रीतीरीवाज

Submitted by admin on 12 January, 2009 - 23:47

धार्मिक रीतीरीवांजाबद्दलचं हितगुज

या अगोदरचं हितगुज इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओत की लवकर. मी बसलेय गोळा करायला मोठा रुमाल घेऊन Proud
अ.मा. अगं जोधा अकबर वाला बिबि शोध त्यात "आईने" वरुन कोटी आहे. हसावं की रडावं कळत नव्हतं. संतू देखील बावचळला होता "तो" प्रश्न बिबिवर आल्यावर.

अगदी बरोब्बर मामी! कालच माझ्या भाच्याचे झाले..! हळदीकुंकू पण तेव्हाच आटोपून घेतले! बाळाला काळे कपडे घालून बसवले होते. हलव्याचे दागिने असले तर ते घालायचे! ५ सवाष्णीनी बाळाला ओवाळले.आणी नंतर चुरमुरे, हरभरा, बोरे,गाजराचे तुकडे, उसाचे तुकडे, चॉकलेटस एवढच काय, द्राक्ष सुद्धा डोक्यावरुन टाकले.
परवा माझ्या भाचीच्या सासुने तर चक्क नातूच्या डोक्यावरुन बिस्कीटाचे पुडे ( ५-५ रुपयाला गुड्डे चा छोटा पुडा येतो) ओतले! Lol

'आइने अकबरी' लिहिलं यावर माझ्या आईने काही नाही लिहिलं असं उत्तर आलं समोरून की कसं गोठलेलं कोंबडं होईल? तेच या संतूचं झालं होतं..
समोरचा अर्थातच ___ (गा.जा.भ.)

असं नव्हतं ते नीरजा. संतूने लिहिलं आई-ने अकबरी मधे अमुक ढमुक लिहिलं होतं. त्यावर प्रश्न आला की संतूच्या आई लिहीतात? त्यावर संतूसारखा धारदार माणून बोथटला.

ह बरोबर... माझी वातावरणनिर्मिती चुकली.. पण गोठलेलं कोंबडं नक्कीच.. Wink

सावट, चांगले लिहिले आहे, पण ते रीतीरीवाजापलिकडे जाऊन तत्वज्ञानात मोडेल.

इतक्यातच नीती व न्याय याबद्दल वाचत होतो. रीती म्हणजे पारंपारीक, चालत आलेले, flowing (अर्थात कधिपासुन हे पहाणे महत्वाचे - अनेक प्रथा या इतक्यातच सुरु झालेल्या आहेत).
नीती म्हणजे सांस्थानीक रीती.
न्याय म्हणजे नीतींपलिकडे जाणारे हितकारक आचरण.

अनेकदा न्याय करायचा असेल तर रीती आणि नीती यांना मोडित काढावे लागु शकते.

सर्व चर्चा वाचली...
पुर्वी ऋषींनी अनेक लोकोपयोगी वैज्ञानिक गोष्टी धार्मिक बनवून सांगितल्या,
नंतर त्याच्या रूढी, परंपरा, रितीरिवाज बनले आणि त्यातले मुळ तत्व हरवले.
अनेक गोष्टींचा पुर्वीच्या काळी खरोखर उपयोग होता,
पण आता बदललेल्या काळात त्याचा तेवढा उपयोग राहिला नाही.
एक उदा. नागपंचमीच्या दिवशी काही चिरायचे नाही, भाजायचे नाही, इ.
पुर्वी शेतामधे असलेली भाजी भराभर चिरून तव्यावर टाकत असताना त्यामधे चुकून नाग किंवा तत्सम प्राणी येत असतील. अथवा भाजी तोडायला गेल्यावर नाग दिसला तर लोक मारत असतील.
त्यामुळे वर्षातला एक दिवस तरी नागांना अभय मिळावे हा हेतू असणार.
पण आजकाल भाज्या निट पारखून घेतल्या तर चिरताना, भाजताना, परतताना कोणी त्यामधे येत नाही.
त्यामुळे ही प्रथा अगदी जशीच्या तशी पाळलीच पाहिजे असे नाही.
प्रत्येक प्रथेमागचे कारण समजावून घेऊन ती पाळायची की नाही हे ठरवावे.

अ‍ॅसीमोवची एक गोष्ट आहे, ज्यात एका ग्रहावर जतरी) तीन सूर्य असल्यामुळे कधीच रात्र होत नाही (काहि हजार वर्षे तरी). पण काही ठराविक काळानंतर ग्रहणामूळे रात्र होते नि अचानक अंधार झाल्यामूळे लोकांवर मानसिक परीणाम होऊन वेडपिसे होतात व सगळे नष्ट करतात. हे चक्र बरेच वेळा होत असते नि तिथल्या धार्मिक ग्रंथांमधे ह्या प्रसंगाचा उल्लेख सांकेतिकरित्या येतो. ती आठवली वरचे पोस्ट वाचून.
>> मला जास्तच फारफेच्ड वाटलं हे नोव्हेल.. मला अ‍ॅसिमोव्ह ओव्हरऑल खूप आवडतो.. पण ह्यात नंतर मरणार कोण जगणार कोण हे अगदी हिंदी चित्रपटासारखं वाटलं (डॉ शिरीन ला हिरवीण नाहिये ना, मारा त्याना)
मी हे पुस्तक वाचलं आणि मग २०१२ चा प्रपोगंडा सुरू झाला.. त्याची टिंगल करताना राहून राहून मला नाईटफॉल आठवत होतं

माफ करा, पण या धमक्या प्रत्येक धर्मात आहेत, फक्त आपल्याच धर्मात नाहीत, किमान आपल्या धर्मात हे नियम पाळले नाहीत तरी चालते. हेतरी किमान लक्षात घ्या.
>> अग, आपल्या धर्मात 'न पाळलेलं' कित्येक शतकं चालत नव्हतं.. त्यातून आपलीच प्रगती खुंटली.
आपला काय किंवा आपल्याला ज्ञात असलेले इतर धर्म काय - हे कित्येक शतकांपूर्वीचे (काही सहस्त्रकांपूर्वीचे).
अग, काही स्कॉलर्स तर रुग्वेदाचा काळ ख्रिस्तपूर्व ५ ते ६००० वर्ष सांगतात, म्हणजे आत्तापासून ७ ते ८!
त्या काळात ह्या लोकांनी इतकं लिहिलं ह्याचं कौतुक, अभिमान तर वाटतच ग! आपलेच पुर्वज ना हे.
इनफॅक्ट क्वांटम फिजिक्सच्या क्षेत्रातले काही दिग्गज वेदांना मानतात - ह्याचं मुख्य कारण वेदात सांगितलेल्या गोष्टी - त्यांना क्वांटम फिजिक्स मध्ये अनुभवता येतात! ह्या सगळ्या गोष्टींबद्दल अभिमान वाटतोच. पण म्हणून सत्यनारायणासारख्या कथा माझ्यासारख्या देवावर प्रेम करणार्‍या माणसाला नाही पटत. भिती आणि प्रेम ह्यात फरक आहे. देवावर प्रेम करावं.. भितीच्या आहारी जाऊ नये. (असं मला वाटतं)
एक ९३ वर्षाच्या अध्यात्मातल्या एका मोठ्या माणसानं छान सांगितलेलं- म्हणालेले: "दक्षिणेकडे दिव्याची वात नको वगैरे- असलं काही नाही.. सगळ्या दिशा देवानच निर्माण केल्या - आणि सगळ्या दिशांना तोच आहे." मला त्यांच १००% पटलं..
नाहीतर अथर्वशीर्ष म्हणताना गणपतीला 'सूर्य-चंद्राची' उपमा द्यायची आणि गणेश चतुर्थीला चंद्र नाही पहायचा.. मला नाही पटत हे!

मी हे पुस्तक वाचलं आणि मग २०१२ चा प्रपोगंडा सुरू झाला.. त्याची टिंगल करताना राहून राहून मला नाईटफॉल आठवत होतं>> अ‍ॅसिमोव्ह ने हे १९४० etc मधे प्रसिद्ध केलेली, त्याचा २०१२ शी काहि संबंध नाहि. मला वाटते ह्याच कथेमुळे त्याला खुप प्रसिद्धि मिळाली नि ह्या कथेला Best Sci-Fi short story पण मानले जाते.

त्याचा २०१२ शी काहि संबंध नाहि>> डायरेक्ट संबंध नाहीये हो..
पण थीम बघा ना.. काही कारणामुळे आपल्या जगाची वाट लागणार आहे - असं फ्लेम ऑफ अ‍ॅपोझल वाले ओरडून सांगत असतातः फक्त धार्मिक लोकच लक्ष देतात. मग शास्त्रज्ञांचा गृप म्हणतो की ते म्हणतात तसं होईल.. तरीही लोक विश्वास ठेवत नाहीत.
२०१२ ची ही तीच थीम आहे (कारण कुठलं का असेना!) की जगाची वाट लागणार आहे.. मध्यंतरी डिस्कव्हरी आणि नॅट जीओवरही सतत हेच दाखवायचे .. की २०१२ ची जगबुडी कशी शक्य आहे.. त्याकरता शास्त्रज्ञांच्याही मुलाखती घ्यायचे! आणि अर्थातच आपण कुणीच ह्यावर विश्वास ठेवत नाहियोत (पुस्तकात पण कुणीच विश्वास ठेवत नाही)
हे मला दिसलेले पॅरलल्स - आणि म्हणून मी तो रेफरन्स दिला.

माहित नाही.. मला फॉऊंडेशन सिरीज वाचल्यानंतर वाचलेली त्याची २-३ पुस्तकं जरा फारफेच्ड वाटली!
१ महिन्यात बरचसं अ‍ॅसिमोव्ह वाचल्याचा परिणाम असेल.

लोक नाही तरी मूर्खच असतात नॉर्मली.(अ‍ॅबनॉर्मली ते शहाण्यासारखे वागतात.) {लोक या संज्ञेत साधारणपणे प्रथम पुरुषी लोक येत नाहीत :)}

विश्वासासाच जर प्रश्न असेल तर तिथेही हा मूर्खपणा आहेच.
म्हणजे असं तुम्ही त्याना सांगितलं ना की अवकाशात २५ निखर्व तारे आहेत. ते मुळीच शंका घेणार नाहीत. एकदम अ‍ॅक्सेप्ट करतील. पण भिंतीला रंग दिलेला आहे असे कितीही कोकलून सांगा. तरी ते खात्री करण्यासाठी त्याला अविश्वासाने बोट लावून पाहतीलच Proud

पण थीम बघा ना.. >> मला वाटते कि त्याची खरी थीम सत्य पारंपारिक मौखिक ज्ञान नि शास्त्रीय संशोधनामधून आलेले ज्ञान ह्यात कसे overlap झालेले असते हि आहे.

हूडा, मूर्खपणा कसा म्हणता?

माणूस, जे सहज शक्य असेल ते पडताळून पहातो. आकाशातले तारे मोजणं सहज शक्य नाही त्यामुळे पडताळण्याच्या वाटेला जात नाही पण रंग ओला आहे का नाही ते सहज पडताळता येतं. Proud

मला तर नाईटफॉल ही फार भारी कथा वाटली. खूप आवडली होती.

असामी, बरोबर आहे. त्या कथेला अमेरिकन सोसायटी ऑफ सायन्स फिक्शन ने 'बेस्ट सायन्स फिक्शन स्टोरी रिटन एवर' असं काहीतरी वोट केले आहे...

परमशिवाच्या अर्धनारीनटेश्वर प्रतिकाचं ज्ञान मार्कंडेय ऋषींना या रात्री झालं. त्या वेळेस त्यांनी परमशिवाची पूजा केली. ती सांगितली अगस्त्य ऋषींनी. नंदी ऋषींनी सिद्ध केलेला ॐ नमःशिवाय जप म्हणावा. शिवपञ्चाक्षर स्तोत्राचं नंदिपक्षात रोज ११ वेळा म्हणतात. (नंदि पंधरवडा = महाशिवरात्रीला मध्य धरुन असलेल पंधरवडा).

अर्धनारीनटेश्वर :-
------------
स्री ही स्थितीज उर्जेचं प्रतिक व पुरुष हे गतीज उर्जेचं प्रतिक. अशा परस्परविरोधी गोष्टींचं उचितप्रकारे एकत्र येणं व उचित गोष्ट तयार करणं हे परमशिवाचं विश्वातील कार्य आहे. स्त्रीचं बीज हे एकच (अपवादांमधे अधिक) तयार होतं व ते गर्भाशयातच स्थिर रहातं. ओव्हरीज मधे तयार झालं तरी गर्भाशयात येताना ट्युबच्या आकुंचन प्रसरणामुळे पुढे पुढे ढकलत येतं. त्याला स्वतःची गती नाही. तर पुरुष बीजे ही अ‍ॅक्टीव्ह असतात आणि कोट्यांच्या संख्येत असतात. असा विरोधाभास असूनही बरोब्बर गर्भधारणा होते.

तसेच समुद्राची किंवा नदीची वाळू. ही वाळू म्हणजे खरंतर पाषाण असतात व पाण्याच्या सततच्या मार्‍यामुळे त्यांचा बारीक चुरा होतो. आता पाषाण हा खूप कठीण आणि पाणी हे खूप मृदू. आपण ५ किलोचा धोंडा कोणाच्या डोक्यात घातला तर ताबडतोब आपल्याला आत टाकले जाईल. पण ५ लिटर पाणी ओतले तर इजा काहीच होणार नाही. असे असताना हे पाणी पाषाण फोडू शकते. हे विरोधी तत्व योग्यप्रकारे एकत्र आणणे हे परमशिवाचे कार्य. म्हणूनच वाळू पासून बनलेलं शिवलिंग (वाळूकेश्वर) हे सर्व शिवलिंगांत श्रेष्ठ मानलं जातं. कारण ते परमशिवाच्या कार्याचं उत्तम प्रतिक आहे.

अश्विनी, चांगल्या उपमा/उत्प्रेक्षा आहेत. तुम्ही झीमर यांचे 'Myths and Symbols in Indian Art and Civilization' वाचले आहे का? त्यात याप्रकारची खुप सुंदर माहिती आहे.

स्त्रीयांनी नवनाथ पोथी वाचू नये असे म्हणतात ते का? (नवनाथांची पोथी स्त्रियांनी हातातही घेवु नये असे ऐकले आहे) नवनाथ कथासार वाचले तर चालते का?

सगळे चालते. नवनाथ हे कानफाटे, कडक ब्रन्हचारी म्हणुन असा समज आहे. खास करुन मच्छींद्रनाथ (== आदीनाथ) याचा शिष्य गोरक्षनाथ याच्याबद्दल. पण हनुमनाने पटविल्यानंतर मच्छींद्रनाथ याने स्वत: स्त्रीराज्याच्या राणीबरोबर विवाह केला होता आणि त्यांना मिननाथ नावाचा मुलगा झाला होता (हे सर्व गोरक्षनाथ तपस्चर्या करत असतांना - मग तो आला आणि म.नाथाला पुन्हा दूर घेऊन गेला.)

ती एकुणच कथा सुरस आहे. स्त्रीराज्यात सगळ्या स्त्रीयाच. त्यांना गर्भधारणा ही मारुतीच्या भु:भुक्काराने व्हायची. तीने मारूतीला प्रसन्न करून (क ते नंतर कधीतरी) त्याने तिच्याबरोबर रहावे असा वर मागीतला. त्याने आपण ब्रह्मचारी असल्याचे सांगुन म.नाथाला तिथे आणण्याचे आश्वासन दिले. म.नाथाने जेंव्हा आपणही ब्रह्मचारी असल्यची हनुमंताला आठवण करुन दिली तेंव्हा त्याने कॉस्मॉलॉजीच्या साय्क्लीक काळाचे मॉडेल उध्रुत करुन सांगीतले की हे ९९वे चक्र आहे. आधीचे ९८ म.नाथ तिथे गेले होते, त्यामुळे त्यालाही जायला हरकत नाही. आणि उर्वरीत सर्व ईताहासजमा (किंवा तसेच काहीतरी).

पश्चातापाबद्दलच्या कथा छान आहेत.

तात्पर्य काय तर खुशाल वाचा.

अगदी अगदी अश्चिग Happy मध्यंतरी गोरखबोध वाचला थोडा थोडा करत. आता ज्ञानदीपबोधाची एकेक ओवी वाच्णं चालू आहे. तात्पर्य, माझ्यामते नवनाथांबद्दलचे वाचन हे स्त्रियांसाठी निषिद्ध नाही. खरंतर काहीच स्त्रियांसाठी निषिद्ध नाहिये. बिनधास्त वाचनेका और कभीभी किसीभी देऊळमे जानेका. काही दिवससुद्धा देवापासून दूर रहायची आवश्यकता नाही.

या बाफ वर पहील्यांदच येतोय .
आण्खीही काही सणंबद्द्ल थोडीशी माहीती.
वडाचे झाड तोडत नाहीत
वटपोर्णिमा: धार्मिक माहीती सावित्रिकथा आणि यमानी दिलेलं जिवदान.
शास्त्रीय कारणं : वड सर्वात जास्त ऑक्सीजन वातावरणात सोडतो विशेषतः दुपारच्या वेळेस.तसच पारंब्याच्यारुपात अधिक कार्बन शोषुन घेतात.या मुळे हा व्रुक्ष दिर्घ काळ टिकतो.

यामुळेच कदाचीत अति उन्हामुळे मुर्छित झालेल्याला गार वार्यामुळे संजीवनी मिळाली आसेल.
वडाची मुळं खूप खूप खोलवर सतत पाण्यापर्यंत पोहोचतात . श्रावणात मांस/मासे खाउ नयेत:
माशांचा विणिचा हंगाम . वादळी पावासामुळे मासेमारी उथळ समुद्रात किनार्यालाच होते . मसे प्रजननासाठी किनार्याकडे येतात. गाभण मासे खाल्यास शरीरास अपाय कारक. तसच कमी प्रजननामुळे नंतर वर्षभर माशांचे उत्पादन कमी होइल.

स्नेहा, कोण म्हणतं घालू नयेत? कुणी म्हणालं असलं तर अज्जिबात ऐकू नकोस. संक्रांतीला काळे कपडे आवर्जून घालतात ना? नॉर्थमधे शादी का जोडा हा लालच असतो ना?

उलट लाल काळ्याच्या काँबिनेशनचा ड्रेस तर मस्तच वाटतो Proud
तर, बिन्धास्त घाल.

पण स्वामी समर्थांच्या गुरुचरित्रातच लिहिले आहे कि जो लाल वस्त्र घालून जेवेल तो चांडाळ होईल.शिवाय अघोरि विद्येचे उपासक देखिल ह्या दोन रंगाचे कपडे घालतात, आणी आमच्या देविलाही काळे चालत नाही असे माहिती पडले आहे. शिवाय ज्याच्या घरी नवरात्रात घट बसतात तेही काळे घालत नाहीत, ते का?

नवजात अर्भकाला पहिल्यांदा देवळात (४० दिवसानी) नेल्यावर थेट घरी जात नाहीत..कोणा दुसर्‍याच्या घरी जाउन त्याच्या डोक्यावर थोडे तेल घालतात.
या मागे काही कारण असते का?

१) नवजात अर्भकाला पहिल्यांदा देवळात (४० दिवसानी) नेल्यावर थेट घरी जात नाहीत..कोणा दुसर्‍याच्या घरी जातात :
बाळाला आपण सव्वा महिन्याचे (४० दिवस) होईपर्यंत घराबाहेर नेत नाहीत. त्यामुळे बाळाला बाहेर काधल्यानंतर पहिले देवाला आणि नंतर कोणा दुसर्‍याच्या घरी नेतात. म्हणजे लाक्षणिक अर्थ असा की आता बाळाला बाहेर न्यायला allowed आहे.

२) त्याच्या डोक्यावर थोडे तेल घालतात:
या मागचं शास्त्रीय कारण माहीत नाही, पण त्या घरातल्यांनी असे न केल्यास त्यांच्या घरी उंदीर निघतात असे म्हणतात. पण याला काही आधार नसावा.
मला असे वाटते की बाळाची टाळू लवकरात लवकर भरून येण्यासाठी जितके तेल घालू तितके चांगले. त्यामुळे (६ ते ८ महिन्यांच्या आतले) बाळ जेव्हा पहिल्यांदा कुणाच्याही घरी नेतात तेव्हा त्याच्या डोक्यावर तेल घालण्याची पद्धत रुढ केली असावी.

Pages