नवरात्रात लोक्स उपवास करतात. चप्पल घालत नाहीत. ते का माहीतीय का कोणाला?? खरंतर नवरात्रात चामडं वापरु नये असा नियम आहे. पण चामडं का वापरु नये हे माहीतीय का कोणाला??
चामडे हे मृत जनावरापासून कमावले जायचे. त्यामुळे ते देवाला वापरत नाहीत. हल्ली तर चामड्याकरता जिवंत जनावरे मारली जातात त्यामुळे देवच काय मी मला स्वतःला पण ते (पायताण सोडून) वापरत नाही.
शन्कराच्या पिन्डीच्या आकाराचा आणि अणुभट्टीचा आकार एकच असण्याचा काय संबंध ? नुसता आकार एक असेल,
तर गुणधर्म एक असतात का ? गरुडाचा आकारही विमानासारखा दिसतो... मग गरुडाच्या देवळासमोर धावपट्टी
बान्धायचे का?
Submitted by जागोमोहनप्यारे on 23 September, 2009 - 02:22
मंडळी, माझी आई गेल्या २-३ वर्षांपासून संकष्ट चतुर्थीचा उपवास करते आहे. पण आता तिला ते जमत नाही. गेल्या आठवड्यात जवळच्या देवळातल्या भटजीला संकष्ट चतुर्थी सोडण्यासाठी काय करावे लागेल असं विचारलं तेव्हा त्याने देवळात ३.५ तास होम करावा लागेल आणि मोदक आणावे लागतील असं सांगितलं. कोणाला संकष्ट चतुर्थी सोडण्यासाठी काय करावे लागतं ह्याची काही माहिती असेल तर प्लीज सांगा.
तसंच संकष्ट चतुर्थी केल्याने संकटं येतात असंही माझ्या आईला कोणीतरी सांगितलं. हे कितपत खरं आहे?
Submitted by स्वप्ना_राज on 1 November, 2009 - 22:18
मालिका बघून बघून तुझा असल्या गोष्टींवर विश्वास बसायला लागलेला दिसतोय. धोक्याची घंटा - वेळीच सावध हो.
कोणताही उपास सोडण्याकरता कसलाही होम करावा लागत नाही. मनात काही हेतू बाळगून काही ठराविक काळाकरता - जसे ११, २१ वगैरे - उपास किंवा दुसरे काही व्रत केल्यास त्याचे उद्यापन असू शकते (असलेच पाहिजे असे नाही) पण वयोमानाप्रमाणे उपास सोडण्याकरता कसलाही विधी करावा लागत नाही. थोडे नीट लक्ष दिले तर कळते की कोणत्याही विधीत लवचिकता असते. 'यथाशक्ती' हे प्रत्येक विधीला लागू होते.
आज गणपतीला आपण विघ्नहर्ता म्हणून ओळखतो. पण काही जाणकारांच्या मते पुर्वी गणपती हा विघ्नकर्ता - म्हणजे संकटाचे प्रतिक - होता. भिऊन लोक त्याची पुजा करायचे. असे करता करता मग तो सर्वमान्य झाला. 'संकष्ट चतुर्थी केल्याने संकटं येतात' असे मानण्यामागे हे कारण असू शकते.
madhavm, अहो मी नाही हो ह्या उपास-तापासाच्या फंदात पडत. पण मातोश्री करताहेत. आणि आता त्या भटजीने हे असलं काहीतरी सांगितलंय. आता मी तिला "सेकंड ओपिनियन" घ्यायला सांगितलंय. तरी पण कोणाला काही माहित असेल तर कळवा प्लीज.
Submitted by स्वप्ना_राज on 2 November, 2009 - 08:32
अहो देव हा भक्तीचा भुकेला आहे... तुमचा भाव महत्त्वाचा आहे बाकी सगळं व्यर्थ आहे... तुम्ही त्याचासाठी काही करा किंवा करु नका... तो तुमच्यांवर कृपार्दॄष्टीच ठेवणारच... म्हणून तर त्याला देव म्हणतात... आपण आपले कर्म चांगल्या भावनेने करत राहायचं बस्स...
जर तुम्हाला काही करायचं असेल तर भुकलेला जेवण द्या, अनाथआश्रमला मदत करा... पण भटजी, पुजारी ह्या बडवेगिरींना काही देवू नका...
>>(अर्थात आवश्यकता मुळीच नाही).
अजून लिंबूचा प्रवेश नाही इथे?
वरच्या एक दोन पोस्टांत म्हंटल्याप्रमाणे खरंच आईला समजवलं तर त्यांनाही मनात भिती, किंतू न उरता उपास करणं सोडता येईल.
आमच्या (कोणे एके काळी असलेल्या) १८ लोकांच्या जॉइंट फॅमिलीत बहुतेक रोज कोणाला तरी उपास असायचा. मग भगर, साबुदाण्याची खिचडी, शिन्गाड्याची थालिपिठं हे असलं उपासाला. निर्जळी करायला सांगितली तर आत्यानी 'माझा नाही बाई विश्वास' असं सांगून टाकलं! पण लोकांच्या वाढत्या पित्त प्रकृत्या बघून एक दिवशी आजीनी फतवा काढला 'शेंगदाणे, तूप आणि 'साखरेचे पदार्थ' खाणं पुरे झालं. सगळ्यांचे उपास बंद. हवं तर फळं खाऊन रहा, किंवा कडकडीत उपास करा'. कुठलाही होम वगैरे न करता हरताळका, चतुर्थ्या, एकादशा, प्रदोष आणि असले सगळे उपास बंद होऊन, महिन्यातून एखाद्या रविवारी बदल म्हणून सकाळच्या न्याहरीला उपासाचे पदार्थ व्हायला लागले. अचानक उपास सोडल्यामुळे कुटुंबात कोणावरही काही गंडांतर आलं नाही.
madhavm, raju76, aschig, Mrinmayee, तुमच्या मेसेजेसबद्दल खरंच खूप आभार! मी आईला हेच सांगितलं होतं. पण ती उगाच घाबरत होती की काही संकट यायला नको. आणि अर्थात "घरकी मुर्गी दाल बराबर" असा प्रकार त्यामुळे माझं बोलणं शहाणपणा/ आगाऊपणा ठरला होता.
शेवटी तुमचे मेसेजेस वाचून दाखवले तिला. तेव्हा कुठे पटलं बिचारा भटजी! त्याचे मोदक चुकले
Submitted by स्वप्ना_राज on 3 November, 2009 - 01:57
घरातल्या देवघरासाठी एखाद्या देवाची नविन मुर्ती घेतल्यास तिची स्थापना कशी करवी? मी कलच चान्दीची लक्ष्मी ची मुर्ती घेतली. तीची पूजा कशी करु? नेहेमी सारखीच की कही वेगळी? कोणत स्तोत्र म्हणू (श्रीसुक्त ?)? कोणत्या दिवशी स्थापना करू? प्लिज कोणितरी सविस्तर सान्गा..
घरातल्या देवघरासाठी एखाद्या देवाची नविन मुर्ती घेतल्यास तिची स्थापना कशी करवी?
----
स्थापना किंवा प्राणप्रतिष्ठा हे विधी माझ्या मते केवळ त्या मुर्ती नामक वस्तू वर आपला भाव निर्माण होण्यासाठी केले जात असावेत. otherwise, भाव तोची देव या उक्तीप्रमाणे एखाद्या मुर्तीवर आपण नुस्ते भक्तीभाव अर्पण केल्यानेही (आपले प्राण ओतून किंवा प्रतिष्ठापून, पुर्ण प्रेमाने) ती मुर्ती प्रतिष्ठापीतच होते. केवळ उपचार म्हणून काही विधी केले अन मनात भावच नसेल तर ती केवळ एक वस्तू आहे, त्यात प्राण प्रतिष्ठापित नाहीत. चराचरात भगवंत असल्याने त्या मुर्तीत भक्तीचे सिंचन केले की भगवंत तुमच्यासाठी तिथे आहेच
मी कलच चान्दीची लक्ष्मी ची मुर्ती घेतली. तीची पूजा कशी करु? नेहेमी सारखीच की कही वेगळी?
-------
चांदीची घ्या नाहितर दगडाची घ्या, रान्फुल वाहा किंवा गुलाब वाहा, पक्वान्नाचा नैवेद्य अर्पण करा किंवा चिमुटभर साखर अर्पण करा, कर्मकांडांच्या अटी पुर्ण करता करता भाव आईच्या (लक्ष्मी) चरणी अर्पण करताना हातचं काहीही राखून ठेवू नका.
कोणत स्तोत्र म्हणू (श्रीसुक्त ?)? कोणत्या दिवशी स्थापना करू? प्लिज कोणितरी सविस्तर सान्गा..
---------
श्रीसुक्त तर उत्तमच आहे. ते शब्दशः कळलं नाही तरी "मी माझ्या आईची कृपा आठवतेय, माझ्या आईचं वर्णन करतेय" हा भाव मनी असू दे. कुठचाही दिवस, कुठचाही क्षण अमंगल नाही जोपर्यंत त्या जगन्माऊलीची नजर आपल्याकडे लागून राहिली आहे. एक क्षणजरी आपल्या वागण्यामुळे (आहार विहार आचार विचार यांचे प्रज्ञापराध) तिने नजर आपल्यावरुन हटवली तरी शापाने ग्रासणेच होय (मंगलाचे दूर जाणे म्हणजे शापच !).
शेवटी, तुमच्या आईला भेटायला हे अडथळे तुम्हाला अडवू शकले नाही पाहिजेत
तुम्हाला वरील उत्तर कदाचित अपेक्षित नसेल, पण तुम्ही विचारलंय तर लिहिल्याशिवाय राहवलं नाही. प्लिज रागावू नका
Submitted by अश्विनी के on 9 November, 2009 - 13:59
माझ्याकडे पंचधातुचे २ देव आहेत (गणपती, क्रुष्ण). देव्हारा नव्हता म्हणुन ह्यावेळि कोल्हापूरला गेल्यावर एक सुबक देव्हारा घेतला आणि तिकडे गणपती, क्रुष्ण आणि महालक्श्मि च्या चांदिच्या मुर्ति इतक्या देखण्या होत्या कि घ्यायचा मोह अगदिच आवरला नाही. तर आता ह्या जुन्या मुर्ती काढुन मी नवीन मुर्तीची स्थापना केली तर चालेल का? काहि विधि आहे का तसे करण्यासाठि.जाणकारांनी मदत करावी pls.
पंचधातूच्या मूर्ती काढुन ठेवायच्या की नाही ते लोक सांगतील पण त्या मोडीत वगैरे नका टाकु आता जुने असतील तर अज्जीबात नको कारण चांगला पंचधातू आता अगदी दुर्मिळ आहे.
सोनल, अश्विनिला अनुमोदन. स्थापना केल्यानंतरच्या महिन्यातील पहिल्या मंगळवारी एक तास एका वृद्धाश्रमात घालवा. पुढच्या महिन्याच्या पहिल्या मंगळवारी एका अनाथालयात. मग अंधांच्या संस्थेत, मतिमंदांच्या शाळेत इत्यादी.
अश्विनी अगदी माझ्या मनातले लिहिलेस. जोपर्यंत हे कळणार नाही तो पर्यंत हिंदू जीवनशैलीतले ३३ कोटी देव, मूर्तीपुजा, 'त्या'च्यापर्यंत पोहचण्यासाठी उपलब्ध असलेले अनेक मार्ग यांची उकलच होणे नाही.
सोनल अगदी कडक कर्ममार्ग आचरायचा म्हटला तर प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्तीची रोज पूजा (निदान पंचोपचारी) करावी लागते. पण भक्तीमार्ग सांगतो जेंव्हा तुम्हाला शक्य नाही तेंव्हा ती मुर्ती मनात आणा आणि तिची मानसपुजा करा (ही तर शोडषोपचारे करता येईल अगदी रोज). दोनही मार्ग बरोबर आहेत. तुम्हाला रुचेल, पटेल तो निवडा आणि त्यावर चालू पडा. मार्गक्रमणा सुरु होणे हे सगळ्यात महत्वाचे!
माझ्या सासरच्या घरी देव घरसुद्धा नव्हते. आता घरी मी व मुलगीच असतो. मी माझ्या लहानपणची आठ्वण म्हणून, मुलीला समजावे म्हणून व स्वतःला सोबत म्हणून नव्याने देवघर वसविले आहे. त्यात लग्नात आणलेले
गणपती, देवी व एक लक्श्मी ची मुर्ती आहे, एक रुद्राक्ष आहे, आईच्या देवघरातील साइबाबांचा फोटो आहे. राधा किशन आहेत. माझ्या लक्षात आले की महादेवच नाही. मला काचेची किन्वा क्रिस्ट्ल ची पिन्डी हवी आहे.
माझे लहान पण पुणयातील पांचाळेश्ववर देवळाच्या शेजारी गेले त्यामुळे घरात शंकराचे प्रतीक हवे असे वाट्ते आहे. आणून बसवू का? त्याचे काही नीयम आहेत का? घरात वडिलधारे कोणीच नाही त्यामुळे देवाचा प्रेझेन्स
जवळ हवा असे वाट्ते आहे. सल्ला द्या.
Submitted by अश्विनीमामी on 10 November, 2009 - 00:51
प्लिज रागावू नका >> अश्विनि के रागवण्याचा प्रश्णच नाहि... खूपच छान प्रतिसाद.. मी मझ्या बाबाना देखील हे विचारले होते. त्यान्नी सुद्धा हेच उत्तर दिलं. मनात भाव असला म्हणजे झालं बकी कही करयला नको... तरी म्हणलं अजुन कही मी करू शकेन असं मिळाल तर बघु...
श्रीसुक्त तर उत्तमच आहे. ते शब्दशः कळलं नाही तरी "मी माझ्या आईची कृपा आठवतेय, माझ्या आईचं वर्णन करतेय" हा भाव मनी असू दे.>> श्रीसुक्ताचा अर्थ मी वाचलाय त्यामुळे माहित आहे. म्हणताना आपोआप तो भाव येतोच.
एक शंका आहे.
घरातील वृद्ध व्यक्तीचा(आजी/आजोबा) मृत्यू झाल्यास घरातील तरूण व्यक्तीचा(नात/नातू) विवाह एक वर्षाच्या आत किंवा तीन वर्षांनीच करता येतो.....याबद्दल कुणी मार्गदर्शन करेल का?
कारण अॅरेंज मॅरेजमधे जर समजा एक वर्षाच्या आत लग्न ठरले नाही व पुढील वर्षात ठरले तर नियमाप्रमाणे तीन वर्षे थांबण कसं काय जमेल?
आमच्या देव्हा-यात शंकराची पिंडी, पार्वती आणि कृष्णाची मूर्ती आहे. आता सासरे गेल्यानंतर त्यांच्याकडची शंकराची पिंडी, पार्वती आणि बाळकृष्ण आमच्याकडे आणला आहे. एकाच देव्हा-यात अशा डबल मूर्त्या असल्या तर चालते ना? समजा नसेल तर काय करावे लागते? माझा नवरा थोडा भाविक आहे त्यामुळे काही शास्त्राधार कोणी सांगितला तर बरे होईल. धन्यवाद !
जर पूजेमधल्या मूर्ती काही कारणाने काढून ठेवायच्या असतील, तर नेहेमीची पूजा करायची. नैवेद्य दाखवल्यानंतर त्या मूर्ती तबकात काढून ठेवायच्या, त्यावर तीन पळ्या पाणी उदक म्हणून सोडायचे आणि वस्त्रात फुलांसह बांधून ठेवायच्या. मनाला आधार म्हणून जे स्तोत्र आवडतं ते म्हणावं
परत त्या मूर्ती पूजेत ठेवायच्या असतील तेव्हा, त्यांवर आधी पाणी सोडून, स्वच्छ करून नेहेमीप्रमाणे देव्हार्यात ठेवायच्या.
मामी, आमच्याकडेही पिंड नव्हती, श्रीशैल्यहून स्फटिकाची पिंड आणून, आधी तिची वेगळी पूजा करून, मग इतर देवांच्या मूर्तीसोबत ठेवली आहे.
श्रीसुक्ताचा अर्थ मी वाचलाय त्यामुळे माहित आहे
सोनल, कुठे वाचलय तुम्ही? म्हंजे अर्थासहित श्रीसुक्ताचं पुस्तक मिळतं का? मला हवं आहे. माझं श्रीसूक्त पाठ आहे पण सगळ्या श्लोकांचा अर्थ कळलेला नाही.
Submitted by मेधा२००२ on 17 November, 2009 - 05:00
नमस्कार मला कोनि सान्गु शकेल
नमस्कार मला कोनि सान्गु शकेल का usa मध्ये कुथे गणेश विसर्जन करावे ... मि richmond virginia ला राहते plz. लवकर माहिति हवि आहे मला उद्याच करायचे आहे ..
मधुसुत, माझ्या माहितीप्रमाणे
मधुसुत, माझ्या माहितीप्रमाणे मोरया या शब्दाचा अर्थ 'नमस्कार' असा आहे. बाकी याबाबतीत तज्ञ आणखी सांगतीलच.
नवरात्रात लोक्स उपवास करतात.
नवरात्रात लोक्स उपवास करतात. चप्पल घालत नाहीत. ते का माहीतीय का कोणाला?? खरंतर नवरात्रात चामडं वापरु नये असा नियम आहे. पण चामडं का वापरु नये हे माहीतीय का कोणाला??
चामडे हे मृत जनावरापासून
चामडे हे मृत जनावरापासून कमावले जायचे. त्यामुळे ते देवाला वापरत नाहीत. हल्ली तर चामड्याकरता जिवंत जनावरे मारली जातात त्यामुळे देवच काय मी मला स्वतःला पण ते (पायताण सोडून) वापरत नाही.
मोरया.. म्हणजे गणेश भक्त
मोरया.. म्हणजे गणेश भक्त मोरया गोसावी... ( नक्की माहीत नाही.. )
शन्कराच्या पिन्डीच्या आकाराचा
शन्कराच्या पिन्डीच्या आकाराचा आणि अणुभट्टीचा आकार एकच असण्याचा काय संबंध ? नुसता आकार एक असेल,
तर गुणधर्म एक असतात का ? गरुडाचा आकारही विमानासारखा दिसतो... मग गरुडाच्या देवळासमोर धावपट्टी
बान्धायचे का?
मंडळी, माझी आई गेल्या २-३
मंडळी, माझी आई गेल्या २-३ वर्षांपासून संकष्ट चतुर्थीचा उपवास करते आहे. पण आता तिला ते जमत नाही. गेल्या आठवड्यात जवळच्या देवळातल्या भटजीला संकष्ट चतुर्थी सोडण्यासाठी काय करावे लागेल असं विचारलं तेव्हा त्याने देवळात ३.५ तास होम करावा लागेल आणि मोदक आणावे लागतील असं सांगितलं. कोणाला संकष्ट चतुर्थी सोडण्यासाठी काय करावे लागतं ह्याची काही माहिती असेल तर प्लीज सांगा.
तसंच संकष्ट चतुर्थी केल्याने संकटं येतात असंही माझ्या आईला कोणीतरी सांगितलं. हे कितपत खरं आहे?
स्वप्ना तू पण? मालिका बघून
स्वप्ना तू पण?
मालिका बघून बघून तुझा असल्या गोष्टींवर विश्वास बसायला लागलेला दिसतोय. धोक्याची घंटा - वेळीच सावध हो.
कोणताही उपास सोडण्याकरता कसलाही होम करावा लागत नाही. मनात काही हेतू बाळगून काही ठराविक काळाकरता - जसे ११, २१ वगैरे - उपास किंवा दुसरे काही व्रत केल्यास त्याचे उद्यापन असू शकते (असलेच पाहिजे असे नाही) पण वयोमानाप्रमाणे उपास सोडण्याकरता कसलाही विधी करावा लागत नाही. थोडे नीट लक्ष दिले तर कळते की कोणत्याही विधीत लवचिकता असते. 'यथाशक्ती' हे प्रत्येक विधीला लागू होते.
आज गणपतीला आपण विघ्नहर्ता म्हणून ओळखतो. पण काही जाणकारांच्या मते पुर्वी गणपती हा विघ्नकर्ता - म्हणजे संकटाचे प्रतिक - होता. भिऊन लोक त्याची पुजा करायचे. असे करता करता मग तो सर्वमान्य झाला. 'संकष्ट चतुर्थी केल्याने संकटं येतात' असे मानण्यामागे हे कारण असू शकते.
madhavm, अहो मी नाही हो ह्या
madhavm, अहो मी नाही हो ह्या उपास-तापासाच्या फंदात पडत. पण मातोश्री करताहेत. आणि आता त्या भटजीने हे असलं काहीतरी सांगितलंय. आता मी तिला "सेकंड ओपिनियन" घ्यायला सांगितलंय.
तरी पण कोणाला काही माहित असेल तर कळवा प्लीज.
अहो देव हा भक्तीचा भुकेला
अहो देव हा भक्तीचा भुकेला आहे... तुमचा भाव महत्त्वाचा आहे बाकी सगळं व्यर्थ आहे... तुम्ही त्याचासाठी काही करा किंवा करु नका... तो तुमच्यांवर कृपार्दॄष्टीच ठेवणारच... म्हणून तर त्याला देव म्हणतात... आपण आपले कर्म चांगल्या भावनेने करत राहायचं बस्स...
जर तुम्हाला काही करायचं असेल तर भुकलेला जेवण द्या, अनाथआश्रमला मदत करा... पण भटजी, पुजारी ह्या बडवेगिरींना काही देवू नका...
स्वप्ना, भटजीला खाऊ घालायचे
स्वप्ना, भटजीला खाऊ घालायचे असेल तर घाला (अर्थात आवश्यकता मुळीच नाही). पण होमहवन करुन पर्यावरणाला मात्र कृपया अजुन असंतुलित करु नका.
जो बदला घेतो, वाईट करतो किंवा चिंतितो तो देव असुच शकत नाही हे थोडा विचार केल्यास तुम्हाला कळेल. आईला पण असे सांगितले तर पटु शकेल.
>>(अर्थात आवश्यकता मुळीच
>>(अर्थात आवश्यकता मुळीच नाही).
अजून लिंबूचा प्रवेश नाही इथे?
वरच्या एक दोन पोस्टांत म्हंटल्याप्रमाणे खरंच आईला समजवलं तर त्यांनाही मनात भिती, किंतू न उरता उपास करणं सोडता येईल.
आमच्या (कोणे एके काळी असलेल्या) १८ लोकांच्या जॉइंट फॅमिलीत बहुतेक रोज कोणाला तरी उपास असायचा. मग भगर, साबुदाण्याची खिचडी, शिन्गाड्याची थालिपिठं हे असलं उपासाला. निर्जळी करायला सांगितली तर आत्यानी 'माझा नाही बाई विश्वास' असं सांगून टाकलं!
पण लोकांच्या वाढत्या पित्त प्रकृत्या बघून एक दिवशी आजीनी फतवा काढला 'शेंगदाणे, तूप आणि 'साखरेचे पदार्थ' खाणं पुरे झालं. सगळ्यांचे उपास बंद. हवं तर फळं खाऊन रहा, किंवा कडकडीत उपास करा'. कुठलाही होम वगैरे न करता हरताळका, चतुर्थ्या, एकादशा, प्रदोष आणि असले सगळे उपास बंद होऊन, महिन्यातून एखाद्या रविवारी बदल म्हणून सकाळच्या न्याहरीला उपासाचे पदार्थ व्हायला लागले. अचानक उपास सोडल्यामुळे कुटुंबात कोणावरही काही गंडांतर आलं नाही. 
madhavm, raju76, aschig,
madhavm, raju76, aschig, Mrinmayee, तुमच्या मेसेजेसबद्दल खरंच खूप आभार! मी आईला हेच सांगितलं होतं. पण ती उगाच घाबरत होती की काही संकट यायला नको. आणि अर्थात "घरकी मुर्गी दाल बराबर" असा प्रकार त्यामुळे माझं बोलणं शहाणपणा/ आगाऊपणा ठरला होता.
शेवटी तुमचे मेसेजेस वाचून दाखवले तिला. तेव्हा कुठे पटलं
बिचारा भटजी! त्याचे मोदक चुकले 
बिचारा भटजी! त्याचे मोदक
बिचारा भटजी! त्याचे मोदक चुकले>>> मग ते आम्हाला दे.
घरातल्या देवघरासाठी एखाद्या
घरातल्या देवघरासाठी एखाद्या देवाची नविन मुर्ती घेतल्यास तिची स्थापना कशी करवी? मी कलच चान्दीची लक्ष्मी ची मुर्ती घेतली. तीची पूजा कशी करु? नेहेमी सारखीच की कही वेगळी? कोणत स्तोत्र म्हणू (श्रीसुक्त ?)? कोणत्या दिवशी स्थापना करू? प्लिज कोणितरी सविस्तर सान्गा..
madhavm, अहो मोदकाला सुवास
madhavm, अहो मोदकाला सुवास यायला हळदीची पानं लागतात. ती नाही ना मिळत आता बाजारात. पुढच्या वर्षी नक्की
सोनल, तुमच्याकडे "संपुर्ण
सोनल,
तुमच्याकडे "संपुर्ण चातुर्मास" पुस्तक आहे का? त्यात माहिती मिळेल.
घरातल्या देवघरासाठी एखाद्या
घरातल्या देवघरासाठी एखाद्या देवाची नविन मुर्ती घेतल्यास तिची स्थापना कशी करवी?
----
स्थापना किंवा प्राणप्रतिष्ठा हे विधी माझ्या मते केवळ त्या मुर्ती नामक वस्तू वर आपला भाव निर्माण होण्यासाठी केले जात असावेत. otherwise, भाव तोची देव या उक्तीप्रमाणे एखाद्या मुर्तीवर आपण नुस्ते भक्तीभाव अर्पण केल्यानेही (आपले प्राण ओतून किंवा प्रतिष्ठापून, पुर्ण प्रेमाने) ती मुर्ती प्रतिष्ठापीतच होते. केवळ उपचार म्हणून काही विधी केले अन मनात भावच नसेल तर ती केवळ एक वस्तू आहे, त्यात प्राण प्रतिष्ठापित नाहीत. चराचरात भगवंत असल्याने त्या मुर्तीत भक्तीचे सिंचन केले की भगवंत तुमच्यासाठी तिथे आहेच
मी कलच चान्दीची लक्ष्मी ची मुर्ती घेतली. तीची पूजा कशी करु? नेहेमी सारखीच की कही वेगळी?
-------
चांदीची घ्या नाहितर दगडाची घ्या, रान्फुल वाहा किंवा गुलाब वाहा, पक्वान्नाचा नैवेद्य अर्पण करा किंवा चिमुटभर साखर अर्पण करा, कर्मकांडांच्या अटी पुर्ण करता करता भाव आईच्या (लक्ष्मी) चरणी अर्पण करताना हातचं काहीही राखून ठेवू नका.
कोणत स्तोत्र म्हणू (श्रीसुक्त ?)? कोणत्या दिवशी स्थापना करू? प्लिज कोणितरी सविस्तर सान्गा..
---------
श्रीसुक्त तर उत्तमच आहे. ते शब्दशः कळलं नाही तरी "मी माझ्या आईची कृपा आठवतेय, माझ्या आईचं वर्णन करतेय" हा भाव मनी असू दे. कुठचाही दिवस, कुठचाही क्षण अमंगल नाही जोपर्यंत त्या जगन्माऊलीची नजर आपल्याकडे लागून राहिली आहे. एक क्षणजरी आपल्या वागण्यामुळे (आहार विहार आचार विचार यांचे प्रज्ञापराध) तिने नजर आपल्यावरुन हटवली तरी शापाने ग्रासणेच होय (मंगलाचे दूर जाणे म्हणजे शापच !).
शेवटी, तुमच्या आईला भेटायला हे अडथळे तुम्हाला अडवू शकले नाही पाहिजेत
तुम्हाला वरील उत्तर कदाचित अपेक्षित नसेल, पण तुम्ही विचारलंय तर लिहिल्याशिवाय राहवलं नाही. प्लिज रागावू नका
माझ्याकडे पंचधातुचे २ देव
माझ्याकडे पंचधातुचे २ देव आहेत (गणपती, क्रुष्ण). देव्हारा नव्हता म्हणुन ह्यावेळि कोल्हापूरला गेल्यावर एक सुबक देव्हारा घेतला आणि तिकडे गणपती, क्रुष्ण आणि महालक्श्मि च्या चांदिच्या मुर्ति इतक्या देखण्या होत्या कि घ्यायचा मोह अगदिच आवरला नाही. तर आता ह्या जुन्या मुर्ती काढुन मी नवीन मुर्तीची स्थापना केली तर चालेल का? काहि विधि आहे का तसे करण्यासाठि.जाणकारांनी मदत करावी pls.
पंचधातूच्या मूर्ती काढुन
पंचधातूच्या मूर्ती काढुन ठेवायच्या की नाही ते लोक सांगतील पण त्या मोडीत वगैरे नका टाकु आता जुने असतील तर अज्जीबात नको कारण चांगला पंचधातू आता अगदी दुर्मिळ आहे.
सोनल, अश्विनिला अनुमोदन.
सोनल, अश्विनिला अनुमोदन. स्थापना केल्यानंतरच्या महिन्यातील पहिल्या मंगळवारी एक तास एका वृद्धाश्रमात घालवा. पुढच्या महिन्याच्या पहिल्या मंगळवारी एका अनाथालयात. मग अंधांच्या संस्थेत, मतिमंदांच्या शाळेत इत्यादी.
दिप्ती, ज्या देवांनी तुमची
दिप्ती, ज्या देवांनी तुमची इतके दिवस इनामे इतबारे सेवा केली, त्यांना नवे देव येताच असा बाहेरचा रस्ता नका दाखवु. share-share करु द्या त्यांना देव्हारा.
अश्विनी अगदी माझ्या मनातले
अश्विनी अगदी माझ्या मनातले लिहिलेस. जोपर्यंत हे कळणार नाही तो पर्यंत हिंदू जीवनशैलीतले ३३ कोटी देव, मूर्तीपुजा, 'त्या'च्यापर्यंत पोहचण्यासाठी उपलब्ध असलेले अनेक मार्ग यांची उकलच होणे नाही.
सोनल अगदी कडक कर्ममार्ग आचरायचा म्हटला तर प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्तीची रोज पूजा (निदान पंचोपचारी) करावी लागते. पण भक्तीमार्ग सांगतो जेंव्हा तुम्हाला शक्य नाही तेंव्हा ती मुर्ती मनात आणा आणि तिची मानसपुजा करा (ही तर शोडषोपचारे करता येईल अगदी रोज). दोनही मार्ग बरोबर आहेत. तुम्हाला रुचेल, पटेल तो निवडा आणि त्यावर चालू पडा. मार्गक्रमणा सुरु होणे हे सगळ्यात महत्वाचे!
शंकराची पिंडी दक्षिण - उत्तरच
शंकराची पिंडी दक्षिण - उत्तरच का ठेवतात?
अश्विनि के, सुन्दर पोस्ट.
अश्विनि के, सुन्दर पोस्ट.
माझ्या सासरच्या घरी देव घरसुद्धा नव्हते. आता घरी मी व मुलगीच असतो. मी माझ्या लहानपणची आठ्वण म्हणून, मुलीला समजावे म्हणून व स्वतःला सोबत म्हणून नव्याने देवघर वसविले आहे. त्यात लग्नात आणलेले
गणपती, देवी व एक लक्श्मी ची मुर्ती आहे, एक रुद्राक्ष आहे, आईच्या देवघरातील साइबाबांचा फोटो आहे. राधा किशन आहेत. माझ्या लक्षात आले की महादेवच नाही. मला काचेची किन्वा क्रिस्ट्ल ची पिन्डी हवी आहे.
माझे लहान पण पुणयातील पांचाळेश्ववर देवळाच्या शेजारी गेले त्यामुळे घरात शंकराचे प्रतीक हवे असे वाट्ते आहे. आणून बसवू का? त्याचे काही नीयम आहेत का? घरात वडिलधारे कोणीच नाही त्यामुळे देवाचा प्रेझेन्स
जवळ हवा असे वाट्ते आहे. सल्ला द्या.
प्लिज रागावू नका >> अश्विनि
प्लिज रागावू नका >> अश्विनि के रागवण्याचा प्रश्णच नाहि... खूपच छान प्रतिसाद.. मी मझ्या बाबाना देखील हे विचारले होते. त्यान्नी सुद्धा हेच उत्तर दिलं. मनात भाव असला म्हणजे झालं बकी कही करयला नको... तरी म्हणलं अजुन कही मी करू शकेन असं मिळाल तर बघु...
श्रीसुक्त तर उत्तमच आहे. ते शब्दशः कळलं नाही तरी "मी माझ्या आईची कृपा आठवतेय, माझ्या आईचं वर्णन करतेय" हा भाव मनी असू दे.>> श्रीसुक्ताचा अर्थ मी वाचलाय त्यामुळे माहित आहे. म्हणताना आपोआप तो भाव येतोच.
असो प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद.
aschig, उत्तम suggestion..
एक शंका आहे. घरातील वृद्ध
एक शंका आहे.
घरातील वृद्ध व्यक्तीचा(आजी/आजोबा) मृत्यू झाल्यास घरातील तरूण व्यक्तीचा(नात/नातू) विवाह एक वर्षाच्या आत किंवा तीन वर्षांनीच करता येतो.....याबद्दल कुणी मार्गदर्शन करेल का?
कारण अॅरेंज मॅरेजमधे जर समजा एक वर्षाच्या आत लग्न ठरले नाही व पुढील वर्षात ठरले तर नियमाप्रमाणे तीन वर्षे थांबण कसं काय जमेल?
आमच्या देव्हा-यात शंकराची
आमच्या देव्हा-यात शंकराची पिंडी, पार्वती आणि कृष्णाची मूर्ती आहे. आता सासरे गेल्यानंतर त्यांच्याकडची शंकराची पिंडी, पार्वती आणि बाळकृष्ण आमच्याकडे आणला आहे. एकाच देव्हा-यात अशा डबल मूर्त्या असल्या तर चालते ना? समजा नसेल तर काय करावे लागते? माझा नवरा थोडा भाविक आहे त्यामुळे काही शास्त्राधार कोणी सांगितला तर बरे होईल. धन्यवाद !
जर पूजेमधल्या मूर्ती काही
जर पूजेमधल्या मूर्ती काही कारणाने काढून ठेवायच्या असतील, तर नेहेमीची पूजा करायची. नैवेद्य दाखवल्यानंतर त्या मूर्ती तबकात काढून ठेवायच्या, त्यावर तीन पळ्या पाणी उदक म्हणून सोडायचे आणि वस्त्रात फुलांसह बांधून ठेवायच्या. मनाला आधार म्हणून जे स्तोत्र आवडतं ते म्हणावं
परत त्या मूर्ती पूजेत ठेवायच्या असतील तेव्हा, त्यांवर आधी पाणी सोडून, स्वच्छ करून नेहेमीप्रमाणे देव्हार्यात ठेवायच्या.
मामी, आमच्याकडेही पिंड नव्हती, श्रीशैल्यहून स्फटिकाची पिंड आणून, आधी तिची वेगळी पूजा करून, मग इतर देवांच्या मूर्तीसोबत ठेवली आहे.
अश्विनी_केची पोस्ट अतिशय मार्गदर्शक!
श्रीसुक्ताचा अर्थ मी वाचलाय

Pages