लव्ह इन ट्रबल भाग- १२
https://www.maayboli.com/node/70297
लव्ह इन ट्रबल भाग- ११
https://www.maayboli.com/node/70284
लव्ह इन ट्रबल भाग- १०
https://www.maayboli.com/node/70266
लव्ह इन ट्रबल भाग- ९
https://www.maayboli.com/node/70153
लव्ह इन ट्रबल भाग- 8
https://www.maayboli.com/node/70118
लव्ह इन ट्रबल भाग- ७
https://www.maayboli.com/node/70025
लव्ह इन ट्रबल भाग- ६
https://www.maayboli.com/node/69994
लव्ह इन ट्रबल भाग- ५
https://www.maayboli.com/node/69974
लव्ह इन ट्रबल भाग- ४
https://www.maayboli.com/node/69957
लव्ह इन ट्रबल भाग- ३
https://www.maayboli.com/node/69948
लव्ह इन ट्रबल भाग- २
https://www.maayboli.com/node/69937
लव्ह इन ट्रबल भाग- १
https://www.maayboli.com/node/69925
लव्ह इन ट्रबल भाग - १३
पहिलं टार्गेट ठरवल्यानंतर सगळ्यांनाच उत्साह आला..उद्यापासून खऱ्या कामाला सुरुवात होणार होती…काय काय करायचंय याचं प्लॅनिंग करून मग संध्याकाळी पाच वाजता ते तिघे एकत्रच बाहेर पडले… ते गेल्यावर अभिजीत काही सामान आणायला म्हणून बाहेर जाणार होता..मग अनुही त्याच्यासोबत निघाली..घरातून बाहेर पडतानाच अनुला आईचा फोन आला..बोलत बोलतच ती चालू लागली..अभिजित गाडी स्टार्ट करावी म्हणून अभिजित गेटमधून बाहेर पडला आणि त्याची पावलं तिथेच थांबली.. समोर प्रिया उभी होती..थोडा वेळ कुणीच काहीच एकमेकांशी बोललं नाही.. अभिजीत गंभीर झाला होता.. जवळजवळ वर्षभराने भेटत होते ते..
“ हाय अभिजित!! खूप दिवसांनी भेटतोय आपण..नाही???” प्रिया थोडं हसून म्हणाली..अभिजित काहीच बोलला नाही..
“ कसा आहेस??” अभिजित गप्प राहिलेला पाहून प्रियानेच विचारलं.. अभिजीतला काहीही बोलायची इच्छा नव्हती.. पण प्रियाच्या अचानक समोर येण्याने तो दुखावला होता..दोघांमध्ये पुन्हा शांतता पसरली…अनुने आईशी बोलून फोन ठेवला आणि ती गेटमधून बाहेर पडणार तोच तीचं प्रियाकडे लक्ष गेलं..अनु दोघांकडेही आळीपाळीने पहात होती..त्यांच्याकडे पाहून अनुला अभिजीतचं बोलणं आठवलं..
“ जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याशी असं वागते,त्यावेळी आपल्याला वाटत राहतं.. आपलं काही चुकलं का?? मी बोरिंग आहे का?? की मी असं काही बोललो ज्याने समोरचा असं वागला!! हे सगळं खोटं असतं..चूक आपली नसते!! चूक समोरच्याने केलेली असते आपला विश्वासघात करून!!” अनुच्या चटकन लक्षात आलं की अभिजीतचं हिच्यावर प्रेम होतं..आणि काही कारणाने त्यांचं ब्रेकअप झालं..अभिजित आणि प्रिया यांचं लक्ष नाही हे पाहून अनु त्या दोघांच्या बाजूबाजूने चालत गेली आणि कम्पाउंडच्या भिंतीआड लपुन त्यांचं बोलणं ऐकू लागली..
“ मला विचारणार नाहीस मी का आलेय ते??” प्रियाने न राहवून अभिला विचारलं..
“ नाही..कारण मला जाणून घ्यायची इच्छा नाहीये..” अभिजित तिच्याकडे लक्षही न देता म्हणाला..प्रियाचा चेहरा उतरला..पण तरीही ती पुढे म्हणाली,
“ तुला माझ्यावर ओरडायचंय का?? ओरड..रागवायचंय का?? रागव.. मी सगळं ऐकून घ्यायला तयार आहे!!”
“ मी तुझ्यावर ओरडण्याचं किंवा रागवण्याचं काहीच कारण नाही..आणि मला ते करायचंही नाहीये.. इथे का आलीयस ते सांग पटकन मला बाहेर जायचंय.. अभिजित शांतपणे म्हणाला..
“ पूर्वी आपल्याला भेटायला कधी कारण लागायचं नाही!!” प्रिया म्हणाली..
“ मला भूतकाळाबद्दल बोलण्यात इंटरेस्ट नाहीये..” अभिजितचं कोरडं उत्तर.. आता प्रियाचा चेहरा उतरला…
“ मी तुझं अभिनंदन करायला आलेय..तू तुझी स्वतःची फर्म सुरू केलीस म्हणून..पण तू तर आता नीट बोलतही नाहीयेस..” प्रिया उदास होऊन म्हणाली..
“ आपल्यात अजूनही काही बोलण्यासारखं आहे, असं वाटतं तुला प्रिया??” आता अभिजितचे डोळे पाणावले..आणि पुढे काहीही न बोलता तो निघून जाऊ लागला..तोच प्रियाने त्याचा हात धरला..
“ असं नको करू अभि!!”
“ तू आणि मी, पूर्वीचं सगळं इतक्या सहज विसरून जाऊ शकत नाही!!” प्रिया काकुळतीने म्हणाली..
“ गैरसमज आहे हा तुझा!! माझ्यासाठी तू कुणीही नाहीयेस…” अभिजित ठामपणे म्हणाला…इकडे अनु विचार करत होती..
“ मी काय करू आता?? काही बोलू की नको??” अनु गोंधळली होती..
“ माझ्याशी असं वागल्याचा नंतर तुला नक्की पश्चात्ताप होईल अभिजित!!” आता प्रियाचा थोडा आवाज वाढला होता..
“ प्रिया!! तू….” आता अभिजितनेही आवाज चढवला आणि तो तिला सुनवणार एवढ्यात,
“ अभि!!!” अशी लाडाने हाक मारत अनु त्यांच्याकडेच येऊ लागली…अभिजित आणि प्रिया दोघ तिच्याकडे पाहू लागले..
“ मी किती वेळ तुझी वाट बघतेय बाहेर!! तू आलाच नाहीस!! चल ना!!” अनु अभिजीतजवळ येत लाडातच त्याला म्हणाली..
“ तू??” प्रियाने प्रश्नार्थक नजरेने अनुला विचारलं..
“ मी.. अभिची गर्लफ्रेंड…” अनु लाजतच म्हणाली..
“ तू अभिजितची गर्लफ्रेंड आहेस??” प्रियाने अविश्वासाने विचारलं..अनुने हसतच होकारार्थी मान डोलावली..
“ अनघा, तुझं काय चाललंय.?” अभिजितने खुसफूसतच अनुला विचारलं..त्यावर अनुने उत्तर म्हणून फक्त डोळे मिचकावले..
“ अभि!!! चल ना निघुया!! मी बोअर होतेय थांबून…” अनु गोड आवाजात म्हणाली… तिचा अवतार बघून अभिजितने सुस्कारा सोडला.. आणि प्रियाकडे पाहून तो म्हणाला,
“ मला वाटतं तू आता निघालीस तरी चालेल..मला बाहेर जायचंय..”
“ ही खरंच तुझी गर्लफ्रेंड आहे?? अभिजित??” प्रियाने उदास होऊन विचारलं..
“ That’s none of your business!!!” अभिजित प्रियाला गप्प करत म्हणाला.. तोच अनुने त्याच्या हातात हात अडकवला..
“ चल!! आपण आधी शॉपिंगला जाऊ मग कँडल लाईट डिनरला.. मस्त एन्जॉय करूया..” अनु थांबतच नव्हती.. अभिजितने एकदा प्रियाकडे पाहिलं आणि तो निघाला.. आणि प्रिया त्या दोघांना जाताना पहात राहिली..
ते दोघं गाडीपर्यंत आले..अभिजित दरवाजा उघडणार तोच त्याचं लक्ष अनुने अडकवलेल्या हाताकडे गेलं..अनुने झटकन हात सोडून दिला..
“ अनघा.. बरी आहेस ना तू?? काय विचार करतेयस? माझ्या हातात हात काय अडकवलास!!! गर्लफ्रेंडसारखं काय वागतेयस!! आणि काय ते?? आधी शॉपिंग मग कँडल लाईट डिनर!! जाऊदे तुझ्याशी काही बोलण्यातच अर्थ नाही..” अभिजित वैतागुन म्हणाला आणि ड्राईव्हिंग सीटवर बसला.. “ थांबा सर!!” असं म्हणून अनु धावत जाऊन त्याच्या शेजारच्या सीटवर जाऊन बसली…
“ पण मी तुम्ही केलेल्या उपकाराचीच परतफेड करत होते..” अनु अभिजितला समजावत म्हणाली…
“ काय??” अभिजितने न कळून विचारलं..
“ तुम्ही अगदी असंच केलं होतं!! जेव्हा मी अशा सिच्युएशनमध्ये होते..” अनु म्हणाली..
“ मी??” अभिजितने विचारलं..अनुने मान डोलावली.. “ मी कधी?”
असं म्हणत अभिजीतला आठवलं..
“ अनु, तू मंद आहेस.. पण तुझ्यासोबत राहणं हाच माझा छंद आहे..” कसाबसा हसरा चेहरा ठेवत अभिजित अनुसाठी,शुभम आणि मोनिकासमोर तसं बोलला होता…
“ त्यावेळी तुम्ही माझी इमेज सांभाळण्यासाठी तसे वागलात!! तुम्ही केलेली मदत मी कशी विसरेन??” अनु म्हणाली..
“ काहीही गरज नाहीये लक्षात ठेवायची!! विसरून जा ते..” अभिजित शांतपणे म्हणाला..
“ का?? माझी तुमच्यासोबतची आठवण आहे ती!!” अनु आश्चर्याने म्हणाली..
“ मला तुझ्या आठवणीत राहायची अजिबात हौस नाहीये!!! आणि आत्ता जे केलंस तसं परत करू नको!!आणि माझी मदत तर अजिबात करू नकोस!!” अभिजितने सांगून टाकलं..
“ का नको??” अनुने हिरमुसून विचारलं..
“ कारण मला भीती आहे की, तू जर असच करत राहिलीस तर एक दिवस असं म्हणशील की…”
“ मी तुमची बायको आहे??” त्याचं बोलणं ओळखून अनुने विचारलं..
“ हो..” अभिजित घसा खाकरून म्हणाला..
“ तुमची मदत करण्यासाठी मी असंही म्हणू शकते की मी तुमच्या मुलांची आई आहे!!” अनु हसत अभिजीतला चिडवत म्हणाली..
“ तू म्हण असं… मग मी बघतोच तुला!!” हुप्प होऊन अभिजित म्हणाला आणि त्याने गाडी स्टार्ट केली…
अनु आणि अभिजित घरी आले तेव्हा साडेसात वाजून गेलेले…अभिजित पूर्ण वेळ गप्प गप्पच होता.. आल्यावर तो थेट वर त्याच्या बेडरूममध्ये गेला..आणि अनुही खालीच तिच्या रूममध्ये, गेस्टरूममध्ये फ्रेश व्हायला निघून गेली…थोड्या वेळाने अनु तिचं आवरून बाहेर आली..आज संध्याकाळचा प्रसंग आठवून अनु विचारात पडली…
अभिजीतही आवरून आरामखुर्चीत येऊन बसला आणि तोही प्रियाचाच विचार करत होता..त्याला आठवलं…अभिजित तसा लाजरा होता..आणि मुलींशी बोलायला तर खासच…अभ्यास, पुस्तकं हेच विश्व होतं अभिजीतचं आणि अगदी त्याउलट प्रिया.. खूप बडबडी आणि बिनधास्त..कुणी अभिजीतला त्रास दिला तर ती जोरजोरात भांडायची त्याच्याशी अभिजीतच्या बाजुने…प्रियानेच अभिजीतला प्रपोज केलं होतं…दोघांचंही मस्त सुरू होतं...पण अचानक घडलेल्या एका घटनेमुळे दोघ वेगळे झाले ते कायमचेच.. त्यानंतर अभिजितने सगळं लक्ष स्वतःच्या कामावर केंद्रित केलं..तिच्याकडे मागे वळूनही पाहिलं नाही.. आज इतक्या दिवसांनी ती त्याच्या समोर आली होती…आणि मनाच्या तळाशी बसलेल्या आठवणी वर येऊन मन पुन्हा गढूळ झालं..
बराच वेळ झाला तरी वरून काहीच आवाज आला नाही म्हणून अनु वर गेली..अभिजित छताकडे डोळे लावून शांतपणे खुर्चीत विचार करत बसला होता…त्याचे डोळे पाणावलेले दिसत होते..अनु भिंतीआडूनच त्याला पहात होती..त्याला असं उदास पाहून तीही उदास झाली होती…तोच अभिजीतचं तिच्याकडे लक्ष गेलं..अनुच्या ते लक्षात आलं आणि तिने भिंतीआड लपून तीचं डोकं भिंतीवर आपटलं..आणि शांतपणे तिथून निघून जाऊ लागली..तोच अभिजित उठून तिथे आला..
“ काही हवंय का??” अभिजितने विचारलं..
“ हा??” अनुला काय बोलावं ते सुचेना..
“ भूक लागलीय का?? काही खायला करू का??” त्याने शांतपणे विचारलं..
“ हम्म..” अनु काही न सुचून म्हणाली…ते ऐकून अभिजित तिथून खाली आला आणि किचनमध्ये शिरला..त्याने वरण भाताचा कुकर लावला..अनु दोघांची पानं घेत होती.. आमटी ढवळता ढवळता अभिजित म्हणाला..
“ पण मला एक कळत नाहीये..”
“ काय??” अनुने विचारलं..
“ मी हे का करतोय??”
“ म्हणजे??” अनुने न कळून विचारलं..
“ म्हणजे मी का रोज उठून तुला जेवण करून वाढतोय??” अभिजीतने कन्फ्युज होऊन विचारलं..
“ तुम्ही माझ्यापेक्षा जास्त छान स्वयंपाक करता म्हणून…” अनु हसून म्हणाली…
जेवण झाल्यावर अनुने थोड्या वेळाने गरमागरम कॉफी केली..आणि दोघही डायनिंग टेबलवर समोरासमोर बसून कॉफी पिऊ लागले…पण अनुच्या डोक्यातून अजूनही प्रियाचा विषय जात नव्हता…ती अभिजीतकडेच एकटक पहात होती….अभिजितने तिच्याकडे पाहिलं आणि त्याला तिची नजर पाहून तिच्या मनात काय चाललंय हे लक्षात आलं..
“ नको विचारू तू मला काही..” अभिजित कॉफीचा घोट घेत म्हणाला..
“ पण मी काहीच विचारलं नाही!!” अनु गोंधळून म्हणाली..
“ तुझ्या नजरेत खूप प्रश्न दिसतायत मला..” अभिजित शांतपणे म्हणाला.. आता अनुने कॉफीचा कप खाली ठेवला…
“ मग मी आता तुम्हाला सरळ प्रश्नच विचारते… का? का वेगळे झालात तुम्ही??” अनुने उत्सुकतेने पण तितक्याच शांतपणे विचारलं.. अभिजीतने कॉफी संपवून कप टेबलवर ठेवला..
“ एक दिवस मी प्रियाकडे, तिच्या घरी तिला सरप्राईज दयायला गेलेलो.. आणि तिथे मी तिला दुसऱ्या व्यक्तीसोबत पाहिलं..त्या दिवशी प्रियाने मलाच सरप्राईज दिलं.. That’s all…” अभिजित कसंनुसं हसला..
“ वाटलंच होतं मला!!! रिलेशनशीपमध्ये असतानाही ही लोकं असं वागतात ना!!! अशा लोकांना ना चाबकाने फोडून काढावसं वाटतं मला!! उकळत्या तेलात तळून काढावसं वाटतं!!” अभिजित तिच्याकडे पहातच राहिला..
“उलटं टांगून मिरच्यांची धुरी द्यायची मस्त!!!आणि अंगावर खाजकुईलीची पावडर टाकायची!!! मग बसतील अंग खाजवत!! कोण समजतात कोण हे लोकं स्वतःला?!!” अनु तावातावात बोलत सुटली होती.. तिचं बोलणं संपल्यावर तिने अभिजीतकडे पाहिलं..त्याला तिचा आवेश पाहून हसू आलं..
“ तुम्हांला जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही माझं नाव वापरू शकता सर..तुमच्यासाठी माझ्याकडून या नाटकाच्या प्रयोगाचा अनलिमिटेड पास!! फ्रीमध्ये!!” अनुने जाहीर केलं…
दुसऱ्या दिवशी बर्व्यांनी सकाळी सकाळीच झेंडे आणि पुष्करला एकत्रच अभिजीतकडे जाऊ असा मेसेज टाकला..पण पुष्करने तो येणार नसल्याचं सांगून टाकलं.. त्याला कालचा प्रसंग आठवला…
कुणाचं लक्ष नाही हे पाहून अभिजितने पुष्करला त्याच्या रूममध्ये यायची खूण केली…ते पाहून पुष्कर तिकडे गेला.. अभिजीत डायरेक्ट मुद्द्यावरच आला..
“ बाकी सगळेजण तिथे होते म्हणून मी काही बोललो नाही..पण तुला उद्यापासून इथे यायची काहीच गरज नाही..” अभिजित गंभीरपणे म्हणाला..
“ आपण बोलू शकतो??” पुष्करने विचारलं..
“ नाही!! बाजूला हो मला कामं आहेत..” अभिजित तिथून निघणार एवढ्यात पुष्कर म्हणाला,
“ मला माझी बाजू तरी मांडुदे!!” पुष्करने विनंती केली.. “ खूप उशीर झालाय आता..” अभिजित थंडपणे म्हणाला आणि तिथून निघू लागला… एवढ्यात पुष्करने त्याचा हात पकडून त्याला अडवलं..
“ माझं म्हणणं तरी ऐकून घे!!” पुष्कर कळकळीने म्हणाला..आता मात्र अभिजित थांबला..
“ मला तुला हेच सांगायचंय की,मला ती आधी आवडली होती…पण मी प्रियाला प्रपोज करणार त्याआधी तिनेच तुला विचारलं… आणि मी पूर्ण माघार घेतली..”
“ तुमच्या दोघांच्या मध्ये येणार नाही याची पूर्ण काळजी घेत होतो मी.. तिला विसरण्याचा खूप प्रयत्न केला मी..आणि मला वाटलं की मला जमेल ते…पण नाही जमलं…ज्या दिवशी तू आम्हाला तिथे पाहिलंस त्या दिवसापासून मनावर ओझं घेऊन जगतोय मी.. मला माहितेय मला तुझी माफी मागण्याचाही अधिकार नाही!!! पण तरीही जमलं तर प्लिज…” पुष्कर पुढचं बोलूच शकला नाही.. त्याचा गळा दाटून आला होता…अभिजीने करारी चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिलं..
“ मी आयुष्यात तुला कधी माफ करू शकणार नाही!!” पाणारलेल्या डोळ्यांनी अभिजित एवढंच म्हणाला आणि तिथून बाहेर पडला…
पुष्करने बर्व्यांना सांगितलं की अभिजित त्याला फर्म जॉईन करू देणार नाही तेव्हा त्यांनी जबरदस्तीने पुष्करला यायला सांगितलं..
9.30 वाजता ते तिघेही अभिजीतकडे पोचले..
“ हे बघ तू पुष्करला फर्ममध्ये घेतलंच पाहिजे!! नाहीतर मी इथेच ठाण मांडून बसेन !!” बर्व्यांनी अभिजीतला धमकी दिली..
“ तुम्हाला काय करायचं ते करा!!” वैतागुन अभिजित तिथून वर आपल्या रूम मध्ये निघून गेला..
अभिजित विचार करत होता..जेव्हा अभिजीतचे आई बाबा वारले तेव्हा पुष्करने त्याला खूप सांभाळून घेतलं होतं..प्रत्येक वेळी त्याने अभिजितची साथ दिली होती.. अभिजित मनातली प्रत्येक गोष्ट त्याच्याशी शेअर करायचा..त्याने कधी अभिजीतला एकटेपणा जाणवू नाही दिला....आणि त्यामुळेच अभिजित पुष्करला पूर्णपणे स्वतःपासून तोडू शकत नव्हता..कारण कितीही झालं तरी तो बालपणीपासूनचा त्याचा एकुलता एक बेस्ट फ्रेंड होता…अभिजीतने सुस्कारा सोडला आणि तो खाली जायला निघाला…
अभिजितने स्टडी रूम मध्ये मिटिंग ठेवली होती..बरोबर 10 वाजता सगळे तिथे हजर झाले..
“गुड मॉर्निंग!! आजचा ऑफिसचा पहिलाच दिवस आणि पहिलीच मिटिंग!! अभिजित येऊन समोरच्या खुर्चीत बसला..अभिजित बोलायला सुरुवात करणार तोच..
“ तू कधी काढून टाकणारेस हिला??” बर्व्यांनी अनुकडे बोट दाखवत अभिजीतला विचारलं..अभिजीतने तिरकी मान करून बर्व्यांकडे पाहिलं..
“ हम्म…झाली याची सुरवात बोलायला!!” अनु मनातल्या मनात चरफडली..
“ मी काही मुद्दे मांडू का??” झेंडेंनी विचारलं..
“ हम्म..” अभिजित एवढंच म्हणाला..
“आपल्याला अजून दोन तरी लोकांची गरज आहे..क्लार्क आणि सेक्रेटरी..म्हणजे..” तोच झेंडेना तोडत बर्वे म्हणाले..
“ ही आहे की सेक्रेटरी!!”
“ हाहा!! मी lawyer आहे प्रॉपर डिग्री घेतलेली!!” अनु खोटं हसून म्हणाली..
“ मग काय झालं??तसही तुझ्यामुळे फर्मचं नुकसानच होणारे..मिस नो एविडन्स!!!.” बर्वे भोचकपणे म्हणाले.. अनु काही न बोलता गप्प बसली..अभिजित आता पकला होता..
“हाहा!! काय हो सर तुम्ही तिच्यावरच घसरता नेहमी!!! तुम्ही का काळजी करता?? मी आहे ना फर्मचं प्रॉफिट करून द्यायला!!” पुष्कर म्हणाला..
“ हो तर!! तू आहेस म्हणून नाहीतर कठीणच होतं सगळं..” बर्वे पुष्करला म्हणाले..
“ म्हणूनच तर आपल्याला फर्मच्या नावात माझं नाव ऍड केलं पाहिजे!!! काळे & कुलकर्णी!!” यावर अभिजीतने पुष्करकडे एक लूक टाकला..
“ कुलकर्णी & काळे??” अभिजीतचा चेहरा पाहून पुष्करने वेगळा ऑपशन दिला..
“ तू मला कसं विसरलास?? मी या फर्म मध्ये इन्व्हेस्ट केलंय..” बर्वे पुष्करला म्हणाले..
“ ठीक आहे मग नाव होईल ‘कुलकर्णी, काळे & बर्वे..” पुष्करने नाव ऍड केलं.. अभिजीतचा संयम आता संपत चालला होता..पहिल्याच दिवशी मिटिंग सोडून भलतंच बोलत होते सगळे..
“ जर नावच टाकायचं असेल तर माझं पण!!” अनुने हात वर केला..
“ कुलकर्णी, काळे,बर्वे,भावे & झेंडे…मी माझं पण नाव ऍड केलं..” झेंडे शांतपणे म्हणाले..
“ स्टॉप इट!!! गप्प बसा सगळे नाहीतर…!!” अभिजित जोरात टेबलावर हात आपटत ओरडला.. त्याच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला होता.. “कामाकडे लक्ष द्या!!!” अभिजित किंचाळला… त्याच्या या अवताराला सगळेच घाबरले आणि गप्प बसून राहिले..त्यानंतर मिटिंग अगदी शांततेत आणि व्यवस्थित पार पडली.. आणि सगळेजण कामाला लागले…
“ उद्या तू सकाळीच पोलिस स्टेशनला जाऊन ‘ मंदार जाधवला’ भेट आणि केस स्टडी कर..तो खरंच दोषी आहे की निर्दोष आहे याची शहानिशा करायला हवी आपल्याला..” अभिजित अनघाला म्हणाला..
“ उद्या जाऊन ये,मग तूला जी इन्फॉर्मेशन मिळेल त्यावरून आपण काय ते ठरवूच!!” त्याने सांगून टाकलं..
दुपारून अभिजीत चहा घेत होता तेव्हा त्याचं अनघा आणि पुष्करकडे लक्ष गेलं.. दोघ बाहेर लॉनवर काहीतरी बोलत बसले होते..आणि हसत होते…काहीतरी कामासाठी पुष्कर अनघाशी बोलायला गेला..अनु त्याच्याशी बोललीही पण पुष्करला ते नेहमीसारखं नाही वाटलं..
“ तुला माहितेय का अभिजित आणि माझ्यात काय झालंय ते??” पुष्करने थेट विचारलं..अनुने चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि तिला कालचं बोलणं आठवलं..
“ कोण होता तो??” अनुने विचारलं होतं..
“ माझा मित्र..” अभिजित शांतपणे म्हणाला…
“ तुझा चेहरा सहज वाचता येतो अनघा..” पुष्कर म्हणाला..अनु काहीच म्हणाली नाही..
“ तुला माझा खूप राग आला असेल ना?? वाटलं असेल किती वाईट माणूस आहे हा!! पण तेव्हढाही वाईट नाहीये मी..” पुष्कर म्हणाला..
“ तुमच्यावर रागावणारी मी कोण?? तसही तुमच्यासारखी लोकं पहिली की तळपायाची आग मस्तकात जाते माझी..पण कितीही झालं तरी मी जेव्हा संकटात होते तेव्हा तुम्हीच माझी केस घेतली होती हे मी विसरू नाही शकणार..” अनु शांतपणे म्हणाली..
“ थँक्स टू यु!! तुझ्यामुळे अभिजित बोलला तरी माझ्याशी आणि मला ही केस हॅन्डल करायला सांगितली..” पुष्कर म्हणाला..
“ म्हणजे तुम्ही बोलावं यासाठी मला जेलमध्ये जावं लागलं!!” अनु हसून म्हणाली.. यावर पुष्करही हसला..
“ तुला आवडतो ना अभिजित??” पुष्करने अनुचा अंदाज घेत विचारलं..अनुने त्याच्याकडे एकवार पाहिलं आणि म्हणाली,
“ हम्म..आहेतच ते तसे!!” अनु हसून म्हणाली..
“नक्कीच!!” पुष्करही हसून म्हणाला..
“ माझ्या मनात त्याच्याबद्दल खूप आदर आहे..पण मी त्यांना विसरायचं ठरवलंय..मला असं वाटतंय की मी जवळपास 90% फिलिंग्स कंट्रोल केल्या आहेत..त्यामुळे लवकरच मी त्यांना पूर्णपणे विसरून जाईन..” अनु कसंनुसं हसत म्हणाली..
अभिजित काय पाहतोय हे बघत झेंडे त्याच्याजवळ पोचले आणि त्यांचंही पुष्कर आणि अनुकडे लक्ष गेलं..ते हसले आणि म्हणाले,
“ वा!! दोघांची मैत्री झालेली दिसते!!”
“ शक्यच नाही…” अभिजित ठामपणे म्हणाला..
“ का?? तू जेलस झालायस का??” झेंडे अभिजीतला चिडवत म्हणाले..
“ काहीपण!! मी कशाला जेलस होऊ!! मला फक्त एवढंच म्हणायचंय की अनघा पुष्करला चांगलीच ओळखते त्यामुळे तुम्हाला वाटतंय तसं काही होणार नाही..” अभिजित खात्रीने म्हणाला..
“ पण मला सांगा, तुमच्यात आणि अनघात नक्की काही नाहीये का??” झेंडे बोलायचं थांबतच नव्हते..आता अनु अभिजीतकडे राहते ही गोष्ट सगळ्यांना कळली होती..म्हणून झेंडे आणखी चिडवत होते..
अभिजितने असं काही झेंडेंकडे पाहिलं..ते पाहून झेंडेनी तिथून पळ काढला..आतापर्यंत पुष्करला कळलं होतं की अभिजित आपल्याकडेच बघतोय म्हणून त्याने अनुसोबत मुद्दाम आणखीनच हसत खिदळत बोलायला सुरुवात केली… आता अभिजित मोठमोठी पावलं टाकत बाहेर पोचला..पुष्कर आणि अनु अजूनही बोलत होते..त्याने झाडांना पाणी घालण्याची नळी हातात घेतली..नळ सुरू केला आणि जोरात त्याचा फवारा पुष्करवर उडवला..अचानक अंगावर पाणी पडलेलं पाहून पुष्कर धडपडत उठला..अनुही तिथून उठली आणि तिने मागे वळून बघितलं..अभिजित मक्ख चेहऱ्याने पुष्करवर पाणी उडवत होता..
“ अभिजित भिजतोय मी!!” पुष्कर कसंबसं म्हणून स्वतःला वाचवत इकडे तिकडे पळत होता..
“ मी आत जाते..” अभिजीतचा अवतार बघून अनु आत पळाली.. ती आत गेल्यावर अभिजितने नळ बंद केला आणि काहीच झालं नाही या आविर्भावात सावकाश आत गेला..पुष्कर मात्र जे झालं त्याने खुश झाला आणि काम करायला आत शिरला..
इकडे तो तरुण न्युज चॅनेल बघत होता… “ सुप्रसिद्ध शेफ जितेंद्र शहा यांच्या घरात चोरी करून त्यांचा खून केल्याचा आरोप आरोपी मंदार जाधवने फेटाळून लावलाय…मिसेस शहा यांनी त्याच्याविरुद्ध खून आणि चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.. आरोपीने पोलिसांकडे वकिलाची मागणी केली असून पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत..” हे ऐकून तो स्वतःशीच हसला..काय झालं असेल याची त्याला कल्पना आली…
मिसेस शहा जेव्हा घरी पोचल्या तेव्हा त्यांना त्यांचे मिस्टर जितेंद्र शहा रक्ताच्या थारोळ्यात बेडरूममध्ये पडलेले आढळले…त्यांना या अवस्थेत पाहून त्या जोरात किंचाळल्या…आणि त्यांनी पोलिसांना फोन करण्यासाठी मोबाइल हातात घेतला तोच त्यांचं लक्ष मिस्टर शहांच्या भिंतीवरच्या मोठ्या फोटोफ्रेमकडे गेलं…त्यावर त्यांच्याच रक्ताने लिहिलं होतं..
“ जो माणूस वासनेच्या भरात एका निरपराध मुलीवर बलात्कार करतो, त्याला जिवंत राहण्याचा काहीएक अधिकार नसतो!!!”
मिसेस शहांनी ती फ्रेम कशीबशी खाली काढली…आणि घाईघाईत त्यावरचा मजकूर पुसू लागल्या…
“ हा सूड वाटता कामा नये!!! चोरी!!! हा हेच बरोबर वाटेल…खून करून चोराने चोरी केली….” मिसेस शहा घाबरून स्वतःशीच म्हणाल्या…
“ घरातल्या सगळ्या महागड्या वस्तू गायब झाल्या पाहिजेत!!! माझे दागिने…हा!! तेच आधी गायब केले पाहिजेत म्हणजे या खुनामागे चोरी हाच उद्देश होता हे स्पष्ट होईल!!!” मिसेस शहांनी प्लॅन केला होता..
आणि त्यानंतर ह्या केसला वेगळंच वळण लागलं होतं…
दुसऱ्या दिवशी सगळेच कामात व्यस्त होते..तोच अनुला एक कॉल आला…पोलिसांनी अनुला कॉन्टॅक्ट केला होता..मंदार जाधवने इनसिस्ट केलं की मला मिस अनघा भावेंशी बोलायचं आहे..आणि माझी केस त्यांनीच लढावी… कॉल कट केल्यावर अनु उठली आणि अभिजीतच्या टेबलसमोर आली.. त्या दोघांची टेबल्स समोरासमोरच होती..
“?????” अभिजितने प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे पाहिलं..
“ मी मंदार जाधवला भेटायला पोलिस स्टेशनला जातेय…तर मी एकटीच जाऊ??” अनुने अभिजीतचा अंदाज घेत विचारलं.. आणि तिला काय म्हणायचंय हे अभिजीतला लगेच लक्षात आलं..
“ तुला माहितेय मी बर्व्यांची फर्म सोडून माझं स्वतःचं ऑफिस का सुरू केलं??” अभिजीतने विचारलं..
“ का??” अनुने विचारलं..
“ कारण बाकीची कामं स्टाफवर सोपवून मला आरामात खुर्चीत बसून शांतपणे काम करता यावं..” अभिजित म्हणाला…
“ बॉसचं हे कामच असतं की त्याने बाकीच्या स्टाफला ऑर्डर्स द्यायच्या असतात आणि स्वतः आरामात बसून observe करायचं असतं!!” अभिजित भोचकपणे अनुला ऐकवत म्हणाला..अनु शांतपणे ऐकत होती…
“ मी जातो अनघासोबत!!” उत्साहाने हात वर करून पुष्कर म्हणाला..अभिजितने त्याच्याकडे पाहिलं….
आणि थोड्याच वेळानंतर अनघा आणि अभिजित कारमधून पोलीस स्टेशनला निघाले होते…अभिजित ड्राईव्ह करत होता आणि त्याच्याकडे पाहून अनु गालातल्या गालात हसत होती..
पोलीस स्टेशनमध्ये प्रिया मंदारच्या समोर बसली होती…
“ तुम्हाला तुमच्यावरचा एकही आरोप मान्य नाहीये तर!!” हातातले पेपर्स चाळत प्रिया म्हणाली..
“ एक साक्षीदार मिळालाय मला ,ज्याने तुम्हाला खून झाला त्याच दिवशी मिस्टर शहांच्या घराबाहेर पडताना बघितलंय..तुम्ही नेहमीच त्या एरियात कुरियर डिलिव्हर करत असल्यामुळे, मिस्टर शहांच्या शेजाऱ्यांनी तुम्हाला ओळखलं..” प्रिया म्हणाली..
“ फक्त एवढंच नाही!! तर घटनास्थळी मिळालेले पुरावे आणि DNA हे सगळंच तुमच्या विरुद्ध आहे…तरीही तुम्ही हेच म्हणाल?? की तुम्ही निर्दोष आहात??” प्रिया मंदारला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होती…
“ मला माहितेय.. मी जरी काहीही बोललो तरी तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाही मॅडम…” मंदार हताशपणे म्हणाला..
“ पण तूम्ही मला convince करायचा प्रयत्नही करत नाहियात..माझा अजिबात विश्वास नाहीये तुमच्यावर आणि तुम्हाला जास्तीत जास्त शिक्षा कशी मिळेल यासाठीच प्रयत्न करेन मी!!” प्रिया ठामपणे म्हणाली..
“ पण मला खात्री आहे मॅडम, की कुणीतरी माझं ऐकेल आणि माझ्यावर विश्वासही ठेवेल…” मंदार एवढंच म्हणाला…
मंदारशी बोलून झाल्यावर जेव्हा प्रिया निघाली तोपर्यंत अनु आणि अभिजीत पोलीस स्टेशनला पोचले होते…पण जवळपास पार्किंगला जागा नसल्याने अभिजीतने लांबच गाडी पार्क केली आणि दोघेही पोलिस स्टेशनकडे निघाले… वाटेत अभिजीतला त्याच्या ओळखीचं कुणीतरी भेटलं म्हणून तो तिथेच बोलत थांबला आणि अनु पुढे निघाली…ती गेटमधून आत शिरणार तोच तिला समोरून प्रिया येताना दिसली… प्रियाचंही तिच्याकडे लक्ष गेलं आणि दोघी एकमेकींसमोर उभ्या राहिल्या…
“ तू?? तू इथे काय करतेयस??” प्रियाने आश्चर्याने विचारलं..
“ खरं तर मी कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी बोलत नाही पण आपण एकदा भेटलोय म्हणून सांगतेय..मी lawyer आहे..” अनु म्हणाली…प्रियाने तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळलं…
“ खरंच तू अभिजितची गर्लफ्रेंड आहेस??” प्रिया कपाळावर आठ्या आणत म्हणाली..
“ हो!!! आम्ही रिलेशनशीपमधे आहोत…” प्रियाची नजर चुकवत अनु म्हणाली… प्रियाने तीक्ष्ण नजरेने तिच्याकडे पाहिलं आणि हसली..
“ खोटं!!! साफ खोटं बोलतेयस तू…वाटलंच होतं मला..” प्रिया आनंदी होऊन म्हणाली..
“ मी खरंच सांगतेय!!” अनुने तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा नजर फिरवली…
“ मला वाटलंच होतं..मला सोडून अभिजित तुझ्याकडे….शक्यच नाही!!” प्रिया कुत्सितपणे म्हणाली..
“ पण मी सोडलंय तुला…” दोघींनीही वळून पाहिलं…तो अभिजित होता… तो त्यांच्याकडेच आला..
“ आणि आता अनुच माझ्यासोबत असणारे कायम!!” अनुच्या खांद्यावर हात टाकून तिला जवळ ओढत अभिजित म्हणाला…हे ऐकून अनुने श्वास रोखून धरला…
“ निघायचं??” अभिजीतने अनुला विचारलं…आणि तो तिला घेऊन पुढे चालू लागला..प्रिया दुखावली गेली आणि ती तशीच गेटबाहेर पडली..अभिजित अनघा पायरीपर्यंत पोचले तोच अभिजीतचं अनुकडे लक्ष गेलं..
“ अनघा?? तुझा चेहरा का असा दिसतोय?? आर यु ऑलराईट??” अभिजीतने काळजीने विचारलं.. तोच अनुच्या लक्षात आलं की आपण श्वास रोखून धरलाय..जोरात धाप टाकत अनुने श्वास सोडला..
“ मी ठीक आहे..पण तुम्हाला काय झालं?? परवा तुम्हीच मला ओरडलात की असं वागू नको म्हणून..मग आता काय झालं??” अनुने वैतागुन विचारलं..
“ मी माझ्याच एम्प्लॉयीला खोटं नाही ना पाडू शकत चारचौघात!!” अभिजित मी किती साधा असा आव आणत म्हणाला..
“ हो का!!” अनुने खोटं हसून विचारलं..
“ आपण असं म्हणूया की, तू जे पेरलंयस त्यालाच मी खतपाणी घातलं!!” अभिजित शांतपणे म्हणाला..
“ हम्म..चला आपल्याला उशीर होतोय..” अनु घड्याळात पाहून म्हणाली.
“ आपल्याला खूप आधीच उशीर झालाय!!” असं म्हणत अभिजित आणि त्याच्यासोबत अनघा पोलीस स्टेशनमध्ये शिरले…
अनुने मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू केलं आणि मोबाईल टेबलवर ठेवून दिला..अभिजित त्याचे आधीचे रेकॉर्डस् चेक करत होता..आणि काही रिपोर्ट्स चाळत शेजारीच बसला होता..
“ या शहरात खूप वकील आहेत जे माझ्यापेक्षामोठे आहेत आसनी experienced आहेत..मग तरीही तुम्ही मला का निवडलं? तुम्हांला ऐकायचंय का, की मी खुनाच्या केसमधून कशी सुटले?? की तुम्हाला काही टिप्स हव्यात माझ्याकडून??” अनुने संशयाने बोलायला सुरवात केली.. हे ऐकून मंदार फिदीफिदी हसला..
“ हसायला काय झालं??” अनुने किंचित आवाज चढवून विचारलं.. हे ऐकून तो गंभीर झाला..
“ वेड लागायची पाळी आलीय माझ्यावर..” तो गंभीरपणे म्हणाला..
“ मी खून केला त्याचा….मीच चाकू खुपसून ठार केलं त्याला… हेच.. असंच ऐकायचंय ना तुम्हाला??” त्याने किंचित वैतागुन विचारलं..अभिजित त्याचं निरीक्षण करत होता..
“ खरंच कोणता दुसरा मार्ग नाहीये का!!! मला मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागणारे का!!” मंदार हताशपणे म्हणाला…
“ भावे मॅडम..आता तुम्ही दोघेच माझ्यासाठी आशेचा किरण आहात..” मंदार कापर्या आवाजात म्हणाला.. त्यावर अनुने त्याच्याकडे चमकून पाहिलं आणि तिला आठवलं..
“ तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना सर?? मला खात्री आहे की तुम्ही माझ्या बाजूने आहात!!! Now you are my only hope !!” अगदी असंच अनघा अभिजीतला म्हणाली होती जेव्हा ती अशा परिस्थितीत होती..
“ तुम्हाला तर माहितेय मी एक साधा डिलिव्हरी मॅन आहे… मला तर आठवतसुद्धा नाहीये की मी त्या घरात किती वेळा जाऊन आलोय…ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी मला कुणितरी पाहिलं म्हणे तिथे..इतक्या वेळा जाऊन आलोय म्हणूनच कदाचित त्यानी ओळखलं मला आणि माझं नाव सांगितलं..पोलीस म्हणतायत की हाच मोठा पुरावा आहे माझ्याविरोधी…म्हणूनच त्यांनी मला पकडलं आणि मी आत्ता तुमच्यासमोर लॉकअपमध्ये बसलोय…मला का पकडलं..का इथे आणलं तेच कळत नाहीये मला…” मंदार त्याची बाजू मांडू लागला..अभिजित प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐकत होता .
“ खरं सांगायचं झालं तर मी खूप घाबरलोय या परिस्थितीत… मी पूर्णपणे एकटा पडलोय इथे!! म्हणूनच मला वाटत होतं की कुणीतरी असावं, ज्याच्यावर मी depend राहू शकेन…” मंदार आता रडवेला झाला होता.. अनु आता त्याच्याकडे सहानुभूतीने पाहू लागली..मंदारमधे ती स्वतःला पहात होती..अभिजितचं तिच्याकडे लक्ष गेलं आणि तिच्या मनात काय चाललंय हे त्याने बरोबर ओळखलं..पण त्यावेळी तो काही बोलला नाही..अभिजित मात्र पूर्ण तटस्थपणे सगळ्या गोष्टी ऐकत होता…त्याने अजूनही मंदारबद्दल चांगलं किंवा वाईट मत करून घेतलं नव्हतं..
“ त्या दिवशी दुपारून मोकळा होतो..climate पण मस्त होतं त्यामुळे मी थोडा वेळ बागेत जाऊन बसलो..छोटी छोटी मुलं खेळत होती..तिथे फुगेवाला पण होता.. त्यानंतर मी रंपाट पिक्चरचं पोस्टर पाहिलं म्हणून थेटरला गेलो पण शो हाऊसफुल्ल होता..त्यामुळे मी तिथून बाहेर पडलो…” अनु काही पॉईंट्स नोट डाऊन करत होती.. अभिजित शांतपणे ऐकत होता…
“ अरे हो!! दुपारी मी जेवायच्या ऐवजी मस्तपैकी बाहेरच गाडीवर पावभाजी खाल्ली..पोट भरून…त्यांनंतर रात्री मी एका हॉटेलात गेलो..तिथे एक जोडपं बसलं होतं..त्याच्या बायकोचा बर्थडे होता आणि ते मस्त एन्जॉय करत होते…त्याने मोठा केक मागवला होता..” मंदार खुश होऊन सांगत होता..मधूनच अनु हसून त्याची गोष्ट ऐकत होती…
मंदार अनुचं निरीक्षण करत होता…तिला आपलं म्हणणं हळूहळू पटतंय, आपल्यावर तिचा विश्वास बसू लागलाय हे पाहून त्याचे डोळे चमकले..त्याच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव होते..पण तोच अभिजीतचं आपल्याकडे लक्ष आहे हे पाहून तो साधाभोळा चेहरा करून बसला..पण त्याच्या चेहऱ्यावर झालेला सूक्ष्म बदल अभिजितने टिपला होता..आणि आता अभिजित अधिक सावधपणे त्याचं म्हणणं ऐकू लागला…
क्रमशः
प्रियाची एन्ट्री आणि अभि
प्रियाची एन्ट्री आणि अभि-अनुचं प्रेम? काय मस्त ट्विस्ट आहे.
आता पुढचा भागसुद्धा लवकर टाका.
छान, पुभाप्र
छान, पुभाप्र
छान आहे कथा
छान आहे कथा
मस्त चाल्लीय.. येउद्या अजून..
मस्त चाल्लीय.. येउद्या अजून..
मस्त चाल्लीय.. येउ द्या अजून.
मस्त चाल्लीय.. येउ द्या अजून..
>>+1
Chan chalu aahe .. lvkr taka
Chan chalu aahe .. lvkr taka next part
मन्या
मन्या
VB
मनिम्याऊ
अनघा
प्रज्ञा
उर्मिला
सर्वांना खूप खूप धन्यवाद!! पुढचा भाग लवकरच टाकेन...
मस्त
मस्त
छानै हाही भाग
छानै हाही भाग
मस्त!
मस्त!
छान, पुभाप्र
छान, पुभाप्र
उनाडटप्पू
उनाडटप्पू
रागिणी
अथेना
निलिमा
खूप खूप धन्यवाद!!
वाचतेय.
वाचतेय.
भारी झालीये प्रियाची एन्ट्री
भारी झालीये प्रियाची एन्ट्री .. आता पुढे काय होणार ? वाट बघायला लावू नका ... पुढचे भाग लवकर टाका ..
अॅमी
अॅमी
Prakrut
प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!! काही कामानिमित्त बाहेरगावी आल्यामुळे पुढील भाग टाईप करायला वेळ नाही मिळाला.. उद्या घरी परत जाणार आहे..तेव्हा दोन दिवसात पुढील भाग टाकते...
Can you please post next
Can you please post next parts bit faster? Audience would love even if you make it a daily soap.
story chan aahe..........
story chan aahe...........next part plssssss