कुरबुर झाली

Submitted by पाषाणभेद on 23 June, 2019 - 04:36

कुरबुर झाली

(काल रात्री साडे तीन वाजता पाणी बचतीवर एक पथनाट्य लिहीले. एका व्हाट्सअ‍ॅप गृपमध्ये सदस्य दुर्गविहारी अन दीपक११७७ यांनी झोप घेत चला अन काही कुरबुर झाली असेल असे विनोदाने लिहीले. सकाळी मी ते वाचले अन मग त्यांना देण्याचे उत्तर या गीतलेखनातून लिहीले.)

तुझ्यासंग माझ्यावाली
कुरबुर झाली ग कुरबुर झाली
त्यानेच माझी झोपायाची
ग झोपायाची पंचाईत झाली ||धृ||

काल मी तुला नाही दाखवला
सिनेमा प्लेक्समंदी
आवड तुला पाहायाची अंधारात
सिनेमा कोप-यामधी
तिकीट नाही मिळाले तर
येवढ्यावरून चिडली
अन मग
तुझ्यासंग माझ्यावाली
कुरबुर झाली ग कुरबुर झाली||१||

नाही घेतली ग घेतली मी तुला
साडी जरी पैठणीची
नाही भरवला मी तुला नाही भरवला
काल तुला पेस्ट्री केक मावावाला
विसरलो मी तुझा वाढदिवस
माफी मला मागावी लागली
अन मग
तुझ्यासंग माझ्यावाली
कुरबुर झाली ग कुरबुर झाली
त्यानेच माझी झोपायाची
ग झोपायाची पंचाईत झाली||२||

- विसराळूभेद पाषाणभेद
२३/०६/२०१९
(अन कुरबुर वगैरे काही नाही, नाईट शिप्ट असल्याने जागा होतो!)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

?
तिथलं उत्तर तिथेच द्यायचं, इथले हिशेब इथे चुकवायचे.
नवीन धागा काढण्याची गरज काय?