साहित्य:- माशांना( pomfret) मॅरिनेट करण्यासाठी.
माशाचे चार-पाच तुकडे करून स्वच्छ धुवून घ्यावेत. ४-५ कोकमाच्या तुकड्यांना भिजत घालून केलेला रस, मीठ अर्धा चमचा, पाव चमचा हळद, लाल तिखट अर्धा चमचा.
- माशांना कोकम, मीठ , तिखट, हळद लावुन १५ मिनिट फ्रिझ मध्ये ठेवा.
ओला मसाला-
साहित्य:- छोटा कांदा १, लसणीच्या ५-६ पाकळ्या, टोमॅटो १, दोन चमचे धने, अर्धा ओला नारळ खवून, अर्धी वाटी स्वच्छ धुवून कोथींबीर, आल्याचे छोल्या एवढे २ तुकडे,लाल तिखट अर्धा चमचा चविला+रंगाला, ओली हिरवी मिरची २ ,शंकासुरी मिरची २, बेडगी मिरची २ , मीठ अर्धा चमचा .
मसाल्यासाठी कृती- वरिल सर्व साहीत्य एकत्र करुन घ्यावा, मिक्सरच्या भांड्यात अगदी नावाला पाणी घालुन सगळा मसाला बारीक गंधा सारख वाटुन घ्यावा.
फोडणीसाठी –
तेल ४ चमचे, लाल तिखट अर्धा चमचा, लसणीच्या २ पाकळ्या, कढीपत्ता ४ पाने,२ त्रिफळे.
कृती- वरिल दिलेल्या साहीत्याच्या क्रमाने कढई मध्ये फोडणी करावी. आता या फोडणी मध्ये ओला मसाला घालुन चांगला परतावा , बर्यापैकी तेल सुटु लागल्या वर मॅरिनेट केलेले माशांचे तुकडे घालावे.
थोडे कोमट/ गरम पाणी घालुन मंद गॅसवर उकळी काढावी. उकळी मध्ये २ त्रिफळे टाका. थोडी कोथींबीर वरुन भुरभुरा. पावसाळ्या मध्ये झणझणीत मच्छी कढी तयार आहे.
टिप-
1) मॅरिनेट केल्याने- कोकम,मीठ,तिखट,हळद हे माशांमध्ये आत पर्यंत व्यवस्थित मुरते.
2) कोकमाच्या ऐवजी चिंच वापरु शकता.
3) ओला मसाला करताना पाणी जास्त वापरले तर तो फोडणी मध्ये टाकल्यावर वरती-वरती उडतो त्यामुळे पाणी थोडेच घालावे.
4) लाल तिखट फोडणी मध्ये टाकल्याने चांगला रंग येतो.
5) थोडे कोमट पाणी या साठी की थंड पाणी वरुन घातल्याने चव कमी होते (आईचा उपदेश).
6) पाणी स्वतःच्या अंदाजाने घाला किती पातळ किवा जाडसर रस्सा हवा आहे त्या नुसार,जाडसर रस्सा चवदार लागतो.
7) फोडणी जास्त उकळू नये नाहीतर माशांचा खिमा होइल.
8) त्रिफळे टाकल्या वरती मस्त चव येते, पण २ च त्रिफळे टाका, जास्त टाकल्याने थोडी तुरट चव येते.(माझा अनुभव- मागे एकदा अजुन छान चव येईल म्हणुन २-४ त्रिफळे जास्त घातली होती, आणि सगळा बेत बिघडला होता)
9) वरुन कोथींबीर ऐछीक, पाहीजे तेवढी घाला.
विशेष टिप
करी करण्यासाठी वेळ नसेल तर मॅरिनेट केलेल्या माशांना रवा लावून मस्त डिप फ्राय करून करमकुरम फस्त करायची.
Chan ahe receive ... Siddhi
Chan ahe receive ... Siddhi
Chan ahe recepe ... Siddhi as
Chan ahe recepe ... Siddhi as mhanaych hot.. typing mistake
Urmila दीदी धन्यवाद....
Urmila दीदी धन्यवाद....
आपल्या भावना पोहोचल्या माझ्या पर्यन्त. Smiley
बरे झाले जेवण झाल्यावर धागा
बरे झाले जेवण झाल्यावर धागा पाहिला. मस्तच दिसतेय. फोटो सुरेख आहेत. शेवटचा तर कातिल एकदम. तोंपासु.
पॉम्फ्रेट आवडत नसल्याने सुरमईच्या तुकड्या वापरून करून पाहीन नक्की.
वा ! मस्त . आमच्या घरी पण
वा ! मस्त . आमच्या घरी पण असेच करतात
तुम्ही कोकणकन्या का ?
तिरफळे की त्रिफळे?
तिरफळे की त्रिफळे?
तोपासू
तोपासू
मस्त दिसत आहे.
मस्त दिसत आहे.
दोन्ही प्रकार छान आहेत. मला
दोन्ही प्रकार छान आहेत. मला फिश फक्त सुपरमार्केट मधील फ्रीझर मध्ये मिळतात तेच माहीत आहेत. बांगडा तवा फ्रायची पण रेसीपी द्या. मध्यंतरी मागवले होते आम्ही. यम्मी टेस्ट. पाककृती गोव्याकडची वाट्ते. त्रिफळे वगिअरे मस्तच.
तोंपासू. करुन बघू. धन्यवाद...
तोंपासू. करुन बघू.
धन्यवाद...
मस्त दिसताहेत.
मस्त दिसताहेत.
मस्त फोटो! मी नेहमी करते
मस्त फोटो! मी नेहमी करते त्यापेक्षा वेगळी पाकृ! इथे मोठे पापलेट मिळण्याची शक्यता कमी आहे, फ्रोजन सुरमई मिळाली तर टोमॅटो वगळून या पद्धतीने करेन .
तिरफळे की त्रिफळे?>> तिरफळ. त्रिफळ वेग़ळे.
धन्यवाद स्वाती२
धन्यवाद स्वाती२
छान आहे
छान आहे
आमच्याकडे फ्रायसाठी जी वरायटी फिश असेल त्याप्रमाणे तांदूळपीठ सुद्धा वापरतात
शालीदा,च्रप्स ,sonalisl,जाई,
शालीदा,च्रप्स ,sonalisl,जाई, दत्तात्रय साळुंके,अमा,अमितव,स्वाती२,ऋतुज़ा
- प्रतिसादा बद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार.
अमा- पाककृती गोव्याकडची वाट्ते.
-कोकणातली पाककृती आहे, गोव्यामध्ये ही थोडीफार सेमच पद्धत आहे.
बांगडा तवा फ्रायची पण रेसीपी नक्की देते.
जाई-तुम्ही कोकणकन्या का ?
- होय बरोबर ओळखल.
ऋतुज़ा-आमच्याकडे फ्रायसाठी जी वरायटी फिश असेल त्याप्रमाणे तांदूळपीठ सुद्धा वापरतात.
- आमच्याकडे सुद्धा तांदूळपीठ किंवा रवा वापरतात, रव्या ने फ्राय करताना तेल जास्त लागत पण कुरकुरीत/झटपट फ्राय होते.
तांदूळपीठ ला तेल कमी लागत.
कबाली ,स्वाती२- तिरफळे की
कबाली ,स्वाती२- तिरफळे की त्रिफळे?
- तिरफळे की त्रिफळे दोन्ही शब्द बरोबर आहेत. स्वाती२ म्हणतात तस तिरफळ हे बरोबर असेल ही, त्याचा आकार तिरा सारखा असतो म्हणुन तिरफळ हे नाव. पण हा एक प्रादेशीक शब्द देखिल आहे. प्रादेशीक शब्दाचे उच्चार प्रदेशा नुसार बदलतात. जस कोकणाकडे खेड ते चिपळुण या परिसरात याला चिरफळ ( मध्ये चिरलेल असत म्हणुन) अस ही म्हणतात, तर पुढे गुहागर ते (माझ गाव) देवरुख, साखरपा ईथे त्रिफळ (थोड अतिच शुद्ध) असा उच्चार करतात. पुढे रत्नागिरी, सिन्धुदुर्ग कडे याला तिरफळ अस म्हणतात.
- त्रिफळा हे एक वेगळे औषधी फळ आहे.
( मा. बो. वर (प्रचि) इमेज छोटी करण्यासाठी काही सेटिंग असेल तर सांगा, खुप मोठ्या इमेज अपलोड होत आहेत.)
आंम्ही तिरफळा म्हणतव.. अन
आंम्ही तिरफळा म्हणतव.. अन इतकी लसुण? २-३ तुकडे बस्स.. टोमॅटॉ नकोच त्यापेक्षा २-४ कोकम टाकायची..कैरीचा मौसम असेल तर बाट टाकायची अन कैरीचे छोटे तुकडे करुन..मस्त लागते माशाचे सार.. सुकी मिरची असली तर अजुन वरुन मसाला नको.. अन हे वाटण म्हणजेच धने, मिरची भाजायची नाहि अशीच वाटायची... तिरफळं वाटणात वाटायची.. फोडणीत नाहि... कढिपत्ता नाहि वापरत माश्याच्या साराला.. कांद्याची फोडणी चालते..
भावना दी -
भावना दी - प्रतिसादा बद्दल थॅक्स.
अन इतकी लसुण?कढिपत्ता नाहि वापरत माश्याच्या साराला.
-हो. या पद्धतीने रेसिपी केल्यावरच इतकी लसुण का याच उत्तर सापडत.
- तुम्ही कदाचित वेगळ्या पद्धतीने रेसिपी करत असाल, ही माझी पद्धत आहे.
प्रत्येकाची पद्धत सारखीच नसते.
- आम्ही कढिपत्ता वापरतो.
- मापुसाला माझी मावशी रहाते ती तुमच्या पद्धतीने नदी मध्ये मिळणार्या माशांच तिखल करते.
सिम्पली वॉव.. या विकेंडला
सिम्पली वॉव.. या विकेंडला करणार म्हणजे करणार..!
सिद्धी, मी पण सेम ह्याच
सिद्धी, मी पण सेम ह्याच रेसेपिने बनवते फिश, फक्त ओलं खोबर्याऐवजी सुकं खोबरं वापरते आणि मच्छीत लसुण मला लागतोच जास्त, त्याचा फ्लेवर मस्त येतो.
भावनाताई आणि सिद्धि तुम्ही
भावनाताई आणि सिद्धि तुम्ही आपापल्या पद्धतीने फिश करी करा आणि मला जेवायला बोलवा. मी अगदी निःपक्षपातीपणे सांगेन कोणती करी चविष्ट झाली होती ते.
DJ..,Swara@1- थॅक्स.
DJ..,Swara@1- थॅक्स.
भावनाताई आणि सिद्धि तुम्ही आपापल्या पद्धतीने फिश करी करा आणि मला जेवायला बोलवा.
- शालीदा most welcome. anytime, फिश मर्केट जवळच आहे.
शाली .. तुमचं स्वागत
शाली .. तुमचं स्वागत
गजालीकरांचं एकदा (तसं बरेचदा) जीटीजी झालं होतं तेव्हा मस्त मालवणी मेनु होते..
भावना दी पुन्हा गजालीकरांचं
भावना दी पुन्हा गजालीकरांचं जीटीजी झालं तर मला पण बोलवा ह.
तिरफळ हे मूळ त्रिफलच. ते तीन
तिरफळ हे मूळ त्रिफलच. ते तीन भागांत फुटते/ उघडते. काही ठिकाणी तेफळ, तेफ्फळ असेही म्हटले जाते. फार पूर्वी हे तिखट किंवा मिरमिरीतपणासाठी वापरीत असत.
त्रिफलाचूर्णातली तीन फळे वेगळी. आवळा, बेहडा आणि हिरडा/ हरडा यांचे चूर्ण करतात. ते पाचक असते. ही तीन फळे वेगवेगळीही औषधी उपयोगाची असतात.
>>>>>भावनाताई आणि सिद्धि
>>>>>भावनाताई आणि सिद्धि तुम्ही आपापल्या पद्धतीने फिश करी करा आणि मला जेवायला बोलवा. मी अगदी निःपक्षपातीपणे सांगेन कोणती करी चविष्ट झाली होती ते.
Wink Wink<<<<<
@शाली तुम्ही संकोची आणि लाजर्याबुजर्या स्वभावाचे असल्यामुळे मला नेणार असालंच...
बादवे : छान रेसिपी...
भावना दी पुन्हा गजालीकरांचं
भावना दी पुन्हा गजालीकरांचं जीटीजी झालं तर मला पण बोलवा ह.>> हो नक्की सिध्दी... अगं आमचे सगळे गजालीकर माबोवरुन गायबलेत.. अगोदर भरपुर गजाली मारायचे.. आता व्हॉटसअप वर मारतात गजाली.. ठरलं तर नक्की बोलावेन
मसाल्याचे ताट आणि शेवटचा फिश
मसाल्याचे ताट आणि शेवटचा फिश करीचा फोटो दोन्ही सुंदर दिसते आहे.
मी फिश करत नाही शक्यतो पण हे करून पाहीन. टोमॅटो वगळून.
वेगळी असली तरी मस्त रेसिपी.
वेगळी असली तरी मस्त रेसिपी.
आमच्याकडे बांगडा,सुरमई,हलवा इ.माशांच्या आमटीत तिरफळे घालतात.पापलेट हा राजस मासा,त्याच्या आमटीत नाही कधी घातली.यावेळी तिरफळे घालून पाहीन.
हीरा,निरु,भावना गोवेकर,वैशाली
हीरा,निरु,भावना गोवेकर,वैशाली हरिहर,देवकी-
सगळ्यांना धन्यवाद.
निरु- तुम्हीही केव्हा ही या.
देवकी -बांगडा,सुरमई,हलवा,रावस ची या पद्धतीने छान करी होते.
पापलेट ची फ्राय छान होते, पण ईथे अंधेरी मध्ये पापलेट छान मिळतात. ताजे अन मोठे म्हणुन मी शेवटला असणार्या शेपटी कडील भागाची एकदा करी ट्राय केली. अन टेस्ट सगळ्यांना आवडल्याने आता दर रविवारी ही करी बनवते.
Pages