तुला 'का' ? 'पाहता' रे..

Submitted by किल्ली on 10 May, 2019 - 05:57

ggg.jpgतुला पाहते रे..

शितु, सुभा, गादा (गायत्री दातार उर्फ आपलं ई बाळ) आणि ह्या सीरीयल मधील समस्त महान लोकांची कामं पाहुन त्यांची मेहनत सार्थकी ठरवण्यासाठी हा धागा..

आओ ना फिर
उडाओ ना फिर

हा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
२. https://www.maayboli.com/node/68143
३. https://www.maayboli.com/node/68936

gggggg.jpghqdefault.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके ! थँक्स सूलू_८२!!
हल्लीच्या काळात कोण करेल असं सीडी वर रेकॉर्डिंग ?! व्हाट्स ऍप्प नाहीये का यांच्याकडे गेला बाजार इ मेल ? Uhoh

ही कोणे एके काळी लव्ह स्टोरी होती ना,मग विक्या आणि बाळ फसवाफसवी चा खेळ का खेळत आहेत.
बाळाला विक्याचा चेहरा समोर आणायचा आहे ना,मग विक्याच्या केबिन मध्ये आता लाव ना मायक्रोफोन,म्हणजे नाही का मिळणार पुरावा.

आज सुभाने इंन्स्टाच्या चँटवर सांगितल की त्याच तुपारे च शूटिंग संपल,पण बाकीच्यांच चालू आहे.थोडा भावूक झाला होता,डोळ्यातल पाणी दिसू नये म्हणून गॉगल घातला होता.
पण माझ्या मते सुटला बाई एका दिव्यातून

थोडा भावूक झाला होता,डोळ्यातल पाणी दिसू नये म्हणून गॉगल घातला होता.पण माझ्या मते सुटला बाई एका दिव्यातून>>>> ++१११११ आनंदाश्रू असतील आहो..

अगदिच वाईट कपडेपट आहे मालिकेचा, काल इ बाळान निळ्या साडिच्या आत राणी कलर ची लेगीग घालतेली सरळ सरळ दिसत होती. निदान रंग तरी बघाय्चे....

कालच्या सीनमधे सुभाच्या बोटावर शाई दिसत होती म्हणजे हे सीन्स कधीच शूट झाले आहेत.

सुभा इतका भोळा कसा झाला आणि बाळ इतकं चतुर कसं झालं हे एक कोडचं आहे. अक्षरशः गुंडाळत आहेत आता.

हो ना..मलाही दिसली तिची डार्क पिंक लेगिंग.....आणि ही लोकं साडीच्या आत लेगिन्स घालूनच काम करतात? नो पेटिकोट..? Uhoh
काल ईशाने निळ्या साडीवर राणी कलरचं ब्लाऊज घातेलेलं....ते आतल्या लेगिन ला मॅच व्हावं म्हणून की काय? Happy
विक्रांत काल गोड दिसत होता. व्हाईट शर्ट मधे . सोन्या पण खूपच सुंदर दिसत होती. मेकप जमला होता बहुतेक!
झेंडे का इतके घाबरुन आहेत हिला?

जालिंदरला सतत नाक खाजवायला का बरं सांगितले असेल?आता तर तो व्हिलन नाहीये ना.
मीच राजनंदिनी आहे असं ईशाने सांगितले तेव्हा जालिंदरने असा काही चेहरा केला की वाटलं भू~~~त असं आरडत तिथूनच उडी मारणार आहे. म्हणेल की मी उगीच परत आलोय सॉरी
गंमत म्हणजे वारंवार झेंडे जालिंदरला पाहिल्याचं विसला सांगतो पण एकदाही आपण त्याला मारूनही तो वाचला कसा याबाबत काहीच आश्चर्य वगैरे दाखवत नाही. माझा लेक हे सर्व पाहून न राहवून म्हणाला की बहुतेक जयदीप ची बंदूक (जुन्या जयदीप ची) घेऊन मारलं होतं जालिंदरला. त्यामुळे वाचला.
शॅम्पेन सुद्धा रिकामी बाटलीच असणार. हिरविणीला द्यायला टिकोटसुद्धा परवडत नाही म्हणून वाटलंय. Wink

विक्रांत काल गोड दिसत होता. व्हाईट शर्ट मधे . >>>>>>>> ++++++++११११११११

.आणि ही लोकं साडीच्या आत लेगिन्स घालूनच काम करतात? नो पेटिकोट..? >>>>>>>> त्यात काही नवीन नाही. बर्याच एक्ट्रेसेसना बघितलय अस. करीना कपूर तर लेगिन्स घालते साडीच्या आत कुठल्याही इव्हेन्टला.

विसला ईशाने खोटे प्रॉपर्टी पेपर बनवले, जालिन्दरला भेटली हे सगळ कळलय. ईआईबाबान्न्ना तो ईमोशनल ब्लॅकमॅल करतोय. पण तो ईशाला मारु शकत नाही. प्रेमात पडलाय म्हणे तिच्या.

कालच्या सीनमधे सुभाच्या बोटावर शाई दिसत होती म्हणजे हे सीन्स कधीच शूट झाले आहेत. >>> ती शाई माझ्यापण नखावर आहे अजून. त्यामुळे राहिली असेल एखादवेळेस त्याच्या बोटावर.

>>ती शाई माझ्यापण नखावर आहे अजून. त्यामुळे राहिली असेल एखादवेळेस त्याच्या बोटावर.
हे जरा' मेरा कुछ सामान' सारखं वाटतय... नसावं तसं काही! Proud

>>ती शाई माझ्यापण नखावर आहे अजून. त्यामुळे राहिली असेल एखादवेळेस त्याच्या बोटावर.
हे जरा' मेरा कुछ सामान' सारखं वाटतय... >> Proud Lol
आम्ही हल्ली बारकावे बघायचंच सोडून दिलंय .. कितीही चुका दाखवल्या तरी त्यांना काही फरक पडत नाही ..
आपण आपलं फा फॉ करत करत बघावं ... मला फक्त आता यातून ते कस आणि काय सिद्ध करणारेय तेवढंच पाहायचंय ..

>>मला फक्त आता यातून ते कस आणि काय सिद्ध करणारेय तेवढंच पाहायचंय ..
सिध्ध झालय सगळं... आता फक्त विस चं पुढे काय होते किंवा तो काय करतो एव्हडच बाकी आहे. मला ऊगाच एक क्रियेटिव्ह शंका येत आहे. की विस ला ईशा चं रहस्य वगैरे सगळं कळलं आहे.. पण तो ते कुणाला जाणवू देत नाहीये. never know.. he may actually kill Isha as well after all property papers are signed and made available to him. He may sacrifice Vilas for this. Lets c.

अशी बातमी आहे की विक्याचा अपघात होतो आणि बाळ प्रेगंन्ट असत,हा ट्रँक चालू झाला का?
सध्या काय चालू आहे?
बाळाला चुन्नुमुन्नु म्हणजे अतिच झाल केड्या जाताजाता पण माती खात आहे.

अशी बातमी आहे की विक्याचा अपघात होतो आणि बाळ प्रेगंन्ट असत >> :हॉरर चेहरा केलेली बाहुली : आणि ३ वेगवेगळ्या डायरेक्शन ने जोरात "काय !", "काय ?" "काय !?" .. (इथे ज्यांनी चष्मा / गॉगल घातला असेल त्यांनी पहिल्या काय च्या वेळी तो उजव्या हाताने ओढून काढायचा आहे Wink )आणि पाठीमागे २ थाळे एकमेकांवर आपटल्याचा आवाज "ठीश्श , ठीश्श , ठीश्श " ..
हा ट्रँक चालू झाला का?>>> नाही .. कुठे पाहिलं तुम्ही हे ?
सध्या हे चालू आहे , प्रॉपर्टी चे कागद खोटे होते हे कळलंय वीस ला
इशा , जैडू , मायरा आणि जाळी एकत्र एका रूम मध्ये :
इशा : आता आपल्याला काहीतरी करायला हवं
मायरा : हो
जाळी : मी काहीतरी प्लॅन वर्क आऊट करतो .
इशा : माझ्याकडे एक प्लॅन आहे
जाळी : प्लॅन आहे ?
इशा : हो , त्यात तुम्हाला महत्वाचं काम निभवायचंय
जाळी : मला ?! सांग बघू प्लॅन .
इशा : सांगते.. पुढे म्यूट अर्थात नुसते हातवारे

अल्मोस्ट सेम संवाद काल २ वेळा झाले .. कोण लिहितं असे संवाद .. !? Uhoh

काल माझ्या नवर्‍याची बायको मध्ये शन्याच्या आईने केड्याच्या डोक्यात काठी घातली. त्यामुळे केड्या आता दोन्ही सिरीयलचे लेखन यापेक्षा भयानक करेल बहुतेक.

कालचा भाग फारच विनोदी होता काय? नवरा थोडा वेळ बघत होता आणि खोखो हसत होता.

रेकोर्ड केलाय कालचा भाग. आज संध्याकाळी बघावा म्हणते.

ही ईशा एकदम इतकी धीट आणि स्मार्ट कशी काय झाली ? तिला पटापट प्लॅन्स सुचताहेत.. जालिंदर सारखे मुरलेले लोक सुद्धा अवाक होऊन पाहाताहेत. चक्क झेंडे लाच ट्रॅप केलं.
काहीही..!! बरं..हे सगळं सांगताना चेहेर्‍यावरची माशीही हलत नाही तिच्या..फक्त बोटांचा चंचू करुन इथून तिथे ठेवते! Angry
विक्रांत मात्र खूपच क्यूट दिसतोय...अगदीच ईशाच्या प्रेमात पडल्या सारखा........! गॉड ब्लेस हिम! Happy

काल झेंडे व जालिंदर मधे दिसायला कोण बेटर हे ठरविणं फार अवघड होतं.....!!
जयदीप अगदीच बाळबोध आहे... , "म्हणजे माय फ्रेंड वहिनी......तुला असं म्हणायचं आहे का.. ?" नी प्रत्येक वाक्य सुरु करतो . प्रेक्षकांना सोपे जावे म्हणून!

काहीही..!! बरं..हे सगळं सांगताना चेहेर्‍यावरची माशीही हलत नाही तिच्या..फक्त बोटांचा चंचू करुन इथून तिथे ठेवते! Angry >>>>>लोल लोल....

विक्रांत मात्र खूपच क्यूट दिसतोय...अगदीच ईशाच्या प्रेमात पडल्या सारखा........! गॉड ब्लेस हिम! Happy:>>>>>>>+१११११११

जयदीप अगदीच बाळबोध आहे... , "म्हणजे माय फ्रेंड वहिनी......तुला असं म्हणायचं आहे का.. ?" नी प्रत्येक वाक्य सुरु करतो . प्रेक्षकांना सोपे जावे म्हणून! >>>>>>> हो न सिन बघुन कळ्ल आम्हाला ... तुम्ही काय केल ते... तरी explain करत होते.... lol......

आता फक्त विस चं पुढे काय होते किंवा तो काय करतो एव्हडच बाकी आहे. मला ऊगाच एक क्रियेटिव्ह शंका येत आहे. की विस ला ईशा चं रहस्य वगैरे सगळं कळलं आहे.. पण तो ते कुणाला जाणवू देत नाहीये. never know.. he may actually kill Isha as well after all property papers are signed and made available to him. He may sacrifice Vilas for this. Lets c. >>>>>>> सध्या विसचा असा प्रॉब्लेम झालाय की त्याला प्रॉपर्टीही हवी आणि ईशासुद्दा. ईशाच्या प्रेमात पडल्यामुळे तो तिला मारुही शकत नाही. झेण्डे आणि ईशा यात कोण बरोबर, कोण चूक असा कन्फ्यूजड झालाय तो, जस काही महिन्यापुर्वी ईशा त्याच्याबाबतीत झाली होती.

एका क्षणाला विस झेण्डेला म्हणतोय की आपल्या स्वार्थासाठी दुसर्यान्चे जीव घ्यायचे नसतात, तर दुसर्याच क्षणाला झेण्डेला बन्दूक देऊन जालिन्दरला मारायला सान्गतो. Uhoh

विक्रांत मात्र खूपच क्यूट दिसतोय...अगदीच ईशाच्या प्रेमात पडल्या सारखा..... >>>>>>>> +++++++११११११११११

ही ईशा एकदम इतकी धीट आणि स्मार्ट कशी काय झाली ? तिला पटापट प्लॅन्स सुचताहेत.. जालिंदर सारखे मुरलेले लोक सुद्धा अवाक होऊन पाहाताहेत. चक्क झेंडे लाच ट्रॅप केलं. >>>>>>>>>> अगदी अगदी. एका प्लॅननन्तर दुसरा सुचतो हिला सटासट. Lol पण झेण्डेला ट्रॅप करण्याचा प्लॅन फुसका होता. झेण्डे कसही करुन विसला ' तो मी नव्हे' म्हणून पटवणार. ईशाला हे उशिरा कळल, सो आता हा नाटकाचा प्लॅन.

मालिकेतल्या पात्रांना पण असा प्रश्न पडलाय की ईबाळ अचानक कसं काय एवढं स्मार्ट झालं ?

काल प्लॅन मधे काही म्हणता काही धोका नव्हता ईशाला, नुसता जालिंदर तिच्या मागे धावणार होता, विक्याकडून धोका कोणाला होता तर जाल्याला होता.

झेण्डेने ईशाला मारायची सुपारी दिली आहे. आता तो विसच्या हातून नक्कीच मरणार.

कालची ईशाला आलेली चक्कर खरी होती का? काही टेस्टस कराव्या लागतील म्हणाली डॉक्टर. प्रिकेपमध्ये आसा ईशाला देवीची ओटी भरायला सान्गते. म्हणजे ती प्रेग्नन्ट आहे का? Uhoh

बाकी विस काल खरच घाबरलेला ईशाला चक्कर आलेली बघताना.

Pages