आज १५ अॉगस्ट! स्वातंत्र्यदिन. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
दरवर्षी प्रमाणे 'मिले सूर मेरा तुम्हारा' दाखवण्यात आले.भाषा वेगवेगळ्या असल्या तरी आपण सगळे भारतीय म्हणून एक आहोत असा संदेश देणारं हे गाणं.
याचंच निमित्य म्हणून आपल्या माबोवर कुणाकुणाला कोणकोणत्या भाषा येतात त्याचीही माहिती शेअर व्हावी.म्हणजे मराठी,हिंदी,इंग्रजी या तीन भाषा सर्रास शिकवतातच शाळेत.त्यांचं काही विशेष नाही पण त्या सोडून अजून कोणत्या भाषा येतात का तुम्हाला?
माणसांची भाषा बरं का? नाहीतर मशिन लँग्वेजेस समजाल चुकून! 
कितपत येते?
वाचता येते की बोलता येते?
कि फक्त समजते?
कुठे शिकलात?
उद्देश काय होता शिकण्याचा?
कधीपासून शिकताय?
पूर्वी शिकलेली भाषा अजूनही येते की बर्यापैकी विसरलात?
पुन्हा त्या भाषेचा अभ्यास सुरु करावासा वाटतोय का?
शिकताना काही गंमत/फजिती झाली का?कसा होता अनुभव?
बापरे! किती ते प्रश्न?
आता नमनाला घडाभर तेल न वाहता करा बरं सुरुवात सांगायला तुम्ही किती बहुभाषिक आहात ते? 
बहासा इंडोनेशिया शिकून काय
बहासा इंडोनेशिया शिकून काय फायदा आहे? तुम्ही इंडोनेशियात राहता का?
मला तिकडची बायको करायची आहे.
मला तिकडची बायको करायची आहे.
ich चा उच्चार 'इक' असाही
ich चा उच्चार 'इक' असाही करतात. विशेष करून दक्षिण जर्मनी मधे. पण बहुतेक लोक 'इश' असा उच्चार करतात.
मराठी व्यतिरीक्त हिंदी
मराठीव्यतीरिक्त हिंदी, इंग्रजी बोलता,लिहीता वाचता येते.संस्कृत,पंजाबी,हरयानवी,उर्दू,भोजपुरी,उडीया, बांगला, गुजराती,राजस्थानी,कोंकणी या भाषा
दूरदर्शनकृपेने थोड्याफार समजतात
मराठी, हिंदी, इंग्लिश, फ्रेंच
मराठी, हिंदी, इंग्लिश, फ्रेंच लिहिता, बोलता, वाचता येते. संस्कृत लिहिता आणि वाचता येते.
मला मराठी, हिन्दी आणि English
मला मराठी, हिन्दी आणि English व्यतिरिक्त बंगाली बोलता, वाचता आणि लिहिता येते. कारण नवरा बंगाली आहे.
Spanish पण बोलता, वाचता आणि लिहिता येते कारण Spain मध्ये पाच वर्षे वास्तव्य होते. German भाषेचा दोन महिन्याचा class केला होता पण practice न केल्यामुळे काहीही येत नाही.
आणि सध्या कर्नाटकात असल्याने मुलाला शिकवण्याच्या निमित्ताने लिहायला/वाचायला सुरुवात केली आहे. कन्नडा बर्यापैकी समजते.
Pages