Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डॉमिनंट हात असं न वाचता
डॉमिनंट हात असं न वाचता डॉमिनंट नारळ वाचलं मी.
मीरा
मीरा
उंबर्यावर मस्त फुटतो. पण हल्ली बर्याच जागी उंबराच नसतो.
नारळ फोडण्यावर एवढी चर्चा
नारळ फोडण्यावर एवढी चर्चा Happy >> आय नो! एखादं सिलीकॉन व्हॅलीतलं/बंगळूरूतलं कार्टं वाचून अॅप काढायचं - उबर 'फोड'. उबर बोलावतो तसं नारळ फोडणारा बोलवायचा
पुजार्याला विचारलं तर म्हणेल
पुजार्याला विचारलं तर म्हणेल "ताई, कडप्प्याचा कड बघा आणि हाणा.." झालं इंस्ट्रक्शन.. Wink
छान डिटेल लिहीलं आहे Happy आवडलं.
>> मी जातो त्या मारुती मंदिरात बऱ्याच ताया परपुरुषांना नारळ फोडायला लावतात व रुईचा हारही देवाला घालायला लावतात. बहुतेक मी बघितलेल्या ठिकाणी स्त्रिया देवाला नारळ फोडत नाहीत. कदाचित मोठ्या शहरात असेलही.
नारळ फोडण्याला 'नारळ वाढवणे'
नारळ फोडण्याला 'नारळ वाढवणे' असे का म्हणतात , हे समजले.
नवरा आणि बायको देवळात नारळ
नवरा आणि बायको देवळात नारळ घेउन गेलेत. दर्शन घेऊन झालं आणि बायको म्हणत्येय... अहो थांबा जरा. कोणी परपुरुष येऊ दे ना! मग आपण त्याला नारळ फोडायला सांगू. असा प्रसंग डोळ्यापुढे आला. आणि नारळ हा कोडवर्ड नाहीये.
अहो थांबा जरा. कोणी परपुरुष
अहो थांबा जरा. कोणी परपुरुष येऊ दे ना! मग आपण त्याला नारळ फोडायला सांगू. >>
परपुरूष आणि नारळ फोडणेबद्दल माहिती नाही. बायका फोडतात नारळ. परस्त्री नारळ फोडणारी असेल तर तिला मातेसमान मानावे व उगाच वाटेस जाऊ नये.
हो नारळ वाढवणे म्हणतात.
हो नारळ वाढवणे म्हणतात. सौभाग्यवती स्त्रियांनी नारळ वाढवा यचा नसतो असे काहीतरी शास्त्र आहे. मला नक्की माहीत नाही.
नारळ फोडणे हे प्रतिकात्मक
नारळ फोडणे हे प्रतिकात्मक नरबळी आहे म्हणे, म्हणून असेल.
https://m.facebook.com/www.mahalaxmi.in/photos/a.728221190644920/1014937...
नवरा वाढायची वाट बघा आणि मग
नवरा वाढायची वाट बघा आणि मग नारळ वाढवा.
म्हणजे आधी लगीन घरातल्या नराचं आणि मग प्रतिकात्मक नारळाचं.
मला वाटलं होतं कुणी तरी हे
मला वाटलं होतं कुणी तरी हे करणारच. त्यामुळे 'मंदिरात दर्शनासाठी एकट्याने आलेल्या ताया' हे मुद्दाम लिहीलं नव्हतं. तेवढंच काहींना जोक मारण्याला निमित्त मिळो हीच सद्भावना होती.
अहो थांबा जरा. कोणी परपुरुष
अहो थांबा जरा. कोणी परपुरुष येऊ दे ना! मग आपण त्याला नारळ फोडायला सांगू. असा प्रसंग डोळ्यापुढे आला>>
नारळ फोडण्याला 'नारळ वाढवणे' असे का म्हणतात , हे समजले.>> हा म्हणजे 'कंटाळा येण्याला वीट येणे का म्हणतात ते समजलं' याच्या तोडीचा जोक आहे ( संदर्भ - मी आणि माझा शत्रुपक्ष- पुलं)
काही ठिकाणी बायकांनी नारळ
काही ठिकाणी बायकांनी नारळ फोडू नये हा समज आहे, रीत आहे. माझ्या आजोळी आहे, त्यामुळे आई कधीही नारळ फोडायची नाही पण माझ्या माहेरी किंवा सासरी असली कुठली रीत नाही त्यामुळे मी फोडते. वाढवणे हा शब्द नारळासाठी मी रायगड जिल्ह्यात वापरताना जास्त ऐकला. बाकी रत्नागिरी जिल्ह्या पुढे देवगड भाग इथे नारळ फोडणे असंच ऐकलं आहे.
रायगड जिल्ह्यात चौलला वगैरे नारळफोडी नावाचा खेळही असतो असं वाचलं आहे आणि जुने शेजारी एक चौलचे होते म्हणून माहितेय.
चला लिहिलं अति अवांतर नारळाबद्दल
सगळ्यांनीच या चर्चेची मागची
सगळ्यांनीच या चर्चेची मागची दोन पानं आणि हे तिसरं असं त्रयस्थपणे पुन्हा एकदा वाचा बरं. कुठली चर्चा कुठे गेली आहे!
आता काय किसायला घेउ या बरे?
आता काय किसायला घेउ या बरे?! मी परवा चुकून साख रेच्या बरणीत तांदूळ भरला. मग तीसाखर पाण्यात विरघळली की जाईल म्हणून ते सर्व पाण्यत भिजवले. मग त्यात घालायला उ डीद डाळ भिजवली व सर्व वाटून डोश्याचे पीठ बनवले पण ते पार पार बिघडले. मग सर्व फेकून दिले. साखरे परी साखर, तांदूळ उडीद सर्व गेले. चटणी आली पण डोसा गेला.
अमा
अमा
चटणी आली पण डोसा गेला>>
चटणी आली पण डोसा गेला>>
अमा.. काय बिघडले नक्की? गोड
अमा.. काय बिघडले नक्की? गोड डोसे झाले असते फार तर! तुम्ही साखरेचे पाणी फेकून द्यायला हवे होतेत.
साखरेच्या पाण्याचं काय केलं?
साखरेच्या पाण्याचं काय केलं?
अमा ?! सिरिअसली ???
अमा ?! सिरिअसली ???
साखरेच्या पाण्याचं काय केलं?>
साखरेच्या पाण्याचं काय केलं?>> त्याचा पाक करायचा आणि लहान लहान डोसे करून ते पाकात घालायचे. पाकातल्या पुऱ्यांसारखे पाकातले डोसे!!
बरणी म्हणजे कॉफीची धुवोन
बरणी म्हणजे कॉफीची धुवोन साफ करून मी त्यात किराणा सामान भरते. तर ती रिकामी आहे समजून त्यात तांदूळ ओतले पण खाली १०० ग्राम तरी साखर होती. मग सर्व पातेल्यात ओतले. व त्यावर पाणी ओतले. थोडावेळ थांबून पाणी फेकून दिले. त्यातून साखर गेलीच की.
ते दोन तीन दा धुवून भिजवत ठेवले तांदूळ. मग मापाने उडीद डाळ पण भिजवली. सर्व नेहमी सारखेच. मग रात्री वाटून सकाळी फ्रिज मध्ये ठेवले.
सोमवारी रात्री फारच थकवा अस्तो व लगेच काहीतरी खायला हवे असते ऑफिसातून आल्यावर मग डोसा करायला घेतला तर सर्व चिकट गोळा होउन बसला. डोसा होइच ना त्याचा. मी आज गेली ३० वर्शे तरी नियमाने इड्ली डोसे करते घरी पीठ भिजवून. पण असे कधी चिकट गोळा झाले नव्हते.
चव खराब नव्हती. पण हे बरोबर कन्सिस्टन्सी नव्हे हे कळत होते. मग सर्व बाजूला ठेवून कांदा मिरची होतीच ( उत्तपे खायचा महत्वाकांक्षी प्लान होता) मग हातासरशी उपमा केला व चूल बंद .
अरेच्चा म्हणजे खरंच असं झालं
अरेच्चा म्हणजे खरंच असं झालं होय? मला वाटलं गंमत चालू आहे.
माका चु वर लिहायला हवे होते
माका चु वर लिहायला हवे होते पण मला माहीत आहे काय चुकले म्हणून इथेच टंकिले. साखरेचा अंश राहिल्याने पीठ चुकीच्या मार्गाने फर्मेंट झाले. हे सर्व बायोडिग्रेडेबल आहे हेच काय ते सूख. आता डोसा मोड ऑफ करून धिरडी टोमाटो आमलेट मोड ऑन केला आहे.
अमा, अप्पे होऊ शकतील का
अमा, अप्पे होऊ शकतील का त्याचे?
अरेच्चा म्हणजे खरंच असं झालं
अरेच्चा म्हणजे खरंच असं झालं होय? मला वाटलं गंमत चालू आहे.>> हो तेच मलाही ..
साखरेचा अंश राहिल्याने पीठ चुकीच्या मार्गाने फर्मेंट झाले. >> हो तसंच असणार
हे सर्व बायोडिग्रेडेबल आहे हेच काय ते सूख.>>खरंय
मलाही गंमत केलीये असंच वाटलं.
मलाही गंमत केलीये असंच वाटलं...
मी घरी इडली च्या पिठाच्या
मी घरी इडली च्या पिठाच्या साखर घालून गोड इडल्या करते ..पण साखर अगदी शेवटी पीठ पात्रात भरायच्या आधी घालते.. फरमेंट होण्या आधी नाही ..
या फसलेल्या डोश्याच्या पिठाच्या इडल्या झाल्या असत्या कदाचित .. नेक्स्ट टाइम
मालपुवे/अप्पे तर असेच करतो.
मालपुवे/अप्पे/ गोड सांदणं तर असेच करतो. गुळ घालून रात्रभर ठेवतो. अशी साखर राहिल्याने बिलकुल आंबणे चुकत नाही. उलट साखरेने आंबणे लवकर होते व बॅकटेरिया( आंबवणात जरूरी असलेला) संख्या वाढते.
तवा नीट तापला नसेल आणि साखरेचा पाक होवून चिकटून गोळा होत असेल , दुसरे काही नाही.
इडल्या करून पहायला हव्या
इडल्या करून पहायला हव्या होत्या. कदाचित नयी खोज लागली असती.
Pages