नमस्कार
म्याऊ हा आयडी माझा तात्पुरता आहे. त्यांमुळे संशोधन करू नये.
मायबोलीची बदलती रूपं मी बघत गेले आहे. अनेक कारणांसाठी मी मायबोलीचा प्रभावी वापर पाहिला. इथे स्त्री वादाबाबत झालेल्या चर्चा वाचल्या. लिंगनिरपेक्षता सारखे अतिशय मार्गदर्शक परिसंवाद वाचले. मी त्यात सहभागही नोंदवला. पुरूषांना इथे बोलतं केलं गेलं. काहींचे कबुलीजबाब आले. मायबोलीला जर आपण सोशल मीडीया समजणार असू तर असा वापर मी कधीही कुठेही पाहिलेला नाही.
भाषाविषयक उपक्रम, गणेशोत्सवाचे उपक्रम आणि दिवाळी अंक हे सर्व मायबोलीच्या यशातले मानाचे तुरे आहेत. हे सर्व मायबोलीचे अधिकृत उपक्रम आहेत. याशिवायही अनेक काही सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत. त्या म्हणजे इथल्या मंडळींनी येऊन एक नाही दोन दोन शॉर्ट फिल्म्स बनवलेल्या आहेत. माझ्या माहीतीत नसलेले ही अनेक उपक्रम असतील. हे पण मायबोलीचेच यश नाही का ?
इथे संशोधक आहेत. खेळाडू आहेत. सायकलस्वार आहेत. ट्रेकर्स आहेत. अनेक व्यावसायिक आणि छंदी फोटोग्राफर्स आहेत. या सर्वांच्या अनुभवांनी मायबोली समृद्ध होत गेली आहे.
माझ्या माहितीत मायबोली म्हणजे नेटवर फुकट चांगले वाचण्याची सोय होती. मी त्याच साठी इथे आले. बाकीचे उपक्रम नंतर समजत गेले. मी कुणाचेही नाव घेण्याचे टाळतेय. पण इथे उत्तमोत्तम कथा, कविता, गझला, ललितं वाचायला मिळायची हे अगदी सत्य आहे. या काळात मला वर्तमानपत्रातले लेख वाचवेनासे झाले होते. कारण नव्या दमाचे साहीत्य मी इथे वाचत होते. मी पण तोडका मोडका प्रयत्न केला. पण तो अगदीच बालीश असल्याने सोडून दिला.
इथे लिहीणा-या मंडळींना खुले आकाश मिळाले. हे नैसर्गिक आहे. त्यांची जागा नव्यांनी घेतली. वाचकांची नवी पिढीही आली.
पुढे पुढे मायबोलीवर काही तरी बिनसत गेले.
कुठून आणि कसे ते सांगता येत नाही. पण साहीत्याचा दर्जा घसरला ही सुरूवात होती कि सदस्यांतली धूसफूस ही सुरूवात हे मला सांगता नाही येणार. मला इथे कारणांच्या मुळाशी जायचे नाही. परिणाम दिसताहेत. त्यावर बोलायचे आहे. कदाचित माझे इथून पुढचे लिखाण चुकीचे असेल, एकांगीही वाटू शकेल. कारण माझ्या चष्म्यातून मी लिहीणार आहे.
- नव्या साहीत्याकडे म्हणावे तसे लक्ष नाही
- नव साहीत्यिकांना मार्गदर्शन करायला कुणालाच वेळ नाही
- साहीत्यिकांचा दर्जा म्हणावा तसा नाही.
- त्यामुळे करंट अफेअर्स, राजकारण यावर चर्चा जास्त होत आहेत.
- इतर काही घडत नसल्याने राजकारण, करंट अफेअर्स पुरतीच मायबोली आहे का असे वाटते.
- जर राजकारणावरच्या चर्चांपेक्षा इतर घडामोडींमधे वाढ झाली तर राजकारणाकडे फारसे लक्ष जाणार नाही
हे काही मुद्दे आहेत.
याशिवाय राजकारणाचा चिखल होण्यामागे काही जण सातत्याने फेक आयडीज घेऊन ख-या नावाने लिहीणा-यांवर चिखलफेक करत राहतात. यावर मायबोलीचे कोणतेच धोरण नाही.
मायबोली जर सोशल साईट आहे असे म्हणणे असेल तर युझर्सला समान वागणूक हवी.
मायबोली ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे असे म्हणणे असेल तर त्या पद्धतीचा डिसक्लेमर सदस्यत्व घेताना मिळायला हवा.
अनेकदा सक्रीय सदस्यांचं जे बहुमत आहे त्यापेक्षा वेगळ्या मताची टिंगल करणे किंवा त्याच्यावर तुटून पडणे हे न्याय्य असल्याप्रमाणे मायबोलीचे धोरण असते. अल्पमताचा आदर मायबोलीवर पूर्वी व्हायचा. तो आता होत नाही. मायबोली ही इतर अनेक साईट्सपेक्षा वेगळी होती. पुरोगामी होती याचे असंख्य पुरावे आहेत.
पण ती तशीच राहिलेली आहे का याबद्दल शंका आहेत.
उजव्या विचारसरणीचा वरचष्मा मायबोलीवर जाणवतो. इथे अनेक सभ्य आयडीज फेक आयडीज घेऊन पुरोगाम्यांना त्रास देत राहतात. रॅशनलिस्टना अपमानास्पद वागणूक देण्यासाठी मायबोलीचा मुक्तपणे वापर सध्या वाढलेला आहे. उजव्या विचारसरणीचे नसाल तर तिरस्कारयुक्त , द्वेषपूर्ण वागणूक मिळते.
अनेक तटस्थ समजले जाणारे आयडीज देखील उजव्या विचारसरणीला अनुकूल आहेत. त्याचे त्यांना नक्कीच स्वातंत्र्य आहे. पण तसे ते कबूल करत नाहीत. यातले काही राजकारणाच्या धाग्यावर येऊन झाली का चिखलफेक सुरू असे शेरे मारतात आणि फेक आयडीने एका कंपूवर तुटून पडतात. मूळ आयडीने कितीही तटस्थपणाचा आव आणला तरी ही मंडळी आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांचा राग धरतात. हे दुर्दैवी आहे.
मतभेदांना जागा असावी.
माझ्या पाहण्यात काही जण आले आहेत. ज्यांच्याकडे मी मत मांडले नव्हते तोपर्यंत ते माझ्याशी खूप चांगले होते. यांच्या तोंडून मी ऐकलेल्ञा गोष्टी आहेत. काही लेखक या मंडळींना आवडायचे. पण यातल्या काहींनी आपली राजकीय विचारसरणी स्पष्ट केल्यानंतर त्यांना वाळीत टाकले गेले आहे. तसे एसएमएस पूर्वी जायचे. नंतर व्हॉट्स अॅप ग्रुप्सवर अमूक तमूक ला रिप्लाय देऊ नका असे मेसेजेस येऊ लागले. फेसबुक ग्रुप्स काढूनही तिथे हे उद्योग झाले आहेत.
मी अनेकदा असे मेसेजेस इग्नोर केले. पण अती झाल्यानंतर संबंधितांना फोन करून सांगितले. याचा परिणाम म्हणून मलाही तीच वागणूक मिळाली. याच कारणाने मी मायबोलीवर अनेक वर्षे नव्हते. यावेसेच वाटले नाही. पण इतर ठिकाणीही रमले नाही.
अधून मधून नवे काही दमदार आले आहे का हे बघत राहीले. पण छे !
मध्यंतरी काही दमदार गझलांची सुरूवात झाली. आश्वासक वाटले. पण गझलकारांचा एक कंपू झाला आणि त्याने नको नको केले. रोगापेक्षा उपाय भयंकर झाला.
अजूनही दाद तैंचं काही येत अधून मधून येता राहतं. (तिच नाव घेतल्याशिवाय राहवत नाही. खूप आवडती लेखिका आहे ती माझी). तेव्हढ्यासाठी मायबोलीवर उगवून अंतर्धान पावणारे आयडीज पण पाहीलेत. हे माझ्यासारखेच नंतर कुठे तरी गायब होतात. खरेच आम्ही मायबोलीवर वैयक्तिक स्वार्थासाठी येतो. आम्हाला मायबोली सुधारावयाची नाही का ?
पण, आमच्या हाती आहे का हे ?
किंबहुना हे आमचे काम तरी आहे का ? मायबोलीला तसे मनापासून वाटत असेल तर सक्षम लोक आहेत इथे. आपोआप सुधारेल. पण तसे खरेच वाटतेय का कुणाला ?
मायबोलीचे मत म्हणजे कुणाचे मत आहे ? जगभर पसरलेली मायबोली आहे. ५०००० च्या पुढे पोहोचलीय ना संख्या ? (कदाचित मी खूप मागच्या जमान्यात असेन)
मग इथे मूठभरच का सक्रीय ? ही मंडळी नेमकी काय करतात ? एखादी चांगली कथा व्हायरल होते. नावाशिवाय चोरी होते ही सक्रीय न दिसणारे लोक मायबोली वाचतात याची पावतीच नाही का ? या सर्वांना सामील करून घेण्यासाठी काय योजना आहेत ?
मुठभरांच्या आवड निवड बाजूला सारून बहुजनांची आवड लक्षात घेऊन आपल्याला उपक्रम आखता येऊ शकतील का ?
माफ करा. जरा जास्तच बोलले. कुणी दुखावले गेले असल्यास क्षमस्व !
बाप्रे ! बाका म्हणजे काय ते
बाप्रे ! बाका म्हणजे काय ते समजायला इतका वेळ गेला....
बोकलत यांची शैली तशीच आहे हे खरंच. पण बोकलत यांना मी भगवा नाही हे समजल्यापासून मी त्यांच्या लाडक्यांच्या यादीत गेल्याचे नुकतेच समजले.
बरं
बरं
या धाग्यावर आपले कुणी नाही हे दिसतंय. तर मुद्दा असा की (सोडलेला नाही)
मायबोलीवर येणे हे अन्नछत्र असेल तर मी काही दिवस टिकटॉक व्हिडीओज, डेटींग साईट्स आणि अझर (उच्चार माहीत नाही) इथे जाऊन यावे असे म्हणतोय.
केतकी चितळे ने फेसबुकला चितळेंची जाहीरात दिली नाही आणि फुकटी म्हणून सेलेब्रिटी पेज चालवत होती म्हणून तिलाही फेसबुकशी संबंधित नसलेल्यांकडून ट्रोल केले गेले.
तसेच मार्क झुकेरबर्ग हाच फुकटा असल्याचे काही भारतियांना (जगभरातील) लक्षात आल्याने त्यांनी त्याला त्याच्या बहीणीच्या नावावरून ट्रोल केले. पाश्चात्य जगतात या नावात एव्हढे काय आहे म्हणून त्यांनी उत्सुकतेने गुगलचा आधार घेतला तेव्हां खरा प्रकार त्यांच्या ध्यानात आला.
तर हा मी चाललो मुशाफिरीला
- आपलाच एक फुकटा युझर
अन्नछत्र: अन्नदानाचे ठिकाण ,
अन्नछत्र: अन्नदानाचे ठिकाण , धर्मार्थ अन्न मिळण्याचे ठिकाण
मायबोली फुकटात वापरायला मिळते म्हणजे अन्नछत्रासारखे फुकट वापरायला मिळते. त्यात मिरपूडीची अपेक्षा बाळगू नये, असे म्हटले तर यात इतक्या मिरच्या का झोंबाव्यात?
<<< मराठी टंकलेखन करणे वाळुचे कण रगडण्यापेक्षा सोपे आहे. >>> मस्त प्रतिसाद.
उपाषी बोका >>
उपाषी बोका >>
तुम्हाला मिरच्या झिंबाव्यात असे वाटले असेल . ज्याच्या त्याच्या संस्कारांचा प्रश्न आहे तो.
टाटा, बिर्ला, अंबानी यांच्या अन्नछत्रामधे जाऊन एखाद्याने याचकाने इतरांना शिकवावे किंवा कसे हे आकलनावर ठरते.
<<<उगा बाष्कळ काही बोलून
<<<उगा बाष्कळ काही बोलून पापाचे घडे भरलेत तर टी पाजावा लागेल.>>>
अहो, बाष्कळ, उथळ नि पांचट लिहीण्याला टीपापा वर आक्षेप तर नाहीच, पण उलट उत्तेजन असते. ज्यांना त्याची घृणा येते त्यांच्या बद्दल टीपापा वर कधीहि चांगले लिहित नाहीत.
नि कुणाचा पापाचा घडा भरला तर टी पाजायला संधि मिळण्या आधीच मायबोलीवरून हकालपट्टी होते. लै पावरबाज लोक. धागेच्या धागे बंद होतात!
हॅरी पॉटर च्या गोष्टीत जसे कुणाचे तरी नाव घ्यायचे नसते तसे इथे टीपापा , तेथिल लेखन, लिहिणारे याचा उल्लेख करायचा नसतो. कधी त्यांची वक्रदृष्टी होइल, सांगता येत नाही - एकदम हकालपट्टी!
टीपापा एजंट्स इथे डोळा ठेवून
टीपापा एजंट्स इथे डोळा ठेवून आहेत हे कळल्यावर येणार नाहीत आता.
अत्यंत दुराग्रही आणि आडमुठ्या
अत्यंत दुराग्रही आणि आडमुठ्या सभासदांना त्यांच्या वागणुकीत काहीही बदल होणार नाही हे माहिती असूनही न थकता मदत करण्याचे मायबोलीकरांचे याच धाग्यावरील प्रयत्न वंदनीय आहेत.
टीपापा एजंट्स इथे डोळा ठेवून
टीपापा एजंट्स इथे डोळा ठेवून आहेत हे कळल्यावर येणार नाहीत आता>>>>
हाच निकष असेल तर तुम्हाला मायबोलीवर येणे बंद करावे लागेल हो
टीपापा म्हणजे पार्ल्यातले
टीपापा म्हणजे पार्ल्यातले पार्लेकर. नाव बदलले म्हणून सवयी जातात होय ? पार्के बाफ का फुटला हा इतिहास धाग्याच्या हेडर मधे दिला तर गौरवशाली परंपरांच्या ओझ्याखालीच वाचक (चोरटा) दबून आत प्रवेश करेल. जे काळ्या चामड्याच्या पोषाखातील अमानवीय आकृत्यांच्या हातातील कडाडणा-या हंटरचा मार खाऊन जगले वाचले तेच इथे टिकले. बाकीचबिचुकले, आपलं बीचुकले..
खरं तर मायबोलीचे नाव बदलून मिसळपावच्या धर्तीवर चहावाले पार्लेकर ठेवलं तरी चालेल. बाकी कुणाचीही गरजच नाही. पण मग वेगळा बाफ काढून कुचाळक्या तरी कुणाच्या कराव्यात ?
आणि या कुचाळक्या वाचायला तर लोक येत असतात. ज्यांचा कधी काळी या कुचाळक्या पुरस्कारात नंबर आलेला असतो त्यांना ते इतरांकडून समजतेच. मग असा पुरस्कृत व्यक्ती कधीही हा सोहळा चुकवत नसतो.
अहो साधना, माझी ती कॉमेंट
अहो साधना, माझी ती कॉमेंट सिरीयस नाहीये. डोमा बाहुली टाकुन संपादीत केली आता.
साधना, माझी ती कॉमेंट सिरीयस
साधना, माझी ती कॉमेंट सिरीयस नाहीये. डोमा बाहुली टाकुन संपादीत केली आता
>>>
मीही मजेतच घेतलीय हो
एक मार्मिक कल्पनाचित्र.
एक मार्मिक कल्पनाचित्र. कृपया गैरसमज नसावा ही विनंती.
चला - टीपापा धाग्याचे सार्थक
चला - टीपापा धाग्याचे सार्थक झाले.
सगळे लायक रिपब्लिकन, नि लोकप्रिय डेमोक्रॅट असूनहि जसा ट्रंपचा विजय झाला तसे मायबोलीवर इतरत्र इतके मनोरंजक, माहितीपूर्ण, गंभीर, विचारप्रवर्तक धागे असताना लोक आता फक्त टीपापा बद्दल बोलायला लागले.
खुद्द या धाग्यावरच मायबोलीची सर्वांगिण माहिती दिली आहे, पण शेवटी सगळे टीपापा वर!!
म्हणजे मायबोलीतला सर्वात प्रसिद्ध धागा म्हणजे टीपापा, बाकीचे धागे आपले उगीचच, चवीला.
बदनाम हुए तो क्या हुआ, कुछ
बदनाम हुए तो क्या हुआ, कुछ नाम तो हुआ
अरे विषय काय? तुम्ही बोलताय
अरे विषय काय? तुम्ही बोलताय काय?
आम्ही मायबोलीबद्दल बोलत आहोत.
आम्ही मायबोलीबद्दल बोलत आहोत.
मला आता जेज्युइनली प्रश्न
मला आता जेज्युइनली प्रश्न पडला आहे.
मायबोलीवर येऊन करायचे तरी काय ?
साहीत्य चांगले नाही ही तक्रार आहे. एकमेकांशी संबंध चांगले नाही असेही अधून मधून वाचनात येते. गझलांची धास्ती घेतलीय. राजकारणावर बोलणे प्रशस्त नाही असे काहींचे म्हणणे आहे.
मग राहीले ते काय ?
कोतबो, माहिती हवी आहे, पिठाच्या डब्याचे घट्ट लागलेले झाकण कसे उघडावे यावर चर्चा. ढेकणाला संमोहीत करून घराबाहेर घालवण्याची नायजेरीयन पद्धत, गोड कसे बोलावे, गोड कसे वागावे, मधूमेहाच्या रुग्णांसाठी मिठाई कुठे मिळेल याची चौकशी.
पुणे महानगर सांस्कृतिक मंडळाच्या स्वागतकक्षातील अंगावर वस्सकन येणारे ओरपे कुठे गेले या प्रश्नावरची चर्चा. तोंपासू पाककृती.
त्यातल्या त्यात गड किल्ले जरा सुसह्य वाटते. बाकी या सगळ्यात काय सहभाग नोंदवायचा हे समजत नाही.
अंगावर वस्सकन येणारे ओरपे>>>
अंगावर वस्सकन येणारे ओरपे>>>
चर्चा पुन्हा वळणावर
चर्चा पुन्हा वळणावर आणल्याबद्दल आपटेंचे आभार.
मला जे थोडक्यात आणि नेमके सांगता आले नाही ते तुम्ही कमी शब्दात सांगितलेत. काही करण्यासारखे नसल्याने इथे येऊन मग भलतेच काही उद्योग केले जातात का ?
अजून हे संकेतस्थळ आपली लोकप्रियता, स्थान टिकवून आहे. इथे प्रत्येकाला रमता यावे ही माफक अपेक्षा.
ढेकणाला संमोहीत करून घराबाहेर
ढेकणाला संमोहीत करून घराबाहेर घालवण्याची नायजेरीयन पद्धत
मायबोलीवर गेली ५ महीने येत
मायबोलीवर गेली ५ महीने येत आहे.वाचनाच्या आवडीमुळे ईथे नियमितपणे येण होत आहे.पण लेखनाचा दर्जा मात्र खरंच घसरत चालला आहे.
सुरवातीच्या काही कथा वाचल्यावर कळतंय कि अनेक चांगले लेखन करणारे माबोकर आता इथे लिहित नाहित.
स्त्रीid वर वैयक्तिक शेरेबाजी,धाग्यांचा विषय भरकटवणं,राजकारणांच्या धाग्यांवरचा गोंधळ हे प्रकार नको आजकाल सर्रास होताहेत.
मलापण एक दोनवेळा trolling ला सामोरी जावं लागलं तो id नंतर उडवल्याचं कळालं.
पण मायबोलीवर अजुनही चांगले लोक आहेत.यावर विश्वास ठेवुन ईथे नियमितपणे येत असते.
राजकारण हा न टाळता
राजकारण हा न टाळता येण्यासारखा विषय आहे. भारतात राहून भारतातल्या राजकारणाला इग्नोर करून राहणे अशक्यच.
पण मायबोलीवर या विषयावर गांभिर्याने चर्चा करणे शक्य नाही. कारण नियमित पुनर्जन्म घेऊन ट्रोलिंग करणारे काही आयडीज. जे त्यांना अडचणीच्या विषयावर धागालेखकाला अपमानित करतात, त्याला खालच्या भाषेत उत्तर द्यायला उसकवतात आणि तसे दिले की अॅडमिन कडे तक्रार करतात. अॅडमिनचे तक्रारपुस्तक याच तक्रारीने भरते.
याला आळा घालणे मनात आणले तर शक्य आहे.
पण म्हणून राजकारणावर चर्चा म्हणजे बदनाम विषय असे समीकरण कशाला ?
इतर धाग्यात दम नाही हे वर व्यवस्थित सांगितले गेलेले आहे.
तुम्हाला काय आवडते, काय नाही, कुणाला भेटायला आवडेल ... या असल्या विषयांनी मायबोलीची बॅण्डविथ व्यापली तर कुणाची तक्रार असत नाही.
दर्जा घसरला दर वर्षी वाटतं!
दर्जा घसरला दर वर्षी वाटतं!
भर ऑफिसात नजरा चुकवून लॉगिन व्हावं लागतं!
कीबोर्डवर बोटं चालत राहतात, कामात मन लागत नाही!
राजकारणी धाग्यांएव्हडा धुरळा वाळवंटातही उडत नाही!
जे त्यांना अडचणीच्या विषयावर
जे त्यांना अडचणीच्या विषयावर धागालेखकाला अपमानित करतात, त्याला खालच्या भाषेत उत्तर द्यायला उसकवतात आणि तसे दिले की अॅडमिन कडे तक्रार करतात. >>>
यावर मत मांडू इच्छितो.
मुळात धाग्याच्या विषयात दम नसतो, धागालेखकालाच धाग्याच्या विषयाबद्धल ज्ञान नसते किंवा निव्वळ ट्रोल करण्याच्या उद्देशाने धागा काढलेला असतो. अशा वेळी धागालेखकाचा अज्ञानी मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न झाला की धागालेखक खवळतो व मुद्देसूद उत्तर नसल्याने खालच्या भाषेत उत्तर देऊ लागतो. हे सर्व "पाशवी बहुमत" या धाग्यावर प्रकर्षाने व ईव्हीएम संबंधीत धाग्यावर काही प्रमाणात दिसून आले.
त्याबरोबरच पकौडेवाला नावाच्या निव्वळ ट्रोल करणाऱ्या व विषयाला भरकटवून हीन दर्जाचे प्रतिसाद देणाऱ्या आयडीवर वरील दोन्ही धाग्यांचे लेखक एका शब्दानेही आक्षेप घेत नव्हते, कारण तो आयडी त्यांचा वैचारिक मित्र होता. त्या एका गोष्टीमुळे किरणउद्दीन यांचे वरील प्रतिसादातील ट्रोलिंगबद्धल रडणे दुतोंडीपणाचे एक उत्तम उदाहरण ठरते
गझलांची शीर्षके हा एकमेव
गझलांची शीर्षके हा एकमेव भन्नाट टाईमपास आहे. बोंबिल बटाटा पीठ लावून कालवण हे सुद्धा गझलेचे शीर्षक वाटले होते.
(पूर्ण गझल वाचण्याची आवश्यकता नाही )
ट्रोल्सचे नाव घेऊन बोटं
ट्रोल्सचे नाव घेऊन बोटं विटाळण्याची इच्छा नव्हती. परस्पर कबुलीजबाब दिल्याबद्दल धन्यवाद..
कबुलीजबाब दिल्याबद्दल धन्यवाद
कबुलीजबाब दिल्याबद्दल धन्यवाद..
Submitted by किरणुद्दीन on 22 June, 2019 - 18:35 >>>
कबुलीजबाब !
तुमच्या दुर्दम्य आशावादाला सलाम...
लेखनाचा दर्जा वगैरे घसरला असे
लेखनाचा दर्जा वगैरे घसरला असे वाचनात आले!
अमा यार फुकटच्या वाचकवर्गाने असले काय बोलणे म्हणजे हैट!!
दर्जा बिर्जा व्यवस्थित आहे! राजकारणात धुळवड होणारच. ती होतेच आहे
व्यवस्थित आहे अगदी सगळं!!
फुकट वाचायला लवकर कुणी येत
फुकट वाचायला लवकर कुणी येत नाहीत पैसे मागितल्यावर काळं कुत्रं तरी येईल का ? प्रतिसादासाठी ईमेल मधून भिका मागाव्या लागतात तेव्हां कुठे प्रतिसाद येतात. लोकांना आपला वेळ खर्चून प्रसवलेलं फालतू काहीही वाचायला फुकट काय आणि पैसे देऊन काय वाचायची भीतीच वाटते. वेळ फुकट जातो.
तुम्हाला वेळेचं नसेल महत्व त्यामुळे नाही समजणार ते.
तुम्ही फुकट / पैसे देऊन किती वाचले , प्रतिसाद दिले हे सांगा त्यापेक्षा.
प्रतिसादासाठी ईमेल मधून भिका
प्रतिसादासाठी ईमेल मधून भिका मागाव्या लागतात तेव्हां कुठे प्रतिसाद येतात>>>>>>हेबी चालतय व्हय इत ? तुम्ही लैच तेल लावून तयार झालेले पैलवान दिसून राहिले इतले. फौंडर मेम्बर ?
Pages