" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"
कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.
"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."
पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.
निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.
(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)
(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)
आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातकचोचीने
प्यावा वर्षाऋतू तरी!
पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.
(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)
नवीन धाग्याचे स्वागत!!
नवीन धाग्याचे स्वागत!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सिध्दी, सुरेख मनोगत
ऑफीसच्या बागेतून...
गावठी गुलाब...ह्याचा सुगंध मस्त आहे
सिध्दी, सुरेख मनोगत>>>> +१.
सिध्दी, सुरेख मनोगत>>>> +१.
विनिता, फोटो मस्तच.
धन्यवाद देवकी
धन्यवाद देवकी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जागूताई, लिंका दोनदा कॉपी पेस्ट झाल्यात मनोगतात...बघशील!!
सिध्दि अप्रतिम लिहिलय मनोगत!
सिध्दि अप्रतिम लिहिलय मनोगत!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऋतूराज तुमचे मनोगतही नेमके, नेटके आणि सुंदर आहे.
विनिता तुम्ही छान सुरवात केली आहे. सुरेख फोटो.
@जागूताई फोटो दिसत नाही मनोगतामधील. आणि लिंक दोनदा दिसत आहेत.
आज माझ्याकडे फुले नाहीत.
आज माझ्याकडे फुले नाहीत.
![180ADCBF-D181-4FB4-8C7A-E5DC0C6B1840.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u32743/180ADCBF-D181-4FB4-8C7A-E5DC0C6B1840.jpeg)
![C8C42AE4-A2BD-419D-B19A-E5A153A9CE8B.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u32743/C8C42AE4-A2BD-419D-B19A-E5A153A9CE8B.jpeg)
![72665092-30A9-4823-BAFA-4EC9B0AA21EB.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u32743/72665092-30A9-4823-BAFA-4EC9B0AA21EB.jpeg)
खार (Squirrel)
बदक (Spotbilled duck)
राखी वटवट्या (Ashy prinia)
अरे वा....!!!!!!
अरे वा....!!!!!!
"निसर्गाच्या गप्पांचा ३४ वा भाग " आला सुध्दा...
या नवीन धाग्याचे मनःपूर्वक स्वागत...
'सिद्धी' सुंदर काव्यमय मनोगत...
ॠतुराज तुझेही छोटेखानी मनोगत छानच...
दोघांचेही अभिनंदन..
असे नव्या दमाचे नवे भिडू मिळाले, मिळत गेले तर त्यासारखी दुसरी चांगली गोष्ट कुठली...?
शाली, मला सद्ध्या तुमचा प्रचि दिसत नाहीये पण तो छानच असणार हे वेगळे सांगायलाच नको.
निसर्गप्रेमाचे बाबतीत तरुण पिढी नव्या जुन्यांच्या मांदियाळीमधे सामिल होत आहे ही खूप आनंददायक आणि त्यापेक्षाही आशादायक गोष्ट आहे.
हा धागा काढून मायबोलीकरांचे निसर्गप्रेम कायम एकत्र गुंफल्याबद्दल जागूचे दर भागाचे वेळी आभार...
आणि नव्या भागाने छान पळावं यासाठी त्याला शुभेच्छा....
निसर्गप्रेमाचे बाबतीत तरुण
निसर्गप्रेमाचे बाबतीत तरुण पिढी नव्या जुन्यांच्या मांदियाळीमधे सामिल होत आहे ही खूप आनंददायक आणि त्यापेक्षाही आशादायक गोष्ट आहे.+१११
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
निरूदा छान प्रतिसाद आणि प्रोत्साहन.
अरे वा नवीन भाग आला का,
अरे वा नवीन भाग आला का, सिद्धी मनोगत मस्त. पण फोटो दिसेना...
विनिता, पांढरी जास्वंद सुरेख! शाली खार, बदक आणि वटवट्या मस्तच एकदम. तुमचा कॅमेरा कोणता आहे?
शक्यतो फोटोसमवेत कॅमेरा/मोबाईल मॉडेल, स्थळ इ. माहिती पण देत जाऊ या का? मी सुरुवात करते.
खूप छान लिहिलय मनोगत.
खूप छान लिहिलय मनोगत.
सिद्धि आणि ॠतुराज.. अभिनंदन
Red whiskered Bulbul जून
हळद्या (Golden Oriole). NIKON COOLPIX P600. दादर, मुंबई.
![](https://lh3.googleusercontent.com/OfnMi4p0RxDsp8mB9VwQFTKw0e6A9oDTb5bIYXwngkERx1I8Ygq528X1VaBcep_Uynt7H2o9Q-kZwCkjpHYuHBRbNUSOnS5Y-1oz6ygZDJejXJ0lRgmtAUwhRNFpM09zfmlgIDBM44-giNhvaG2Gghx3TIrtuFdclGnJYmdrJoYf2-xC_85fm_3XiCH3MTJ7hszw1W1a5m1W5HSCBaxIMimW3TFIjojdpJ2BgSt4FNojoGYDoyrHjVlRLurlNBxtr366wOqqutQUoM9joHBe1vLXvzwYKcwrlU0RK4eOtq_ROB4WucB-pIQPzOsymN3jr4OfQMJ20GQjXq8m3ZIWFfUCN4wzK8-itz2qL2Qu80oX-tjP_9EFIOHb-XXMW0WBBxlDijDQv7fJjhkZFTwYuc1SKTI_PIQlHSOe3YsrPtOluYSDFkS-IXHY9RCHRI0yq41Nye-k2mThbejzQVP20z8D2NgK0JV3D13x8XFLfGQk-CllQ_NTa_Ko8-NIZ7oRBNsiHUF27Edpdut1lO5coAnndvOBG7sj5Jg0AWp4CgtP6cWEMHqVVuYBP59j38CEJSD1dRGgO_gFtu5k6NYTtElGbwpeHD-fGbJ-tng3RBl2LcdMlprG_12JDh2vroy0gfUk6z8_Q_pqPWq2LnnmYPOpGv_OezU=w811-h608-no)
हा घरातून काढलाय फोटो.
Black Rajah, महाराष्ट्र
Black Rajah, महाराष्ट्र निसर्ग उद्यान, Canon PowerShot SX60 HS
![](https://lh3.googleusercontent.com/-fWAhFQ9aFVVAOH8v1bKBX_ZZCcJU05siob1JoheqaQRNG5jWLD303jrCOsm0ySAo3Ad-fnTqD1_yY-2w2L8TdhP0_-XKdF56irJ_kdnS2Eee0T-G5DEWwiFkYQpYU7znN5k-WwWHQJKIwrGFRJlTwjXBNIP6XJ30M2ceyKAkZm5gd1YDqGw68veavL_igCngWnWnwBgWoLh9Yx5ikxJe3TMRlpqt8EXTH3qRowqFO4wBHOudJrD1dyKySmVccBof36tcWQylqMkdyUPORpg3e3RdSkuIj1mkRUBGQghiO1u9mVQ4-GuP-DCv5lIYZBp33VNZjSVUGOfim8uyCepSz-WL7zhnIelUqAAPJtJIbi3O9Eiho-yAU-JLTvJye8WkDqh-Q1aUMK0BaEZq-hxt3VWl_4tcb6s13CEKlOw0Kles6JEYV6ATQIi0QQHac1tfFl-RYb1NqQ8KdK85oGPvI7UBK4d2lU0cyrn_n66m-5nUYLMbjIHZcSod2zRHMK9NujmANN7ivapekVJJIH70E--vyGLglSjHJj9QF8KVCIQEw99CpDEQVuqbrONgUFWGKceO4JDVEDhowbTH-nb07efL7ME9YOpRxt-OHRqzwauqxFtMhs4qlIrq3hJybGX9efu7wpLq8U83VgOP7jFylPDd2ZtqTA=w811-h608-no)
सगळ्यांचे मनापासुन आभार.
सगळ्यांचे मनापासुन आभार.
आणि हो जागूताई लिंक डबल पोस्ट झाल्या आहेत.
विनिता ताई, शालीदा, वर्षा ताई फोटो छान आहेत. मस्त सुरुवात.
माळशेज घाटातून खाली असणारा
माळशेज घाटातून खाली असणारा परिसर
![FB_IMG_15646679425621910.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u70969/FB_IMG_15646679425621910.jpg)
![FB_IMG_15646679517929387.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u70969/FB_IMG_15646679517929387.jpg)
.
ऋतूराज- मनोगत छान आहे.
निरुदा खुप छान तुमच मनोगत.
निरुदा खुप छान तुमच मनोगत.
निरुदा खुप छान तुमच मनोगत.
निरुदा खुप छान तुमच मनोगत.
सुरेख मनोगत आणि फोटोज!
सुरेख मनोगत आणि फोटोज!
जांभळी पाणकोंबडी ( Purple swamphen)
निसर्गाच्या गप्पांच्या ३४
निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या भागात सर्व निसर्ग प्रेमींचे स्वागत.
शालीदा, विनिता ताई, वर्षा ताई, वावे सर्व प्रचि अप्रतिम आहेत.
सिद्धि , सुरेख मनोगत व प्रचि
सर्वांचे मनापासुन आभार
कोसळणाऱ्या पावसासारखी धाग्याची दमदार सुरुवात
Strongylodon macrobotrys
Strongylodon macrobotrys
![P_20180217_100327.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u61683/P_20180217_100327.jpg)
Jade vine, Emerald vine, पाचू वेल
वॉव! हा वेल मी प्रथमच पहातो
वॉव! हा वेल मी प्रथमच पहातो आहे. मस्तच फोटो ऋतूराज.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सिध्दि माळशेज परिसर सुंदर टिपला आहे. मनोगतामधील फोटोही माळशेजमधीलच आहे.
@वर्षा माझे बहुतेक फोटो
@वर्षा माझे बहुतेक फोटो iPhone 7plus ने काढलेले आहेत तर काही Nikon coolpix P900 ने काढले आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कॅमेऱ्याची तसेच लेन्स व सेटींगची माहीती दिली तर ती उपयुक्तच ठरेल.
फोटो कुठे काढलाय याचाही उल्लेख करावा.
छान कल्पना आहे ही.
आज पाणकावळ्याने हजेरी लावली.
आज पाणकावळ्याने हजेरी लावली. (Little Cormorant, लिटल कॉरमरंट)
![63715095-0400-4353-9470-7A7B274C9244.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u32743/63715095-0400-4353-9470-7A7B274C9244.jpeg)
![16C3031C-8FC9-4119-A110-7D7D17FC7939.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u32743/16C3031C-8FC9-4119-A110-7D7D17FC7939.jpeg)
![EE5B4C93-C98F-4B87-9ED5-D97D71A7ACDA.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u32743/EE5B4C93-C98F-4B87-9ED5-D97D71A7ACDA.jpeg)
स्पॉटेड मुनियांचा थवा बराच वेळ गवतात धान टिपत होता. खुप दुर असल्याने फोटो क्लिअर नाही आले.
हा त्यांच्या थव्याचा छोटासा भाग दिसतोय. बाकीच्या मुनिया गवतात दडल्या आहेत.
भूईछत्र्या 2
भूईछत्र्या
![IMG_20190804_124643.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u67203/IMG_20190804_124643.JPG)
2
![IMG_20190804_124608.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u67203/IMG_20190804_124608.JPG)
नकल्या खाटीक (Long tailed
नकल्या खाटीक (Long tailed shrike)
![96E010EA-20DD-4E9B-8D61-091A492B0186.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u32743/96E010EA-20DD-4E9B-8D61-091A492B0186.jpeg)
![B3A99B6E-DC7F-4A3D-8A9F-2749DC02DA52.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u32743/B3A99B6E-DC7F-4A3D-8A9F-2749DC02DA52.jpeg)
चिमणी (House sparrow)
शालीदा, मुनियांचा थवा, खाटीक
शालीदा, मुनियांचा थवा, खाटीक मस्त
मनिम्याऊ, भुछत्रे प्रचि सुंदर
मी नुकतंच दुर्गा भागवतांच भावमुद्रा पुस्तक वाचतोय, त्यात त्या लिहीतात की कुर्गमध्ये भुछत्र्यांना "अणिबे" म्हणतात आणि आपल्याकडे मराठीत व कोकणीत "अळमी" म्हणतात, तो अणिबेचा अपभ्रंश आहे.
पिसे साफ केल्यानंतर बुलबूल.
पिसे साफ केल्यानंतर बुलबूल. (Red vented bulbul)
![3F9A6A3B-2B3C-4569-BDBD-7CA4027CDB96.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u32743/3F9A6A3B-2B3C-4569-BDBD-7CA4027CDB96.jpeg)
![5474A34E-FBE6-4125-AAA6-2E62BF77BC5C.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u32743/5474A34E-FBE6-4125-AAA6-2E62BF77BC5C.jpeg)
.
अप्रतिम!!! सुरेखच सगळी प्र
अप्रतिम!!! सुरेखच सगळी प्र .चि. सिद्धी आणि ऋतुराज ह्यांचे मनोगत ही छान. जागु चा हा धागा आवडतोच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त फोटोज
मस्त फोटोज![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पिसं साफ केल्यावर असा दिस्तो होय बुलबुल! माझ्याकडेही एक असाच फोटो आहे त्यात बुलबुल असाच लठ्ठ दिसतो. मला कळलं नाही तेव्हा कारण त्याचं, विचित्रच वाटला होता तो बुलबुल. कारण बाकी बुलबुल तसा स्लीम ट्रीम पक्षी आहे ना
पाचू वेल! रंग कसा आहे नं!
पाचू वेल! रंग कसा आहे नं! धन्यवाद ऋतुराज.
हे महाशय आज सकाळी सकाळी
हे महाशय आज सकाळी सकाळी आमच्या बाळाच्या मच्छरदाणीत शिरले
![IMG_20190804_195353.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u67203/IMG_20190804_195353.JPG)
अलगद हाताने उचलून बाहेर रवानगी
![IMG_20190804_195251.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u67203/IMG_20190804_195251.JPG)
आता संध्याकाळी मस्त झोप घेणं सुरू आहे
![IMG_20190804_195155.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u67203/IMG_20190804_195155.JPG)
फुलपाखरे मस्त दिसताएत
फुलपाखरे मस्त दिसताएत शेवटच्या फोटोतली.
Pages