राहुन गेले..

Submitted by मन्या ऽ on 29 July, 2019 - 13:54

राहुन गेले..

तुझ्यासवे अवखळ
बालपणीचे ते क्षण
पुन्हा एकदा
वेचायचे होते
ते क्षण वेचणे
राहुन गेले

तुझे जीवनगीत
ऐकत तुझ्या
कुशीत रातभर
जागायचे होते
ते जागणे आता
राहुन गेले

तु शिकवलेस
मज चालावयास
तुला आधारासाठी
हात देणे राहुन गेले

तुझ्याकडुन अजुन
जगरहाटीचे नियम
शिकायचे होते
पण ते नियम
शिकणे राहुन गेले

तुझ्यासोबत अजुन
थोडे जगायचे होते
मनसोक्त बोलायचे होते
चांदण्यात नहायचे होते
तुझ्या कुशीत
झोपायचे होते
तुझ्याकडे हट्ट
करायचे होते
तुझ्या कुशीत
एकदा रडायचे होते
पण पण
ते सारे काही
राहुन गेले
तुझ्या आठवणींत
आजी,मी आज
पुन्हा एकदा
हरवुन गेले

तु प्रेमाने मज
सारेकाही दिलेस
तु मात्र एक
संधीही न देता
निघुन गेलीस
तुझ्यासोबतचे ते
गोड क्षण जगायचेत
पुन्हा एकदा
पण तेही तुझ्यासारखेच
अनंतात विरुन गेले..

(Dipti Bhagat)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शशिकांत सातपुते हा आयडी गेल्यानंतरच्या नैराश्यातून बाहेर पडून नवीन कविता लिहीली याबद्दल अभिनंदन.

छान आहे आठवण.
प्रतिसाद देण्याचे राहून गेले होते.
Happy

मन्या सुंदर कविता, लिहीत रहा. आणि मुख्य म्हणजे ट्रोलर्सला भीक घालू नकोस, तुझे चाहतेही आहेत मायबोलीवर.

म्याउ तुम्ही कोण आहात माहिती नाही, पण स्वतः डु आय डी असल्याची कबुली दिल्यावर मन्या यांच्या प्रत्येक धाग्यावर गोंधळ घालण्याचे प्रयोजन काय?
आणि आजपर्यंत मन्या या आय डीचा शशिकांत किंवा त्याच्या अनेक अवतारांशी अनेक प्रकाशवर्षं संबंध मला आढळला नाही. हा आय डी पूर्णपणे ओरिजिनल आहे. ती प्रत्येक कवितेखाली आपलं नाव लिहिते.
असो, गोंधळ घालण्याची मनोवृत्ती असल्यावर कुणीही काही करू शकत नाही, मात्र म्याउ हा आय डी कुणाचा आहे, अशी पुसटशी शंका मात्र येतेय. फक्त ट्रोल्स गोंधळ घालतात म्हणून भेकत बसू नका. तुम्हीही त्यातलेच एक आहात. फक्त चांगले धागे नासवू नका ही विनंती!

मी तर अभिनंदन केले आहे. महाश्वेता हा ड्युआयडी नेहमी गोंधळ घालतो असे ऐकले होते. त्याची प्रचिती आली. कुणाचा आहे ते ही जगजाहीर आहे. मी मन्या हा ड्युआयडी आहे असे कुठेच म्हटलेले नाही. पण शिवराळ आयडी गेला म्हणून नैराश्य आलं ते दूर करायचा प्रयत्न केला.
आता ती चूक झाली असे वाटते. कदाचित श्रद्धा, महाश्वेता या बदनाम ड्युआयड्यांच्या जाळ्यात चुकून पाय दिला असे वाटते. तुमचे चालू द्या.
मी फक्त अभिनंदन केले आणि माझा चांगला हेतू होता.
तुम्ही मधे पडण्याचे काहीच कारण नव्हते.

शशिकांत सातपुते या आयडीने पूर्वी शशिराम, शक्तीराम असताना खूप शिवीगाळ केली आहे. मन्या यांनी परवाच्या शिवीगाळीनंतर मायबोलीवर रहायचे नाही म्हणून अ‍ॅडमिनला विनंती केली. म्हणून मी समजूत काढली फक्त. शशिराम, शक्तीराम हा आयडी शिवीगाळ करत असतानाच त्यांनी मायबोलीवरून एक्झिट घ्यायला हवी होती असे मला वाटले. त्या वेळी भीती नाही वाटली आत्ता का वाटली अशी मी समजूत काढली. काही चुकले का यात श्रद्धाताई ?

महाश्वेता किंवा अन्य ड्युआयडीने मन्या या आयडीतर्फे माझ्याशी बोलंण्याची काही गरज नाही. मन्या या आयडीला उत्तर देता येते. कृपया ड्युआयड्यांचा फेरा इथे वापरण्याची गरज नाही. थांबवा हे.

अच्छा, उपरती झाली असेल तर बाजूला व्हा. चांगला धागा नासवू नका.
जास्त काही बोलत नाही, भेकायचं असेल तर विपु आहेच. पुन्हा तोंडावर आपटण्याची गरज नाही.

मन्या या आयडीला उत्तर देता येते.>>नक्कीच देता येते म्हणुनच तुम्ही orignal id वरुन बोला. असं विपुतसुद्धा स्पष्ट बोलले आहे. डुआयडीचा मुखवटा मला चढवायचा प्रयत्न करु नका.तुमचा आहे तोच बाजुला करा.

मन्या तुम्ही तुमची ओरिजिनिलॅटी सिद्ध करा आधी. कोण तुम्ही ? अज्ञातवासी या आयडीच्या ड्युआयडी आहात असे खान ९९ म्हणजेच शशिराम याने तुमच्याच एका धाग्यावर सांगितले आहे. त्याच आयडीशी तुमचे विपू विपू चालले होते बरेच दिवस. हा आयडी शिव्या देत असताना तुम्ही कधी तक्रार नाही केलीत. का बरं ?

या आयडीने गेल्या काही महीन्यात वेगवेगळ्या अवतारात अनेकांना शिवीगाळ केली तेव्हां तुम्हाला मायबोलीवर राहण्याची भीती नाही वाटली. का बरं ?

हे प्रश्न पडतात ना सर्वसामान्यांना.
मन्या किंवा दिप्ती भगत हे नाव सांगितले आणि महाश्वेता सारख्या वादग्रस्त ड्युआयडीची साक्ष काढली की तुम्ही ओरोजिनल आहात असे सिद्ध होते का ?

मला इथे जास्त काही लिहायला भाग पाडू नका ही नम्र विनंती. बाकी अ‍ॅडमिनना सर्व काही माहीत असते.
दुसरे म्हणजे अक्की आणि तुम्ही एकमेकांचे ड्युआयडी आहात असे मी म्हटलेले नाही. त्यामुळे अ‍ॅडमिनच्या विपूत जाऊन गोंधळ घालू नये.

महाश्वेता, दिवस फिरलेत एव्हढे लक्षात ठेवा. खूप गोंधळ घातलात. आता पुन्हा चालणार नाही.
मन्या यांच्या धाग्यावर तुम्ही मला धमकी देताय याचा अर्थ कळतो ना ?
त्या वरून मन्या यांना कसलाच प्रॉब्लेम नाही.
श्रद्धा किंवा महाश्वेता जरा आवर घाला स्वतःला.
एकाच प्रेक्षणिय मृत्यू होत असताना कुणीही सहानुभूती दाखवायला आले नाही. उलट ते सर्व आयडी उडाले.
तुम्हाला मायबोलीवर सन्मानाने राहण्याचा पर्याय खुला आहे.
तुम्ही इतरांशी नीट वागा.

आवडली!!
आजी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील नाजुक कोपरा असतो.
पुलेशु.

म्याऊ तुम्ही ज्यांचे डुआयडी मला करु पाहत आहात ती मी मायबोलीवर कमी वेळात जोडलेली चांगली माणसं आहेत. मला तुम्हाला मी कोण? हे सिद्ध करत बसण्यात काडीमात्र interest नाही.बाकी तुम्ही लवकर बरे व्हा. वेगवेगळ्या नावाने वावरण्याचा मानसिक आजार तुम्हाला असेल मला नाही. आणि माझा धागा अजुन नासवु नका.

Dipti... Ignore kr ... Tu lihit raha .... kuni Chan lihit asel tyana kuni changl bolalel ikde pahvat nahi ... U continue... jyanchi layki nahi tyana aapla nyay kru dyaycha nsto.. tu original ahes he Tula konalach sangaychi garaj nahi... Best wishes dear..

कवितेच्याही धाग्यावर मारामाऱ्या? Lol

कविता आवडली

(आता मी नेमकी हीच कविता का वाचली याचे अपेक्षित स्पष्टीकरण न येवो Proud )

छान !
दिप्ती, तू अन् तुझी कविता नशिबवान आहे. Lol

आनंद> Lol Thanks! Happy

अज्ञानी, अजयदा प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद! Happy

Pages