युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ब्रेड घरी बनवते. पण कडेचे स्लाईस मात्र उपेक्षित राहतात. ब्रेड क्रम्ब्स होतातच पण प्रत्येक आठवड्यात बर्गर / कटलेट होतात असं नाही. ब्रेड चा चिवडा वगैरे करते पण तो पण ड्राय होतो. अजून काय करता येईल?

Puding

आभा, ब्रेडचा उपमा / चिवडा छान होतो, पण ते तुम्ही करताच. कडा कट करून पक्षांसाठी ठेवल्या तर हळूहळू सवयीने भरपूर पक्षी यायला लागतील. ( एरियात कबुतर असतील तर मात्र नक्कोच्च )

Collard Greens भेट म्हणून मिळाल्यात. एक आपली नेहमीची झुणका स्टाईल भाजी करून पाहिली पण खास चव आवडली नाही. आता नेटवर पाहिलं तर दीडेक तास शिजवायला सांगताहेत. Uhoh इथे ट्राइड अॅंड ट्रस्ट्ड पर्याय असल्यास मिळतील का?
धन्यवाद Happy

थोडी लसूण आणि कांदा पावडर घालून आर्धा तास शिजवून पहा. बारीक कापून. आणि लाल मिरचीची फोडणी द्यायची. मस्त होते.

वेका, ह्या यु ट्युबच्या रेसिपीनी वड्या करुन बघ. मी चार्ड, केल, पालक, कोथींबीर सगळं एकत्र करुन केल्या होत्या. छान होतात. डाळीच्या पीठाबरोबरच थोडं अल्मंड फ्लावर ( कॉस्टकोत मिळतं ते ) पण घातलं होतं.
https://www.youtube.com/results?search_query=palak+vadi+recipe

मुगाची किंवा तुरीची डाळ घालून चांगली लागते. लाल सुक्या मिरचीची फोडणी , त्यात डाळ परतुन आणि लसून घालुन मग ही भाजी घालुन शिजवून घ्या. शिजल्यावर दाण्याचा कुट, तिखट,मीठ,जिरा धन्याची पावडर. परत एकदा वाफ आणायची.
अशीच चार्ड,पालक,मेथी पण चांगली लाग्ते.

नारळाच्या आतमधला पांढरा भाग सोप्यात सोप्या पद्धतीने कसा काढायचा कुणी सांगू शकेल का? मला नारळ खोवायचा नाहीय. मी यू ट्यूब वरच्या एक दोन पद्धती ट्राय केल्या. फ्रीझर मध्ये नारळ ठेवून नंतर सूरी नी काढायचा प्रयत्न केला पण ते भरपूर ताकदीचं काम वाटलं. आणि दुसरी पद्धत गॅस वर नारळ धरून नंतर हॅमर नी करवंटी फोडून मग आतमधला गर (? )काढायचा.ह्या पद्धतीने नारळ पटकन निघालं पण ओल्या नारळाची गोडसर चव नाहीशी.
अजून कुठली ट्रिक आहे का?

पूर्वी मिळत असे तसे नारळ खोवायचे यंत्र अमॅझॉन वर आहे ते घ्या. किंवा भारतात अंजली ब्रँडचे पण मिळते. आमच्या इथे सुपर्मार्केट मध्ये खोवलेला नारळच मिळतो डायरेक्ट. प्लस चटणीचे साहित्य असे पण मिळते. सांबा र भाजी मिक्स मिळते. किंवा डोश्याची चट णीच मिळते डीप फ्रीझर मधली. चटकन संपवावी लागते मात्र.

ह्यो बघा. असला. आणि तो सपाट सरफेस जसे ओटा त्यावर व्हॅक्युम सील करून नीट बसवावा लागतो नाहीतर आपण उत्साहाने नारळ खवायला लागले की तो निघून येतो व आपला पोपट होतो.
https://www.amazon.in/s?k=coconut+scrapers+anjali&crid=1TBLDM6MU8B2V&spr...

जुन्या पध्हतीची विळी असल्यास त्याला पुढे नारळ खवायचे चकती असे पात्याला. मी लहान पणी अनंत नारळ खवले आहेत अश्या विळीवर पण खाली जमिनीवर एक पाउल विळीच्या लाकडी बेस वर ठेवून जरा अवघडत बसावे लागेल किंवा विळी ओटा/ डाय निन्ग टेबल वर ठेवून मग खवायचा नारळ.

ह्या आधी तो नेहमीच्या पद्धतीने अर्धा करून घ्यावा लागेल.

मी सुटे पैसे मिळायला कधी कधी आख्हा नारळ घेते तेव्हा असेच करते कि अर्धा फोडून सुरीने खोबरे काढून मग माझ्याक डे बुलेट मिक्सर आहे त्यातून फिरवून घेते ते बारीक तुकडे. पण असल चव विळीवर खोवलेला व त्यात साखर घालून खायला जीटेस्ट येते ती इतर मार्गाने येत नाही.

उकडलेल्या मोदकांची तयारी सुरू झाली वाट्टॅ. मोरया.

नारळाच्या आतल्या पांढर्‍या भागाला खोबरं म्हणतात.

व्हॅक्यूम बेस्ड कोकोनट स्क्रेपरचा काहीही उपयोग होत नाही.
कोकोनट स्क्रेपर अ‍ॅटॅचमेंट असलेला फूड प्रोसेसर ग्राहक पेठेत पाहिला होता.
जुन्या विळ्या, आढाळे लाकडाच्या बेसचे असत. पण पूर्णपणे स्टीलचे आढाळेही मिळतात. तो खुर्चीवर ठेवून त्यावर बसून नारळ खोवता येतो.

नारळ फोडायला आमच्यात कोयता वापरतात. हा विळ्यासारखा असतो, पण जड आणि जाड असतो. त्याच्या मागाच्या बाजूने नारळावर घाव घालून त्याची दोन शकले करून घ्यायची. त्याआधी नारळ ओला करून घेतला तर एका रेषेत फुटायला मदत होते.

आयडियली एका हातात नारळ धरून फिरवत फिरवत त्यावर दुसर्‍या हातातल्या कोयत्याने हाणायचं. पण करवंटी जाड असेल तर खूप वेळ जातो. अशा वेळी जाडजूड कापडाच्या घडीवर नारळ ठेवून फोडायचा.

कोयत्याच्या पुढच्या कमी अरुंद भागाचे नारळाची कीस (टरफलावरचं तंतूमय आवरण) काढणे, शहाळे (कोवळा नारळ) सोलणे, फणस सोलणे हे उपयोग आहेत.

व्हॅक्यूम बेस्ड कोकोनट स्क्रेपरचा काहीही उपयोग होत नाही>> होतो की! मी गेली १० वर्षं वापरतेय अंजलीचा कोकोनट स्क्रेपर.आता व्हँक्यूम सील जरा सैल झालं आहे. मधेच परत घट्ट बसवावं लागतं. पण चांगला उपयोग होतो मला. आठवड्यातून एकदा तरी नारळ खवला जातोच त्याच्यावर.

बाजारात 5 , 10 रुपयाला खोबर्याचे आयते तुकडे मिळतात,

गरजेच्या दुप्पट घ्यावा, घरी आल्यावर धुवून अर्धा खावा व उरलेला वापरावा

नाहीतरी ना बम्ब ना चूल , करवंटी घेऊन करणार काय ?

अंजलीचा कोकोनट स्क्रेपर मस्तच आहे. मी ही गेली १३/१४ वर्ष वापरत आहे. व्हॅक्युम सील थोड ओल करूअ मग काउंटरटॉप वर बसवल कि जरा सुद्धा हलत नाही. अतिश य उत्तम नारळ खोवला जातो.
स्क्रेपर न वापरता काढायचा असेल नारळ फोडल्यावर चाकुने कापुन तुकडे तुकडे काढायचे. कवचापासून सुटतात जर व्य्वस्थित कापले तर. फ्र्रीजमध्ये तासभर भकल ठेवून मग कापले तर जास्त पटकन निघतात.
आणि मग पीलरने मागचा पांढरा भाग काढून ग्यायचा आणि तुकडे मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचे.

आमच्याकडे पंचवीस तीस वर्षांपूर्वी घेतला होता कोकोनट स्क्रेपर. त्याच्याशी जुळलं नाही. नंतर आलेले सुधारित असावेत.

अमा -सुपर मार्केट मधून मी सहसा आणत नाही. फ्रेश कोकोनट ची चव त्याला येत नाही.
कोकोनट scrapper नी खवलेला नारळ उकडीचे मोदक, ओल्या नारळाच्या करंज्या तत्सम पदार्थाना वापरता येतो. मी ओल्या खोबऱ्याची हिरवी मिर्ची, कोथिंबीर, थोडंसं आलं असं घालून चटणी करते. त्यासाठी खोवलेला नारळ नाही चालणार. ओल्या नारळाचे काप त्यासाठी लागतात.
भरत म्हणतायेत त्याप्रमाणे कोयत्याने नारळ फोडावा लागेल.
नारळाच्या आतल्या पांढर्‍या भागाला खोबरं म्हणतात>>नेमक कळत नव्हतं काय लिहायचं ते. धन्यवाद
आणखी काही हॅक्स असतील तर येऊ द्यात.

नारळ घेताना फोडून घ्या.आणि वर बर्‍याच जणांनी सांगितलेले उपाय करून पहा.रेनॉल्डच्या फुप्रोमधे नारळ खवून मिळतो.त्याचे प्रात्यक्षिक पाहिले आहे.मस्त चव पडतो.तुम्हाला चटणीसाठीच नारळ हवा असेल तर वरचेच उपाय बेस्ट.

सगळ्या प्रतिसाद्कर्त्यांचे मनापासून आभार. एकंदरीत माझ्याrequirement साठी मला धारदार कोयता तत्सम काहीतरी टूल हवं आहे असं दिसतंय. तसंच एखादं चांगल्या दर्जाचं कोकोनट स्क्रॅपर ही घेऊन ठेवावं असं दिसतंय.
सर्वांचे परत एकदा आभार.

भरतच्या कोयता पोस्टला +1 फक्त पाण्याची रेघ काढून नारळ सरळ फुटतो ही टोटल कोकणी अंधश्रद्धा आहे असं स्पआप्रा मत आहे. Lol घरी आजी आणि बाबा त्याच मताचे आहेत.
कोयत्याच्या धार असलेल्या भागाने नारळ फोडण्याआधी करवंटी घासून घासून साफ करणे हे ही बाबांचं आवडत काम. ते केल्याने नारळ खरावडताना तुसं ताटात पडत नाहीत.
इकडे फ्रोझन खोबरं आणतो पण नारळ फोडायचा झालाच तर हातोडीने फोडतो. अर्थात तो बहुतेक वेळा खराबच निघतो.

सध्या परदेशात आहे, नारळ फोडणं खोवणं फार कठीण आहे इथे तरी.

अलीकडेच दोन नारळ घरात होते . ते छोट्या हॅमर ने खूप ताकद लावून फोडले कसे तरी. मग भरपूर वेळ खर्चून खोबऱ्याचे तुकडे काढले, पाठीकडचा काळा भाग काढला. मग नारळाचे पात्तळ काप केले आणि मग ते फूड प्रोसेसर मध्ये फिरवून चव बनवला. भरपूर मेहनत लागली. नारळ वाया गेले नाहीत हेच काय ते ह्या कोब्रा ला मिळालेले समाधान Happy

अलीकडेच दोन नारळ घरात होते . ते छोट्या हॅमर ने खूप ताकद लावून फोडले कसे तरी. >>मीही काल, रविवारी जे नारळ फोडलं ते छोट्या, लाइटवेट हॅमर नीच फोडलं. आधी गॅस वर गरम करून घेतलं आणि नंतर हॅमर नी ठोके मारले मग करवंटी आपोआप सुटी झाली आहे आणि ओलं खोबरं निघालं. पण ते गॅस वर गरम केल्यामुळे शुष्क झाले होते.
रच्याकने, यू ट्यूब वर तर गोऱ्या लोकांचे पण व्हिडीओस आहेत नारळ कसं काढायचं ह्यावर. ते काय करत असतील ओलं नारळ घेऊन??

चव बनवला हे चहा बनवला वाचलं चुकून... आणि म्हणणार होतो इतक्या मेहेनती नंतर यु डीझर्व इट. पण फूड प्रोसेसर, इन्स्टंट पॉट असला करण्यापेक्षा व्यवस्थित स्टोव्ह वर करा. Proud

ओली हळद आणली आहे त्याच करता येइल? इथे व्हॅलि प्रोड्यस नावाच दुकान आहे तिथे खुप फ्रेश भाज्या मीळतात शेतकरी ते दुकान अस काहिस आहे ते, तिथे नेहमी दिसते आज (उगा) आणलीच ४-५ खोड ( नसती खोड)
इडियन दुकानात पण मिळते, दुकानदार म्हणे त्याच लोणच करतात किवा नुसते काप करुन मिठ लावुन खायचे

लोणचं छान लागतं ओल्या हळदीचं.

नारळ फोडायला मी स्टीलचा बत्ता वापरते. व्यवस्थित सरळ रेषेत फुटतो. पाण्याची रेघबिघ नाही मारत. डाव्या हातात नारळ धरून उजव्या हाताने बत्त्याचे थोडे जोरात ठोके मारायचे. प्रत्येक ठोक्यानंतर नारळ थोडा फिरवायचा. एका बाजूला चीर गेली की ती बाजू खाली करून पाणी भांड्यात काढायचं आणि मग जोरात ठोका मारून दोन शकलं करायची.

वावे माझे बाबा सेम असाच फोडायचे स्टीलच्या बत्त्याने, फक्त पाण्याची रेघ ओढायचे. इथे आमच्याकडे कोयता आहे.

पाण्याची रेघ न मारता,कोयत्यानेच फोडते.काही नारळाच्या करवंट्या जाड असतात्,तेव्हा जरा हाल होतात.

पाण्याची रेघ न मारता,कोयत्यानेच फोडते. >>> सेम नवरा करतो. मी पाण्याची रेघ मारुन कोयत्याने फोडते.

मी कोयत्याची उलटी बाजू वापरते, नवरा धारदार बाजू वापरतो.

एक नारळ त्याच्या फोडण्याच्या विविध पद्धत्ती Lol

Pages