नमस्कार
म्याऊ हा आयडी माझा तात्पुरता आहे. त्यांमुळे संशोधन करू नये.
मायबोलीची बदलती रूपं मी बघत गेले आहे. अनेक कारणांसाठी मी मायबोलीचा प्रभावी वापर पाहिला. इथे स्त्री वादाबाबत झालेल्या चर्चा वाचल्या. लिंगनिरपेक्षता सारखे अतिशय मार्गदर्शक परिसंवाद वाचले. मी त्यात सहभागही नोंदवला. पुरूषांना इथे बोलतं केलं गेलं. काहींचे कबुलीजबाब आले. मायबोलीला जर आपण सोशल मीडीया समजणार असू तर असा वापर मी कधीही कुठेही पाहिलेला नाही.
भाषाविषयक उपक्रम, गणेशोत्सवाचे उपक्रम आणि दिवाळी अंक हे सर्व मायबोलीच्या यशातले मानाचे तुरे आहेत. हे सर्व मायबोलीचे अधिकृत उपक्रम आहेत. याशिवायही अनेक काही सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत. त्या म्हणजे इथल्या मंडळींनी येऊन एक नाही दोन दोन शॉर्ट फिल्म्स बनवलेल्या आहेत. माझ्या माहीतीत नसलेले ही अनेक उपक्रम असतील. हे पण मायबोलीचेच यश नाही का ?
इथे संशोधक आहेत. खेळाडू आहेत. सायकलस्वार आहेत. ट्रेकर्स आहेत. अनेक व्यावसायिक आणि छंदी फोटोग्राफर्स आहेत. या सर्वांच्या अनुभवांनी मायबोली समृद्ध होत गेली आहे.
माझ्या माहितीत मायबोली म्हणजे नेटवर फुकट चांगले वाचण्याची सोय होती. मी त्याच साठी इथे आले. बाकीचे उपक्रम नंतर समजत गेले. मी कुणाचेही नाव घेण्याचे टाळतेय. पण इथे उत्तमोत्तम कथा, कविता, गझला, ललितं वाचायला मिळायची हे अगदी सत्य आहे. या काळात मला वर्तमानपत्रातले लेख वाचवेनासे झाले होते. कारण नव्या दमाचे साहीत्य मी इथे वाचत होते. मी पण तोडका मोडका प्रयत्न केला. पण तो अगदीच बालीश असल्याने सोडून दिला.
इथे लिहीणा-या मंडळींना खुले आकाश मिळाले. हे नैसर्गिक आहे. त्यांची जागा नव्यांनी घेतली. वाचकांची नवी पिढीही आली.
पुढे पुढे मायबोलीवर काही तरी बिनसत गेले.
कुठून आणि कसे ते सांगता येत नाही. पण साहीत्याचा दर्जा घसरला ही सुरूवात होती कि सदस्यांतली धूसफूस ही सुरूवात हे मला सांगता नाही येणार. मला इथे कारणांच्या मुळाशी जायचे नाही. परिणाम दिसताहेत. त्यावर बोलायचे आहे. कदाचित माझे इथून पुढचे लिखाण चुकीचे असेल, एकांगीही वाटू शकेल. कारण माझ्या चष्म्यातून मी लिहीणार आहे.
- नव्या साहीत्याकडे म्हणावे तसे लक्ष नाही
- नव साहीत्यिकांना मार्गदर्शन करायला कुणालाच वेळ नाही
- साहीत्यिकांचा दर्जा म्हणावा तसा नाही.
- त्यामुळे करंट अफेअर्स, राजकारण यावर चर्चा जास्त होत आहेत.
- इतर काही घडत नसल्याने राजकारण, करंट अफेअर्स पुरतीच मायबोली आहे का असे वाटते.
- जर राजकारणावरच्या चर्चांपेक्षा इतर घडामोडींमधे वाढ झाली तर राजकारणाकडे फारसे लक्ष जाणार नाही
हे काही मुद्दे आहेत.
याशिवाय राजकारणाचा चिखल होण्यामागे काही जण सातत्याने फेक आयडीज घेऊन ख-या नावाने लिहीणा-यांवर चिखलफेक करत राहतात. यावर मायबोलीचे कोणतेच धोरण नाही.
मायबोली जर सोशल साईट आहे असे म्हणणे असेल तर युझर्सला समान वागणूक हवी.
मायबोली ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे असे म्हणणे असेल तर त्या पद्धतीचा डिसक्लेमर सदस्यत्व घेताना मिळायला हवा.
अनेकदा सक्रीय सदस्यांचं जे बहुमत आहे त्यापेक्षा वेगळ्या मताची टिंगल करणे किंवा त्याच्यावर तुटून पडणे हे न्याय्य असल्याप्रमाणे मायबोलीचे धोरण असते. अल्पमताचा आदर मायबोलीवर पूर्वी व्हायचा. तो आता होत नाही. मायबोली ही इतर अनेक साईट्सपेक्षा वेगळी होती. पुरोगामी होती याचे असंख्य पुरावे आहेत.
पण ती तशीच राहिलेली आहे का याबद्दल शंका आहेत.
उजव्या विचारसरणीचा वरचष्मा मायबोलीवर जाणवतो. इथे अनेक सभ्य आयडीज फेक आयडीज घेऊन पुरोगाम्यांना त्रास देत राहतात. रॅशनलिस्टना अपमानास्पद वागणूक देण्यासाठी मायबोलीचा मुक्तपणे वापर सध्या वाढलेला आहे. उजव्या विचारसरणीचे नसाल तर तिरस्कारयुक्त , द्वेषपूर्ण वागणूक मिळते.
अनेक तटस्थ समजले जाणारे आयडीज देखील उजव्या विचारसरणीला अनुकूल आहेत. त्याचे त्यांना नक्कीच स्वातंत्र्य आहे. पण तसे ते कबूल करत नाहीत. यातले काही राजकारणाच्या धाग्यावर येऊन झाली का चिखलफेक सुरू असे शेरे मारतात आणि फेक आयडीने एका कंपूवर तुटून पडतात. मूळ आयडीने कितीही तटस्थपणाचा आव आणला तरी ही मंडळी आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांचा राग धरतात. हे दुर्दैवी आहे.
मतभेदांना जागा असावी.
माझ्या पाहण्यात काही जण आले आहेत. ज्यांच्याकडे मी मत मांडले नव्हते तोपर्यंत ते माझ्याशी खूप चांगले होते. यांच्या तोंडून मी ऐकलेल्ञा गोष्टी आहेत. काही लेखक या मंडळींना आवडायचे. पण यातल्या काहींनी आपली राजकीय विचारसरणी स्पष्ट केल्यानंतर त्यांना वाळीत टाकले गेले आहे. तसे एसएमएस पूर्वी जायचे. नंतर व्हॉट्स अॅप ग्रुप्सवर अमूक तमूक ला रिप्लाय देऊ नका असे मेसेजेस येऊ लागले. फेसबुक ग्रुप्स काढूनही तिथे हे उद्योग झाले आहेत.
मी अनेकदा असे मेसेजेस इग्नोर केले. पण अती झाल्यानंतर संबंधितांना फोन करून सांगितले. याचा परिणाम म्हणून मलाही तीच वागणूक मिळाली. याच कारणाने मी मायबोलीवर अनेक वर्षे नव्हते. यावेसेच वाटले नाही. पण इतर ठिकाणीही रमले नाही.
अधून मधून नवे काही दमदार आले आहे का हे बघत राहीले. पण छे !
मध्यंतरी काही दमदार गझलांची सुरूवात झाली. आश्वासक वाटले. पण गझलकारांचा एक कंपू झाला आणि त्याने नको नको केले. रोगापेक्षा उपाय भयंकर झाला.
अजूनही दाद तैंचं काही येत अधून मधून येता राहतं. (तिच नाव घेतल्याशिवाय राहवत नाही. खूप आवडती लेखिका आहे ती माझी). तेव्हढ्यासाठी मायबोलीवर उगवून अंतर्धान पावणारे आयडीज पण पाहीलेत. हे माझ्यासारखेच नंतर कुठे तरी गायब होतात. खरेच आम्ही मायबोलीवर वैयक्तिक स्वार्थासाठी येतो. आम्हाला मायबोली सुधारावयाची नाही का ?
पण, आमच्या हाती आहे का हे ?
किंबहुना हे आमचे काम तरी आहे का ? मायबोलीला तसे मनापासून वाटत असेल तर सक्षम लोक आहेत इथे. आपोआप सुधारेल. पण तसे खरेच वाटतेय का कुणाला ?
मायबोलीचे मत म्हणजे कुणाचे मत आहे ? जगभर पसरलेली मायबोली आहे. ५०००० च्या पुढे पोहोचलीय ना संख्या ? (कदाचित मी खूप मागच्या जमान्यात असेन)
मग इथे मूठभरच का सक्रीय ? ही मंडळी नेमकी काय करतात ? एखादी चांगली कथा व्हायरल होते. नावाशिवाय चोरी होते ही सक्रीय न दिसणारे लोक मायबोली वाचतात याची पावतीच नाही का ? या सर्वांना सामील करून घेण्यासाठी काय योजना आहेत ?
मुठभरांच्या आवड निवड बाजूला सारून बहुजनांची आवड लक्षात घेऊन आपल्याला उपक्रम आखता येऊ शकतील का ?
माफ करा. जरा जास्तच बोलले. कुणी दुखावले गेले असल्यास क्षमस्व !
गुगल इंडिक डाउनलोड केलं. फारच
गुगल इंडिक डाउनलोड केलं. फारच मस्त आहे. पूर्ण टायपायचीही गरज पडत नाही अजिबात. म्हणजे grj pdt nhi ajbt एवढे लिहिले तरी टाईप होतेय.
थँक्स वीक्ष्य.
:)ऑलवेज वेलकम
:)ऑलवेज वेलकम
व्हॉइस टायपिंग मराठी नावाचं
व्हॉइस टायपिंग मराठी नावाचं ॲप आहे ते खूप जबरदस्त आहे.. अच्छी बात कष्ट नाहीत
iOS साठी नाहीए असे ॲप
iOS साठी नाहीए असे ॲप किरणुद्दीन.
मला यातलं समजत नाही. मी ते
मला यातलं समजत नाही. मी ते अॅप वापरूनच कमेंटले आहे. एडीट कसे करायचे हे बघावे लागेल.
फोन अॅंड्रॉईड आहे.
मला पण ते रात्रीतून वाचताना
मला पण ते रात्रीतून वाचताना प्रयेत्ने वालूच्ये कन रगाडिता तेलहि गले वाचुन जरा भैसाटायला झालेलं टू फनी फॉर वर्ड्स.
मी मायबोली बद्दल रिथिंग करायला सुरुवात झाली ते कुत्रा बेंच वर बसतो त्याचे काय करावे बाफ वरून. तिथे मिळालेल्या प्रतिसादंवरून
फार खोलात जाउन विचार केला व आपल्याला ह्याची गरज आहे का स्ट्रेंजर लोकांकडून व्हॅलिडेशन मिळवून काय मिळते ह्यावर खूपच विचार केला. साइटची भाषा व काही इथेच घडणारे विनोद ह्या मुळे अजूनही अॅटेच मेंट आहे. तसेच नवीन असताना साइटवर मिळालेला आधार अमूल्य होता व राहील. शंकाच नाही. तेव्हा ही फ व्गैरे ओरिजिनल मेंबर साइटचा दर्जा घसरला आहे असे प्रतिसाद देत.
तेव्हा एक क्लोज्ड कम्यु निटी असल्यासारखेच वातावर ण होते. व प्रतिसाद खेळीमेळी ने दिले जात संवाद घडत असे व वादहि हिरीरीने होत.
पण ते तेव्ढ्या पुरतेच. प्रतेकाचेच काही सॉफ्ट स्पॉट असू शकतात. मग बेफिकीरांचे रोज येणारे लेखन, विबासं मालिका फायनली फॅन क्लब
हे आले. नंतर रुन्मेष पर्व चालू झाले. कट्टा, कोपू पुपु पार्ल्यातील गप्पा, बारा बाफ. ह्याम्च्याशी माझे काहीही देणे घेणे नसूनही गप्पा वाचायला
देखील मजा यायची. कोणी मेंबर येणार म्हणून गटग प्लॅण केली जात. पुढे राजकारणी य बाफा नी हे घरगुती वाता वरण गेलेच. आता तशी व्यक्त होण्याची गरजही गेली. गावानुसार गप्पांचे व्हॉट्सॅप ग्रूप झाले. आता तसे कोणाशी मेंटल कनेक्षन राहिलेले नाही. इन्स्टाग्राम बरे वाटते
तिथे फ्रेंड होण्याची पण गरज नसते. आता तर लोक सल्ला हवा सारखे बाफ काढतात पण सल्ला नको असतो. काव्य शास्त्र विनोदेन हे संपलेच आहे. पण चांगला कंटेंट उपलब्ध होत राहिला तर वाचन मात्र राहीनच.
Amaa ++
Amaa ++
पूर्ण इंग्रजाळलेले मराठी
पूर्ण इंग्रजाळलेले मराठी देवनागरीत लिहिणे व शुद्ध मराठी रोमन लिपीत लिहिणे या माबोवर पाहिलेल्या दोन पद्धतीमध्ये लोकांना पहिली पद्धत योग्य वाटते आणि दुसऱ्या पद्धतीवर मात्र ते सडकून टीका करतात हे एक निरीक्षण.
बरोबरच आहे ते. रोमन मराठी
बरोबरच आहे ते. रोमन मराठी मोठ्या पोस्ट वाचणे खूप त्रास आहे.
आता काही प्रॉब्लेम नाही. आला
आता काही प्रॉब्लेम नाही. आला लॅपटॉप हातात...
अमा
अमा
तुमचा प्रतिसाद वाचला. समजून घेतला आणि आवडला. तुमच्या दृष्टीकोणातून ते पटले.
थोडक्यातच काही लोकांनी एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधण्यासाठी एक प्लॅटफॉर्म बनवला. ही तुमची भावनिक गुंतवणूक देखील असेल.
पण नवीन लोक येतात त्यांच्या भावना तशाच नसतील ना ?
देवनागरी टायपिंगचं इथे कशाला
देवनागरी टायपिंगचं इथे कशाला ? त्या त्या बाफावर करा चर्चा.
उपाशी बोका तुम्ही टीपापावर कसे ?
<<< तुम्ही टीपापावर कसे ? >>>
<<< तुम्ही टीपापावर कसे ? >>>
पूर्वीच्या पार्लेकरांनी म्हणजे आताच्या टीपापा वाल्यांनी किती जणांना पळवून लावलेय ते बघा. ... याच्यामुळे उत्सुकता, विशेष काही नाही.
बोकालताना पाठवा तिपापा वर.
बोकालताना पाठवा तिपापा वर.
टिपापा म्हणजे काय आहे?
टिपापा म्हणजे काय आहे?
देवनागरीत टंकणे हे मायबोलीशी
देवनागरीत टंकणे हे मायबोलीशी संबंधित आहे. ते तुम्हाला चालत नाही.
खासगी पानावर चर्चा कोणत्या नियमाला धरून आहे ?
Mala external keyboard
Mala external keyboard download karane shakya nahiye mobile var. >>
जवळपास सगळ्याच फोन्स मध्ये इन-बिल्ट मराठी/देवनागरी किबोर्ड उपलब्ध आहे. किबोर्ड सेटिंग्ज चेक करून पहा. मी अँड्रॉईड आणि आयओस दोन्हींवर इनबिल्ट कीबोर्डच वापरतो. आताही तसेच लिहीत आहे.
> आपल्याला ह्याची गरज आहे का
> आपल्याला ह्याची गरज आहे का स्ट्रेंजर लोकांकडून व्हॅलिडेशन मिळवून काय मिळते ह्यावर खूपच विचार केला. > काय उत्तर मिळालं मग या प्रश्नांच?
काय उत्तर मिळालं मग या
काय उत्तर मिळालं मग या प्रश्नांच?>> व्हॅलिडेशनची गरज नाही. ती आहे असे वाटत होते हा भ्रम. दूर झाला आहे कधीच. प्रत्येकाची इथे व्यक्त होण्याची एक आर्क असते . ती प्ले आउट झाली.
> व्हॅलिडेशनची गरज नाही. ती
> व्हॅलिडेशनची गरज नाही. ती आहे असे वाटत होते हा भ्रम. दूर झाला आहे कधीच.> खरंय
<<<टिपापा म्हणजे काय आहे?>>>
<<<टिपापा म्हणजे काय आहे?>>>
टीपापा हा एक धागा आहे. तिथे लिहिणार्यांनी बर्याच मायबोलीकरांना मायबोली वरून पळवून लावले आहे असे बर्याच जणांना वाटते, त्यांच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत नाही असे मत एकाने व्यक्त केले आहे. इतके ते पॉवरबाज आहेत.
टीपापा धाग्यावरील बरेच लोक अनेकदा प्रत्यक्ष एकमेकांना भेटले असून, त्यांच्यात दृष्ट लागावी, हेवा वाटावा अशी दृढ मैत्री झाली आहे. त्यांच्यातहि अनेक विद्वान, कलाकार, गझल कार, लेखक लोक आहेत, पण ते समजण्याची इतरांना कितपत इच्छा/अक्कल/हिंमत आहे ते इतरांवर अवलंबून. टीपापा वर लोक जळतात अशी शंका यावी असे बहुतेक जण लिहितात. त्यामुळे त्यांचे दर्शन इतर धाग्यांवर क्वचितच होते.
तर जरा जपून बोला.
बापरे खूपच डेंजर लोक्स
बापरे खूपच डेंजर लोक्स दिसताहेत. शोले मधल्या गब्बरनंतर इतक्या वर्षांनी टिपापा सदस्यांनी धडकी भरवली.
बोकलत - ही घ्या लिंक टीपापा
बोकलत - ही घ्या लिंक टीपापा ची -
https://www.maayboli.com/node/40581
तिकडे सगळे तुमची वाट बघत आहेत.. त्वरा करा ...
कुठल्या ग्रुपमध्ये सामील
कुठल्या ग्रुपमध्ये सामील व्हायला लागतं.
टीपापावर बर्याच उत्सुकतेने
टीपापावर बर्याच उत्सुकतेने तिथले हिंस्त्र लोक पहाय्ला गेलो तर हे आले पुढ्यात
हे पान पहायची परवानगी नाही.
Submitted by webmaster on 18 July, 2010 - 17:15
तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही.
म्या आता काय क्रावे ब्रे?
अमेरिकेतील आयुष्य चे सदस्य
अमेरिकेतलं आयुष्य चे सदस्य व्हा.
https://www.maayboli.com/node/3532
Prayatne valuche kaN ragaDita
Prayatne valuche kaN ragaDita telahi gaLe
>>>
मराठी टंकलेखन करणे वाळुचे कण रगडण्यापेक्षा सोपे आहे.
Submitted by टवणे सर on 19 June, 2019 - 01:44
<<
बेस्टेस्ट प्रतिसाद!
म्या आता काय क्रावे ब्रे?
म्या आता काय क्रावे ब्रे?
<<
हुड्या, अम्रिकेतिल आयुष्याची मेम्बर्शिप घे पाहू.
बोकलतना पाठवायचं चाललं होतं
बोकलतना पाठवायचं चाललं होतं ना ? हे बाका का मध्येच जाऊन आले तिकडे ?
हूड पण आले का आमच्यात वंदे मातरम म्हणायला ?
जय श्रीराम !
टीपापावाले वाचताहेत सगळं. उगा
टीपापावाले वाचताहेत सगळं. उगा बाष्कळ काही बोलून पापाचे घडे भरलेत तर टी पाजावा लागेल.
Pages