तुला 'का' ? 'पाहता' रे..

Submitted by किल्ली on 10 May, 2019 - 05:57

ggg.jpgतुला पाहते रे..

शितु, सुभा, गादा (गायत्री दातार उर्फ आपलं ई बाळ) आणि ह्या सीरीयल मधील समस्त महान लोकांची कामं पाहुन त्यांची मेहनत सार्थकी ठरवण्यासाठी हा धागा..

आओ ना फिर
उडाओ ना फिर

हा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
२. https://www.maayboli.com/node/68143
३. https://www.maayboli.com/node/68936

gggggg.jpghqdefault.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो रस्त्याचा शॉट प्रत्येक भागात एकदा दाखवतात हल्ली.

प्रश्न असा आहे की ईबाळ जर रानं नसेल तर मग विक्याने खून केलेत का हे खरं का खोटं हे घरातले लोक ठरवत असावेत. मुळात शिक्षा कुठे ठरली आहे काय द्यायची ते ?

ईशाला अगदी तिच्या सारखीच मुलगी होणार आणि सर्र सारखं विस ला ब्वाब्वा असं ऐकायला लागणार हीच त्याला शिक्षा ठरली आहे म्हणं

फारएंड, भारीच! Lol
मी मालिका बघत नाही, पण ...
आपण प्रेग्नंट आहोत याची ईशाला काहीच कल्पना आली नसेल तर हे खोटं नसेल कशावरून? विक्रांतने खोटे रिपोर्ट आणले असतील की. मुळात बातमी त्यालाच आधी कळली हे संशयास्पद नाही का?

आपण प्रेग्नंट आहोत याची ईशाला काहीच कल्पना आली नसेल तर हे खोटं नसेल कशावरून? विक्रांतने खोटे रिपोर्ट आणले असतील की. मुळात बातमी त्यालाच आधी कळली हे संशयास्पद नाही का? >>>>>>तिचे पीरिअड्स स्किप झालेत हे तर तिला ठाऊक असेल ना ?? का डॉक्टर ला विचारल्यावरच कळते?

जाळींदर खरंच ढगात गेलाय का?? >>>>>>>> मला तर झेण्डे खरच ढगात गेलाय का हा प्रश्न पडलाय.

विक्रांत ने खून केलेत हे सगळ्यांना माहीत आहे, तर अधूनमधून विसरल्यासारखे का वागत आहेत हे लोक? बाळाचे बाबा खुनी आहेत हे विसरल्चे सगळे. >>>>>>>> आसा आणि जयदीप अजून नाही विसरलेत.

वट्ट घरात ली अशी माण से आई व जयडू. आता त्याचे लग्न झाल्यावर त्याची बायको. पण हे वेग ळेच सं बंध नसलेले पब्लिक घरी राहते आहे व त्यांना पोरेबाळे पण होत आहेत. आता तर जायदाद पण तिच्या नावावर. >>>>>>>> मग ह्याच न्यायाने आसा आणि जयदीप- सॉनया हे सुद्दा बाहेरचेच झाले असे म्हणता येईल. आसा हि सावत्र आई आणि जयदीप सावत्र भाऊ. सो, दासा हि घरातली व्यक्ती, त्यान्च्या नन्तर नन्दूचा हक्क आहे घरावर. नन्दूचा पुनर्जन्म ईशा असेल तर मग प्रॉपर्टी तिच्याच नावावर होण योग्य वाटत.

आता तर जायदाद पण तिच्या नावावर. >>>>>>>>> प्रॉपर्टी अजून कुठे तिच्या नावावर झाली? जयदीपच्या नावावर आहे. ईशाने विसला दिलेले पेपर्स खोटे होते.

सॉन्या एकदम ललिता पवार, शशिकला, नादिरा वगैरे मोड मधून आशा काळे, जयश्री गडकर मोड मधे कशी आली? एकदम "ती लाजून पदराशी चाळा करत आत पळाली...." छाप वागणे सुरू आहे >>>>>>>>>>> अगदी अगदी. कालपरवापर्यन्त मूल नको म्हणणारी सॉनया तुम्हीसुद्दा चान्स घ्या म्हटल्यावर चक्क लाजायला लागली!

जयदीपही कधीचाच मैने प्यार किया मधला मोहनीश बहलचा हम आपके है कौन मधला झालाय. >>>>>>>> पण जयदीप मैने प्यार किया मधल्या मोहनीश बहल सारखा कधी वागला होता? Uhoh

बाकी विक्रांत खून एकदम सराईत पणे करतो..दादा साहेब, राजनंदिनी, तो खबर्या कोण होता व त्याची फॅमिली, आणि जालिंदर व झेंडे.......एकदम कूल! >>>>>>> मग, उगाच नाही त्याला सिरियलचा व्हिलन केलय ते. आता व्हिलन म्हटले की हि सगळी कार्ये त्याच्यासाठी ' मोस्ट रिक्वायर्ड' कॅटेगॅरीमध्ये असतीलच ना.

पण जयदीप मैने प्यार किया मधल्या मोहनीश बहल सारखा कधी वागला होता? >> अगदी तसाच नव्हे पण आधी रागीट दाखवला होता आता एकदम सौम्य.

काल तो वरच्या कप्प्यांत साड्या वगैरे ठेवण्याचा सीन कथेत नंतर दाखवला असला, तरी शूट आधी केला असावा. कारण इतके भरघोस ते कुंकू की गुलाल चेहर्‍यावर लावल्यानंतर पुढच्याच सीन मधे ईशा एकदम स्पॉट क्लीन! कसला मागमूसही नाही. विक्याचे आणि तिचे सीन्स ७०ज मधल्या कादंबर्‍यांपेक्षा भंकस झाले आहेत. "सर तुम्हीपण ना!", "किती दिवसांनी हा आवाज ऐकला!" वगैरे वगैरे. ती ते कपडे कप्प्यांत ठेवत असताना विक्या अडवतो आणि दोघेही एकमेकांना आराम कर वगैरे सांगत पाच मिनीटे वाद घालतात. एवढे करून नंतर तो तिला ते कपडे ठेवायला सांगतो. अरे मग आधी ती तेच करत होती की!

सरांपासून लपवण्यासारखे मोठे कारस्थान सुरू आहे. त्याचे पुरावे ढळढळीतपणे सर दिवसभर पडीक असतात त्याच रूम मधे आहेत.

ही कथा आता चालू काळात आली आहे ना? विक्याची हेअर स्टाइल फ्लॅशबॅक मधली अजून तशीच आहे. ते १३ कंपन्या चालवणारे सरंजामे दिसत नाहीत.

दुसरे म्हणजे विक्याचे सीन स्वतंत्रपणे चित्रीत होत असावेत. कारण त्याच्याविरूद्ध कारस्थान सुरू आहे हे डॉन प्रमाणे "ये ईशा जानती है, ये आईसाहेब जानती है, लेकिन विक्या नही जानता". मग आता टुणटुणीत झालेला असताना खाली ज्या गप्पा, जे कार्यक्रम सुरू आहेत त्यात हा कसा उगवत नाही? दिवसभर त्या रूम मधे पडीक असतो की काय? बरं कंपनीसंदर्भात कोणाशीतरी बोलतोय वगैरे? काहीच नाही. कोणालाच फिकीर दिसत नाही.

देवी आली तर आला नाही. खाली सासू-सासरे आहेत, त्यांच्याशी गप्पा वगैरे? ते ईपालकही अगदी नेसत्या वस्त्रानिशी म्हणतात तसेच २-३ दिवस बसवून ठेवलेले दिसतात त्या कोचवर.

रॅण्डम ट्रॅफिक शॉट आजही होता Happy त्या सायकलवाल्याला लोक आता विचारत असतील अहो ते तुपारे मधले तुम्हीच का?

झेण्डे मेला नसावा. एकतर जोपर्यंत मेल्याची खात्री असलेला सीन दाखवत नाहीत तोपर्यंत कोणी मेलेला नसतो हे चित्रपट, मालिका वगैरेंमधे लागू होते.

खरे तर एक खत्रा लॉजिक सिरीज मधे वापरता येइल. तेवढे डोके चालवले आहे का ते कळेल काही भागांत. झेंडेकडे पिस्तूल रोखल्यावर विक्या म्हणतो, "मरताना माणूस कधी खोटे बोलत नाही". तेथे तो सीन कट केलेला आहे. पुढे असे निष्पन्न झालेले दाखवायचे की झेंडे मरतो, पण मरताना विक्याला तेच परत सांगतो जे तो पटवत होता. "मरताना खोटे बोलत नाही" लॉजिक मुळे मग विक्याचा विश्वास बसतो, त्यामुळे आता घरी आलेल्या विक्याला सगळे माहीत असते. जे तो नंतर उघड करतो.

पण तसे नसावे, कारण मग त्या पेन बद्दल इतका विचार करत बसला नसता तो.

सायकलवाल्याला लोक आता विचारत असतील अहो ते तुपारे मधले तुम्हीच का?>> ओ एम जी मी पण तो माणूस रोज बघते. मोस्ट इं टरेस्टिन्ग. एव्ढेच नव्हे ती मागची बिल्डिंग बघितलीत तर शनाया व तिची आई केड्या कडे राहतात ती आहे असे मला वाट्ते.

सुभा एक दोन दिवस अ‍ॅलोकेट करत असावा शूटला. त्यात सर्व सीन्स घ्यायचे करून.

झेंडे ने जिथे त्याला किड्नॅप करून ठेवले होते ते घर नक्की झेंडेचे नव्हते खूपच सॉफिस्टिके टेड इंटिरीअर्स होते त्या घराचे. मस्त पण होते.

बर हा माण से मारतो ती माणसे डिलीट होतात का? तो कंपनीतला एक माणूस विथ फॅमिली गेला. जालिंदर आता मरून पडला. झेम्डेला मारले.
ह्या डेड बॉडीज ची विल्हेवाट मायरा लावते का? ऑ. आजचे स्केडूल काय तर सरांनी अंधेरी इस्ट्ला एक मर्डर केला आहे दोन बॉड्या उचलून
पेण जवल डंप करायच्या आहेत. चलो. असे काहीतरी. कथेत मारले की गेलेच ते. अतीच स्टुपिड डिरेक्षन आहे. गादाचे बाबा अहो दिग्दर्शन अस्ते कथांचे. जरा थोडे पैसे नेक्स्ट टाइम चांगल्या दिग्दर्श कासाठी ठेवा बाई.

गादा कपडे कपाटात ठेवते ते तेच काळा ड्रेस रेड ड्रेस व एक यलो ऑरेंज आहे तीन इस्त्री केलेले.

मागची बिल्डिंग बघितलीत तर शनाया व तिची आई केड्या कडे राहतात ती आहे असे मला वाट्ते. >>> अमा Lol सुपर अभ्यास Happy

घर नक्की झेंडेचे नव्हते खूपच सॉफिस्टिके टेड इंटिरीअर्स होते त्या घराचे. मस्त पण होते. >>> +१ मलाही वाटले होते की या झेण्ड्याला त्याच्या उद्योगातून कधी वेळ मिळेल हे सगळे करायला. बहुधा झी कडे असलेल्या इन्वेण्टरी मधले एक वापरले.

फारएण्ड Lol
पालकही अगदी नेसत्या वस्त्रानिशी म्हणतात तसेच २-३ दिवस बसवून ठेवलेले दिसतात त्या कोचवर> Lol

@ तुपारे टीम : xxx xxxxxx xxxxxxxx xx xxxxxxx xxxxxxxx xxxxxxxxxx xx xxxxxxxxxxx xx xxxxx xxxxxx xxxxxxxx xxxxxxx xxxxxxx xxxxxxxxxxxx xxxxxxxx xxxxxxx xx xxxxxx xxxxxxxxxxxx xxxxxxxxxxx xxxx xxxxxxxx xxxxxxx xxxxxxx xxxxxx xxxxxxx xxxxxxxx xxxxxx xxxxxxx xxxx xxxxxxxxxxx xxxxxx xxxxxxx xxxxxxx xxxxxxx xxxxxxxx ---> ∞

इन्फिनिटी सिम्बॉल शोधायला गेले होते. Happy

जालिंदर आता मरून पडला. झेम्डेला मारले.>> अच्छा ! मेलेत का ते दोघे ?! मी गेला पूर्ण आठवडा पाहिलं नाहीये .. त्यामुळे मी सुखात आहे Wink
@कारवी ताई या एवढ्याच शिव्या!! Wink Proud

झेंडे ने जिथे त्याला किड्नॅप करून ठेवले होते ते घर नक्की झेंडेचे नव्हते खूपच सॉफिस्टिके टेड इंटिरीअर्स होते त्या घराचे. मस्त पण होते. >>>>>>>>> ++++++++११११११११११

बर हा माण से मारतो ती माणसे डिलीट होतात का? >>>>>>>>> फक्त एक माणूस डिलीट नाही झाला, राजनन्दिनी. ती गेली ईशामध्ये. Proud

ह्या डेड बॉडीज ची विल्हेवाट मायरा लावते का >>>>>>>>> मायरा आता सुधारली ना? ईशाच्या साईडने गेली सो आता ती कशाला हे काम करील म्हणा.

झेंडेकडे पिस्तूल रोखल्यावर विक्या म्हणतो, "मरताना माणूस कधी खोटे बोलत नाही". तेथे तो सीन कट केलेला आहे. पुढे असे निष्पन्न झालेले दाखवायचे की झेंडे मरतो, पण मरताना विक्याला तेच परत सांगतो जे तो पटवत होता. "मरताना खोटे बोलत नाही" लॉजिक मुळे मग विक्याचा विश्वास बसतो, त्यामुळे आता घरी आलेल्या विक्याला सगळे माहीत असते. जे तो नंतर उघड करतो. >>>>>>>>> फारएण्ड, मस्त लॉजिक

झेण्डे मेला नसावा. एकतर जोपर्यंत मेल्याची खात्री असलेला सीन दाखवत नाहीत तोपर्यंत कोणी मेलेला नसतो हे चित्रपट, मालिका वगैरेंमधे लागू होते. >>>>>>>>> सहमत. विसच्या बन्दुकीतून गोळी सुटल्याचा शॉट दाखवलाय फक्त. झेण्डेची बॉडी दाखवली नाही.

ईशाने आपल्या विरोधात कट रचलाय असा डाउट येऊ लागलाय सध्या विसला. झेण्डेच्या माणसाकडून सगळ कळलय त्याला. आता त्याला ईशाच्या जागी नन्दू दिसतेय म्हणे.

पालकही अगदी नेसत्या वस्त्रानिशी म्हणतात तसेच २-३ दिवस बसवून ठेवलेले दिसतात त्या कोचवर> Rofl ते निमकर पुन्हा चाळीत गेले होते ना. पुन्हा कशाला आलेत विसकडे फु़कटच हादडायला. बाकी विस सुद्दा तेच करतो तिथे म्हणा, दुसर्यान्च्या घरातल फुकटच हादडतो.

सध्या आपल्या जे सिन्स दाखवतायत ते आधीच शूट करुन झाले आहेत. सिरियल ऑलरेडी सम्पली आहे. न्यूज चॅनल्सवर Wrap Up Party दाखवली. इन्स्टावर फोटो आहेत पार्टीचे.

सुभा नाटकात बिझी आहे. एक वेबसिरिज पण करतोय. गादा पण वेबसिरिज करतेय म्हणे.

जयडीप चिडलाय mfw वर
ते निमकर किती साधे भोळे आहेत
सगळं सांगून टाकलं

काल एक प्रिव्ह्यू पाहिला त्यात निमकर अडाण्यासारखे विसला विचारतात तुम्ही दा/सांची औषधे बदलली, पो/मा रिपोर्ट बदलला , ते रानंला कळले तर तिला मारले ---- हे खरेय का?
जो या कानाचे त्या कानाला कळू न देता मुडदे पाडतो त्याला असा भाबडा / मूर्ख / रोखठोक प्रश्न?
पाऊस पडताना जवळून बघायचा या बाप्याला?

जर लेखकाचे लॉजिक हे असेल --- रा नं आणि तिचे तात यांना विसने मारले तर ईशाने का जिवाला लावून घ्यावे? तिने आपला संसार सुखाने करावा. ईशाच्या तातांचा सेंडॉफ त्याने केला की मग ती एलिजिबल झाली हिशोब चुकता करायला ---- तर लेखकाचा मेंदू प्रिझर्व करून म्युझियममध्ये ठेवावा लागेल. रिंकल फ्री मानवी मेंदू कसा दिसतो ते बघायसाठी.

बहुतेक निमकरांचे पेमेंट ड्यूज संपले. विस त्यांना परतीचे तिकीट काढून देईल.
मग ईशा आधी डोनल्ड डक / अंकल स्क्रूज सारखे ओठ काढून ब्याब्या म्हणत रडेल मग बेशुद्ध पडेल.
विसच्या आजी + माजी सासूबाई त्याची धुलाई करतील.
सॉन्या, मंदा, सर्जेराव, मायरा त्यांना लागणारी आयुधे देतील.
जैदू मोबाईलमध्ये शूट करेल --- हि फ्रे व शुद्धीवर आली की दाखवायला --- की तिचा बदला पूर्ण झालाय

जो या कानाचे त्या कानाला कळू न देता मुडदे पाडतो त्याला असा भाबडा / मूर्ख / रोखठोक प्रश्न? >>> Lol

१५-२० व्हिलन्स च्या अड्ड्यात "मै ये सब पुलिस को बताउंगी" म्हणणार्‍या हीरॉइनच्या नंतर यांचाच नंबर.

जर लेखकाचे लॉजिक हे असेल --- रा नं आणि तिचे तात यांना विसने मारले तर ईशाने का जिवाला लावून घ्यावे? तिने आपला संसार सुखाने करावा. ?>>> हो असेच दिसते. विक्याने पहिल्या बायकोला मारले हे दुसर्‍या बायकोच्या दृष्टीने, तिच्या पालकांच्या दृष्टीने थोडे काळजीचे कारण असावे. पण ते रियल लाइफ मधे. ही मालिका रियल लाइफ मधे जगत नसावी.

पण विसं ची इतकी वर्ष साधी चौकशी पण होऊ नये हे जरा अतिच आहे. कोणता गुन्हेगार इतका सर्रास फिरू शकतो

>>>>रॅण्डम ट्रॅफिक शॉट आजही होता Happy त्या सायकलवाल्याला लोक आता विचारत असतील अहो ते तुपारे मधले तुम्हीच का?
क्विकहील, स्कोडा वगैरेच्या अ‍ॅड दाखवायला वापरायचे तो सीन...

Pages