नमस्कार
म्याऊ हा आयडी माझा तात्पुरता आहे. त्यांमुळे संशोधन करू नये.
मायबोलीची बदलती रूपं मी बघत गेले आहे. अनेक कारणांसाठी मी मायबोलीचा प्रभावी वापर पाहिला. इथे स्त्री वादाबाबत झालेल्या चर्चा वाचल्या. लिंगनिरपेक्षता सारखे अतिशय मार्गदर्शक परिसंवाद वाचले. मी त्यात सहभागही नोंदवला. पुरूषांना इथे बोलतं केलं गेलं. काहींचे कबुलीजबाब आले. मायबोलीला जर आपण सोशल मीडीया समजणार असू तर असा वापर मी कधीही कुठेही पाहिलेला नाही.
भाषाविषयक उपक्रम, गणेशोत्सवाचे उपक्रम आणि दिवाळी अंक हे सर्व मायबोलीच्या यशातले मानाचे तुरे आहेत. हे सर्व मायबोलीचे अधिकृत उपक्रम आहेत. याशिवायही अनेक काही सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत. त्या म्हणजे इथल्या मंडळींनी येऊन एक नाही दोन दोन शॉर्ट फिल्म्स बनवलेल्या आहेत. माझ्या माहीतीत नसलेले ही अनेक उपक्रम असतील. हे पण मायबोलीचेच यश नाही का ?
इथे संशोधक आहेत. खेळाडू आहेत. सायकलस्वार आहेत. ट्रेकर्स आहेत. अनेक व्यावसायिक आणि छंदी फोटोग्राफर्स आहेत. या सर्वांच्या अनुभवांनी मायबोली समृद्ध होत गेली आहे.
माझ्या माहितीत मायबोली म्हणजे नेटवर फुकट चांगले वाचण्याची सोय होती. मी त्याच साठी इथे आले. बाकीचे उपक्रम नंतर समजत गेले. मी कुणाचेही नाव घेण्याचे टाळतेय. पण इथे उत्तमोत्तम कथा, कविता, गझला, ललितं वाचायला मिळायची हे अगदी सत्य आहे. या काळात मला वर्तमानपत्रातले लेख वाचवेनासे झाले होते. कारण नव्या दमाचे साहीत्य मी इथे वाचत होते. मी पण तोडका मोडका प्रयत्न केला. पण तो अगदीच बालीश असल्याने सोडून दिला.
इथे लिहीणा-या मंडळींना खुले आकाश मिळाले. हे नैसर्गिक आहे. त्यांची जागा नव्यांनी घेतली. वाचकांची नवी पिढीही आली.
पुढे पुढे मायबोलीवर काही तरी बिनसत गेले.
कुठून आणि कसे ते सांगता येत नाही. पण साहीत्याचा दर्जा घसरला ही सुरूवात होती कि सदस्यांतली धूसफूस ही सुरूवात हे मला सांगता नाही येणार. मला इथे कारणांच्या मुळाशी जायचे नाही. परिणाम दिसताहेत. त्यावर बोलायचे आहे. कदाचित माझे इथून पुढचे लिखाण चुकीचे असेल, एकांगीही वाटू शकेल. कारण माझ्या चष्म्यातून मी लिहीणार आहे.
- नव्या साहीत्याकडे म्हणावे तसे लक्ष नाही
- नव साहीत्यिकांना मार्गदर्शन करायला कुणालाच वेळ नाही
- साहीत्यिकांचा दर्जा म्हणावा तसा नाही.
- त्यामुळे करंट अफेअर्स, राजकारण यावर चर्चा जास्त होत आहेत.
- इतर काही घडत नसल्याने राजकारण, करंट अफेअर्स पुरतीच मायबोली आहे का असे वाटते.
- जर राजकारणावरच्या चर्चांपेक्षा इतर घडामोडींमधे वाढ झाली तर राजकारणाकडे फारसे लक्ष जाणार नाही
हे काही मुद्दे आहेत.
याशिवाय राजकारणाचा चिखल होण्यामागे काही जण सातत्याने फेक आयडीज घेऊन ख-या नावाने लिहीणा-यांवर चिखलफेक करत राहतात. यावर मायबोलीचे कोणतेच धोरण नाही.
मायबोली जर सोशल साईट आहे असे म्हणणे असेल तर युझर्सला समान वागणूक हवी.
मायबोली ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे असे म्हणणे असेल तर त्या पद्धतीचा डिसक्लेमर सदस्यत्व घेताना मिळायला हवा.
अनेकदा सक्रीय सदस्यांचं जे बहुमत आहे त्यापेक्षा वेगळ्या मताची टिंगल करणे किंवा त्याच्यावर तुटून पडणे हे न्याय्य असल्याप्रमाणे मायबोलीचे धोरण असते. अल्पमताचा आदर मायबोलीवर पूर्वी व्हायचा. तो आता होत नाही. मायबोली ही इतर अनेक साईट्सपेक्षा वेगळी होती. पुरोगामी होती याचे असंख्य पुरावे आहेत.
पण ती तशीच राहिलेली आहे का याबद्दल शंका आहेत.
उजव्या विचारसरणीचा वरचष्मा मायबोलीवर जाणवतो. इथे अनेक सभ्य आयडीज फेक आयडीज घेऊन पुरोगाम्यांना त्रास देत राहतात. रॅशनलिस्टना अपमानास्पद वागणूक देण्यासाठी मायबोलीचा मुक्तपणे वापर सध्या वाढलेला आहे. उजव्या विचारसरणीचे नसाल तर तिरस्कारयुक्त , द्वेषपूर्ण वागणूक मिळते.
अनेक तटस्थ समजले जाणारे आयडीज देखील उजव्या विचारसरणीला अनुकूल आहेत. त्याचे त्यांना नक्कीच स्वातंत्र्य आहे. पण तसे ते कबूल करत नाहीत. यातले काही राजकारणाच्या धाग्यावर येऊन झाली का चिखलफेक सुरू असे शेरे मारतात आणि फेक आयडीने एका कंपूवर तुटून पडतात. मूळ आयडीने कितीही तटस्थपणाचा आव आणला तरी ही मंडळी आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांचा राग धरतात. हे दुर्दैवी आहे.
मतभेदांना जागा असावी.
माझ्या पाहण्यात काही जण आले आहेत. ज्यांच्याकडे मी मत मांडले नव्हते तोपर्यंत ते माझ्याशी खूप चांगले होते. यांच्या तोंडून मी ऐकलेल्ञा गोष्टी आहेत. काही लेखक या मंडळींना आवडायचे. पण यातल्या काहींनी आपली राजकीय विचारसरणी स्पष्ट केल्यानंतर त्यांना वाळीत टाकले गेले आहे. तसे एसएमएस पूर्वी जायचे. नंतर व्हॉट्स अॅप ग्रुप्सवर अमूक तमूक ला रिप्लाय देऊ नका असे मेसेजेस येऊ लागले. फेसबुक ग्रुप्स काढूनही तिथे हे उद्योग झाले आहेत.
मी अनेकदा असे मेसेजेस इग्नोर केले. पण अती झाल्यानंतर संबंधितांना फोन करून सांगितले. याचा परिणाम म्हणून मलाही तीच वागणूक मिळाली. याच कारणाने मी मायबोलीवर अनेक वर्षे नव्हते. यावेसेच वाटले नाही. पण इतर ठिकाणीही रमले नाही.
अधून मधून नवे काही दमदार आले आहे का हे बघत राहीले. पण छे !
मध्यंतरी काही दमदार गझलांची सुरूवात झाली. आश्वासक वाटले. पण गझलकारांचा एक कंपू झाला आणि त्याने नको नको केले. रोगापेक्षा उपाय भयंकर झाला.
अजूनही दाद तैंचं काही येत अधून मधून येता राहतं. (तिच नाव घेतल्याशिवाय राहवत नाही. खूप आवडती लेखिका आहे ती माझी). तेव्हढ्यासाठी मायबोलीवर उगवून अंतर्धान पावणारे आयडीज पण पाहीलेत. हे माझ्यासारखेच नंतर कुठे तरी गायब होतात. खरेच आम्ही मायबोलीवर वैयक्तिक स्वार्थासाठी येतो. आम्हाला मायबोली सुधारावयाची नाही का ?
पण, आमच्या हाती आहे का हे ?
किंबहुना हे आमचे काम तरी आहे का ? मायबोलीला तसे मनापासून वाटत असेल तर सक्षम लोक आहेत इथे. आपोआप सुधारेल. पण तसे खरेच वाटतेय का कुणाला ?
मायबोलीचे मत म्हणजे कुणाचे मत आहे ? जगभर पसरलेली मायबोली आहे. ५०००० च्या पुढे पोहोचलीय ना संख्या ? (कदाचित मी खूप मागच्या जमान्यात असेन)
मग इथे मूठभरच का सक्रीय ? ही मंडळी नेमकी काय करतात ? एखादी चांगली कथा व्हायरल होते. नावाशिवाय चोरी होते ही सक्रीय न दिसणारे लोक मायबोली वाचतात याची पावतीच नाही का ? या सर्वांना सामील करून घेण्यासाठी काय योजना आहेत ?
मुठभरांच्या आवड निवड बाजूला सारून बहुजनांची आवड लक्षात घेऊन आपल्याला उपक्रम आखता येऊ शकतील का ?
माफ करा. जरा जास्तच बोलले. कुणी दुखावले गेले असल्यास क्षमस्व !
भांडणे कशामुळे होतात?
भांडणे कशामुळे होतात?
मायबोलीवर घडणारी वायफळ भांडण,
मायबोलीवर घडणारी वायफळ भांडण, वितंडवाद टाळायचे असतील तर द्या बनावट ओळखीची कवचकुंडल फेकून. तुमच्याकडं काही चांगलं देण्यासारखं आहे मग कशाला लपवा छपवी . उलट लोक तुमचं ख-या नावानं कायम स्मरण करतील. तुम्हाला तुमची खरी ओळख मिळेल.
Submitted by दत्तात्रय साळुंके on 17 June, 2019 - 17:16 >>>
राजकीय धागे वाचत नाहीत काय तुम्ही भाउ? मी माझ्या खर्या नावानेच लिहायचो. पण खरे लिहिल्यावर बर्याच जणान्ना मिरच्या झोम्बल्या आणि माझा आयडी उडवायला लावला.
राजकीय धागे वाचत नाहीत काय
राजकीय धागे वाचत नाहीत काय तुम्ही भाउ? मी माझ्या खर्या नावानेच लिहायचो. पण खरे लिहिल्यावर बर्याच जणान्ना मिरच्या झोम्बल्या आणि माझा आयडी उडवायला लावला.
Submitted by मी-माझा on 17 June, 2019 - 18:
तुमचं म्हणणं बरोबर आहे. सुरवातीला काही राजकीय धागे वाचले अन् तिथली अराजकीय चर्चा मन विषन्न करत गेली. आपण विरोधकांच्या मतालाही महत्व असते हे मानायलाच तयार नसतो ब-याचदा. तो उदार दृष्टिकोन विसरतो. नेते मंडळी गळ्यात गळे घालतात पण आपन मतभिन्नता असली तरी मनभेद नसावा हे शिकत नाही. मतं मांडण्याची पध्दतही कुणाचा मानभंग करणारी नसावी. जे सांगायचं ते सभ्यतेच्या मर्यादा पाळून व्हावे. तसे झाले तर कटुता टळेल. हे मी सर्वांसाठी लिहिले आहे. कृपया गैरसमज नसावा.
<<<मायबोलीवर घडणारी वायफळ
<<<मायबोलीवर घडणारी वायफळ भांडण, वितंडवाद टाळायचे असतील तर द्या बनावट ओळखीची कवचकुंडल फेकून. तुमच्याकडं काही चांगलं देण्यासारखं आहे मग कशाला लपवा छपवी .>>>
लपवाछपवी अश्यासाठी की बहुतेकांना आ़जकाल वायफळ भांडण, वितंडवाद, दुसर्याबद्दल वाईट, असभ्य बोलून घेणे यातच मजा वाटते. असे मला स्पष्ट दिसून येते. अर्थात् मी काही पुरावे गोळा करत बसत नाही. कारण जरी दिले तरी म्हणतील नाही, यातून आम्हाला असे वाटत नाही. पण हा मतभेद व्यक्त करून थांबणार नाहीत तर - तुम्ही किडा आहात. गटारात जा, वगैरे बोलतील. मी स्वतः या गोष्टी अजिबात वैयक्तिक रीत्या घेत नाही, कारण माझ्या आयडी ला नि मायबोलीला ते लखलाभ! माझ्या आयुष्यात इतर अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत, पण मायबोली पूर्वी खूप आवडत असे म्हणून अधून मधून मत व्यक्त करायला येतो.
बाकी आता मायबोली कशी होती नि कशी झालीये याबद्दल खेद खंत नाही!
<<<फुकट मिळतेय म्हणून ती
<<<फुकट मिळतेय म्हणून ती कशीही वापरायची ही खास भारतीय वृत्ती आहे>>>
"खास" भारतीय वृत्ती आहे असे नाही - जगात इतरत्रहि असे होत असते - कमी अधिक प्रमाणात!
भारताला नावे ठेवण्यात जेव्हढा पुढाकार भारतीय लोक घेतात, जेव्हढ्या जोराने भारताची उणी दुणी जगभर पसरवतात तेव्हढ्या प्रमाणावर या गोष्टी परकीय व्यक्ति देखील करत नाहीत. असा माझा अनुभव आहे - इतरांचा वेगळा असेल तर असू दे. तेव्हढ्यावरून पुनः इथे येऊन
वायफळ भांडण, वितंडवाद, वाईट, असभ्य लिहिणे असले करू नका.
पूर्वी मी पण अनेकदा असे करत असे, पण आता मला अनुभव वेगळे आले. मी आता भारताला नि भारतीयांना भारतीय म्हणून नावे ठेवणार नाही.
नन्द्या४३
नन्द्या४३
वा वा ! याला म्हणतात साळसूद मानभावीपणा. उलटे पण चालेल. काडीमास्टरने इथे भगवद्गीता सप्ताह ठेवला आहे असाच भास होतोय. तुमच्या मुळे आणि तुमच्या मित्रमंडळींमुळे भारतातील कितीतरी आदरणिय आयडीज मायबोली सोडून गेले याची खंत तुम्हाला कशी काय असेल ? एक अजातशत्रू पण गेले. तुम्ही तर भारतावर इतकी चिखलफेक केलेली आहे की जसे काही तुमचा जन्मच मूळचा अमेरीकन आणि मध्यंतरी मराठी शिकून घेतले असावे.
चांगलं आहे झक्कीबोवा !!
ओ धागालेखक..... बेअरींग सुटतय
ओ धागालेखक..... बेअरींग सुटतय!
धन्यवाद राहुल
धन्यवाद राहुल
खूप छान वाटत आहे प्रतिसाद वाचून
थोडक्यात काय तर मायबोलीवर
थोडक्यात काय तर मायबोलीवर एव्हडेपण भांडू नका की लोकं बोलतील अरे हा तर काळ्या बोक्याच्या बायकोचा आयडी.
काही तरी सुचलं होतं. प्रतिसाद
काही तरी सुचलं होतं. प्रतिसाद वाचता वाचता
ईसरलंय !!
जाऊ द्या. लहान आहेत सगळे.
जाऊ द्या. लहान आहेत सगळे.
मी ओळखलेले आयडीज नंतर पुन्हा मुद्दामच नाही ओळखले.
(मला चापट्या बसल्या, कशाला म्हणून उद्योग )
बोकलत फक्त मला ओळखू आले नाहीत. म्हणजे यांचा ओरिजिनल मला अजिबात ठाऊक नाही.
भुत्याभाऊ
भुत्याभाऊ
<<<याला म्हणतात साळसूद
<<<याला म्हणतात साळसूद मानभावीपणा.>>>
अहो इतके मवाळ कसे काय लिहिलेत? काहीतरी कड्डक, शिव्यागाळींनी भरलेले लिहायचे ना? भांडण, वितंडवाद, वाईट, असभ्य लिहिणे असले
काहीतरी करा.
आजकाल मायबोलीवर तशीच पद्धत आहे.
हे असे मवाळ बोलून कुणि मायबोली सोडून जाणार नाहीत नि भारताला/अमेरिकेला शिव्या देणे थांबवणार नाहीत. मला अनुभव आहे ना!अमेरिकेला भारतीयांनी इथे कितीहि शिव्या दिल्या तरी आम्ही ढिम्म मनावर घेत नाही. कारण सहसा हे लोक अमेरिकेत न येताच अमेरिकेबद्दल लिहीत असतात, हे लगेच लक्षात येते.
बोकलत फक्त मला ओळखू आले नाहीत
बोकलत फक्त मला ओळखू आले नाहीत. म्हणजे यांचा ओरिजिनल मला अजिबात ठाऊक नाही.>>>> खरं सांगायचं तर हा माझा दुसरा आयडी आहे, परंतु माझा पहिला आयडी एव्हडा काही फेमस न्हवता, हजारातून एखाद्याला आठवला तर आठवेल असा तो आयडी आहे, बरेच महिने झाले असतील तो बंदच आहे. त्यामुळे हाच माझा ओरिजनल आयडी पकडा.
>> ... म्हणजे मायबोलीवर
>> ... म्हणजे मायबोलीवर महिला म्हणून वावरणारा एक आयडी आहे. मुळात हा आयडीच एका परदेशस्थित बल्लवांचा आयडी आहे अशी वदंता आहे....
बापरे! रात्रीच्या वेळी हे एकदम अमानवीय धाग्यावर वाचतो तसे काहीसे वाटले
धागालेखकाची तळमळ जाणवली.
धागालेखकाची तळमळ जाणवली.
मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे 'केवळ राजकारणावर बोलाण्यासाठी माबोवर येणारे सगळेच आयडी उडवले, त्यांचा आयपी ब्लॉक केला, आणि हे दर महिन्याला किमान एकदा करत राहीलं' तर परिस्थिती बदलू शकेल अशी माझी भाबडी आशा आहे.ं
बर्याच गोष्टींबाबत
बर्याच गोष्टींबाबत धागालेखिकेशी असहमत.
१. मायबोलीने (एकंदरीत मराठी आंतरजालाने) खूप सकारात्मक गोष्टी दिल्या आहेत, पण इथे लिहाच असा आग्रह कुणीही केला नाहीये. वाचकांना जर काही व्हॅल्यू मिळत असेल तरच ते इथे येणार आणि टिकून राहाणार. नाहीतर संकेतस्थळ बंद पडायला वेळ लागणार नाही.
२. वेबमास्तरांच्या नावाने खडे फोडून उपयोग नाही. ते पदरचा पैसा आणि वेळ खर्च करून हे व्यासपीठ चालवत आहेत.
३. << मायबोली जर सोशल साईट आहे असे म्हणणे असेल तर युझर्सला समान वागणूक हवी. >>
अन्नछत्रात जेवणार्यांनी मिरपूडीची अपेक्षा बाळगू नये.
४. << नेटवर फुकट चांगले वाचण्याची सोय होती. >> <<< त्यामुळे करंट अफेअर्स, राजकारण यावर चर्चा जास्त होत आहेत. >>>
काय वाचायचे, काय सोडून द्यायचे हा निर्णय सर्वस्वी वाचकाचा आहे, याबद्दल दुमत नसावे.
५. <<< - नव्या साहीत्याकडे म्हणावे तसे लक्ष नाही, नव साहीत्यिकांना मार्गदर्शन करायला कुणालाच वेळ नाही, साहीत्यिकांचा दर्जा म्हणावा तसा नाही. >>>
सहमत नाही.
६. <<< राजकारणाचा चिखल होण्यामागे काही जण सातत्याने फेक आयडीज घेऊन ख-या नावाने लिहीणा-यांवर चिखलफेक करत राहतात. यावर मायबोलीचे कोणतेच धोरण नाही. >>>
चिखलफेक होते हे मान्य आहे, पण दोन्ही बाजूंकडे बघितले पाहिजे. शिवाय डु.आयडी शोधण्यात किती बँडविड्थ वाया जाते, याचा कुणी विचार केला आहे का? प्रत्येकाने हा खेळ खेळलाच पाहिजे असे थोडेच आहे? त्याचप्रमाणे असे सांगावेसे वाटते की इथले सदस्य थोडेफार का होईना पण सूज्ञ आहेत असे वाटते. व्यवस्थित उत्तर दिले किंवा चांगला लेख असेल तर ते धुळवड करत नाहीत. ( निव्वळ १ उदा: डॉ. कुमार यांचे लेख)
७. <<< किंबहुना हे आमचे काम तरी आहे का ? मायबोलीला तसे मनापासून वाटत असेल तर सक्षम लोक आहेत इथे. आपोआप सुधारेल. पण तसे खरेच वाटतेय का कुणाला ? >>>
हो, मला वाटते तसे आणि तशी आशा आहे. हे आमचे काम आहे का? असे म्हणून चालणार नाही, सर्वांनी मिळून हातभार लावायचा आहे कारण इथे येणारे सगळे मराठीच्या प्रेमापोटीच इथे येतात. अन्यथा श्री. हर्पेन यांनी मी एकट्याने झाडे का लावत बसू, असा विचार केला नसता. (निव्वळ उदाहरण).
८. << पुरोगामी होती याचे असंख्य पुरावे आहेत. >> << उजव्या विचारसरणीचा वरचष्मा मायबोलीवर जाणवतो. >>>
बरं मग? विरोधी मत मांडायला इथे बंदी आहे का?
टोपण नावाने लिहायला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मी "राजेश प्रभुदेसाई" किंवा "मारुती माने" या नावाने लिहिले तर ते नाव खरे कशावरून आणि त्याने काय फरक पडणार आहे? खर्या नावानेच सभासदस्य बनवावे या मताशी मी सहमत नाही. उलट डु.आयडीचा त्रास असेल तर नवीन आय.डी. काढताना रुपये ५०० किंवा १० डॉलर डोनेशन घ्यावे. त्यामुळे मायबोलीला थोडेफार उत्पन्न मिळेल आणि खिशाला फटका बसला की भसाभस डु.आयडी. बनवण्याचे प्रमाण कमी होईल. शिवाय फुकट काही मिळाले की त्याची कदर नसते. (वैयक्तिक मत).
ता.क. माझा आणि मायबोली प्रशासनाचा काहीही संबंध नाही आणि मी एकाही सदस्याला व्यक्तिशः ओळखत सुद्धा नाही.
उपाशी बोका पटले.
उपाशी बोका पटले.
Shali tumhala patale ?
Shali tumhala patale ?
Annachatra he Webmaster yanche mhanane aahe ka ? Asel tar Lok Facebook Kade jatil. UBO paise deun yet asatil kadachit. Itrana hi tase. Sangave. Jyala awadate to paise deun member hoil. Nahi tar dusarikade jail. Upashi boka itrana hinawanara pratisad kontya adhikarat Det aahet?
Facebook sudhdha Free aahe. Tithe hi kuni tari kharch karatey. Pan ase ,Annacharea vagaire, sangitale tar Lok Orkut sodun Facebook Kade aale asate kaa ?
Users nako asatil tech hi bhasha vaparat asatil.
अहो किरणुद्दीन ज्यांच्या
अहो किरणुद्दीन ज्यांच्या ज्यांच्या प्रतिसादात जे काही योग्य आहे ते घ्यायला काय हरकत आहे? अगदी प्रत्येक मुद्यांचा किस काढत बसलो तर कसे व्हायचे? एकवाक्यता होने शक्य आहे का?
अन्नछत्राचा मुद्दा तुम्ही लक्षात आणून दिला म्हणून माझ्या लक्षात आला. माझे दुर्लक्ष झाले होते त्याकडे. नाही पटला मला तो मुद्दा उपाशी बोका यांचा.
मला सुरवातीला वाटलं नानबा
मला सुरवातीला वाटलं नानबा यांनी लिहिली पोस्ट, शेवटी बघतोय तर हे आपल्या सगळ्यांचे लाडके.
Shall atyant hinkas sherebaji
Shall atyant hinkas sherebaji aslyane vicharle. Apeksha nasati tar nasate vicharle. Tumhala kis kadhane Vatale feel tar mazi chuk zali..
Shall atyant hinkas sherebaji
Double post
किरणुद्दीन मी तुमच्या
किरणुद्दीन मी तुमच्या प्रतिसादाबद्दल नाही म्हणालो हो. एकुन चर्चेला उद्देशून मी म्हणतो आहे की कुठे तरी यावर मार्ग काढूयात. प्रत्येक शब्दावर घोडे अडायला लागले तर कसं व्हायचं? पाट्या कोऱ्या करुन चर्चा व्हायला हवी इतकच.
बोकलत तुम्हाला असे म्हणायचे
बोकलत तुम्हाला असे म्हणायचे आहे का की किरनुद्दीन म्हणजेच नानबा?
वरती कोणीतरी म्हटले आहेच की किरनुद्दीन हा परदेशस्थित स्त्री चा आयडी आहे। तुमचा बाण चुकून बरोबर लागला की काय?
उपाशी बोका यांचा ता. क.
उपाशी बोका यांचा ता. क. वाचनीय वाटला, उर्वरित प्रतिसादाइतकाच!
स्वतःच स्वतःला जाहीरपणे दाद
स्वतःच स्वतःला जाहीरपणे दाद देणे हे असाधारण (अमानवीय नव्हे) लक्षण आहे.
L O L
L O L
बोकलत तुम्हाला असे म्हणायचे
बोकलत तुम्हाला असे म्हणायचे आहे का की किरनुद्दीन म्हणजेच नानबा? >> ROFL.
Tumhala mee "Itaki" rikamatekadi vaTat asen tari tell satya nahi. Ek id baas zala, to paN veddpaNa vaTato tumachya sarakhya mallanmule!
Pan asoch!
Prayatne valuche kaN ragaDita telahi gaLe
Trusharthachi trushna mrugajaL piunihi viTale
sashachehee labhe vipin firata shrungahi jari
Parantu murkhache hrudaya dharavena kshaNabhari!
Prayatne valuche kaN ragaDita
Prayatne valuche kaN ragaDita telahi gaLe
>>>
मराठी टंकलेखन करणे वाळुचे कण रगडण्यापेक्षा सोपे आहे.
Pages