" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"
कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.
"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."
पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.
निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.
(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)
(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)
आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातकचोचीने
प्यावा वर्षाऋतू तरी!
पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.
(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)
धन्यवाद ऋतुराज
धन्यवाद ऋतुराज
>>> माझ्या एका पक्षीतज्ञ मित्राला विचारले.... त्याच्या सांगण्यानुसार तो इंडियन राॅबिन आहे
आय सी! थँक्स शशांक पुरंदरे.
वर कुठेतरी लाल चतुराचा विषय
वर कुठेतरी लाल चतुराचा विषय निघाला होता तेव्हा हा फोटो देणार होते पण वेळेवर सापडला नाही.
NIKON COOLPIX P600 जिजामाता उद्यान.
जिजामाता उद्यानात एक तळे आहे त्यात वॉटर लिली वगैरे मस्त आहेत. खूप चतुर सुद्धा दिसतात. तिथे एक चाफ्याचे झाड आहे, त्यावर बसलेल्या
किंगफिशरचे मस्त फोटो काढता आले होते.
आता ते तळं असलेला विभाग बंदच करुन ठेवलाय.
मानिम्याऊ, चौकोनी वॉटर लिली
मानिम्याऊ, चौकोनी वॉटर लिली मस्तच, कुठे?
शालीदा, फुलपाखराच्या स्पृश्या व वळलेली सोंड अगदी भारी आहे
शशांकजी बरोबर. माझ्या पण एक मित्राने तो फोटो इंडियन रॉबिन फिमेल चा सांगितला
वर्षाताई, खूप छान आहे लाल चतुर (हाच लाल रंग मी म्हणत होतो), आठवणीने फोटो टाकल्याबद्दल धन्यवाद
शालीदा फुलपाखरू काय टिपलंय!
शालीदा फुलपाखरू काय टिपलंय! गुंडाळलली सोंड आणि दोन अॅटेना. आणखीही एक सरळ सोंड दिसतेय ती कशासाठी??जीन्सवर बसलं होतं का??
@चौकोनी वॉटर लिली मस्तच, कुठे
@चौकोनी वॉटर लिली मस्तच, कुठे?>>
धन्यवाद ऋतुराज ..
घरचीच वॉटर लिली आहे. आणि हे एकच फ़ुल चौकोनी आलय
(No subject)
आमच्या बागेतल्या इको-पाँडमधलं Thaila Geniculata..
Close -Up...
त्याच्या पानांवरचा Wolly Bear Moth Caterpillar..
हा तोच सुरवंट पण वेगळ्या झाडावर...
https://images.app.goo.gl
https://images.app.goo.gl/WiuaQ3BYWtT15uAR9
mouthparts of butterfly.
भन्नाट फोटो सर्वच.
भन्नाट फोटो सर्वच.
लाल चतुर भारी फोटो, बघून भीती वाटली, हा त्याच प्रकारातला का ज्याबद्दल अंजली यांनी लिहिलं होतं मागे.
मी हा बघितलेला आठवत नाहीये.
आमच्या बागेतल्या इको-पाँडमधलं
आमच्या बागेतल्या इको-पाँडमधलं Thaila Geniculata -------निरुदा मस्त. मी पहिल्यांदाच पाहतोय
तुमच्या बागेला भेट द्यायची इच्छा आहे
@शशांकदा
@शशांकदा
एकदा फुलपाखरांच्या जोडीने माझ्या मांडीवर त्यांचा शृंगारसोहळा साजरा केला. तेंव्हा फार बारकाईने त्यांचे निरिक्षण केले होते. त्यातल्या एका फुलपाखराला सोंड नव्हती.
(No subject)
हो. ॠतुराज... नक्की...
हो. ॠतुराज... नक्की...
Painted Grasshopper
Painted Grasshopper
नाकतोडा एवढा सुंदर,
नाकतोडा एवढा सुंदर, पहील्यांदाच बघितला. निसर्गाची कमाल, खरंच पेंटेड वाटतोय.
Oleander hawk-moth , Army
Oleander hawk-moth , Army green moth
शालीदा सुंदर फोटो
शालीदा सुंदर फोटो
सगळ्यांचे फोटो भारी आहेत.
सगळ्यांचे फोटो भारी आहेत. शाली जोडी मस्त टिपलीय, सोंड दिसतेय व्यवस्थित.
निरु, थालिया जेनिक्यूलटाचा पानांसकट लॉंग शॉट पण टाका ना, रोपट्याची ओळख होईल.
आहाहा काय सुंदर फोटो आणि
आहाहा काय सुंदर फोटो आणि माहिती.
खालील फोटो दिसतोय का कुणाला?
खालील फोटो दिसतायेत का कुणाला?
(No subject)
दोन फोटो व्यवस्थित दिसतायेत.
दोन फोटो व्यवस्थित दिसतायेत.
शालिदा दिसतायत फोटो
शालिदा दिसतायत फोटो
आमच्याकडीला फुलपाखरे. खुप प्रकारात आहेत पण फोटो मात्र खुप कमीच काढून देतात.
१.
२.
३.
फुलपाखरे छानच आहेत. सकाळी
फुलपाखरे छानच आहेत. सकाळी कोवळ्या उन्हात ती फारशी चंचल नसतात असं आताच लक्षात आलय. पंखही उघडून बसतात त्यामुळे मस्त फोटो येतो.
मी गुगलवरुन फोटो टाकायचा प्रयत्न करतो आहे. माझी माबोवरची स्पेस संपली.
मावळ (२०१८)
मावळ (२०१८)
शाली, जबरीच फोटो असतात रे
शाली, जबरीच फोटो असतात रे तुझे.....
अप्रतिम फोटो शाली.
अप्रतिम फोटो शाली.
जागू फुलपाखरे मस्तच.
जागू बहुतेक तुझी १ & ३
जागू बहुतेक तुझी १ & ३ फुलपाखरु danaid eggfly फिमेल व प्रचि २ मधले common palmfly असावे.
शाली फोटो ऑफ मावळ निव्वळ
शाली फोटो ऑफ मावळ निव्वळ अहाहा! तो एरिया निसर्गसौदर्यने ब्लेस्ड आहे.
ऋतुराज, आर्मी ग्रीन मॉथ मस्त. किती समर्पक नाव.
तुंगारेश्वरला दिसलेले बॅरोनेट
तुंगारेश्वरला दिसलेले बॅरोनेट. केशरी व काळा, बस इतके दोनच मुख्य रंग असतात पण इतके उठावदार दिसते हे.
आहा हा!
आहा हा!
काय देखनं फुलपाखरू आहे! तेजस्वी रंग आणि पार्श्वभुमीला अजिबात हिरवाई नसलेला रस्ता. मस्तच दिसतय.
Pages