आज १५ अॉगस्ट! स्वातंत्र्यदिन. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
दरवर्षी प्रमाणे 'मिले सूर मेरा तुम्हारा' दाखवण्यात आले.भाषा वेगवेगळ्या असल्या तरी आपण सगळे भारतीय म्हणून एक आहोत असा संदेश देणारं हे गाणं.
याचंच निमित्य म्हणून आपल्या माबोवर कुणाकुणाला कोणकोणत्या भाषा येतात त्याचीही माहिती शेअर व्हावी.म्हणजे मराठी,हिंदी,इंग्रजी या तीन भाषा सर्रास शिकवतातच शाळेत.त्यांचं काही विशेष नाही पण त्या सोडून अजून कोणत्या भाषा येतात का तुम्हाला?
माणसांची भाषा बरं का? नाहीतर मशिन लँग्वेजेस समजाल चुकून!
कितपत येते?
वाचता येते की बोलता येते?
कि फक्त समजते?
कुठे शिकलात?
उद्देश काय होता शिकण्याचा?
कधीपासून शिकताय?
पूर्वी शिकलेली भाषा अजूनही येते की बर्यापैकी विसरलात?
पुन्हा त्या भाषेचा अभ्यास सुरु करावासा वाटतोय का?
शिकताना काही गंमत/फजिती झाली का?कसा होता अनुभव?
बापरे! किती ते प्रश्न?
आता नमनाला घडाभर तेल न वाहता करा बरं सुरुवात सांगायला तुम्ही किती बहुभाषिक आहात ते?
मराठी, इंग्रजी, हिंदी आणि
मराठी, इंग्रजी, हिंदी आणि फ्रेंच. सगळ्या भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येतात.
Marathi Hindi English gujrati
Marathi Hindi English gujrati Ani aagri
मराठी,हिंदी,इंग्रजी लिहीता,
मराठी,हिंदी,इंग्रजी लिहीता, वाचता,बोलता येते..जन्म गुजरात मध्ये झालाय..गुजराती बोलता येते..नवरा मललु..मळयाळम बोलता येते,समजते..बंगलोर ला राहत असलयाने कंनडा समजते..
मला मराठी, हिंदी, इंग्रजी अन
मला मराठी, हिंदी, इंग्रजी अन डोळ्यांची भाषा येते
अन डोळ्यांची भाषा येते ..
अन डोळ्यांची भाषा येते ...nice reply Mr chaitnya
मला कोकाटे फाडफाड इंग्लिश
मला कोकाटे फाडफाड इंग्लिश येते.
मला मराठी, इन्ग्रजी, हिंदी,
मला मराठी, इन्ग्रजी, हिंदी, जर्मन, डच, स्पॅनीश लिहिता, वाचता, बोलता येते गुजराती, बेंगाली थोडी फार बोलता येते, पण पुर्णपणे कळते, जपानी अतीशय थोडी वाचता येते.
Nice....One Polyglot spotted
Nice....One Polyglot spotted finally
मला गुगल ट्रान्सलेटरच्या
मला गुगल ट्रान्सलेटरच्या सहाय्याने पंचवीस एक भाषा समजतात पण बोलता येत नाहीत.
मनाची भाषा,
मनाची भाषा,
प्रेमाची भाषा,
डोळ्यांची भाषा देखिल कळते.
मराठी, इंग्रजी, हिंदी आणि
मराठी, इंग्रजी, हिंदी आणि थोडफार पंजाबी, गुजराती बोलता येत.
डोळ्यांची भाषा येते-चैतन्य रासकर.... भारी हा
मला मराठी, अहिराणी, हिंदी,
मला मराठी, अहिराणी, हिंदी, इंग्रजी अस्सखलितपणे वाचता लिहिता आणि बोलता येते. गुजराती आणि बंगाली वाचता येते आणि कळतेही पण बोलता येत नाही.
मला तामिळ भाषा शिकण्याची खूप ईच्छा आहे (कारण मलाही माहिती नाही) पण कोणी गुरु सापडत नाहीये.......
तमिळ शिकतोय.लहानपणी दिवाळीत
तमिळ शिकतोय.लहानपणी दिवाळीत लक्ष्मीतोटा नावाचा फटाका मिळायचा.तो फुटल्यानंतर आत वापरलेली तमिळ वर्तमानपत्राची रद्दी कुतूहल चाळवून गेली.हे फटाके तमिळनाडूतल्या शिवकाशीहून येतात त्याअर्थी हा पेपर तमिळ भाषेत असावा हा अंदाज होताच.मग एकदा त्यातला एक फटाका न उडवता त्याची बांधणी सोडवली.त्यावरची तारीख इंग्रजीत होती.साधारण आठवड्याभरापूर्वीचं वर्तमानपत्र होतं.त्याच तारखेचं मराठी वर्तमानपत्र मिळवलं.मग ती तमिळ आणि मराठी वर्तमानपत्र दोन्ही शेजारीशेजारी ठेवून समान बातम्या कुठल्या ते शोधलं.तमिळ अक्षरे ही वाचायला अतिशय सोपी आहेत.दक्षिणेतल्या कन्नड,तेलुगू ,मल्याळम यांच्या लिप्यांपेक्षाही सोपी.अशाप्रकारे तमिळ लिपी वाचायला थोडी थोडी जमायला लागल्यामुळे हुरुप वाढला.मग नंतर नितीन प्रकाशनाचं श्री ल कर्वे यांचं तमिळ शिका हे पुस्तक बाजारात आलं.त्यातून शिकू लागलो.मग गती येऊ लागली.नंतर पुण्यातून रैपिडेैक्सचं हिंदी-तमिल लर्निंग कोर्स आणलं.आधी एका दुकानात विचारलं तर त्याच्याकडे हे पुस्तक नव्हतंच वर "छान! आता हिंदीतून तमिळ शिकणार का तुम्ही?" असं ज्ञानही मिळालं.(आता रैपिडैक्स मराठी-तमिळ स्वरुपात छापत नाही यात माझा काय दोष? असो.) शेवटी वर्मा बुकस्टॉलमधे एकदाचं मिळालं.त्यातून शिकणं सुरु झालं.पण नंतर अन्य व्यापामुळे जरा खीळ बसली.मग २०१४ ला पहिला स्मार्टफोन घेतल्यावर व्हॉटसअॅपवर,फेबुवर काही तमिळ मित्र मिळाले.अजून काही पुस्तके PDF स्वरुपात मिळाली.त्या मित्ररुपी गुरु आणि पुस्तके,टिव्ही,इंटरनेट यांच्यामार्फत तमिळ शिकणे सुरु आहे.सध्या तमिळ वाचता येते.थोडे बोलताही येते.अजून काही महिन्यात बर्यापैकी प्रगती होईल अशी आशा आहे.
गुजराती लिपी वाचता येते,वाचून थोडी समजते.बोलता मात्र येत नाही. सिंहली लिपी फार छान आहे दिसायला.ती एकदा नक्की शिकणार आहे.तमिळमुळे मल्याळमही शिकता येईल.बघू कसे कसे जमते ते!
सध्या तमिळनाडूत बर्याचजणांमधे 'राष्ट्रीय एकात्मतेचे' वारे पसरले आहे.हिंदी जरी राष्ट्रभाषा नसली तरी देशातली सर्वात मोठी भाषा आहे शिवाय अॉफिसातला उत्तरभारतीय+हिंदी येणारा गट गप्पा मारु लागला की आपल्याला फक्त बघत बसावे लागते.ते काय बोलतात ते कळत नाहीत ही खंत. या दोन गोष्टींमुळे हिंदी शिकू इच्छिणार्या तमिळ लोकांमधे वाढ होतेय.त्यांना मी एका ग्रुपात हिंदी शिकायला मदत करतो.
तंजावर आणि आजूबाजूच्या प्रदेशात दक्षिणी मराठी बोलणारे बरेच मुळचे मराठी लोक आहेत.त्यांना महाराष्ट्रातली मराठी शिकायला मदत करतो आहे.
या निमित्याने अजून एक आठवण सांगाविशी वाटते.माझे एक केरळी मित्र १९९० पासून मराठी शिकतायत.९० साली त्यांनी टिव्हीवर 'आता उठवू सारे रान' हे गाणं पाहिलं होतं.त्यातून त्यांना मराठीची गोडी लागली.एकदाही महाराष्ट्रात न येता सुद्धा फक्त टिव्ही आणि नेटकरवी मराठी शिकले.बर्यापैकी चांगलं मराठी बोलतात,लिहितात.मी सुद्धा त्यांना मदत करतो मराठी शिकायला.
पण तरीही हिंदी,बंगाली,तेलुगू,मल्याळम शिकणार्यांच्या तुलनेत मराठी शिकू इच्छिणारे परप्रांतीय फार कमी आहेत याची खंत वाटते.निदान महाराष्ट्रातल्या सर्व अमराठी भाषिकांनी कामापुरती तरी मराठी शिकावी असे वाटते.
हैद्राबादमधले मराठी आयटी कर्मचारी तेलुगू शिकण्यात उत्साह दाखवतात हे ही निरीक्षण आहे.
मला मराठी हिंदी इंग्लिश
मला मराठी हिंदी इंग्लिश गुजराती आणि अहिराणी या भाषा नीट बोलता येतात.
स्पॅनिश आणि जर्मन नीट समजते व बोलता येते, पण फ्लूइंटली नाही.
तेलगू समजते आणि थोडीफार बोलताही येतात.
बाकी मल्याळी भाषा खूप सुंदर आहे हे माझं वैयक्तीक मत!
बाकी मल्याळी भाषा खूप सुंदर
बाकी मल्याळी भाषा खूप सुंदर आहे हे माझं वैयक्तीक मत!>>>> हे माझंही मत आहे. २०१५ ला प्रेमम सिनेमा रिलीज झाल्यापासून मी या भाषेच्या प्रेमात आहे.
Minalji,चैतन्यजी, अज्ञातवासी
Minalji,चैतन्यजी, अज्ञातवासी आणि बाकीचेही खूप छान प्रयत्न सुरु आहेत भाषा शिकण्याचे.छान चर्चा सुरु आहे.
पद्म,
पद्म,
मुंबईत राहत असाल तर मुलूंडच्या खांडेकर वाचनालयात मराठीतून तमिळ शिकवतात ही जुनी माहिती आहे.सध्याची स्थिती बघावी लागेल.
पोर्तूगीज, स्पॅनिश, बहासा
पोर्तूगीज, स्पॅनिश, बहासा इंडोनेशिया. - तिन्ही काम चलाऊ
मल्याळी भाषेत मैत्रीणीच नाव लिहायला शिकलो होतो. आता विसरलोय.
मला इंग्लिश मराठी आहिराणी
मला इंग्लिश मराठी आहिराणी हिंदी आगरी इतक्या भाषा बोलता आणि वाचता येतात.
तामीळ आणि मल्याळम भाषा
तामीळ आणि मल्याळम भाषा शिकण्याचे प्रयत्न चालुयेत.
मला लेवा पाटलांची भाषा बोलता
मला लेवा पाटलांची भाषा बोलता येते.
मराठी, हिंदी, इंग्रजी
मराठी, हिंदी, इंग्रजी
फ्रेंच (लिहितावाचता येते, पूर्ण समजते, बोलताना अडखळतो, आता सवय राहिली नाही)
जपानी (हिरागाना काताकाना लिहितावाचता येते, भाषा समजते, बोलण्याची सवय सरावआभावी गेली, अनेक कांज्या विसरलो)
बंगाली - लिहितावाचता येते, बोललेले ठीकठाक समजतं, बोलता येत नाही
एस्पेरांतो - लिहितावाचता येते, बोललेलं समजतं, बोलता येत नाही
तामिळ, गुजराती वाचता येतात
फारसी लिहायवाचायला शिकतोय
तिबेटी बरीच वाचता येते
अरे वा! तामिळमध्ये अनेकांना
अरे वा! तामिळमध्ये अनेकांना ईंटरेस्ट दिसतोय... मला वाटलं मीच विशेष आहे..!
म्हणजे मराठी आणि तामिळ मध्ये काहीतरी मागच्या जन्माचा संबंध दिसतोय...
चिनूक्स तिबेटी भाषा!! भारी
चिनूक्स तिबेटी भाषा!! भारी आहेस!
मी मराठी, हिंदी, इंग्रजी, जपानी लिहू-वाचू-बोलू शकते
सध्या युट्युबवरुन जर्मन शिकायचा प्रयत्न करतेय
ईंप्रेसिव, हेवा वाटतो सगळ्या
ईंप्रेसिव, हेवा वाटतो सगळ्या मल्टिलिंग्वल लोकांचा. खतरनाक टॅलेंट आहे नवीन भाषा आत्मसात करणे.
दुर्दैवाने मला मातृभाषा मराठीसहित एकही भाषा धड पूर्णपणे वाचता, बोलता, लिहिता येत नाही.
मालवणी/ मराठी/ हिन्दी/
मालवणी/ मराठी/ हिन्दी/ इंग्रजी..
जर्मन / गुजराती/ पंजाबी कळते.
मराठी/हिंदी/ईंग्रजी लिहिता
मराठी/हिंदी/ईंग्रजी लिहिता वाचता बोलता येते. पण मी कमालीची आळ्शी असल्याने चुका होतात( खास करून इथे लिहिताना). (शालेय शिक्षण)
-फ्रेंच बेसिक लिहिता/वाचता/बोलता येते( शालेय विषय होता) , आता सवय सुटलीय.
-गुजराती पुर्ण बोलता/वाचता येते. लिहिता येत नाही.( वडीलांकडून)
-पंजाबी पुर्ण कळते , थोडीफार बोलते. वाचता बर्यापैकी येते.( मित्र परीवार)
-बंगाली पुर्ण कळते, पुर्ण बोलते. वाचता येत नाही.( मित्र/ सासर परीवार)
-तामिळ व्यवस्थित पुर्णपणे कळते, वाचता येत नाही पण लिपी ओळखते, बोलते कमी.( मित्र परीवार)
-कन्नड्डा, मल्याळं, ओरीया, कोंकणी( गोयं),मालवणी पुर्ण कळते फक्त. ( मित्र परीवार).
-स्पॅनिश बोलता/ वाचता येते( कामकाज)
अतिशय उपयोगी धागा आहे हा
अतिशय उपयोगी धागा आहे हा माझ्यासाठी. आजच हैदराबादला आम्ही शिफ्ट झालो.मुलाला शाळेत आणि आम्हाला व्यवहारात तेलगू गरजेची आहे. मराठीतून तेलगू शिकण्यासाठी एखादे पुस्तक आहे का? अजून कोणत्या मार्गाने लवकर तेलगू शिकता येईल?
ते आधी तेलुगू लिहून सुरुवात
ते आधी तेलुगू लिहून सुरुवात करा.
हे घ्या,
https://youtu.be/S3Z3-5IvAiU
cuty यांच्यासाठीhttps://www
cuty यांच्यासाठी
https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=51109406227021...
Pages