अर्थात जर कर्ण जिंकला असता, तर तो त्याच्या विजयाचे फळ सरळ सरळ आणून दुर्योधनाच्या पायी ठेवेल, असा बंदोबस्त केला त्याने."
"कृपाचार्य, मित्र बनवण्यात आणि मैत्री निभावण्यात दुर्योधन कधीच कपट येऊ देत नाही. मी पाहिली आहे अश्वत्थामा आणि दुर्योधनची मैत्री. तो बंधुत्व आणि मैत्री उत्तम निभावतो."
"पांडवां बद्दलचा द्वेष पाहूनही तुम्ही असं म्हणता आहात?"
"दुर्योधनाला नवव्यान्नव अनुज आहेत. ते त्याच्यावर किती प्रेम करतात, त्याचा किती आदर करतात, तेपाहिले आहेत ना तुम्ही? कौशल्य दाखवायलाही त्याच्या पुढे शस्त्र उचलत नाहीत त्याचे अनुज. विचार करा, कृपाचार्य! हे बंधुत्व तर पांडवांमध्येही नाही. पांडवांशी असलेले वैरही एका लहान-सहान कारणामुळे आहे. ते म्हणजे, दुर्योधनाला जेष्ठत्व गाजवलेले चालत नाही, इतकेच."
"इतकेच नाही, द्रोणाचार्य. त्याला हस्तिनापुरवरही कोणी हक्क दाखवलेला चालत नाही. त्याचे अनुज राजगादीचे स्वप्नच पाहत नाहीत, म्हणून हे टिकून आहे हे बंधुत्व. तो राजगादीसाठी कपट, छळ, अधर्म..... काहीही करू शकतो."
"असं तुम्हाला वाटतं असेल तर, दुर्योधनाला तुम्ही नीट ओळखलेलेच नाही."
"दुर्योधनाला स्वतःची ओळख आहेच कुठे, द्रोणाचार्य? गांधार नरेशने त्याला त्याची ओळख मिळवू कुठे दिली आहे? त्याचे निर्णय हे स्वतःचे कधी नसतातच. तो केवळ एक बोलका बाहुला आहे, द्रोणाचार्य. शकुनीला हवे तसा चालणारा, वागणारा आणि जगणारा एक बोलका बाहुला! ज्याचे स्वतःचे काही मत नसते, काही विचार नसतात आणि ज्याच्या दोऱ्या केवळ गांधारनरेशच्या हातात असतात."
"कृपाचार्य, तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे." भीष्माचार्य कक्षातच आलेत हे लक्षात आल्यावर दोघांनी त्यांना हात जोडून नमस्कार केला.
"तुम्हालाही असेच वाटते भीष्माचार्य?"
"हो, द्रोणाचार्य! दुर्दैवाने गांधारनरेशच्या हातातले प्यादे बनला आहे दुर्योधन."
"तेच सांगत होतो मी, महामहीम."
"पण आज कर्णाच्या बाबतीत दुर्योधन जे वागला ते मात्र तो स्वतःच्या मनापासून वागला, कृपाचार्य."
"भीष्माचार्य?" कृपाचार्यांनी आश्चर्याने बघितले.
"दुर्योधन कधी गांधारनरेश सोडून दुसऱ्या कोणाचे ऐकत नाही. पण यावेळी मी त्याला स्वतःच्या मनानुसार वागताना पाहिले. आणि कोणाच्या आदेशाचे अनुसरण अजिबात नव्हते ते!"
"कश्यावरून भीष्माचार्य?"
"आज्ञा पालन करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर कधी ते स्मित नसते कृपाचार्य, जे आज दुर्योधनाच्या मुखावर पसरले होते. दुर्योधनाने आज जे केले ते त्याच्या स्वतःच्या मनाने केले. मग त्याचे कारण कर्णाचे अर्जुनाला ललकारण्याचे धाडसही असू शकेल अथवा कर्णाचे असामान्य तेजही."
"हो.... त्याच्या त्या सुवर्ण वस्त्रामुळे तर सर्वच प्रभावित झाले होते. मला हाच प्रश्न पडला होता की एका सूत पुत्राकडे इतके सुंदर वस्त्र आले कुठून?"
"ते वस्त्र नाही, कवच आहे, कृपाचार्य. जन्मापासूनच आहे त्याच्याकडे. ते कवच त्वचेप्रमाणे त्याच्या शरीरानुसार आकारमान बदलते. ते दिव्य आहे. पण कोणालाच माहितं नाही ते त्याच्याकडे आले कसे! "
"द्रोणाचार्य? काय म्हणता आहात? खरचं? आणि तुम्हाला कसे माहित हे?" कृपाचार्यांनी प्रश्न केला.
द्रोणाचार्य भूतकाळात हरवत म्हणाले, "शब्द दिला नसता तर मला दोन असामान्य विद्यार्थी गमवावे लागले नसते, कृपाचार्य.... ज्यांना मी शिष्यत्व नाकारले त्यांच्यापैकीच एक होता तो..... कर्ण." त्यांच्या चेहऱ्यावर दु:खी छटा होत्या.
"म्हणजे तुम्हाला आधीपासूनच माहित होते की तो सूतपुत्र आहे? मग...." कृपाचार्यांना कळेच ना की मग द्रोणाचार्य स्पर्धेच्या वेळी गप्प का राहिले!
"आधी फक्त तसा संशय होता. अधिरथ आला तेव्हा खात्री पटली."
'तरीच द्रोणाचार्यांच्या चेहऱ्यावर इतके आश्चर्य नव्हते.' कृपाचार्य हसले.
भीष्माचार्यांनी मुद्याला हात घातला. "द्रोणाचार्य, आजचे आयोजन व्यर्थ गेले. आता कसे निवडायचे भावी महाराज?"
"आता ह्या द्रोणाचार्याला गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली आहे, भीष्माचार्य. उद्या जो शिष्य माझी गुरुदक्षिणा मला देईल, तो विजेता!"
"द्रोणाचार्य? गुरुदक्षिणेवरून महाराज कसे ठरवणार आपण?"
"माझ्यावर विश्वास ठेवा, महामहीम. योग्य दावेदारच राजगादीवर बसेल."
कृपाचार्य आता अजून जास्त अस्वस्थ झाले होते. 'गुरुदक्षिणा' शब्द ऐकून त्यांना एकलव्यची आठवण झाली आणि ते धास्तावले.
"काय मागणार आहात तुम्ही गुरु द्रोण?"
"शांतता मागणार आहे कृपाचार्य. मनाची हरवलेली शांतता मागणार आहे."
"म्हणजे?" उद्वीग्न होत कृपाचार्यांनी विचारले.
"एक हिशोब राहिला आहे, कुलगुरू. खूप जूना...... केलेल्या अपमानाचा!"
---------
"थांबाsss" किंचाळत कुंती झोपेतून जागी झाली तसा गांधारीने आन मान धपक्याने तिचा हात पकडत तो थोपटला, "कुंती, काय झालं ? ठीक आहेस ना तू?"
कुंती कुठल्या तरी विचित्र मनोवस्थेत आहे, हे कळण्याकरता गांधारीला कुंतीचा चेहरा बघण्याची गरज नव्हती.
"काही नाही, महाराणी..... काही नाही."
"कुंती, काल बेशुद्ध पडली होतीस तू. मला तर भिती वाटली. जेव्हा वैद्य म्हणाले सर्व ठीक आहे, तेव्हा जीव भांड्यात पडला." कुंतीच्या चेहऱ्यावरून तिने हात फिरवला.
"कालच्या स्पर्धेचे काय झाले?"
"काहीच नाही, कुंती. सुर्यास्त झाला आणि स्पर्धा अपूर्ण राहिली. पूर्ण झाली असती खरं, कर्ण आला नसता तर."
"कर्ण??"
"ज्याने अर्जुनला द्वंद्व युध्दासाठी आवाहन केले ना, तो. अगं विदूर सांगत होते, कि तो काहीतरी सचेतन ताऱ्याच्या तुकड्यासारखा दिसतो म्हणून. आपल्या अधिरथाचाच पुत्र आहे. तो मध्ये आला नसता तर बरे झाले असते. मला दुर्योधन आणि भीम समोरासमोर आले की धडकी भरते गं. कालचं अपूर्ण राहिलं म्हणून आता पुन्हा नवीन स्पर्धा आयोजन होणार. पुन्हा सर्वांची थकावट. पुन्हा ती च भिती. पण यावेळी तू काळजी घे हं तब्येतीची."
गांधारीने दासींकडून फळांनी भरलेली थाळी कुंती समोर ठेवून घेतली आणि पुन्हा एकदा 'तब्येतीची काळजी घे.' असे सांगत तिने कक्ष सोडला.
कुंतीने खिडकीतून नुकत्याच उगवलेल्या सुर्यदेवांच्या तांबड्या रुपाकडे पाहिले.
'कर्ण.....आपला पुत्र, सुर्यदेव! जिवंत आहे. तो.... तो जिवंत आहे..... सुखरूप आहे. मनातलं शल्य गेलं आज.' कुंतीने आनंदाने डोळे पुसले. 'तो इथेच आहे, सुर्यदेव.... हस्तिनापुरात. माझ्या खूप जवळ. तुम्ही दिलेले खरचं कवच शोभून दिसते त्याला.' कालचा प्रसंग आठवला आणि क्षणात तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती उठून अस्वस्थपणे फेऱ्या घालू लागली. 'आज.....त्याने स्वतःच्याच अनूजला द्वंद्व आव्हान दिले. बाकीच्यांनी एकमेकांसोबत द्वंद्व केलं तेव्हा त्यांना माहित होतं की ते एकमेकांचे बंधु आहेत. पण कर्ण? त्याला नातं माहित नाही.... कर्णाकडे तर कवच आहे.... पण अर्जुन? जर काही झालं असतं अर्जुनला तर? नाही.....मला हा विचारही सहन नाही होतं.'

© मधुरा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुमाल टाकुन गेलो होतो गं. हा भाग पण छान झालाय. रच्याकने, सत्यवती कुठे गायबली पर डे जास्त मागत होती म्हणुन कथेतुन बाहेर काढलं की काय.

धन्यवाद शिव, अमर, अज्ञातवासी.

शिव, wait for next part Happy

अमर, सर्वोत्तम योद्धाच राजा म्हणून निवडणार होते.
नाहीतर मुळात दुर्योधनाने युधिष्ठिराला राजा बनू दिलेच नसते आणि लाक्षागृह कांडही झाले नसते. हे.मा.वै.म.

अज्ञातवासी, kind of..... Happy धन्यवाद!

धन्यवाद अक्कु, प्रॉडक्षन हाऊस ला परवडत नाही रे ती ! भीष्माचार्यांकडून राज्यच घेतले तेव्हापासून धास्तावले होते सारे आणि त्यात तिने गांधारी कांडही केलं. म्हणून आउट ! Wink

@अमर बरं..... पुढच्या भागात तसं वाटणार नाही कदाचित. Keep reading Happy

लिंक वाचली.
19 Aug 2019 - 1:02 pm | यशोधरा
LOL! शरद ह्यांच्यासारख्या अभ्यासू लेखन करणाऱ्या व्यक्तीच्या लेखनाला मृत्युंजय आणि राधेय ह्या कादंबऱ्यांंवर विसंबून लेखन करणाऱ्या लोकांनी नावे ठेवावीत? कलियुग रे देवा, कलियुग! =))
>> मिपावरील एक प्रतिक्रीया.

अक्कु, गांधारी कांड म्हणजे तिला अंध व्यक्तीसाठी मागणी घालणे रे..... भीष्माचार्यांना पाठवले होते बघ सत्यवतीने गांधार नगरीला. त्यामुळे तर शकुनी चिडला. Happy

अक्कु, I was joking. तिचा उल्लेख येणार आहे. पण आत्ता लाईम लाईट वेगळ्या व्यक्तीरेखेवर आहे. Happy

अमर, मिपावर मी जास्त प्रतिसाद लिहितचं नाही. निवडक लिहिते अगदीच काही आवडले तर. कारण तिकडे गरज नसताना अपमान केले जातात अगदी ग्रूप बनवून. पण मला वाटते, की यशोधरा मिपालेख मालेचे परीक्षण पण करते आहे. एकदा तिचा मेसेज आला होता लेख मालेबद्दल. पण माझ्याशी खूप छान संभाषण केले तिने मेसेजवर.
पण मिपावर प्रतिक्रिया देताना सगळेच हात सैल सोडत असावेत, असा अंदाज आहे.

राजा दृपद ( की धृपद ) बरोबरचे युद्ध या स्पर्धेच्या अगोदरच झाले होते ना.......
गोंधळ उडतोय.....
संदर्भ असतील तर लिंक द्याल का.....

As his gurudakshina, Drona asked the princes to defeat and capture Drupada. Firstly all kauravas brothers attacked Drupada to defeat him but Drupada defeated all of them.[4] Then the Pandavas, led by Arjuna (as he was a great archer and fighter), defeated Drupada, bound him in ropes and brought him to Drona. Drona set Drupada free, but retained half of the kingdom that had been promised to him. >>>>> https://en.m.wikipedia.org/wiki/Drupada

B.R. चे महाभारत:
https://youtu.be/V712usl0MIs
https://youtu.be/8XWBnvxTZhg

Suryaputra Karn
https://youtu.be/LTzXWTnGdAA

मी_अनामिक, नाव द्रुपद आहे. काम्पिल्य देशाचा/पांचाल चा राजा. त्याच्या नावावरूनच यज्ञसेनी ला द्रौपदी नाव पडलं.

सुंदर लेखन
आणि हे मिपा काय कळाले नाही मला

हायझेनबर्ग, भरपूर रेफरेन्सेस आहेत. सगळे देत बसू शकत नाही. जे सोप्प्या पद्धतीने कळतील, आवडतील असे देते आहे. काही ठिकाणी तर BR चे महाभारत पण चुकीचे, वाढीव असते.
बाकी सुर्यपुत्र कर्ण, मृत्युंजय, राधेय तर इतिहासाची केलेली तोडमोड आहे निव्वळ. पण त्यातही काही घटना खऱ्या आहेत.

तुम्हाला हे समजवावं लागेल, असं वाटलं नव्हतं. त्यातही विकिपीडिया चा उल्लेख तुम्ही सोयीस्कररित्या गाळलात.
असो, धन्यवाद! Happy

ओ ''Uncertainty principle" वाले तुम्ही तर या विषयावर लिहू नये या मताचे होते ना? तुम्ही वाचतायेत अजून??? उगाच काहीतरी!

Pages